Ashadhi Wari 2024 : कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारीचं यंदाचे 430वं वर्ष

Ashadhi Wari 2024 : कौंडिण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारीचं यंदाचे 430वं वर्ष


”…तर पालकमंत्री संदीपान भुमरेंना जिवेच मारू, तुमचा शरद मोहोळ अन् गजू तौर करू”; संभाजीनगरमध्ये ‘गब्बर’च्या पत्राने खळबळ, पोलिस अधिकारी फैलावर



Source link

विदर्भात मान्सून पूर्व पावसाची दाणादाण! वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच नेले उडवून

विदर्भात मान्सून पूर्व पावसाची दाणादाण! वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच नेले उडवून


Vidarbha Weather Update नागपूर : हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) मान्सूनपूर्व पावसाने एकच दाणादाण उडावल्याचे बघायला मिळाले. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना  पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. यात अनेकांच्या घरांवरची छत उडून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी मोठे झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक आणि विद्युत प्रवाह खंडित झाला आहे. तर पूर्व विदर्भात हजारो क्विंटल धान पावसात अक्षरक्ष: ओले होऊन लाखोंचे नुकसान झाले आहे.

तर आगामी चार दिवसात विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे. आज देखील विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, वर्धा, गोंदिया इत्यादि ठिकाणी दमदार पावसाने सलग हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या वैदर्भीयांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. 

वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच नेले उडवून   

तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चक्रीवादळामुळे यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याचे छप्पर पूर्णपणे उडून गेले. त्यामुळे या ठाण्याचा सद्यस्थितीतील कारभार या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कापडी टेंट मधून चालविण्यात येत आहे. वादळाच्या तडाख्यात इमारतीवरील टिनाचे छप्पर अक्षरक्ष: उडाल्याने संगणक आणि इतर कागदपत्रे पावसाने ओली झाली होती. छप्पर उडल्याने पोलीस ठाण्याचे कामकाज कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी, ठाणेदारांच्या कॅबिनमध्ये स्टेशन डायरी आणि वायरलेसची व्यवस्था करण्यात आली. तर ठाणेदारांना कामकाज सांभाळण्यासाठी समोरील मैदानात पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून टेंट उभारून देण्यात आला आहे. तर नुकतेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणची पाहनी केली असून  सर्व्हे करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी दिवसात या पोलीस ठाण्याचे बांधकाम करण्याच्या उपाययोजना सुरू करण्यात येणार आहे. मात्र अद्याप तरी या पोलीस ठाण्याचा कारभार कापडी टेंटमधूनच होत असल्याचे समोर आले आहे.  

विदर्भात सलग कोसळत असलेल्या पावसाने वैदर्भीयांना दिलासा 

सलग दुसऱ्या दिवशीही बुलढाण्यात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय. काही वेळ कोसळलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरीही सुखावलाय. त्यामुळे आगामी दोन दिवसात खरिपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. विदर्भात मान्सून दाखल होण्यासाठी दोन दिवसाचा अवधी उरला असला तरी वाशिम जिल्ह्यातही आज सलग पाचव्या दिवशी अनेक भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील कामांना आणि पेरणीना वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाला आहे.

अकोल्यातही आज मान्सून पूर्व पावसासह जोराच्या वादळी वाऱ्याने हजेरी लावली आहे. अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार वारा आणि पाऊस पडतो आहे. अकोल्यात वाढत्या तापमानामुळे अकोलेकर चांगलेच हैरान झाले होते. मात्र आज सायंकाळच्या पावसानं अकोलेकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

आमचा विजय पचनी पडला नाही म्हणून घाण राजकारण; बॅनर फडल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रया

आमचा विजय पचनी पडला नाही म्हणून घाण राजकारण; बॅनर फडल्याप्रकरणी यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रया


Amravati News अमरावती : अमरावती लोकसभेत  (Loksabha Election 2024) ज्यांना पराभव पत्करावा लागला त्यांना हार पचवता आली नाही. राज्यात शिव-शाहू फुले, आंबेडकर विचारधारा आहे. मात्र काही लोक घाण राजकारण करत आहेत. आम्ही गांधी विचाराने पुढे जाणारी लोक आहोत. मात्र गरज पडल्यास त्यांना योग्य उत्तर देखील देऊ शकतो. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्री यांना मी विनंती केली आहे की हे आता थांबले पाहिजे. आमचा विजय त्यांच्या पचनी पडला नाही. म्हणूनच त्यांनी आमच्या विजयाचे बॅनर फाडले आहेत. ही संस्कृती कुणाची आहे आणि या मागे कुणाचा हात आहे हे अमरावती मधील लोकांनां चांगल्याने माहीत आहे. अशा शब्दात अमरावतीत काँग्रेसच्या खासदार बळवंत वानखेडे यांचे बॅनर फडल्या प्रकरणी निषेध करत काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

आमचा विजय त्यांना पचनी पडला नाही – यशोमती ठाकूर 

अमरावतीच्या राजकमल चौकात काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे फ्लेक्स फाडल्याचा प्रकार समोर आलाय. या संपूर्ण प्रकाराबद्दल काँग्रेसने संताप व्यक्त केलाय. ही घटना रविवारच्या सायंकाळी घडली. या प्रकरणी आज काँग्रेसकडून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली असून बॅनर फाडणाऱ्याला तात्काळ कारवाई करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच कारवाई होत नाही तोपर्यंत सिटी कोतवाली ठाण्यात काँग्रेस शहराध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं.

परिणामी पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 जणाविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. तर आतापर्यंत 4 जणांना अटक केली असून इतरांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. या प्रकरणी आता  काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर या देखील आक्रमक झाल्या असून त्यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे. 

अमोल मिटकरी यांनी आधी त्यांच्या पक्षाचं पहावं

रोहित पवार (Rohit Pawar) हे माझ्या लायकीचे नेते नाहीत, ते ग्ल्लीबोळातील नेते असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय. तसेच विजय वडेट्टीवार काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच भाजप पक्षामध्ये जातील असा दावाही त्यांनी केला. याविषयी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, अमोल मिटकरी यांना विचारून विजय वडेट्टीवार निर्णय घेतील अस वाटत नाही. त्यामुळे ते आजही सोबत आहेत आणि उद्याही सोबत राहतील. अमोल मिटकरी यांनी त्यांच्या पक्षाचं पहावं, आमच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. असे म्हणत अमोल मिटकरींचा दावा यशोमती ठाकूर यांनी फेटाळून लावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात;  भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू 

मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात;  भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू 


Akola News अकोला : अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली आहे. अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्याय. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीच चाक या भेगांमधून गेले आणि अडकलं. त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसरा व्यक्तिला देखील अपघातात जिव गमवावा लागला आहे. सचिन जुनारे आणि शाम महल्ले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू 

घटनेची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठत, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघतामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.  

 गुरांच्या गोठ्याला आग, तीन म्हशींचा होरपळून जागीच मृत्यू

वाशिमच्या शिरपूर जैन  शेतशिवार भागातील गोविंदराव देशमुख यांच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली आहे. या आगीत तीन म्हशींचा होरपळून जागीच मृत्यू झालाय. तर तीन जनावरे आगीत गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर  शेतशिवारात गोविंद देशमुख या शेतकऱ्याच्या शेतातील गुरांच्या गोठ्याला काल दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली. शेतामध्ये कुणीच हजर नसल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. दरम्यान, गोठ्यामध्ये दोन बैल, चार म्हशी बांधलेल्या होत्या. सदर आगीमध्ये गवताचा गोठा जळून पूर्णपणे खाक झालाय. तर तीन म्हशींचा आगीमध्ये जळून मृत्यू झाला आहे. सोबतच  तीन जनावरे जखमी झाले आहेत. या घटनेत शेतकऱ्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

कापूस गोदामला भीषण आग 

अशीच एक आगीची घटना यवतमाळच्या पांढरकवडा येथे घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत पाच हजार कापूस गठानी जळून खाक झाल्याची घटना घडली. सिबला रोडवर असलेल्या झाझरिया यांच्या कापूस गोडाऊनमध्ये पाच हजार कापूस गठानी ठेवून होत्या. मात्र अचानक आग लागलेल्या आगीने पाहता पाहता रौद्ररूप  धारण केले. दरम्यान, तेथील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती देताच, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

विदर्भात काँग्रेसची घरवापसी, भाजपला धक्का; दहा मतदारसंघातल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय?

विदर्भात काँग्रेसची घरवापसी, भाजपला धक्का; दहा मतदारसंघातल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय?


Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : राज्यासह देशाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि विदर्भातील (Vidarbha) सर्वात प्रतिष्ठेचा अन् हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या, नागपूर लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election Result 2024) भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकारींनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतीत गडकारींनी आपल्या विकासाच्या जोरावर विजयाची माळ आपल्या गळ्यात घातली आहे. दुसरीकडे विदर्भात मात्र काँग्रेसने घरवापसी केल्याचे चित्र आहे.

कारण विदर्भातील (Vidarbha) दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश आले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातील सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. विदर्भातील दहा मतदारसंघात नेमकं काय घडलं, या  मतदारसंघातल्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय?  हे आपण जाणून घेऊया.      

नागपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Election Result 2024) पहिल्या फेरी पासून  नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे  चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी 1,37,603 मतांनी आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. नितीन गडकरी यांना 6 लाख 55 हजार 027 मते मिळाली तर विकास ठाकरे (Vikas Thakre) यांना 5 लाख 17 हजार 424 मते मिळवत पराभव स्वीकारावा लागलाय. नागपूरची 12 तर साडे चौदा तास मतमोजणी झाली. यात मात्र गेल्या वेळीच्या तुलनेत गडकारींच्या मताधिक्यात 1.56 टक्क्यांनी घट झाली. तर मध्य नागपूर गडकारींच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरला. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार ज्या मतदारसंघात आमदार आहेत तिथेच त्यांना कमी मते पडल्याचे समोर आले आहे. नागपूर मतदारसंघ भाजपने जरी राखला असला तरी विदर्भात भाजपला सफशेल अपयश आल्याचे पाहायला मिळाले. 

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ

नागपूरनंतर पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचा पराभव केला आहे. प्रतिभा धानोरकर यांना एकूण 7 लाख 18 हजार 410 मत मिळाली, सुधीर मुनगंटीवार यांना 4 लाख 58 हजार 004 मत मिळाली. प्रतिभा धानोरकर यांनी 2 लाख 60 हजार 406 मतांनी विजय मिळवला. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, त्या मतदारसंघातूनही प्रतिभा धानोरकर यांना मताधिक्य मिळालं. त्यामुळे चंद्रपूरात देखील भाजपला मोठा धक्का बसला असून 2019 प्रमाणेच काँग्रेसने हा गड राखला आहे.   

रामटेक लोकसभा मतदारसंघ

नागपूर आणि चंद्रपूरनंतर देशाला पंतप्रधान मिळवून देणारा मतदारसंघ अशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख असलेल्या रामटेक गडावरही महायुतीला अपयश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी  दणदणीत विजय मिळवत रामटेकच्या गडात काँग्रेसच्या गडात 6 लाख 13 हजार 025 मतांनी विजयी झेंडा रोवला आहे. विशेष म्हणजे कधीकाळी रामटेक मतदारसंघातील कांद्रीचे माजी उपसरपंच आता रामटेकचे खासदार झाले आहेत. 

अकोला लोकसभा मतदारसंघ

नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला विजय मिळवण्यात यश आले आहे. महायुतीचे भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे या निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. मात्र संजय धोत्रे आजारी असल्याने यंदा अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. मात्र, विदर्भात नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला यश आले आहे.  

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात (Bhandara Gondia Lok Sabha Election) काँग्रेसचा नवा चेहरा असलेले डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) आणि सलग दुसऱ्यांदा महायुतीचे उमेदवार असलेले सुनील मेंढे (Sunil Mendhe) यांच्यात अतीतटीची लढत झाली. राज्यात एकट्या भंडारागोंदिया मतदारसंघात उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. अखेर 30 व्या फेरीत डॉ. प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेत विजय मिळवला आहे. तर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यावर 32 हजार 945 मतांनी आघाडी घेत आपल्या गळ्यात पहिल्याच टर्म मध्ये विजयाची माळ घातली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात तब्बल 25 वर्षानंतर निवडणुकीत पहिल्यांदा इव्हीएम मशीनवर पंजा निवडणूक चिन्ह पाहायला मिळाले होते. तर राज्यातील पक्ष फुटीनंतर या मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

अमरावती लोकसभा मतदारसंघ

विदर्भातील कायम चर्चेत असलेल्या अमरावती या मतदारसंघात मोठी रंजक निवडणूक झाल्याचे बघायला मिळाले होते. यात भाजपच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवलेल्या नवणीत राणा (Navneet Rana) यांचा पराभव झाला आहे. येथे मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पारड्या मतं टाकली आहेत.पूर्वी अपक्ष म्हणून निवडणूक लढल्या आणि विजयी ठरलेल्या नवनीत राणा यंदा मात्र भाजपच्या तिकिटावर 19 हाजार 731 मतांनी पराभूत झाल्या आहेत. अमरावती लोकसभेच्या मैदानात यंदा तिहेरी लढत पाहायला मिळाली. काँग्रेसचे बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा आणि प्रहारचे दिनेश बुब हे मैदानात होते. पण या तिहेरी लढतीत काँग्रेसने बाजी मारत बळवंत वानखेडेंनी विजयाचा गुलाल उधळलाल. त्यामुळे विदर्भातील एका महत्त्वाच्या जागेवरची महायुतीची आणि पर्यायाने भाजपची पकड सुटली.  

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ

विदर्भातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या यवतमाळ-वाशिमची निवडणूक यंदा कधी नव्हे इतकी चुरशीची ठरली. गेल्या पाच टर्मपासून यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेच्या भावना गवळी यांचे एकहाती वर्चस्व होते. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अँटी-इन्कम्बन्सीचा फॅक्टर आणि भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे महायुतीने भावना गवळी यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे यवतमाळमधून शिंदे गटाने  हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील  यांना रिंगणात उतरवले होते. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून रिंगणात उतरलेल्या ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचे आव्हान होते. मात्र उद्धवसेनेने अखेर हा गड आपल्याकडे खेचला आहे. 94 हजार 474 मतांनी महायुतीच्या राजश्री पाटील यांचा दारुण पराभव झाला.    

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

सुनेत्रा पवार यांचा पराभव म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आईचा पराभव; विधानसभेत बदला घेणार-अमोल मिटकरी

सुनेत्रा पवार यांचा पराभव म्हणजे कार्यकर्त्यांसाठी आईचा पराभव; विधानसभेत बदला घेणार-अमोल मिटकरी


Lok Sabha Maharashtra Election Result 2024 Amol Mitkari: राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मत मिळाली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मोठी खळबळ उडून दिली होती. लोकसभेच्या निकालानंतरही आपण आपल्या आरोपांवर आजही ठाम असल्याचं अमोल मिटकरींनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं आहे. या संदर्भातील आपल्याकडील काही गोष्टी आणि पुरावे पुढच्या दोन दिवसात पक्षश्रेष्ठींना भेटून देणार असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. अमोल मिटकरींनी आज अकोल्याचे भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावरुन देखील अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं. लोकसभेतील विजयाची हवा रोहित पवारांच्या डोक्यात शिरल्यानेच ते अशी विधानं करत आहेत, असं अमोल मिटकरी म्हणाले. दरम्यान बारामतीतील सुनेत्रा पवार यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपल्या आईचा पराभवासारखा आहेत. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या पराभवाचा बदला विधानसभेत घेणार असल्याची प्रतिज्ञाही यावेळी अमोल मिटकरींनी केली. 

सुनेत्रा पवारांचा पराभव-

 बारामतीत (Baramati Lok Sabha Election) नंणद सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भावजय सुनेत्रा पवारला (Sunetra Pawar)  जोरदार धक्का दिला आहे.   बारामती राखण्यात सुप्रिया सुळेंना यश मिळाले आहे. तर अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवारांचा पराभव झाला आहे. सध्या बारामतीत  जल्लोष समोर आला आहे. बारामतीचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का  मानला जात आहे.

अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या : रोहित पवार

आम्हाला नेता बनण्याची घाई झाली नाही. भाजपने खाली राजकारण नेलं होतं. ते पुन्हा व्यवस्थित करायचं आहे.  जेव्हा अनेक नेते धमक्या देत होतें त्यावेळी आम्ही म्हणत होतो की जनता हे सर्व काही बघत आहे. अनेक लोकांच्या झोपा आता उडाल्या आहेत. महाराष्ट्राला पुन्हा एक नंबरच राज्य करायचे आहे. वंचित आमच्यासोबत आले असते तर नक्की आणखी वेगळं चित्रं पाहिला मिळालं असतं. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरस-

लोकसभा 2024 च्या निवडणूकीत (Lok Sabha Election Result 2024) महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा मिळवत दमदार यश मिळवले. तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानवे लागले. राज्यात काँग्रेसला सर्वाधिका 13 जागा मिळाल्या. तर उद्धव ठाकरेंना 9 आणि शरद पवार यांच्या पक्षाला 8 जागा मिळाल्या. भाजपला 9, शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा जिंकली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले.

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp