भाजपला राज्यात मिळालेल्या जागा केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्या: अमोल मिटकरी

भाजपला राज्यात मिळालेल्या जागा केवळ अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्या: अमोल मिटकरी


Akola News अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) आज परत नव्याने भाजपवर (BJP) जोरदार हल्ला चढवलाय. भाजपनं आमची मतं घेतलीत. परंतू, त्यांची मतं भाजपला मिळालीच नसल्याच्या गंभीर आरोपाचा पुनरूच्चार मिटकरींनी केलाय. ते अकोल्यात बोलत होते. भाजपला राज्यात मिळालेल्या 9 जागा अजित पवार (Ajit Pawar) आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याचा दावा त्यांनी केलाय. भाजपची मतं मिळाली असती तर आमचा बारामतीसह चार जागांवर पराभव झालाच नसता, असंही मिटकरी म्हणालेय. त्यामुळे मिटकरी़च्या या वक्तव्यामुळे महायुतीत (Mahayuti) आता पुन्हा नव्याने वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आम्हालाही त्याच भाषेत बोलता येतं, मात्र..  

लोकसभेच्या पराभवासाठी (Lok Sabha Election ) अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी पक्षाकडे अनेकांनी बोट दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना त्यात आता आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा  पुनरूच्चार करत भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, अजित पवारांना जाणीवपुर्वक डावललं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यावर भाजपाचे नेते प्रविण दरेकर यांनी मिटकरींवर टीका करतांना त्यांचा आवाका आणि कुवत काढली होती. त्यावर अमोल मिटकरींनी आपल्यालाही दरेकरांच्या भाषेत बोलता येतं. मात्र, आपल्यावरील संस्कारामुळे आपण असो बोलणार नसल्याचा टोलाही मिटकरींनी दरेकरांना लगावलाय.

भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे भजपचा पराभव झाला   

एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  जेष्ठ नेते  छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहे. आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असूनही संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच  नाराज असलेले छगन भुजबळ हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली प्रवेश करणार असल्याचीही  चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र आज संजय राऊत यांनी स्पष्टीकरण देत हा दावा खोडून काढला आहे. तर दुसरीकडे लोकसभेच्या पराभवासाठी महायुतीकडून अजितदादांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे. तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात आला, असे वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही अजित पवारांवर निशाणा साधला आहे.  

यावेळी रोहित पवारांनी अजित पवारांसह भाजपवरही हल्लाबोल केला. दादांना वेगळे होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे. भाजपचा पराभव केवळ दादांमुळे नाही, तर भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे झालाय, असेही रोहित पवार म्हणाले. त्यामुळे सध्याच्या राजकारणात एकमेकांवरील दावा प्रतिदावा आणि टीकेतून पुढे काय राजकीय गणिते जुळतात की आणखीन बिघडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मी शेतकरी, मला चिखलाची सवय; चिखलाने माखलेले पाय धुतल्या प्रकरणी नाना पटोलेंची स्पष्टोक्ती

मी शेतकरी, मला चिखलाची सवय; चिखलाने माखलेले पाय धुतल्या प्रकरणी नाना पटोलेंची स्पष्टोक्ती


Akola News अकोला : अकोला येथे घडलेली घटना ही कुणापासूनही लपून राहिलेली नाहीये. माझ्या कार्यकर्त्याने वरून पायावर पाणी टाकले. तिथे नळ उपलब्ध नव्हता, त्यामुळे कार्यकर्त्याने पायावर बॉटल ने पाणी टाकले. मी शेतकरी आहे. त्यामुळे मला या चिखलाची सवय आहे. या ठिकाणी चिखल होता म्हणून मी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन करणार नाही, असा कुठलाही प्रकार नाही. किंबहुना या चिखलाचा मला काहीही फरक पडत नाही. मी काही राजा नाही, तसेच मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. मी शिवरायांचा मावळा आहे आणि मावळा हा मावळ्याप्रमाणेच कायम राहील. असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आपल्या कार्यकर्त्याने पाय धुतल्या प्रकरणी भाष्य करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. 

नेमका प्रकार काय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. यावेळी नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत  संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं धुतले. विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत असताना याबाबत आता स्व:ता नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

म्हणूनच मोदी सरकारला जनतेने नाकारलं 

एकीकडे शेतकरी कर्जाच्या चिखलात फसलेला आहे. त्या शेतकऱ्यांना कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. दुसरीकडे महावितरणाचा गोंधळ सुरू आहे. दिवसागणिक विजेचे दर वाढत आहेत. सर्वसामान्यांचे कंबडे  मोडले आहे. शेतकऱ्यांना वेळेत वीज उपलब्ध होत नाही. या सगळ्या गोष्टींकडे सरकारने लक्ष घातलं पाहिजे. महाराष्ट्रात म्हणूनच मोदी सरकारला जनतेने नाकारले आहे. त्यामुळे राज्यात आता मोदी मोदी करून काहीही उपयोग होणार नाही, असा सल्ला माझा सत्ताधाऱ्यांना असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली. 

सरकारने प्रीपेड मीटरचा घाट घातला आहे. मात्र, जनतेनेच याला विरोध दर्शवला असून लिखित स्वरूपात आम्हाला अशा स्वरूपाचे मीटर नको, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. याबाबत सरकारने जनतेला  पर्याय दिला होता. आज इतके आंदोलन होऊन देखील सरकार ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. ऐकुणात आज राज्यात मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे जनतेला तुम्ही चिखलात फसवत आहात. सर्वसामान्यांची लूट सध्या सुरू आहे. असे माझे स्पष्ट मत असल्याचेही नाना पटोले म्हणाले.

इंग्रजांनी केले नाही ते हल्लीचे मोदी सरकार करतंय 

सरकार शेतकरी विरोधी आहे. हे गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रातील जनतेने अनुभवले आहे. नाशिक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. एका शेतकऱ्याने सांगितलं होतं की कांद्याच्या प्रश्नावर बोला, त्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना आपल्या वेदना देशाच्या पंतप्रधाना पुढे देखील मांडता येत नाही. त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात येत.  त्यावरूनच शेतकरी विरोधी यांची मानसिकता दिसून येते, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली. जे पाप इंग्रजांनी केले नाही ते हल्लीचे मोदी सरकार करत आहे. असेही नाना पटोले म्हणले.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्याने धुतले; अमोल मिटकरी कडाडले

मोठी बातमी : नाना पटोलेंचे चिखलाने माखलेले पाय चक्क कार्यकर्त्याने धुतले; अमोल मिटकरी कडाडले


Akola News अकोला : राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षावर आणि पक्षातील नेत्यांवर फार प्रेम करत असतात. याच प्रेमातून ते अनेक कृत्य करत असल्याचे कित्येक उदाहरण आपण यापूर्वी बघितले आहेत. मात्र, असाच काहीसा एक प्रकार अकोला जिल्ह्यातून (Akola News) समोर आला आहे. हा प्रकार घडला आहे तो काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बाबतचा . मात्र, कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे नाना पटोले नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर झाले असे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. 

यावेळी पालखी दर्शनासाठी थांबलेल्या नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून मार्ग काढत त्यावेळी संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क एका कार्यकर्त्यानं हाताने धुतलेय. विजय गुरव असं या काँग्रेस कार्यकर्त्याचं नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. 

स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये – अमोल मिटकरी

नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतल्याचा प्रकार घडल्यानंतर या कृतीला राजकीय वर्तुळातून विरोध झाला नसता तरच नवल. एका कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे कृतीमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता असतानाच आता यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आलीय. नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर हे कृत्य निंदाजनक आहे, यातून पक्षाची कार्यकर्त्याप्रती काय धारना आहे, हे या माध्यमातून दिसून येत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हा पहिल्यांदाच प्रकार पाहण्यात आला आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे, हा कार्यकर्त्यांचा एकप्रकारे अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वतः ला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये. अशी बोचरी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले

आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले


अकोला : अकोला (Akola Crime News)  हत्येच्या घटनेने हादरलं आहे.  पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं. अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव खुर्द गावात  घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.. रेणुका ढोले असं मृत पत्नीचे नाव आहे, तर गजानन ढोले असं  पतीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ढोले या दामत्य पती-पत्नीमध्ये वाद होते.  शेतीच्या कारणावरून हे वाद सुरू आहे, तसेच गजानन हा पत्नी रेणुका हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, त्यातून दोघांची भांडण झाली आणि त्या रागात पतीने पत्नीला घरातच वार करून तिची हत्या केली. आयुष्यभरासाठी निवडलेला जोडीदार हाच वैरी बनला आणि मृत्यू काळ बनून आला.

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील  तळेगाव बाजार शेतशिवरात ही घटना घडली आहे. पत्नी रेणुका ढोले हे आज शेतात पेरणी करण्यासाठी आले असता तेथे पती गजानन पोहचला तिथे वाद घालण्यास सुरूवात केली. वाद सुरू झाल्यानंतर त्याने पत्नीला शेतात पेरणी करायला विरोध केला. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्यांचा हा वाद विकोपाला गेला.  गजाननने रागाच्या भरात थेट रेणुकाच्या अंगावर आणि हातावर कुऱ्हाडीने वार केले.  या हल्ल्यात रेणुका  गंभीर जखमी झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. 

पत्नीच्या हत्येनंतर पती फरार

घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणी साठी रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या प्रकरणात हिवरखेड पोलिसांनी खुनाचे गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करीत आहे. दरम्यान मारेकरी गजानन ढोले हा सध्या फरार आहे.

चारित्र्यावर संशय घेत अनेकदा वाद 

मारेकरी गजानन हा पत्नीच्या चारित्र्यावर घेत संशय होता.  नेहमी त्यांच्यात किरकोळ गोष्टीवरून वाद व्हायचे. या वादादरम्यान रेणुकाच्या माहेरच्यांनी अनेकदा गजानन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यातले वाद कायम असायचे. तसेच गजाननने आपली शेती पत्नी रेणुकाच्या नावाने केलेली होती, याच शेतीत ती पेरणी करण्यासाठी माहेरवरुन आली असता त्यांच्यात वाद होऊन प्रकरण विकोपाला गेले आहे.

हे ही वाचा :

Pune Accident Video: आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली, अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ

                         

अधिक पाहा..



Source link

‘गण गणात बोते’च्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन; भक्तांमध्ये उत्साह

‘गण गणात बोते’च्या गजरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अकोल्यात आगमन; भक्तांमध्ये उत्साह


महाराष्ट्र

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल



Source link

Weather Update : उकाड्यातच गेला जूनचा पंधरवडा; विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षाच!

Weather Update : उकाड्यातच गेला जूनचा पंधरवडा; विदर्भात अद्याप दमदार पावसाची प्रतिक्षाच!


Vidarbha Weather Updateगेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूननं (Monsoon) राज्यासह विदर्भापर्यंत  (Vidarbha) मजल मारली असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप विदर्भात दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, उष्णतेचा पारा सरासरीपेक्षा वरच असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने दमदार एंट्री केली असली तरी विदर्भात अद्याप पावसाने दांडी दिल्याने नेमका पाऊस गेला तरी कुठे? असा प्रश्न या निमित्याने विदर्भवासियांना पडला आहे. तर दुसरीकडे शेतीतीत पेरणीसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. अशातच नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon Arrived in Vidarbha) आज पासून पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी पाऊस हजेरी लावतो का? या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट    

जून हा पावसाचा महिना आहे. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी निम्या विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा अजूनही 40 अंशांच्यावर असल्याचे चित्र आहे. तर  दुसरीकडे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, विदर्भातील अनेक तलावांच्या पाण्याच्या पातळीनेही अगदी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना देखील आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अशातच हवामान विभागाने विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 16 जून ते 20 जून दरम्यान विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

योग्य पावसाशिवाय पेरणीची घाई करू नये, कृषी अधीक्षकांच आवाहन

गेल्या चार-पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे, यामध्ये खामगाव, शेगाव, देऊळगावराजा, चिखली, जळगाव जामोद या तालुक्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 70 मिलिमीटर पाऊस पडलेला आहे, त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे, तर इतर तालुक्यांमध्ये अजूनही कमी पाऊस पडल्याने शेतकरी आता पेरणी योग्य पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शंभर मिलिमीटर पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

वीज पडून शेतमजुराचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारच्या सायंकाळच्या सुमारास अचानकपणे विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असलेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील टाकळी भोसा या गावात घडली. कचरू नामदेव ढेंगे असं मृतक शेतमजुराचं नाव आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp