Gold Silver Price Today 14 April 2026 Updated: मध्यपूर्वेतील तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एकिकडे मौल्यवान धातू असणाऱ्या सोन्याचे दर ढासळताना दिसले. मात्र, आता सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोमवार, 13 एप्रिल 2026 रोजीसुद्धा सोन्याच्या दरांमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यात भर पडली ती म्हणजे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयानं. जिथं त्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी ब्लॉक करण्याचा इशारा दिला. परिणामी जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर 0.44 टक्क्यांनी म्हणजेच 699 रुपयांनी कोसळले. मात्र मंगळवार, 14 एप्रिल 2026 ला हे चित्र बदलल्याचं दिसून आलं. 

Add Zee News as a Preferred Source

सोन्याच्या किमती  1,51,983 रुपयांवर पोहोचल्या आणि पुन्हा एकदा जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या दरांमध्ये तेजी आल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी 1 टक्क्यानं वाढ झाली. ज्यानंतर कॉमॅक्स सोन्याच्या किमती 23 डॉलरनी वाढल्या. 

चांदीचा दर आज वाढला की कमी झाला? 

युद्धजन्य परिस्थितीमुळं आलेल्या तणावानं सोन्यासमवेत चांदीच्या किमतीतसुद्धा घट झाल्याचं पाहायला मिळालं. चांदी -2,775 (-1.14%) रुपयांनी कोलमडली. प्रतिकिलोमागे हे दर 2,40,499 रुपयांवर पोहोचले. ज्यामुळं पुन्हा एकदा मौल्यवान धातूंना झळाळी मिळत असल्याचं पाहायला मिळालं. 

शहरानुसार सोन्याचे दर (प्रतितोळा) खालीलप्रमाणे 

मुंबई – 139278 (22 कॅरेट)/ 151940 (24 कॅरेट)
पुणे – 139278 (22 कॅरेट)/ 151940 (24 कॅरेट)
नागपूर – 139278 (22 कॅरेट)/ 151940 (24 कॅरेट)
नाशिक – 139278 (22 कॅरेट)/ 151940 (24 कॅरेट)

 

सोमवारी सोन्याच्या दरांमध्ये एक हजार रुपयांहून अधिकची घट पाहायला मिळाली, तर, मंगळवारी मात्र चांदीमध्ये आणि सोन्यातही काहीशी तेजी आली. सध्या सोनं ऑल टाईन हाय व्हॅल्यूहून स्वस्त आहे ही मात्र वस्तूस्थिती. 29 जानेवारी रोजी सोन्याचे दर 1.80 लाख रुपये प्रति तोळा इतक्या दराला विक्री केलं जात होतं. तर चांदीची किंमत 4.20 लाख रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचली होती. या किमतीची तुलना केल्यास अक्षय्य तृतीयेला सोनं- चांदीची खरेदी करण्यासाठीची सुवर्णसंधीच सामान्यांना आहे. 

का वाढलेले सोन्याचे दर? 

अमेरिका आणि इराणमध्ये असणाऱ्या तणावामध्येच अपयशी ठरणाऱ्या चर्चांमुळं येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीत 23.61 डॉलरनं तेजी आल्याचं पाहायला मिळालं. तर, COMEX गोल्ड ची किंमत 4,800 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. यामध्ये COMEX सिल्वरची किंमत 1 टक्क्यानं वाढली आणि दर 76.49 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. येत्या काळात हे दर नेमके कोणत्या पटीनं वाढतात किंवा कमी होतात हे पाहणं औत्सुक्याचं असेल.  





Source link

YouTube
Instagram
WhatsApp