Nanded fake Baba Exploitation: नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातचे काळे कारनामे उजेडात आले आहेत. महिलांना आपल्या कॅबिनमध्ये बोलावून त्यांचे शोषण करायचा. याचे व्हिडीओ फुटेजच व्हायरल झाले. याप्रकणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणा दिवसेंदिवस अधिकाधिक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान नाशिकनंतर आता नांदेडमधून आणखी एका भोंदू बाबाचे कारनामे समोर आले आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

कोण आहे हा नवा महाराज?

नांदेड शहरातील एका मठात राहणाऱ्या 39 वर्षीय हरिगिरी दत्तगिरी महाराज यांच्यावर गंभीर आरोप आहेत. हा महाराज मठात येणाऱ्या स्त्रियांना धार्मिक सल्ला देतात असे भासवत होते. पण खरे चित्र वेगळे होते. एका 46 वर्षीय विधवा महिलेला त्यांने लक्ष्य केले. महिला मठात मदत मागायला आली होती, पण महाराजांनी तिच्यावर विश्वास बसवला.

लग्नाचे आमिष आणि तीन वेळा अत्याचार

जुलै 2025 पासून कथित महाराज महिलेला सतत ‘तुझ्याशी लग्न करेन’ असे म्हणत होता. याच आमिषाखाली त्यांने तीन वेळा तिचे शोषण केले. महिला एकटी विधवा होती, त्यामुळे तिने विश्वास ठेवला. पण नंतर तिला आपण फसल्याचे कळले. दुखावलेल्या महिलेनं धैर्य दाखवले आणि पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या तक्रारीत सर्व तपशील स्पष्ट आहे.

पोलिसांची त्वरित कारवाई

भाग्यनगर पोलीस ठाण्यात हरिगिरी दत्तगिरी महाराज याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी लगेच महाराजांना अटक केली. सध्या तो कोठडीत आहे. या प्रकरणात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अशोक खरात प्रकरणात जसे व्हिडिओ आले, तसे येथेही पुरावे मिळण्याची शक्यता आहे. पोलिस म्हणतात, ‘कोणतीही भोंदूगिरी आम्ही खपवणार नाही.’

जनतेत संताप, सावधानतेचा इशारा

दोन्ही प्रकरणे एकाच वेळी समोर आल्याने जनतेत मोठा संताप आहे. लोक म्हणतात, ‘मठ-मंदिरातही सुरक्षितता नाही का?’ महिला संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी सरकारला कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अशा भोंदू बाबांना ओळखण्यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे सांगितले जाते. महिलांनी अशा ठिकाणी एकटे जाऊ नये, कुटुंबासोबत जावे असे सल्ले दिले जात आहेत. हे प्रकरण आता न्यायालयात जाणार असून, भोंदू बाबांच्या कारनाम्यांना लगाम बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

अशोक खरातची चौकशी सुरु 

भोंदू बाबा अशोक खरातची सात तास सलग चौकशी केल्यानंतर आता एसआयटीच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते इतर लोकांकडे आपली चौकशी सुरू करणार आहेत… एका महिलेच्या तक्रारीसोबत अनेक महिलांच्या तक्रारी याव्यात यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न आहे. प्रत्येक महिलेला दूरध्वनी करून तक्रार करण्याची विनंती केली जात आहे.सध्या खरातने केलेले पूजा विधी, अघोरी प्रक्रिया, त्याची पद्धत, कामाख्या मंदिरातील बळी पूजा, अनुभद्र पूजा आणि इतर पूजांबाबत त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp