राष्ट्रवादीत जयंत पाटलांचे मोठे योगदान; रोहीत पवार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : अमोल मिटकरी

राष्ट्रवादीत जयंत पाटलांचे मोठे योगदान; रोहीत पवार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : अमोल मिटकरी


Amol Mitkari On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्ष उभारणीमध्ये जयंत पाटील (Jayant Patil) साहेबांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ज्याप्रमाणे शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) हा पक्ष उभा केला त्यानंतर जयंत पाटील, आर. आर आबा, अजित दादा पवार  या सर्वांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. अशातच नव्याने आलेला एक नवखा  युवक नव्याने आमदार होतो आणि सध्या ज्याप्रमाणे लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यामध्ये पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी फार कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे आयत्या बिळावर नागोबा ही म्हण आहे त्याचप्रमाणे रोहित पवार (Rohit Pawar) कृत्य करत आहे. यातूनच त्यांचे हे बालिशपणाचे वक्तव्य पुढे येत आहे. अशी बोचरी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे.

रोहित पवार आणि जयंत पाटलांच्या शीतयुद्धात अमोल मिटकरींची उडी  

नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापनदिन सोहळा अहमदनगरमध्ये पार पाडला. या सोहळ्यात स्टेजवर बसलेल्या नेत्यांकडून एकमेकांवर खोचक टीका केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, पक्षात कुठं तरी अंतर्गत कलह तर सुरू नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा पक्षांतर्गत कलह शरद पवारांची (Sharad Pawar) डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो. कारण, नगरमधील 25व्या वर्धापनदिन सोहळ्यात रोहित पवार यांनी नाव न घेता थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले.

त्यानंतर, राज्यात चर्चा सुरू झाली ती पक्षांतर्गत सुरु असलेल्या कलहाची. त्यातच, रोहित पवार (Rohit Pawar) समर्थक आणि जयंत पाटील समर्थकही सोशल मीडियातून भिडल्याचं पाहायला मिळालं. यात आता अमोल मिटकरी यांनी उडी घेत  जयंत पाटील यांची पाठराखण केली आहे. तर रोहित पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. 

रोहित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री व्हायचे आहे 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील हे किलर म्हणता येईल असेच नेतृत्व आहे. अलीकडे त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे कुणालाही आवडलेलं नाही. याबाबत स्वतः जयंत पाटलांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे  नुसतं ट्विटरवर टीवटीव करण्यापेक्षा याबाबत पवार साहेबांना सांगितले पाहिजे. यात काही चुकीचे वाटत असल्यास पवार साहेब त्यावर निर्णय घेतील, असा सल्लाही अमोल मिटकरी यांनी दिला आहे. मात्र असे सांगून देखील हा नेता असे वक्तव्य करत आहे. कारण रोहित पवार यांना भविष्यात मुख्यमंत्री व्हायचे आहे, असेच यातून दिसत आहे.

जयंत पाटील याचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम वाजवतील 

अजित दादा ज्यावेळी पक्षात होते त्यावेळी देखील अशाच पद्धतीने त्रास दिला जात होता. तेव्हा देखील अजितदादा पवार यांनी काही वेगळं मागितले नव्हतं. त्यावेळी अजित दादांनी हेच सांगितलं होतं की,  शरद पवार साहेबांचं वय हे 82 झालेला आहे.  त्यामुळे शारीरिक दृष्ट्या  होणारी धावपळ  आणि दगदग याला काही मर्यादा येत आहेत. आमच्याकडे या जबाबदाऱ्या सोपवून  आपण आम्हाला मार्गदर्शन करावे, हीच अजित पवार यांची भूमिका होती. त्यामुळे आता अजित पवार यांची जागा रोहित पवार घेऊ पाहत आहेत. त्यांना जयंत पाटील साहेब अडचण ठरत आहेत, म्हणून त्यांना देखील पक्षातून बाहेर काढला पाहिजे, पक्ष ताब्यात मिळावा, असे प्रयत्न सुरू आहे.

याबाबत सुनंदा पवार यांनी देखील सूचक वक्तव्य करून रोहित पवार यांना जबाबदारी देण्याची मागणी केली आहे.  एकंदरीत पक्षातील ही परिस्थिती पाहता  जयंत पाटील साहेबांचा हा एक प्रकारे अपमान आहे. मात्र मला याची देखील खात्री आहे की जयंत पाटील साहेब याचा टप्प्यात आल्यावर कार्यक्रम वाजवतील. अशी बोचरी टीका ही आमदार अमोल मिटकरी यांनी बोलताना केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

दिलासादायक! तुरीला हंगामातील सर्वोच्च दर, बळीराजाला दिलासा, नेमका किती मिळतोय दर?

दिलासादायक! तुरीला हंगामातील सर्वोच्च दर, बळीराजाला दिलासा, नेमका किती मिळतोय दर?


Agriculture News : तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Tur Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तुरीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं तुर उत्पादकांना चांगला फायदा मिळत आहे. या आठवड्यात अकोल्यात तुरीला (Tur) या हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात (Akola) सध्या तुरीचे भाव 12000 ते साडेतेरा हजाराच्या दरम्यान आहेत.

अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला 13 हजार 800 रुपयांचा दर

या आठवड्यात अकोल्यात तुरीला हंगामातील सर्वोत्तम भाव मिळाला आहे. अकोल्यात तुरीचे भाव सध्या 12000 ते साडेतेरा हजाराच्या दरम्यान आहेत. दोन दिवसांपुर्वी अकोल्यात उच्च प्रतीच्या तुरीला 13 हजार 800 रुपयांचा प्रती क्विंटल भाव मिळाला होता. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या तुरीची आवक सुरु झाली आहे. यावर्षी तुरीला सरकारनं 7000 रूपये किमान आधारभूत मुल्य दिलं आहे. मात्र, सध्या हमीभावापेक्षा तुरीला ज्यादा दर मित आहे. 

हंगामाच्या सुरुवातीला तुरीच्या घरात झाली होती घसरण

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला तुरीचे भाव पडल्याने तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र, अलीकडे बाजारात तुरीच्या वाढत्या मागणीमुळे तुरीला अच्छे दिन आल्याची परिस्थिती आहे. अकोल्यात सध्या तुरीला सरासरी 12000 एवढा सरासरी भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. मात्र, या वाढलेल्या भावाचा फारसा फायदा शेतकऱ्यांना  होत नसल्याची खंत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात अकोला बाजार समितीत तुरीला मिळालेला सर्वोच्च भाव

तारीख      सरासरी भाव (प्रती क्विंटल)

08 जून       13905
09 जून       12920
10 जून       13800
11 जून       12500
12 जून       11300

महत्वाच्या बातम्या:

पोलिसाची नोकरी सोडून शेतीत रमला, आज तुरीच्या पिकातून तरुण करतोय लाखोंची कमाई 

अधिक पाहा..



Source link

पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचीही शक्यता

पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट; विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचीही शक्यता


Vidarbha Weather Updateहवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार विदर्भातील (Vidarbha)  बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावत एकच दाणादाण उडावली आहे. यात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, तर अनेकांच्या नाहक बळीही गेला आहे. मात्र अलिकडे पडत असलेला पाऊस हा मान्सून (Monsoon) नसल्याचे नागपूर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत सलग कोसळत असेलेल्या दमदार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांच्या घरांवरची छत उडून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि विद्युत प्रवाह खंडित झाला आहे.

तर आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यात पावसाचे ढग कायम राहणार असून सोसाट्याचा वारा आणि ताशी 30-50 किमी वेगाचा वादळी वाऱ्याचा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. 

पुढील पाच दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट

जून हा पावसाचा महिना आहे. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी निम्या विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्यावर असल्याचे चित्र आहे. तर  दुसरीकडे तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, विदर्भातील अनेक तलावांच्या पाण्याच्या पातळीनेही अगदी तळ गाठला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांना देखील आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अशातच हवामान विभागाने विदर्भातील सर्वच्या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. 12 जून ते 16 जून दरम्यान विदर्भात विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज नागपूर प्रदेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.     

50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेलेत

यवतमाळ जिल्ह्यात 11 जूनच्या रात्री जोरदार पाऊस बरसला. पुसद, रुंझा, डोंगरखर्डा, कळंब, हिवरी, हिवरी संगम, सवना, महागाव, महागाव कसबा आणि बाभूळगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली. नाकापार्डी येथे  वादळी पावसाने अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाली. यात 50 ते 60 घरांवरील छप्पर उडून गेलेत. यात धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेतकऱ्यांनी  लागवडीसाठी आणलेले बियाणे, खते याचेही नुकसान झाले. नुकसान झालेल्या घरांच्या सर्व्हे करण्यात आला असून आपत्ती विभागाकडून नुकसानीसाठी मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर; प्रदेश काँग्रेसच्या सचिवाचे सहा वर्षासाठी निलंबन

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर; प्रदेश काँग्रेसच्या सचिवाचे सहा वर्षासाठी निलंबन


Lok Sabha Election Result 2024 : देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कायम राहिला तर महायुतीची सत्ता जाणे अटळ आहे.

लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेस ॲक्शन मोडवर 

दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने  (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी काही मतदारसंघातील पराभवानंतर काँग्रेस अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसपक्ष नेतृत्वाने संघटनात्मक स्तरावर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. याची सुरवात आज अकोल्यातून झाली आहे.  

प्रदेश काँग्रेसच्या सचिवाचे सहा वर्षासाठी निलंबन

अकोला लोकसभेतील पराभवानंतर अकोल्यातील पक्षविरोधी कारवायांवर काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांचे पक्ष आणि पदावरून निलंबन करण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी गावंडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्याविरोधात वंचितचे सर्वेसर्वा आणि अकोला मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे असलेल्या प्रकाश आंबेडकरांचं निवडणुकीच्या काळात काम केल्याचा ठपका गावंडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.परिणामी  पक्ष विरोधी कारवाईचा ठपका ठेवत प्रशांत गावंडे यांच्यावर सहा वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतचा आदेश आज बुधवार, 12 जून रोजी प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे (प्रशासन व संघटन) यांनी काढला आहे.

कोण आहेत प्रशांत गावंडे ?

  • प्रशांत गावंडे हे सध्या प्रदेश काँग्रेसचे सचिव पदावर कार्यरत आहेत. 
  • काँग्रेस पक्षात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे.
  • अकोल्यातील सर्वपक्षीय ‘शेतकरी जागर मंच’ या गैरराजकीय शेतकरी आंदोलनाचे ते संस्थापक आहेत
  • पाच वर्षांपूर्वी भाजपचे तत्कालिन जेष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी शेतकरी जागर मंचाच्या व्यासपीठावरून केलेलं शेतकरी आंदोलन देशभर गाजलं होतं.
  • गावंडे यांचा काँग्रेसच्या राहूल गांधी, सोनिया गांधी, मुकूल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला या नेत्यांशी थेट संपर्क आहे. 
  •  अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांचे कट्टर विरोधक अशी ओळख त्यांची ओळख आहे. 
  • ‘महाबीज’ संचालक पदाच्या निवडणुकीत संजय धोत्रेंना त्यांनी तगडं आव्हान दिले होते. मात्र त्यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला होता.
  • अकोला लोकसभेसाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.
  • काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अकोला लोकसभेत त्यांनी आंबेडकरांचं काम केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Mohan Bhagwat : राजकीय पक्षांना सरसंघचालकांच्या कानपिचक्या, सध्य परिस्थितीवरुन सर्वांना खडे बोल! नेमकं काय म्हणले मोहन भागवत?

अधिक पाहा..



Source link

राज्यात मान्सूनची एन्ट्री, तर विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ; मान्सूनच्या प्रतीक्षेत शेतकरी

राज्यात मान्सूनची एन्ट्री, तर विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ; मान्सूनच्या प्रतीक्षेत शेतकरी


Vidarbha Weather Update : राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाने (Maharashtra Monsoon) दमदार हजेरी लावली असताना, विदर्भवासी (Vidarbha) अजूनह आकाशाकडे डोळे लावून आहेत. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील काही भागात कोसळलेल्या पावसाने एकच दाणादाण उडवली आहे. यात अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या नाहक बळीही गेला आहे. मात्र अलिकडे पडत असलेला पाऊस हा मान्सून (Monsoon) नसल्याचे नागपूर हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

अशातच उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांसह बळीराजालाही आता दमदार पावसाची प्रतीक्षा असतानाच विदर्भातील जलसाठयाने तळ गाठल्याचे चित्र आहे. त्यामुळे जवळ जवळ अर्धा जून महिना निघून गेल्याने मृग नक्षत्र कोरडे तर जाणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्व विदर्भातील अनेक तलावांनी गाठला तळ

जून हा पावसाचा महिना. मात्र, आता जून महिन्याचा मध्यान्ह लागला असला तरी भंडारा जिल्ह्यासह पूर्व विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात मान्सूनचं अजूनही आगमन झालेलं नाही. परिणामी प्रखर उष्णता आणि उन्हाच्या झळा अजूनही नागरिकांना सोसाव्या लागत आहे. अशाच तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडे ठाक झाले आहेत. तर, काही तलावांची पाण्याच्या पातळीनं अगदी तळ गाठला आहे. 

नागपूर विभागातील प्रकल्पातील जलसाठा

नागपूर विभागाचा जलसाठा आजची स्थिती 37 टक्के आहे. मात्र मागील वर्षी हाच जलसाठा 41.52 इतका होता

जिल्हा आणि प्रकल्पातील जलसाठा

बावनथडी : आजचा साठा 6.41, 
मागील वर्षीचा आजच्या दिवशीच साठा 22.55

गोसेखुर्द : आजचा साठा 32.61
मागील वर्षी 28.40

अस्वलामेंढा : आजचा साठा 21.67, मागील वर्षी 70.19

दिना : आजचा साठा 18.76, मागील वर्षी 33.97

धापेवाडा : आजचा साठा- 51.78, मागील वर्षी 37.28
इटियाडोह : आजचा साठा 24.68, मागील वर्षी-24.68
कालीसरार : आजचा साठा 0 टक्के, मागील वर्षी 34.74
पुजारी टोला : आजचा साठा 36.60, मागील वर्षी 86.06
शिरपूर : आजचा साठा 8.59, मागील वर्षी 9.15

कामठी (खैरी) : आजचा साठा 85.78, मागील वर्षी 70.40
खिंडसी : आजचा साठा 58.42, मागील वर्षी – 66.68
नांद : आजचा साठा 0.51, मागील वर्षी- 17.63
तोतलाडोह : आजचा साठा 49.79, मागील वर्षी-57.75
वडेगाव : आजचा साठा 29.27, मागील वर्षी-32.91

बोर : आजचा साठा 29.86, मागील वर्षी 35.91
लोअर वर्धा : आजचा साठा 48.47, मागील वर्षी – 49.59

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू


Vidarbha Weather Update Akola : विदर्भात (Vidarbha) मान्सून दाखल होण्यास अद्याप अवकाश असताना विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जीवितहानी झाल्याच्या घटनाही आता समोर येऊ लागल्या आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना अकोला (Akola) जिल्ह्यात घडली. काल, 11 जून रोजी दुपारनंतर सुमारे दोन तास कोसळलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटाने एकच दाणादाण उडवली आहे.

दरम्यान यावेळी अकोल्यात (Akola News) विज पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यात वीज पडून या दोन तरुणाचा मृत्यू झालाय. ग्राम खापरवाडा येथील शुभम राजू टापरे (वय 30) आणि टिपटाळा येथील शालीग्राम श्रीराम डोंगरे (वय 65) असे मरण पावलेल्या व्यक्तींचे नाव आहे. दोघे जण शेतात काम करीत असताना त्यांच्यावर विजपडून काल सायंकाळच्या सुमारास दुर्दैवी मृत्यू झालाय. 

नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात दमदार मान्सून पूर्व पावसासह वादळी वाऱ्याने एकच दाणादाण उडवली आहे. काल 11 जूनच्या संध्याकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वारा आणि पावसाने विदर्भातील बहुतांश भागात मोठे नुकसान केल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. काल दिवसभर आणि रात्री अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे अकोट तालूक्यातील पठार नदीला पूर आलाय. मात्र, सध्या पठार नदीवर तीन ठिकाणी सुरू असलेल्या पुलाच्या संथगतीने सुरू असलेल्या बांधकामाचा फटका नागरिकांना बसलाय. पठार नदीवर मरोडा, दिनोडा आणि पनोरी येथे पुलांचं बांधकाम सुरूये.

बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या बाजूने तात्पुरता केलेल्या रस्त्याचा भराव तिन्ही ठिकाणी वाहून गेलाय. त्यामुळे तिन्ही गावातील दळणवळण व्यवस्था कोलमडून गेलीय. गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाचं बांधकाम सुरू आहे. मात्र, कंत्राटदाराच्या संथगतीने काम करण्याचा भुर्दंड या तिन्ही गावातील नागरिकांना भरावा लागतोये. या तिन्ही गावांचा संपर्क यामूळे सध्या तुटलाय. या तिन्ही ठिकाणच्या भराव वाहून गेल्याची एक्सक्लूझिव्ह दृष्य एबीपी माझाच्या हाती लागली आहेत.

विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 

दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात 11 ते 16 जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी 40 ते 50 किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये, वीज चमकत असताना मोबाईल, विजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने विजेचा खांब आणि झाडे यापासून दूर ठेवावीत, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp