Akola Accident News: अकोला: अकोल्यातल्या अकोला पातुर राज्य महामार्गावर भीषण अपघात झालाय. चार चाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झालाय. तर हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चक्क चारचाकी वाहन रस्त्यावरील डिवाइडरला लागून पलटी झालेय. या अपघातात मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर वाहनचालक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांनी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र हा अपघातामागील नेमकं कारण अद्याप पुढे आलेले नाही.
भीषण अपघातात एक जण जागीच ठार
मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या पातुर-अकोला राज्य महामार्गावरील हिंगणा फाटा येथे हा भीषण अपघात झालाय. आज दुपारी 12 वाजताच्या सुमाराचा अपघात झाल्याच समजतेये. दरम्यान, अद्यापपर्यंत दुचाकीवर स्वार असलेल्या आणि यात मरण पावलेल्या तरुणाची ओळख समोर आली नाहीये. याप्रकरणी अधिक तपास जुने शहर पोलीस करतायेत. मात्र या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बियरशॉपी समोर वाद, पोलिसांचा लाठीचार्ज
अकोल्यात एका बियर शॉपी समोर सुरु असलेल्या वादादरम्यान खदान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. बिअर शॉपी मालक आणि एका ग्राहकांमध्ये हा वाद होता. बिअर शॉपी समोर उभी केलेली दुचाकी चोरी झाल्याच्या संशयावरून ग्राहकाने सीसीटीव्ही तपासण्यासाठी हट्ट धरला. याच कारणावरून हा संपूर्ण वाद सुरू होता. त्यानंतर शाब्दिक वाद हाणामारी सुरू झाला, अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज करावा लागलाय. इतकच नाही तर बनणार्यांवर सुद्धा लाठीचार्ज करून पोलिसांनी पांगवले आहे. त्यानंतर प्रकरण शांत झालेय. दरम्यान, अकोल्यातल्या सिंधी कॅम्प भागात काल रात्री उशिरा 1 वाजता सुमारास हा वाद झाला होता.
दरम्यान, स्थानिक पत्रकार या संपूर्ण प्रकरणाचे चित्रकरण करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर देखील दमदाटी केली, आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतलाये. इतकंच नाही तर व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय.
हे ही वाचा
अधिक पाहा..