Baramati Bypoll  Election Sunetra Pawar :   महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. बारामतीची  पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाहीअखेर काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे.  बारामतीत काँग्रेसकडून आकाश मोरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आकाशा मोरे सुनेत्रा पवारांविरोधात निवडणूक लढणार आहेत.  बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता मोठा ट्विस्ट आला आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. मात्र, ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि काँग्रेसनं निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानं राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या अडचणी वाढल्या आहेत, तसंच बिनविरोध निवडीसाठी सुनेत्रा पवारांची धावाधाव देखील सुरू केली.

Add Zee News as a Preferred Source

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेञा पवार यांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. पण, आता खूप उशीर झाला, आमची उमेदवार निवडीती प्रोसेस ऑलरेडी सुरूंय असं उत्कर काँग्रेसकडून देण्यात आल्याचे समजते. यामुळे बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध होण्याची आशा मावळली आहे. 
बारामतीतल्या पोटनिवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापायला लागल आहे.  काँग्रेसनं आपला उमेदवार जाहीर करत आकाश मोरे यांना मैदानात उतरवलंय.. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आता स्पष्ट झालं. सुनेत्रा पवार यांच्याविरोधात मोरे थेट टक्कर देणार आहेत.. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा जोरदार राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. स्थानिक पातळीवर जय पवारांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही सक्रिय झालेत.. त्यामुळे आता बारामतीमधे नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोण आहेत आकाश मोरे?

आकाश मोरे हे माजी आमदार तसेच विधान परिषदेचे सदस्य राहिलेले विजयराव मोरे यांचे चिरंजीव आहेत. स्थानिक पातळीवर त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याने त्यांना ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, 2014  साली आकाश मोरे यांनी काँग्रेसच्या ‘पंजा’ चिन्हावर निवडणूक लढवली होती.

सुनेत्रा पवारांविरोधात 17 उमेदवारी अर्ज दाखल

2024 विधानसभेत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार निवडणुकीच्या मैदानात होते, मात्र दादांच्या निधनानंतर पोटनिवडणूक न लढवण्याची भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली. दादांना श्रद्धांजली म्हणून निवडणूक लढणार नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. तर बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनील तटकरेंकडून देखील प्रयत्न सुरू झाले आहेत, मल्लिकार्जून खर्गेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी म्हटले मात्र, काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने  प्रयत्न फेल ठरल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होणारय, दरम्यान या निवडणुकीसाठी आतापर्यंत 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, सुनेत्रा पवार उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडणूकीची शक्यता धूसर होण्याची चिन्ह आहेत.

 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp