<p>अलिकडे विरोधक भाजपवर ‘वॉशिंग मशिन’ म्हणून टीका करतात. गंभीर आरोप असलेला माणूस भाजपमध्ये आला की पवित्र होतो, असा टोला विरोधक लगावतात. ही टीका खरी आहे काय असा प्रश्न पडतोय अकोला भाजपमधील एका पक्षप्रवेशामुळे. अकोला भाजपमध्ये रविवारी अजय उर्फ अज्जू ठाकूरचा प्रवेश झाला… प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. अज्जू ठाकूर हा अकोल्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर अनेक पोलीस स्टेशनमध्ये मारहाण, खुनाचा प्रयत्न, खंडणीसह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. साडेतीन वर्षांपुर्वी, म्हणजे १८ एप्रिल २०२० रोजी याच अज्जू ठाकूरची अकोला पोलीसांनी जठारपेठ भागातून धिंड काढली होती. त्याला भरचौकात खास पोलिसी पाहू़णचार देखील दिला होता. </p>
Source link