Satyaki Savarkar On Swatantryaveer Title: पुणे विशेष न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधातील मानहानी खटल्याची सुनावणी झाली. या प्रकरणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची उलटतपासणी झाली. सात्यकी यांनी न्यायालयात अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले सात्यकी?

विनायक दामोदर सावरकर यांनी काही पुस्तके इतर लोकांच्या नावाने प्रसिद्ध केली होती, असे सात्यकी सावरकर यांनी कोर्टात स्पष्ट सांगितले. त्याचबरोबर काही पुस्तके इतर लेखकांनी सावरकरांच्या नावाने छापली असण्याची शक्यता त्यांनी पूर्णपणे नाकारली नाही. शिवाय सावरकरांच्या नावावर असलेल्या सर्व लेखन-प्रकाशनांबद्दल स्वतःला संपूर्ण माहिती नसल्याचेही त्यांनी मान्य केले. अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी राहुल गांधी यांच्या वतीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सात्यकी यांनी हे सगळे खुलासे केले.

ऐतिहासिक चर्चेला नवीन वळण

‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी सरकारने दिलेली नाही, हे सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात कबूल केले. त्यांनी सांगितले की, ‘ही पदवी जनतेकडून लोकप्रिय झाली असावी. पण याबाबत कोणताही सरकारी किंवा अधिकृत कागदपत्री पुरावा उपलब्ध नाहीट, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कबुलीने ऐतिहासिक चर्चेला नवीन वळण मिळाले आहे.

पदवी जनमानसातून उद्भवली

‘स्वातंत्र्यवीर’ ही पदवी प्रथम लेखक सदाशिव रानडे यांनी आपल्या चरित्रग्रंथात वापरली होती. रानडे यांनी ही पदवी आपल्या स्वतःच्या कल्पनेतून आणि आवडीतून दिली होती. यामागे कोणतीही सरकारी किंवा संस्थात्मक मंजुरी होती की नाही, हे मला माहीत नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे ही पदवी जनमानसातून उद्भवली असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

ऐतिहासिक दाव्यांवर भाष्य

या उलटतपासणीत सात्यकी सावरकर यांनी अनेक ऐतिहासिक दाव्यांवरही भाष्य केले. त्यांनी पुस्तक-प्रकाशन आणि लेखन याबाबत आपल्या मर्यादित ज्ञानाची कबुली दिली. राहुल गांधी यांच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी सावरकरांच्या जीवनातील काही पैलूंबाबतही नवीन माहिती दिली. यामुळे खटल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

नवीन दृष्टिकोन समोर 

पुणे येथील विशेष एमपी-एमएलए न्यायालयात झालेली ही सुनावणी आता तहकूब झाली आहे. पुढील नियमित सुनावणी 13 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. या खटल्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील काही पैलू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सात्यकी सावरकर यांच्या कबुलीमुळे ‘स्वातंत्र्यवीर’ पदवीच्या मुळाबद्दल आणि सावरकरांच्या लेखन-कार्याबद्दल नवीन दृष्टिकोन समोर आला आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp