अमित शाहांची शंकरबांबाच्या दिव्यांग मुलांची आस्थेने विचारपूस; थेट सोबत जेवणाचे दिले आमंत्रण

अमित शाहांची शंकरबांबाच्या दिव्यांग मुलांची आस्थेने विचारपूस; थेट सोबत जेवणाचे दिले आमंत्रण


Amravati News अमरावती : स्व.अंबादासपंत वैद्य बेवारस, दिव्यांग बालगृह वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर (Padmashri Shankar Baba Papalkar) यांना 9 मे रोजी भारत सरकारनी पदमश्री पुरस्कार देवुन गौरव केला. त्यावेळी दोन बेवारस दिव्यांग गांधारी दोन्ही डोळयांनी अंध आणि बहुविकलांग योगेश यांना सोबत घेवुन गेले होते. पदमश्री पुरस्कार समारंभ समाप्त् झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) स्वत:हुन गांधारीकडे आले आणि तीचे दोन्ही हात धरुन विचारना केली. यावेळी त्यांनी गांधारी तुम कैसी हो, यह पदमश्री पुरस्कार समारंभ आपको कैसा लगा, तु ठिक है ना? आप मेरे घर मेरे साथ खाना खाने चलो असे म्हणत आपल्या घरी बोलावले. देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची ही आत्मीयता पाहुन राष्ट्रपती भवनातील  मंत्रीगण, अधिकारी वर्ग, पुरस्कार प्राप्त गणमान्य आणि आमंत्रीत प्रेक्षक वर्ग आश्चर्यचकित झाले होते.

पद्मश्री पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बेवारस दिव्यांग मुले

गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी 24 जुन रोजी स्पीडपोस्टाच्या माध्यमातून गांधारीच्या नावाने अभिनंदनस्पद पत्र आणि फोटोचे पार्सल आले. ही गोष्ट पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि  गांधारीला माहिती होताच त्यांना आनंद झाला. तसेच पद्मश्री पुरस्कार सोहळ्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बेवारस दिव्यांग मुले आली असल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी अमित शाह यांना यावेळी दिली होती. हेच लक्षात घेऊन त्यांनी गांधारीला आमंत्रण दिले होते.

कोण आहेत शंकरबाबा पापळकर?

अमरावतीच्या वझर येथील स्व.अंबादासपंत वैद्य स्मृती बालगृहाचे संचालक शंकरबाबा पापळकर यांनी बेवारस आणि दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजातील त्यांच्या या भरीव योगदानाबद्दल शंकरबाबा पापळकर यांना 9 मे रोजी भारत सरकारनी पदमश्री पुरस्कार देवुन गौरव केला. अमरावती जिल्ह्यातील परतवड्यात 14 फेब्रुवारी 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. धोब्याचा व्यवसाय पासून ते पत्रकारिता केल्यापासून ते रस्त्यावरच्या अनाथ, अपंग, गतिमंद आणि दिव्यांग मुलांच्या वेदनांनी त्रस्त झाल्याचे त्यांनी त्यांचा जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. वंचित घटकांसाठी संगोपन आणि पुनरुत्थानासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, 1990 च्या दशकात त्यांनी वझ्झर या गावात “स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृह” नावाचा आश्रम स्थापन केला. या आश्रमात अपंग, बेवारस, गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून ते भारतात एक रोल मॉडेल बनले आहे.

शासकीय कुठलेही अनुदान न घेता हा आश्रम सुरू आहे. समाजाकडून मिळणाऱ्या दानावर आणि शेगाव संस्थान आणि अंबादास पंथ बालगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मिळणाऱ्या मदतीवर हा आश्रम सुरु केलं. या मुलांना स्वावलंबी बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे ते सांगतात, आश्रम सुरू झाल्यानंतर 200 मूले आश्रमात होती. आश्रमातल्या 30 मूकबधिर-गतिमंद मुलामुलींचे लग्न लावल्याची माहितीही  त्यांनी माहिती  शंकरबाबा पापळकर यांनी दिली. आतापर्यंत आश्रमातील 12 जणांहून अधिक लोक शासकीय सेवेत रुजू झाले आहेत आणि यासोबत त्यांना जगण्याचा अधिकार मिळाल्याचेही ते सांगतात.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना भोवलं; 11 जणांविरुद्ध गुन्हा

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना भोवलं; 11 जणांविरुद्ध गुन्हा


Bhandara News भंडारा : वैनगंगा नदीवरील गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरवर जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प होत आहे. त्याच्या भूमिपूजन समारंभाकरिता काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) भंडाऱ्यात आले होते. दरम्यान, भूमीपूजनाचा कार्यक्रम आटपून सभास्थळाकडं जात असताना जिल्हा परिषद चौकात युवक काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी युवक काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर, सभास्थळी गोसेखुर्द प्रकल्प (Gosekhurd Dam) बाधित एका महिलेसह पाच जणांनी सभेदरम्यान नारेबाजी करीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अशा अकरा जणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

घोषणाबाजी अन् काळे झेंडे दाखवणं काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांना भोवलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते भंडाऱ्यात काल 547 कोटींच्या विकासकामाच्या भूमिपूजन संपन्न झाले. यात  102 कोटीच्या खर्चातून होत असलेल्या जागतिक दर्जाचे जल पर्यटन प्रकल्पाचा देखील समावेश आहे. मात्र हा कार्यक्रम अनेक कारणांनी चर्चेत आला आहे. एकीकडे भूमिपूजनाच्या फलकावर जलसंपदा मंत्री आणि पर्यटनमंत्री यांचे नावच गायब असल्याचे आढळून आले. तर विरोधी पक्षातील अनेक नेते कार्यक्रमाला उपस्थित असताना महायुतीतील प्रमुख नेत्यांनाच आमंत्रण मिळाले नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या कार्यक्रमाने महायुतीत मतभेदाची दरी निर्माण केली आहे का असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. तर आता भंडाराचे माजी खासदार आणि भाजप नेते सुनील मेंढे यांनी भाजप नेत्यांना कार्यक्रमाचं निमंत्रणात नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाही कार्यक्रमाचा निमंत्रण नव्हतं. त्यामुळे महायुतीत समन्वयाचा अभाव दिसत असून समन्वय वाढवण्याची गरज असल्याचं मेंढे म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांना युवक काँग्रेसने दाखविले काळे झेंडे

दरम्यान, दुसरीकडे भंडाऱ्यातील या भूमिपूजनाच्या  कार्यक्रमाला स्थानिकांचा विरोध होताना देखील बघायला मिळाले होते. गोशीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना मागील दोन वर्षापासून मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप भेट देत नसल्याचा आरोप करत प्रकल्पग्रस्तांनी कालच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान गोंधळ घालण्याचा  प्रयत्न केला. यावेळी आपल्या मागण्यांना घेऊन या प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेत पोलीस व्हॅन मध्ये कोंबून नेलं. हा सर्व प्रकार भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेदरम्यान घडला.

काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल 

तर दुसरीकडे जागतिक जल पर्यटन प्रकल्पाचे भूमिपूजन कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा सभा स्थळाकडे जात असताना युवक काँग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखविले. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौकात हे काळे झेंडे दाखविण्यात आले. यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्यासह काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांसह 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

संतप्त शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; अधिकार्‍यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींना कार्यालयात डांबलं

संतप्त शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; अधिकार्‍यांसह विमा कंपनीच्या प्रतिनिधींना कार्यालयात डांबलं


Akola News अकोला : राज्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी  (Farmers) वर्गात शेतीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. मात्र गेल्या उन्हाळ्यात अचानक आलेल्या अवकळी पावसाने सर्वत्र एकच दाणादाण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं आहे. परिणामी, पीकविमा कंपनी (Crop Insurance) कडून या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने पीक विमा (Pik Vima) कंपनी आणि कृषि अधिकाऱ्यांकडे धाव घेत आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कुठलीही मदत न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज अकोटमध्ये तालूका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकर्यांनी स्वत:सह कार्यालयात डांबले. या प्रकारामुळे परिसरात काहीकाळ चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.   

विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यात जवळपास पावणेदोनशे शेतकरी केळीच्या पीकविम्यापासून वंचित आहेत. वेळोवेळी याबाबत तक्रार करूनही संबंधित प्रशासनाने अद्याप कुठलीही उपाययोजना अथवा ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज थेट कृषि अधिकारी, विमा कंपनी अधिकार्‍यांसह स्वत:ला डांबून घेतलं. यावेळी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे आंदोलनात सहभागी झाले होते. विम्याचे जवळपास 4.75 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ठोस निर्णय घेतल्याशिवाय कृषी अधिकारी आणि विमा प्रतिनिधींना कार्यालयातच डांबून ठेवणार असल्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून शेतकऱ्यांनी मात्र कार्यालयाचा दरवाजा उघडण्यास आंदोलक शेतकरी आणि शेतकरी संघटनेने नकार दिला आहे. 

तहसीलदारांच्या दालनात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

अमरावती जिल्ह्यातील वरुड – मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना 2023 मधील अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे रखडलेले अनुदान तात्काळ देणात यावे, या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यावर कोणतीही कार्यवाही नसल्याने आज शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी त्यांनी वरुडच्या तहसीलदारांच्या दालनात वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलंय. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ असून शेतकऱ्यांना खत, बी बियाणे घ्यावे लागत असतात. त्यामुळे जवळ पैसे नसल्याने आणि अवकाळी ने शेतकऱ्यांचे मोठे नुकशान केल्याने शेतकरी आधीच आर्थीक अडचणीत सापडला आह. त्यामुळे त्यांना या अनुदानाचे रक्कमेची आवश्यकता आहे. परिणामी, आता शेतकरी या मागणीला घेऊन शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स

Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स


Akola Banner : अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण ? अज्ञाताचे बॅनर्स  अकोल्यात एका बॅनरची मोठी चर्चा आहेय. आज सायंकाळी अज्ञात व्यक्तीने अकोला महापालिकेतील सर्वात भ्रष्ट नेता कोण? असे बॅनर शहरातील मध्यवर्ती चौकांमध्ये लावलेयेत. अनेक वर्षांपासून अकोला मनपातील भाजप सत्तेत आहेय. भाजपमधील अंतर्गत वदातून हा प्रकार घडल्याची चर्चा सध्या अकोलेकरांमध्ये आहेय.

हेही वाचा : 

संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बंगालसह १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७८ खासदारांचा शपथविधी सोहळा
 इंडिया आघाडीच्या खासदारांची सकाळी १० वाजता बैठक, लोकसभा अध्यक्षपदाची ठरणार रणनीती
देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे  दिल्लीत, भाजप पक्षश्रेष्ठींशी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा
अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेश बंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती, अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास
राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा, राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश, परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार 
ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांशी देवेंद्र फडणवीसांची फोनवर चर्चा, नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना समज
मुंबईत नव्या इमारतींमध्ये ५० टक्के घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परबांकडून पुन्हा मागणी
फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडीओ समोर, पुणे-नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये २ तरुणी ड्रग्जसेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल
भारताचा ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश, सुपर ८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ इंग्लंडशी



Source link

अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतीला तलावाचे स्वरूप, नदीनाल्याला पूर

अमरावती, यवतमाळ, वाशिमसह अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतीला तलावाचे स्वरूप, नदीनाल्याला पूर


Vidarbha Weather Update : : नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेल्या बुलढाणा, अकोला, अमरावती, गडचिरोलीसह  यवतमाळ, वाशिम येथे देखील मुसळधार पावसाच्या (Heavy Rain)  सरी कोसळल्या आहेत. तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे बहूप्रतिक्षीत पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजासह सर्वसामान्य वैदर्भीय सुखावले आहे. तर पुढील काही दिवस विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तवविला आहे.   

वाशिमच्या काकडदाती गाव परिसरात शेतीला  तलावाचे स्वरूप

सलग चौथ्या दिवशी वाशिम जिल्ह्यात अनेक भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावलीय. वाशिम तालुक्यातील काकडदाती परिसरासह अनेक भागात  मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढल्यानं शेतीत पेरलेल्या बियाण्यांसह खरडून गेलीय. या पावसाच्या पाण्यामुळे शेतीला काही काळ तलावाच स्वरूप आल होत. तर परिसरातील अनेक नाले ओसंडून वाहू लागले आहेत. नुकत्याच खरिपाची पेरणी केलेलं बियाणे पावसात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलंय. या सर्व नुकसानीचे पाहणी आणि पंचनामे करून योग्य ती मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

यवतमाळच्या नेर तालुक्यात मूसळधार पाऊस

यवतमाळच्या नेर तालुक्यातील धनज-माणिकवाडा या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास जवळपास 1 तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी फकिरजी महाराज मंदिर जवळून गेलेल्या नाल्याला चांगलाच पूर आला. तसेच नदी-नाल्या काठावरील शेतजमीनीचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता शेतकरी आणि स्थानिकांकडून केल्या जात आहे.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी

मागील दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतल्यानं वातावरणात प्रचंड उकडा निर्माण झाला होता. अशात काल सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या जोरदार पावसानं वातावरणात सर्वत्र गारवा निर्माण झाला आहे. तर, या पावसाने शेतकरी राजा देखील सुखावला असून आता शेतीच्या खरीप हंगामाची लगबग बघायला मिळणार आहे. मोहाडीसह भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी हलक्या ते माध्यम सरी बरसल्यात. त्यामुळे शेतकरी राजा आनंदीत झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुलीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?

चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुलीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?


अकोला  : पुण्यातील ड्रग्जप्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच तापलं असून पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागानेही कारवाई सुरू केली आहे. पुण्याच्या (Pune) एफसी रोडवरील एका बारमधील तरुणांचा ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाईंना लक्ष्य केले. त्यानंतर, आमदार रविंद्र धंगेकरांनीही पुणे पोलिसांवर पुन्हा एकदा हफ्ताखोरीचे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे, पुणे शहरातील गुन्हेगारी आणि वाढती पब संस्कृती, अंमली पदार्थांचा वापर आणि बदललेला नवा पॅटर्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे. यावरुन, विरोधकांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. पुण्यातील व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी कारवाई करत संबंधित बार सील केला आहे. मात्र, आता राजकीय नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवल्याचं दिसून आलं. पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्या काळात असं घडलं नाही, असे म्हणत सध्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बोट दाखवले होते. त्यावरुन, आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राजपूत नावाच्या अधिकाऱ्याला महिन्याला तीन कोटी रुपये मिळतात, ते मंत्र्यांना पोहोचतात. तो हप्ता शंभूराज देसाई यांना जातो, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. तर सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावर भाष्य करताना मी पालकमंत्री असताना अशा घटना घडल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर, आधी भुजबळ आणि आता अमो मिटकरी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.   

चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेवर आमदार अमोल मिटकरी यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटलांवर आमदार अमोल मिटकरींनी गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांतदादांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात पुण्यात अंमली पदार्थ, डान्स बार, पब्स, हप्ता वसुलीला उधाण आलं होतं, असा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला आहे. पालकमंत्री असताना पुण्यातील अवैध धंद्यांना चंद्रकांत पाटील छुप्या पद्धतीने समर्थन करत असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसेच, अजितदादांनी या सर्व गोष्टींना समर्थन न केल्यामुळे आज हे प्रकार उघड होत असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. 

महायुतीत तणाव होण्याची शक्यता

अमोल मिटकरींच्या या आरोपानंतर आता महायुतीत आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, आधीच लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत अजित पवार गट वेगळा पडल्याचं चित्र आहे, त्यातच आगामी विधानसभा निवडणुकांना महायुतीमध्ये अजित पवार नको, असाही सूर काही नेत्यांकडून उमटला आहे. त्यामुळे, महायुतीतील बिघाडीत आणि बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरींनी थेट चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत एकत्र आल्यास राज्यात वेगळं चित्र पाहायला मिळेल, असे म्हटले होते. त्यानंतर, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सारवासारवही केली. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं मिटकरी यांनी म्हटलं होतं. 

छगन भुजबळ यांनीही लगावला टोला

मी पालकमंत्री होतो, मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा असे घडत नव्हते असे म्हणून कसे चालेल? प्रत्येकाच्या कार्यकाळात गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम सुरू असते. काही गोष्टी उजेडात येतात, तेव्हा त्याला महत्व प्राप्त होतं. समोरच्या विरोधकांनी बोलले तर ठीक आहे. पण, बरोबरच्या लोकांनी बोललं तर कसे चालेल, असा टोला छगन भुजबळ यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp