अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा

भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरे गटाच्या नितीन देशमुखांमध्ये वाद

भर बैठकीत दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लिल शिवीगाळ

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने

पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढले

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात पोलीस दल दाखल. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप आमदार रणवीर सावरकर आणि ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यात झालेला होता जोरदार राडा. दोघेही एकमेकांच्या अंगावर गेले होते धावून. दोघांनी एकमेकांना केली यथेच्छ शिवीगाळ. दोघांमधील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते गोळा होण्यास झाली होती सुरुवात. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून काढून देण्यास केली सुरुवात. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी.

Source link