Central Railway Special train From Pune Mumbai : उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येतात. यामुळे या मर्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. मध्य रेल्वेना प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहेत. मुंबई पुण्यातून उत्तर प्रदेशच्या गोरखपूर/दानापूर मार्गावर 176 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेने या स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जारी केले आहे.  

Add Zee News as a Preferred Source

प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे (CR) मुंबई/पुणे ते गोरखपूर/दानापूर दरम्यान विशेष शुल्कात 176 विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील दादर, CSMT, LTT या स्थानकांसह पुणे रेल्वे स्थानाकातून दैनंदिन या रेल्वे धावणार आहेत. 

176 स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक

1 सीएसएमटी मुंबई-गोरखपूर-सीएसएमटी दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१०७९ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज रात्री २२:३० वाजता सीएसएमटीहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:०० वाजता गोरखपूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१०८० विशेष गाडी १२.०३.२०२६ ते ०२.०४.२०२६ पर्यंत दररोज दुपारी २.३० वाजता गोरखपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता सीएसएमटीला पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
रचना: १ एसी-२ टायर, ६ एसी-३ टायर, ९ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
2 LTT-दानापूर-LTT दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०११४३ विशेष ट्रेन १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज सकाळी १०.३० वाजता एलटीटी येथून धावेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ६.४५ वाजता दानापूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०११४४ विशेष गाडी ११.०३.२०२६ ते ०१.०४.२०२६ पर्यंत दररोज रात्री २१:३० वाजता दानापूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ७:४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: १ एसी-२ टायर, ६ एसी-३ टायर, ९ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
3 पुणे-गोरखपूर-पुणे दैनिक विशेष (44 फेऱ्या)
ट्रेन क्रमांक ०१४१५ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज सकाळी ०६.५० वाजता पुणे येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०० वाजता गोरखपूरला पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१४१६ विशेष ट्रेन ११.०३.२०२६ ते ०१.०४.२०२६ पर्यंत दररोज ५:३० वाजता गोरखपूरहून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०३:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दौंड चोर केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
रचना: १ एसी-२ टायर, ५ एसी-३ टायर, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन
4 पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (44 फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१४४९ विशेष गाडी १०.०३.२०२६ ते ३१.०३.२०२६ पर्यंत दररोज १५:३० वाजता पुणे येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:४५ वाजता दानापूर येथे पोहोचेल. (२२ सेवा)
ट्रेन क्रमांक ०१४५० विशेष गाडी १२.०३.२०२६ ते ०२.०४.२०२६ पर्यंत दररोज सकाळी ०५:०० वाजता दानापूरहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी १८:१५ वाजता पुणे येथे पोहोचेल. (२२ सेवा)
थांबे: दौंड चोर केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
रचना: १ एसी २-टायर, ५ एसी ३-टायर, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन

आरक्षण: वर नमूद केलेल्या विशेष  ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवरुन करता येईस. अनारक्षित डबे सामान्य शुल्कात UTS प्रणालीद्वारे बुक करता येतात. प्रवासी तिकीट बुकिंगसाठी RailOne अॅप देखील डाउनलोड करू शकतात.
या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp