विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर, झी 24 तास
Maharashtra Condom Factory : अमेरिका इस्त्रायल आणि इराण युद्धाचा मोठा फटका भारताला बसला आहे. कच्च्या तेलाची निर्यात कमी झाल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात आला आहे. तरस अनेक उद्योगांना देखील याचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील 6 मोठ्या कंडोम निर्मिती कंपन्यांना युद्धाचा फटका बसला आहे. यामुळे कंडोमचे दर वाढणार आहे. तर, निर्यात ही मंदावणार आहे.
ऑटोमोबाइल प्रमाणे संभाजी नगर कंडोम उत्पादनात ही अग्रेसर आहे, एकूण 6 कंपन्यांद्वारे उत्पादन होते, मात्र युद्धाचा परिणाम आयात निर्यातीवर झाला आणि या कंपन्यांना सुद्धा फटका बसलाय, कच्चा मालाचे भाव वाढल्याने याचा परिणाम कंडोम चे दर वाढण्यावर ही होऊ शकेल असे चित्र आहे..
युद्धाचे परिणाम सर्वच स्तरावर होत आहेत, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज वसाहतीत कंडोम उत्पादन करणारे 6 उद्योग आहेत यांनाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, कंडोम साठी लागणारा कच्चा माल युरोप सह आखाती देशा पलीकडून येतो मात्र होमुर्ज समुद्रधुनी मूळ शिपिंग बंद आहे परिणामी माल अडकला, त्यामुळं उपलब्ध मालाचे दर गगनाला भिडले आहेत.
Lubricants (silicon oil 50 टक्के दर वाढले), अल्युमिनीम फॉईल 3 लेअर — 35 टक्के दर वाढले, पॅकेजिंग मटेरियल 15 टक्के दर वाढले, तर लॅटेक्सचे दर 27 टक्क्यांनी वाढले आहेत. दर वाढूनही माल म्हणावा तसा मिळत नाहीय, त्यामुळं घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे शक्य होत नाही. त्यामुळं उद्योग चांगलाच अडचणीत आल्याचं कंपनी कर्मचारी सांगत आहेत. महत्वाचं म्हणजे कच्चा माल आयात कमी होतोय त्यामुळं इथून 38 देशांना निर्यात होतेय त्यावर सुद्धा नियंत्रण आल्याचं कंपनी व्यवस्थापक सांगतात. तर, याच कंपनीत देश अंतर्गत 50 वर ब्रँड साठी उत्पादन होते. त्यावरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळं उद्योग प्रचंड अडचणीतून जातोय असे सांगण्यात येत आहे. एकीकडे कच्चा माल दर वाढले असल्याने किमतीवर परिणाम होणार, तर दुरीकडे माल मिळाला नाही तर थेट उपलब्धतेवर ही परिणाम होईल असे चित्र आहे त्यामुळं आता कंडोम उद्योग ही युद्धा मुळे धोक्यात आले आहे.