Bhandara Theft Case: भंडाऱ्याच्या गोबरवाहीमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी प्रमोद आणि कुणाल भोरगडे यांची नावे संशयित म्हणून तक्रारीत नमूद करण्यात आली होती. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने ‘संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?’ असा प्रश्न AIला विचारला. हीच सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावला. दरम्यान, संशयित आरोपीने पोलीसांनी त्याला गंभीर मारहाणा केल्याचा आरोप केला आहे. काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घ्या. 

Add Zee News as a Preferred Source

 

नेमकी घटना काय घडली?

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत 15 फेब्रुवारी रोजी खंदाळ येथील रहिवासी विजय भोरगडे यांच्या घरी चोरी झाली. त्यांनी याची तक्रार गोबरवाही पोलिसात दिली. या चोरीचा संशय घेत त्यांनी गावातील तिघांचा नाव घेतलं. त्यात प्रमोद बोरघरे, व कुणाल बोरघरे यांची नावे तक्रारीत नमूद झाली. स्वतःचे नाव संशयित म्हणून आल्यानंतर घाबरलेल्या कुणालने ‘संशयित आरोपी असल्यास बचाव कसा करावा?’ असा प्रश्न गुगलवर शोधला. ही सर्च हिस्टरी पोलिसांच्या हाती लागल्याने संशय अधिकच बळावला. 

 

पोलीसांवर गंभीर मारहाण केल्याचा आरोप 

चौकशीसाठी ताब्यात घेताना मोबाईल जप्त करण्यात आला. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कुणाल याला ताब्यात घेतले व भंडारा येथे आणून मारहाण केल्याने हात फ्रॅक्चर झाल्याचा दावा त्याने पत्रकार परिषदेत केला. हाताला गंभीर दुखापत झाली असून शरीरावरही मारहाणीच्या खुणा असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांच्या नाकात काहीतरी टाकून त्रास दिला व जबरदस्तीने कबुली देण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी कोणताही गुन्हा नोंद नसतानाही मारहाण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

AIला कोणते प्रश्न विचारणे टाळावे? 

1. स्फोटक किंवा बेकायदेशीर गोष्टींची निर्मिती: कोणतेही जबाबदार एआय तुम्हाला बेकायदेशीर कृत्यांमध्ये मदत करणार नाही. स्फोटके किंवा विष, ड्रग्स कसे तयार करायचे? असे प्रश्न विचारल्याने तुमचे अकाउंट बॅन होऊ शकते. 

2. अनेकदा लोक गंमत म्हणून असे प्रश्न एआयला विचारतात पण त्याने दिलेली माहिती चुकीची असू शकते. त्या माहितीच्या आधारे एखाद्या घातक रसायनाचे मिश्रण चुकीचे झाल्यास, तुम्ही त्याचे सेवन केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. 

3. तसेच जर एखाद्या वापरकर्त्याने वारंवार असे घातक प्रश्न विचारले तर, एआय सिस्टीम त्याला फ्लॅग करते. यामुळे अकाउंट कायमचे बंद होऊ शकते किंवा कायदेशीर कारवाईची शक्यता निर्माण होऊ शकते. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp