Akola Crime News अकोला: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला (Akola Crime) पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय शुभम लोणकर असे या अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्यासोबत इतर दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टलसह 9 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यातील (Akola Crime ) अकोट शहर पोलीसांनी 16 जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं होत. 27 वर्षीय अजय तुकाराम देठे आणि 25 वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांवर राहत्या घरून अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, या अवैध शस्त्रसाठ्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी जुळले असल्याचा संशय बळावला होता. अशातच आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.  

पार्सलमुळे सत्य आले समोर

अजय आणि प्रफुल्ल हे शुभम लोणकरच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी शुभमने या दोघांना एका अज्ञात व्यक्तीकडून पार्सल घ्यायला सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या व्यक्तिकडून पार्सल घेतलं. हे पार्सल होत देशी पिस्टलचं. दोघांनाही याबाबात काहीही कल्पना नव्हती, मात्र घरी नेल्यानंतर त्यांनी पार्सल ओपन केलं अन् थेट त्यामध्ये दोन पिस्टल दिसल्या.  पिस्टल बघतांच दोघांना जबर धक्का बसला आणि ते दोघेही घाबरले. त्यानंतर त्यांनी याबाबत शुभमला फोन करून याबाबत विचारणा केली. मात्र त्याने फार प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर देखील त्यांनी शुभमला वेळोवेळी फोन करून ते पार्सल नेण्यासाठी सांगितले. मात्र तो तेव्हाही आला नाही. अखेर या बाबत पोलिसांना गुप्त महितीद्वारे ही बाब कळली पोलिसांनी अजय आणि प्रफुल्ल या दोघांना त्याच्या राहत्या घरून अटकेची कारवाई केली. तपासात मात्र याबाबत सत्यता बाहेर आली आणि पिस्टल बोलवणाऱ्या शुभम लोणकरचा देखील शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत शुभमला पुण्यातील वार्जे शहरातून अटक केली. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो पुण्यातील वार्जे शहरात वास्तव्यास होता. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई अनेक व्हिडीओ कॉल

पोलिसांनी शुभम लोणकरची कसून चौकशी केली असता पोलिसांपुढे धक्कादायक माहिती समोर आली. शुभम हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात होता. शुभम आणि त्या दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडिओ कॉल, फोन रेकॉर्ड आणि इतर माहीत पोलिसांच्या हाती लागली. ज्यामध्ये दुबईसह अनेक इंटरनॅशनल गुन्हेगारासोबत शुभमचा कॉन्टेक्ट होता. तसे फोन कॉल आणि इतर माहिती पोलिसांना तपासात मिळाली असल्याची माहिती अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. विशेष म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link