
राणा-ओवेसी वादाला उकळी, 15 सेकेंदाचे वक्तव्य अंगलट; नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचा समन्स
Navneet Rana vs Asaduddin Owaisi : भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana)यांनी एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांना दिलेल्या चॅलेंज प्रकरणी राणा यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. हैदराबादला जाऊन नवनीत राणा यांनी खासदार ओवेसीं जाहीर आव्हान देत केलेल्या वक्तव्याप्रकरणी हैदराबाद न्यायालयाने नवनीत राणांना समन्स पाठवला आहे. शिवाय येत्या 28 फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता माजी खासदार नवनीत राणा न्यायालयात हजर राहणार का याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
नेमकं प्रकरण काय?
ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं होतं. या वक्तव्यावरून मोठा वाद रंगला होता आणि नवनीत राणा यांच्या विरोधात हैदराबाद मध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता. 8 मे 2024 ला नवनीत राणा यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर 10 फेब्रुवारीला हैदराबाद येथील शादनगरमध्ये गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आता याच 15 सेकंदाच्या वक्तव्य विरोधात नवनीत राणा यांना समन्स आला असून येत्या 28 फेब्रुवारी रोजी हैदराबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आले आहे.
नेमकं काय म्हणाल्या होत्या नवनीत राणा?
15 सेकंद लगेगा @AkbarOwaisi_MIM @asadowaisi pic.twitter.com/TfEmWhvArX
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) May 8, 2024
ज्या देशाचं नावच हिंदुस्थान आहे, त्या देशामध्ये हे पाकिस्तानच्या आवलादी येऊन आम्हाला धमकी देत असतील. तर आम्ही उत्तर देण्यास ठाम आहेत. मी माझ्या त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहे. तुम्हाला 15 मिनिटं लागत असतील तर आम्हाला फक्त 15 सेकंदच लागतील, असे राणा म्हणाल्या होत्या.
ओवैसी यांनी तीन तलाकला विरोध दर्शवला. महिलांच्या 33% आरक्षणालाही त्यांनी विरोध केला. आमची बाबरी आहे आणि राहणार या पद्धतीने भाषा करणारे हिंदुस्थानात राहतात आणि पाकिस्तानवर प्रेम करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही. पाकिस्तानला शांत करण्यासाठी आमचे मोदीजी सक्षम आहेत, असं ही राणा म्हणाल्या.
हे ही वाचा
अधिक पाहा..