महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये.महाराष्ट्र सरकार राज्यात नमो शेतकरी सम्मान योजना राबविणार आहे.त्यानुसार केंद्र सरकार चे 6 हजार आणि राज्य सरकार चे 6 हजार अशे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार आहेत. याची प्रक्रिया लवकरच समाजणार असल्याचे वृत्त आहे.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेली घोषणा पूर्ण करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं नमो शेतकरी सन्मान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प जाहीर करताना याबाबत घोषणा केली होती. आज मंत्रिमंडळाने याला मान्यताही दिली आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना एका वर्षात ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसानप्रमाणे आता ६ हजार रुपये मिळतील.

अकोला जिल्हात विजाच्या कडकडासह अतिवृष्टीचा अंदाज; सतर्कतेचा इशारा

प्रादेशिक मौसम विभाग नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार दि. 5 ते 7  मार्च  दरम्यान  विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडासह अतिवृष्टी व पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी आपला माल सुरक्षीत ठिकाणी साठवून ठेवावा. 

तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीकरीता आणला असल्यास मालाचे नुकसान होणार नाही याबाबत काळजी घ्यावी. विज व गारांपासून बचावाकरीता सुरक्षीत ठिकाणी आश्रय घ्यावा. याबाबत सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावा, असा इशारा जिल्हाधिकारी निमा अरोरा यानी दिला आहे.