24 Year Old Woman End Her Life In Mumbai: मुंबईमधील नामांकित वस्तीमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील अँटॉप हिल भागात राहणाऱ्या एका तरुणीने प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास लावून घेतल्याची घटना घडली आहे. मयत तरुणीचं नाव स्तुती सोनावणे असं असून या प्रकरणामध्ये हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. या तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

सहा पानांची सुसाईड नोट

24 वर्षीय स्तुती नवी मुंबईतल्या एका डेंटल मेडिकल कॉलेजमध्ये एमडीएसचं शिक्षण घेत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना स्तुतीच्या आत्महत्येसंदर्भात फोनवरुन माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली असला तिने ओढणीने गळफास लावून स्वत:ला संपवल्याचं घटनास्थळावरील परिस्थितीवरुन स्पष्ट झालं. या ठिकाणी पोलिसांना सहा पानांची सुसाईड नोटही मिळाली. या सुसाईड नोटमध्ये स्तुतीने तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केला आहेत. प्रियकराचं नाव फजल मोहम्मद खान असल्याचं तिने चिठ्ठीत नमूद केलं आहे. फजल माझा छळ करायचा आणि माझ्या चारित्र्यावर संशय घ्यायचा असं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख

सुसाईड नोटमध्ये स्तुतीने, बॉयफ्रेंड फझल मोहम्मद खान हा नेहमी माझ्यावर गंभीर आरोप करायचा. चारित्र्यावर संशय घ्यायचा, असं म्हटलं आहे. स्तुतीने एकदा तिला प्रियकराने श्रद्धा वालकर प्रकरणाचा संदर्भ देत धमकावल्याचंही म्हटलं आहे. 18 मे 2022 रोजी श्रद्धा वालकरची तिच्या प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली होती. या प्रकरणामुळे सगळा देश हादरला होता. श्रद्धाची हत्या तिचा प्रियकर आफताब पूनावालाने केली होती. तिच्या मृतदेहाचे तुकडे त्याने घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तो मृदेहाचा एक एक तुकडा फेकून देत पुरावा नष्ट करत होता. श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे पोलिसांना फ्रिजमध्ये मिळाले होते. याच प्रकरणाचा उल्लेखही स्तुतीने सुसाईड नोटमध्ये करत आपलंही असं होईल अशी चेष्टा आपले मित्र-मैत्रिणीही मस्करीत म्हणायचे असा उल्लेख चिठ्ठीत असल्याचं वृत्त ‘द ट्रेब्यून’ने दिलं आहे.

आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणात फझल मोहम्मद खान या 31 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. सोमवारी, 9 मार्चला स्तुतीने आत्महत्या केली. फझल मोहम्मद आणि स्तुती यांची ओळख एका डेटिंग अॅपवरुन झाली होती. मागच्या एक वर्षापासून या दोघांचे प्रेमसंबंध होते. पण फझल तिला कायम त्रास देत होता आणि तिच्यावर संशय घेत होता, या प्रकरणात आता त्याची चौकशी सुरु आहे. अँटॉप हिल पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे बॉयफ्रेंडची भूमिका नेमकी काय होती त्याचा तपास सुरु केला आहे. तसंच तिच्या कुटुंबाशी आणि मित्र परिवाराशी चौकशी करणं आणि त्यांचे जबाब नोंदवणं ही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 

‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील’

स्तुती तिच्या आई वडिलांसह अँटॉप हिल भागात राहायची. 9 मार्चला सकाळी 11 वाजेपर्यंत स्तुती तिच्या खोलीतून बाहेर पडली नाही. अर्धा दिवस उलटून गेला तरी मुलगी बाहेर का येत नाही या विचाराने घरच्यांनी आधी दार ठोठवलं पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा तोडण्यात आला तेव्हा स्तुतीने गळफास लावून घेतल्याचं समोर आलं. तिला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. स्तुतीने असंही लिहून ठेवलं आहे की तिच्या बॉयफ्रेंडकडून तिला जो त्रास दिला जात होता आणि छळ केला जात होता ते सगळे प्रकार तिच्या मित्र-मैत्रिणींना माहीत होते. ते तिला ‘एक दिवस तू फ्रिजमध्ये सापडशील’ असं चिडवायचे. आता अशाप्रकारे चिवडण्यामागे फझलने खरोखर तिला अशी काही धमकी दिली होती का याबद्दलचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी स्तुतीच्या मित्रमैत्रीणींचीही चौकशी सुरु केली आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp