मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election 2024) सध्या देशातह महाराष्ट्राती वातावरण राजकारणमय झाले आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलाय. वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले आहेत. खुद्द वंचितचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हेदेखील या निवडणुकीत अकोला या मतदारसंघातून उभे आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. एबीपीच्या सी वोटर्स सर्व्हेनुसार या जागेवर भाजपचा (BJP) उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 

ओपीनियन पोलनुसार कोण जिंकणार? 

अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद आहे. याच कारणामुळे त्यांनी या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील यांना तिकीट दिले आहे. महायुतीकडून अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलंय. धोत्रे हे भाजपचे उमेदवार आहेत. या जागेवर तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता असली तरी तेथे भाजपाचेच धोत्रे बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

वंचितला किती जागा मिळणार? 

निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाअंतर्गत वंचितने महाराष्ट्रात अनेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. मात्र यातील एकाही जागेवर वंचित बहुजन आघाडीची कामगिरी नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. वंचितचा एकाही जागेवर विजय होणार नाही, असे एबीपी सी वोटर्सच्या सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll)

महायुती- 30 
महाविकास आघाडी- 18
—————
एकूण जागा- 48

महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Mahayuti seats)

भाजप- 21-22
शिवसेना (शिंदे गट)- 9-10
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 0
——————
एकूण जागा- 30-32

महाविकास आघाडीला किती जागा? 

काँग्रेस- 03
शिवसेना ( ठाकरे गट)-  09-10
राष्ट्रवादी- (शरद पवार गट)-  05
——————–
एकूण जागा- 18 

हेही वाचा :

 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार का? किती जागांवर होणार विजय?

एकनाथ शिंदेंची शिवसेना मैदान मारण्याच्या तयारीत, ‘माझा’च्या सर्व्हेत किती जागा?

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, ‘माझा’च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!

अधिक पाहा..



Source link