Rohit Pawar on Ajit pawar Baramati Plane Crash : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा घातपात असल्याची शंका व्यक्त, करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे प्रकरण उचलून धरलं आणि एफआयआर दाखल करून घेण्यासाठी थेट बारामती गाठली. जिथं दोन तास पोलिसांची चर्चा केल्यानंतर एफआयआर दाखल का करून घेता येणार नाही, पोलिसांनी यावर कोणती भूमिका मांडली, याबाबत खंत व्यक्त करणारी भूमिका माध्यमांशी संवाद साधताना मांडली. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले रोहित पवार?

‘दोन दिवसांपूर्वी डीजीसीएकडून एक अहवाल आला, 24 फेब्रुवारीचा हा अहवाल असून. बुधवार, 25 फेब्रुवारी 2026 ला आम्ही पदाधिकारी, समर्थकांसह मरीन ड्राईव पोलीस स्टेशनला एफआईआर दाखल करायला गेलो होतो. पण काहींनी शंका उपस्थित करत, मी मुंबईला एफआयआर करू शकतो असा प्रश्न उपस्थित केला. झिरो एफआयआर कॉन्सेप्टअंतर्गत ही एफआयआर दाख करता येऊ शकते. मुंबईत हे शक्य होतं पण ते स्वीकारलं नाही, म्हणून आज आम्ही बारामती पोलीस स्टेशन ला आलोय’, असं सांगत कायद्यातील कलम आणि कायद्यांचा दाखला देत रोहित पवार यांनी तक्रार करण्याचा आपला अधिकार असल्याचं स्पष्ट केलं. 

डिजीसीए रिपोर्टनुसारच व्हीएसआर विमान कंपनीवर ठपका ठेवला गेलाय असं सांगत त्याच आधारे आम्ही एफआईआर दाखल करण्याचा आग्रह धरतोय असं ते म्हणाले. ‘दादा ज्या विमानानं बारामतीला गेले ते लेअर जेट प्रकारातलं होतं हे विमान नॉन कम्लायन्स होतं मग तरीही अजित दादांना खराब असलेलं विमान का दिलं? असा आमचा सवाल हे म्हणूनच आम्ही या गलथान कारभाराला जबाबदार असलेल्या व्हिएसआर कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे हाच मुद्दा त्यांनी सातत्यानं उपस्थित केला. 

पाचही विमान ग्राऊंड, मग अजित पवारांना बिघाड झालेलं विमान दिलेलं?

24 तारखेच्या डीजीसीएच्या आदेशानुसार व्हीएसआरचे पाचही विमान ग्राऊंड करत त्यांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली. नॉन कम्लायन्स कंपनीनं मान्य केला मग, मी पोलिसांसमोर हा प्रश्न केला की , पाचही विमानं ग्राऊंड करतात तर, अजित पवारांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिसं गेलं की मुद्दाम? यासाठीचाच एफआयआर करण्यासाठी आलेलो. जो व्हीएसआर कंपनीच्या मालकांविरोधातील असेल. मात्र, अजित पवारांचं विमान चांगल्या स्थितीत आहे, या अहवालावर कोणी सह्या केल्या? त्यांना शोधा अशी मागणी करणारा दुसरा एफआयआर आम्ही करणार होतो. विमान कोणतं द्यावं, ते उडण्यास सक्षम आहे की नाही, दृश्यमानता आहे की नाही इथपासून इतर सर्व गोष्टींची जबाबदारी आहे Arrow नावाच्या कंपनीकडे. एका व्हॉट्सअप चॅटनुसार एका पवार नावाच्या इसमानं हवामान योग्य असल्याचं म्हटलं आणि त्यानंतर दादांच्या पीएनं दादांना सांगितल्यानंतर ते कारमधून विमानात बसले. या कंपनीवर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report

‘कायदेशीर सल्ला घेऊन एफआयआर दाखल करायचा की नाही ते सांगू. अॅक्सिडेंट रिपोर्ट फाईल झाल्यामुळं एफआयआर दाखल करता येणार नाही असं पोलीस सांगत आहेत’ असं म्हणताना दादांच्या अपघाताचा फक्त Accident Report झाला आहे, मात्र यातील गुन्हेगारी दृष्टीकोनाचं काय? असा सवाल रोहित पवारांनी केला. आपला अधिकारच इथं नाकारला जात असल्याचा नाराजीचा तीव्र सूर त्यांनी आळवला. कबुतरं चोरीला गेल्याचा एफआयआर होतो आणि अपघाताचा एफआयआर का नाही, असं म्हणताना रोहित पवारांनी कातरत्या पण तितक्याच आक्रोशानं शासनावर ताशेरे ओढले. आम्ही मांडलेले मुद्दे चुकीचे असतील तर जेलमध्ये टाका… पण, कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न होतोय का?’ असं म्हणत रोहित पवारांनी उपस्थित केले उद्विग्न प्रश्न. 

आमचा हक्क का नाकारला जातोय?

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार सर्व नागरिकांना एफआयआर  दाखल करण्याचा अधिकार आहे मग तरीही आमचा हक्क का नाकारला जातोय असाच उद्विग्न प्रश्न त्यांनी पस्थित करत विमानासंदर्भातील माहिती ज्या Whats App चॅटमध्ये होते हे चॅट आहे आपण आधीच दाखवले असून, त्या ग्रुपमध्ये काही मोठे अधिकारी होते असं सांगत अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं हा अपघात झाला आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशीही एफआयआर आम्ही करण्याची मागणी धरली असल्याचं रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. मात्र पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर मिळालेला नकार हा त्यांच्या संतापात भर टाकताना दिसला. 

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp