Sanjay Raut On India Lockdown : मागील काही दिवसांपासून भारतात लॉकडाऊन या शब्दानं एक प्रकारे भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. इंधन तुटवड्याच्या समस्येशी जवळपास निम्मं जग सामना करत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्याचसंदर्भातील सूचक विधान केलं. खरात प्रकरणापासून देशातील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या तीन लीटर पेट्रोलच्या मुद्द्यापर्यंत महत्त्वाच्या मुद्दयांवर त्यांनी आपली भूमिका मांडली. 

Add Zee News as a Preferred Source

भारतात लॉकडाऊनची शक्यता? 

शुक्रवार, 27 मार्च 2026 ला माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यास उशीर केला असा निशाणाही राऊतांनी साधला. लॉकडाऊनची शक्यता आणि चर्चा सुरु असल्याचं पाहता ही शक्यता राऊतांनी नाकारली नाही. ज्या पद्धतीनं देशात सध्या सरकारच्या एकंदर हालचाली सुरू आहेत त्या, पाहता पंतप्रधान मोदी पेट्रोल आणि डिझेलची बचत करण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा लॉकडाऊन लावू शकतात असं विधान राऊतांनी केलं. ‘मोदींच्या मनात असे विचार येतच असतात’, या त्यांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. 

‘आपण देशाचे नेते आहात, पक्ष किंवा कोणत्या राज्याचे नाही’

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना देशातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे असं राऊत म्हणाले. ही परिस्थिती पंतप्रधान मोदी यांच्या हातातून बाहेर जाताना दिसत आहे. ‘लोकांना आता रॉकेलच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे. मोदींनी आम्हाला परत रॉकेलच्या रांगेत आणलं. 50 वर्षांपूर्वीची जी परिस्थिती होती जेव्हा धान्य आणि रॉकेलच्या रांगा लावाव्या लागत होत्या त्याच रॉकेलच्या रांगेमध्ये मोदींनी मोदींनी देशाला, जनतेला उभे केले. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार आहे कारण प्रधानमंत्री मोदींच्या काळात भारताला एकही मित्र (राष्ट्र) नाही. शेजारच्या राष्ट्रातही मित्र नाही आणि बाहेरही नाही जे. मित्र होते ते आपण गमावले. अशा वेळेला मोदींना राजांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलावं लागत आहे. मात्र, या चर्चेसाठी सत्तावीस दिवस का लागले?’ असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. 

ज्या दिवशी युद्ध सुरू झालं त्या दिवशी परिस्थिती हाताबाहेर गेली, ती क्षणोक्षणी बिघडत गेली तेव्हाच त्यांनी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवणं अपेक्षित होतं. त्या बैठकीला त्यांनी स्वतः उपस्थित राहिला हवं होतं. त्यानंतर राज्याचे सर्व मुख्यमंत्री याशिवाय राज्याराज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री त्यांनाही मार्गदर्शन करण्याची आवश्यकता होती. आपण देशाचे नेते आहात आपण एका राज्याचे किंवा एका पक्षाचे पंतप्रधान नाही आहात मोदीजी, असा खोचक टोला लगावत आज तुम्ही देशाला रॉकेलच्या रांगेत उभं करून मुख्यमंत्र्याशी चर्चा करत आहात, त्यामुळं बघू या चर्चेमध्ये काय निष्पन्न होतं असा कटाक्ष राऊतांनी टाकला. 

तीन लिटर केरोसीन, अंधभक्तांसाठी तीर्थ…

‘तीन लीटर केरोसीन वाटपावर टीका करून उपयोग काय? टीका कोण करणार? अंधभक्त टीका करणार नाहीत तीन लिटर रॉकेल हा त्यांच्यासाठी तीर्थच आहे. मोदी ते लेटर रॉकेल देत आहेत हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचे तीर्थ आहे पण या देशातील सामान्य गोरगरीब जनता मध्यवर्ती जनता यांना देखील तीन लिटर रॉकेलवर निर्वाह करावा लागत असेल तर देशावरती ही परिस्थिती आणि अवकाळा फक्त मोदी राज्यामुळे आणि मोदींच्या चुकलेल्या नियोजनामुळे नेतृत्वहीन कारभारामुळे आली आहे’, असा घणाघात राऊतांनी केला. 

लॉकडाऊनच्या चर्चा आणि दिशेवर राऊत थेटच म्हणाले… 

आता खरात तुरुंगामध्ये आहे त्यामुळं आपल्या राजाच्या मुख्यमंत्र्यांनी आता दुसरे कोण बुवा महाराज असतील तर राज्यामध्ये काय चाललं आहे समजून घ्यावं, सरकारला हात असेल तर सरकारचा हात दाखवून घ्यावा, अशा शब्दांत निशाणा साधला.

देशात ठिकठिकाणी अस्वस्थता असून, देशभरामध्ये लोक रॉकेलच्या रांगेच उभे आहेत आणि मोदींनी ही भीती जास्त निर्माण केली आहे असं म्हणत तुम्ही रॉकेलची तुंग काढल्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाल्याची बाब अधोरेखित केली. तुम्ही पेट्रोल आणणार कुठून? चीन सारख्या देशांमध्ये फ्रान्स सारख्या देशांमध्ये साधारण चार महिन्याचा साठा आहे पेट्रोल आणि डिझेलचा. मात्र या क्षणी आणि आपल्याकडे एक आठवड्याचाही साठा उरलेला नाही ही माझी माहिती आहे. परिणामी आता तुम्ही जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगायला पाहिजे असं आवाहन सत्ताधाऱ्यांना केलं. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp