अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रहार (Prahar Party) पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला खिंडार पडल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बच्चू कडू कोण ओळखत नसल्याचं वक्तव्य केलं होतं. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षासह 12 नगरसेवकांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

हेमेंद्र ठाकरे यांच्यासह 10 नगरसेवकांचा प्रहारमध्ये प्रवेश

वाशिमच्या (Washim) मानोरा नगरपंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष हेमेंद्र ठाकरे यांच्यासह 10 नगरसेवक आणि स्वीकृत नगरसेवक यांचा प्रहार पक्षामध्ये (Prahar Party) प्रवेश झाला आहे. आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. या प्रवेशामुळे वाशिममध्ये राष्ट्रवादीला मोठा खिंडार पडलं आहे. अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार पक्षामध्ये बच्चू कडू यांच्या उपस्थितीत हेमेंद्र ठाकरे यांच्यासह एक भाजप आणि नऊ राष्ट्रवादीचे नगरसेवक, एक स्वीकृत सदस्यांचा प्रहारमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. हेमेंद्र ठाकरे हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती असून सध्या ते नगर पंचायतचे नगराध्यक्ष असल्याने मानोरा तालुक्यात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे हेमेंद्र ठाकरे यांच्या प्रहारमध्ये प्रवेश झाल्याने पक्षाला चांगलाच फायदा होईल.

‘आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू’

यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले की, पदाला आणि सत्तेला महत्व नाही, हेमेंद्र ठाकरे यांच्या प्रवेशामुळे प्रहार आता आणखी मजबूत होईल. विधानसभा निवडणुकीची ही सुरुवात आहे आणि बऱ्याच गोष्टी आम्ही थांबवून ठेवल्या आहेत, जर त्या केल्या तर, स्फोट होईल… आम्ही एक-एक सुतळी बॉम्ब लावू, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

प्रत्येकाला स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार : बावनकुळे

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी याआधी बच्चू कडू यांच्याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, ‘प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या स्वबळाची तयारी करण्याचा अधिकार आहे, बच्चू कडू यांनी स्वबळाची तयारी करायची ठरवली असतील ते त्यांनी करावी. पण ते महायुतीमध्ये आहेत, त्यांचा सन्मान करतो. पुन्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. समाधान करण्याचा प्रयत्न होईल.’



Source link