Jitendra Property Deal: मुंबई हे फक्त भरातातीलच नाही तर जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईत मालमत्तांचे अनेक मोठे व्यवहार होतात. हे मोठे व्यवहार नेहमीच चर्चेत येतात. यात निवासी मालमत्तांसह कर्मिशीयल मालमत्तांचा देखील समावेश असतो. अशातच मुंबईतील बालाजी IT पार्क ची डील चर्चेत आली आहे. मुंबईतील बालाजी IT पार्क 8,55,00,00,000 रुपयांना विकला आहे. या IT पार्कचा मालक प्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता 15,12,00,00,000 रुपयांच्या अफाट संपत्तीचा मालक आहे. जाणून घेऊया हा अभिनेता कोण आहे?
मुंबईतील बालाजी IT पार्क चा मालक दुसरा तिसरा कुणी नसून प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जितेंद्र कपूर आहे. जून 2025 मध्ये जितेंद्र यांनी एक मोठा व्यवहार केला. जितेंद्र यांनी मुंबईतील बालाजी IT पार्क 855 कोटी रुपयांना विकला आहे. विक्रेते पॅन्थिऑन बिल्डकॉन आणि तुषार इन्फ्रा डेव्हलपर्स या कंपन्या असून, त्या ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते जितेंद्र कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत.
जितेंद्र यांनी 855 कोटी रुपयांना हा IT पार्क विकला. जितेंद्रचा मुलगा, तुषार कपूर याने ही जमीन विकली. केवळ मुद्रांक शुल्कापोटी 8.96 कोटी रुपये आणि 30,000 रुपयांचे नोंदणी शुल्क भरण्यात आले.
जितेंद्र यांचा मुंबईतील IT पार्क कोणी विकत घेतला?
जितेंद्र कपूर यांचा बालाजी IT पार्क मुंबईतील अंधेरी परिसरात आहे. या IT पार्कमध्ये 3 इमारती आहेत. एकूण 9,664.68 चौ.मी भूखंडावर बालाजी आयटी पार्क आहे. नामांकित डेटा कंपनी एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने ही मालमत्ता खरेदी केली आहे. अंधेरी हा मुंबईतील सर्वात हायप्रोफाईल एरिया आहे. येथे अनेक बड्या कंपन्या तसेच हायप्रोफाईल व्यक्तींचा निवासस्थाने आहेत. यामुळे जितेंद्र कपूर यांचा बालाजी IT पार्कची डील ही सर्वात महागडी डील ठरली आहे. यापूर्वी एनटीटी डेटाची उपकंपनी असलेल्या एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडियाला जितेंद्र यांनी एक मोठी व्यावसायिक मालमत्ता 559.25 कोटी रुपयांना (अंदाजे ५६.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) विकली होती.
मुंबईत IT सेक्टर बूस्ट घेणार
जितेंद्र यांच्या बालाजी IT सेंटरचा हाव्यवहार भारताच्या वेगाने वाढणाऱ्या डेटा सेंटर क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. डिजिटल सेवा, क्लाउड कंप्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा-आधारित तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे भारतात डेटा सेंटर्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. बँकिंग, ई-कॉमर्स, टेलिकॉम आणि सरकारी संस्था यांसारखे उद्योग या मागणीला चालना देत आहेत. मुंबई, चेन्नई, बंगळूर आणि हैदराबाद यांसारखी शहरे त्यांच्या मजबूत डिजिटल कनेक्टिव्हिटी, भक्कम पायाभूत सुविधा आणि कुशल कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेमुळे प्रमुख डेटा सेंटर हब बनत आहेत. एनटीटी ग्लोबल ही एक प्रमुख जपानी कंपनी आहे. सकारात्मक सरकारी धोरणे, सुधारित वीजपुरवठा आणि परदेशी व देशांतर्गत गुंतवणूकदारांची वाढती रुची यांमुळेही या क्षेत्राला चालना मिळत आहे. हे सर्व घटक भारताला जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण स्थान मिळवून देत आहेत. जितेंद्र यांच्या कंपनीसोबत झालेला व्यवहार हा मुंबईच्या IT सेक्टर बूस्ट देणार आहे. एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया ही एक प्रमुख जपानी कंपनी आहे. जी डेटा सेंटर आणि क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर सेवा पुरवते. ही कंपनी सार्वजनिक आणि खाजगी क्लाउड सेवा, होस्टिंग, डेटा व्यवस्थापन, ॲप डेव्हलपमेंट, धोक्यांचे निरीक्षण, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क्स आणि चाचणी यांसारख्या सेवा देते. ही कंपनी जगभरातील ग्राहकांना सेवा देते.
जितेंद्र यांच्याकडे अफाट संपत्ती
जितेंद्र यांनी 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची मुलगी एकता कपूर छोट्या पडद्यावर अभिराज्य गाजवते. ती प्रसिद्धा निर्माता असून अनेक मालिका तिने काढल्या आहेत. बालाजी प्रॉडक्शन्स चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मालिकांची निर्मिती करते. त्यांचा मुलगा, तुषार कपूर, चित्रपट निर्मितीसोबतच कौटुंबिक व्यवसायही सांभाळतो. जितेंद्र यांची एकूण संपत्ती 1512 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.