IAS Officer Tukaram Mundhe Story: महाराष्ट्र सरकाराने प्रशानात मोठे फेरबदल केले आहेत. एकावेळी 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. ही बदली प्रक्रिया चर्चेत आली आहे ती सनदी अधिकारी तुकाराम मुंढे ( IAS Tukaram Mundhe) यांच्यामुळे. 21 वर्षात मुंढेंची 24वी बदली आहे. मुंढे आता आपत्ती व्यवस्थापन विभागात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. महसूल आणि वनविभागाचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 21 वर्षांच्या सेवेत 24 वेळा बदली झाली आहे. जाणून घेऊया तुकाराम मुंढे कोण आहेत
IAS अधिकारी तुकाराम मुंढे कोण आहेत?
तुकाराम मुंडे हे महाराष्ट्र केडरचे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 3 जून 1975 रोजी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्या गावात झाला. ते वंजारी समाजाचे आहेत, जो समाज ओबीसी प्रवर्गात येतो. तुकाराम मुंढे यांनी 1996 मध्ये इतिहासात बीए पदवी मिळवली. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांनी राज्यशास्त्रात एमए पदवी मिळवली. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. ते पहिल्या प्रयत्नात अयशस्वी झाले, पण त्यांनी कधीही हार मानली नाही. अखेरीस 2005 मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि ते यूपीएससी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनले. त्यांची पहिली नियुक्ती सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून झाली, जिथे त्यांनी अवैध दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकून खळबळ उडवून दिली होती.
तुकाराम मुंडे हे एक हुशार आणि प्रामाणिक अधिकारी मानले जातात. त्यामुळेच त्यांच्या कार्यशैलीचे सामान्य जनतेकडून कौतुक केले जाते, परंतु कर्मचाऱ्यांवरील त्यांची कडक शिस्त आणि काही राजकारण्यांशी असलेले त्यांचे संघर्ष हे सर्वश्रुत आहे.
21वर्षात तुकाराम मुंढे यांची २४ वेळा बदली
ऑगस्ट 2005 – प्रशिक्षणार्थी, उपजिल्हाधिकारी सोलापूर.
सप्टेंबर 2007 – उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग.
जानेवारी 2008 – सीईओ, जिल्हा परिषद नागपूर.
मार्च 2009 – आयुक्त, आदिवासी विभाग.
जुलै 2009 – सीईओ, वाशिम.
जून 2010 – सीईओ, कल्याण.
जून 2011 – जिल्हाधिकारी, जालना.
सप्टेंबर 2012 – विक्रीकर सहआयुक्त मुंबई.
नोव्हेंबर 2014 – सोलापूर जिल्हाधिकारी.
मे 2016 – आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
मार्च 2017 – मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे.
फेब्रुवारी 2018 – आयुक्त, नाशिक महापालिका.
नोव्हेंबर 2018 – सहसचिव, नियोजन.
डिसेंबर 2018 – प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई.
जानेवारी 2020 – आयुक्त, नागपूर महापालिका.
ऑगस्ट 2020 – सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई.
जानेवारी 2021 – राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत.
सप्टेंबर 2022 – आयुक्त आरोग्य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान.
एप्रिल 2023 – सचिव पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
जून 2023 – सचिव मराठी भाषा विभाग
जुलै 2023 -कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सचिव
जून 2024 – असंघटित कामगार विभाग
ऑगस्ट 2025 – दिव्यांग कल्याण विभाग
मार्च 2026 – आपत्ती व्यवस्थापन, महसूल आणि वन विभाग