Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत आहे. ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेने दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फुटले आहेत. ठाकरेंच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केला आहे. ठाकरेंच्या खासदारांच्या वेगळ्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा देखील रंगली आहे. ठाकरेंचे पक्ष दुसऱ्यांदा फोडल्यावर एकनाथ शिंदेना मोठी लॉटरी लागणार आहे. कारण, शिदेंच्या शिवसेनेचे पक्षीय बलाबल वाढणार आहे. यामुळे शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते. महाराष्ट्रात शिंदेची शिवसेना हा भाजपपेक्षा मोठा पक्ष होऊ शकते.
शिवसेनेच्या खासदारांचे वेगळ्या गटासाठी लोकसभाअध्यक्षांना पत्र दिले?
ठाकरेंच्या पक्षातील सहा खासदार बंडाच्या वृत्तामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, परभणीचे संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे, उत्तर पूर्व मुंबईचे संजय दिना पाटील हे खासदार दिल्लीत दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या वेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याची चर्चा आहे. आधी पत्रावर फक्त 5 खासदारांच्या सह्या होत्या. एका खासदाराच्या सहीसाठी थांबली होती. दिल्लीत रात्री वेगवान घडामोडी घडल्या. पहाटे सहाव्या खासदराने सही केली. ओमराजे निंबाळकर रात्री उशिरा दिल्लीत गेले होते.तिथे त्यांची चर्चा झाली आणि त्यांनी सही केल्याची माहिती आहे. या सहीनंतर वेगळ्या गटासाठी लोकसभाअध्यक्षांना पत्र दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिंदेची शिवसेना महाराष्ट्रात भाजपपेक्षा मोठा पक्ष होणार
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रात शिंदेच्या शिवसेनेचे वजन वाढणार आहे. खासदारांची आकडा वाढून महाराष्ट्रात शिवसेना भाजपपेक्षा मोठा पक्ष ठरु शकतो. पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्रात भाजपचे 9 खासदार आहेत. काँग्रेसचे 13, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9, शिंदेच्या शिवसेनेचे 7, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 1 आणि इतर पक्षाचे 1 असे खासदारांचे पक्षीय बलाबल आहे.
ठाकरेंच्या 6 खासदारांचा गट शिंदेच्या शिवसेनेत विलीन झाल्यास शिंदेच्या खासदारांची संख्या थेट 13 वर पोहचणार आहे. म्हणजेच भाजपच्या खासदांरापेक्षा शिंदेंच्या खासदारांचा आकडा आणखी वाढणार आहे. शिंदेची शिवसेना भाजपपेक्षा मोठी होणार आहे. काँग्रेसच्या बरोबरीने शिंदेच्या खासदारांचा आकडा 13 होणार आहे.
शिंदेंच्या शिवसेनेला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळणार?
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे फक्त ताकद वाढणार नाही तर त्यांना मोठी लॉटरी लागणार आहे. खासदारांची संख्या वाढल्याने आकड्यांचे सर्व गणित बदलणार आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळू शकते.
राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभेत कमीत कमी 4 सदस्य असले पाहिजेत. लोकसभा निवडणुकीत त्या पक्षाला एकूण जागांपैकी कमीत कमी 2% जागा मिळाल्या पाहिजेत आणि या जागा कमीत कमी 3 राज्यांमधून निवडून आल्या पाहिजेत. 3 पक्षाला कमीत कमी 4 राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी या निकषांपैकी एक निकष पूर्ण करावा लागतो. शिंदेचे लोकसभेतील संख्याबळ वाढल्यास राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा होवू शकतो.