अमेरिका-इस्त्रायल आणि इराणमधील युद्धाचा फटका आता थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला बसलाय, युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली असून किंमतीमध्ये देखील वाढ झाली आहे. या महागाईचा फटका इंदू मिलमध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला बसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे असे सांगितले जात आहे, दरम्यान युद्ध आणि स्मारकाचा संबंध काय? असा सवाल करत संजय राऊतांनी सरकारला केला आहे. तर याला प्रत्युतर देत मविआच्या काळामध्ये विटही रचण्यात आली नव्हती विटही रचण्यात आली नव्हती असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आखातातील युद्धाचा स्मारकाला फटका

इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकावरून सुप्रिया सुळेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्ष फोडायला वेळ आहे, मात्र बाबासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ नसल्याचं म्हणत सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका जोरदार टीका केली आहे. आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची टंचाई निर्माण झाली आहे, याचा फटका आता ‘दादर’च्या ‘इंदू मिल’मध्ये साकारल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आतंरराष्ट्रीय स्मारकाला बसतोय. तांबे आणि एलपीजीच्या टंचाई आणि दरवाढीमुळे हा प्रकल्प आणखी वर्षभर रखडण्याची शक्यता आहे असे सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा – ‘जय भीम’ शब्द कसा तयार झाला? भारतात पहिल्यांदा जय भीम अशी घोषणा कोणी, कधी आणि कुठे केली?

स्मारकाचं काम पूर्ण होईल – साटम

विरोधकांनी स्मारकावरून सरकारवर केलेल्या टीकेनंतर अमित साटम यांनी उत्तर दिलं आहे. भाजप नेते अमित साटम यांनी दोन वर्षात इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण होईल असं सांगितल आहे. तर दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बनवू नका असं विधान सुजात आंबेडकर यांनी केलं. त्याऐवजी रिसर्च सेंटर उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

मागील अनेक वर्षांपासून इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम सुरू आहे. मात्र, आता आखातातील युद्धाचा स्मारकाच्या कामावर परिणाम झाला आहे असे सांगितले जात आहे. धातू ओतकामात एलपी वापरला
जातो. आखाती युद्धामुळे तांबे आणि एलपीजीची देशात टंचाई असून दोन्हींचे दरही वाढले, त्यामुळे स्मारकाचं काम रखडण्याची शक्यता आहे.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp