Akola News : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक होती; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Akola News : अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक होती; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप


Akola Lok Sabha Election Result 2024 अकोला  : अकोल्यात पराभूत झाल्यानंतर काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपला पूरक होती. त्यातूनच त्यांनी निवडणुकीदरम्यान अनेकदा आपल्यावर वैयक्तिक टीका आणि आरोप केल्याचं खळबळजनक आरोप डॉ. अभय पाटील (Abhay Patil) यांनी केला आहे. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’ शी  बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच मतदारांनी 2019 च्या तुलनेत आंबेडकरांचे मताधिक्य घटवल्याचा टोलाही अभय पाटील यांनी लगावलाय. दरम्यान आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करून पुढची दिशा ठरवणार असल्याचेही अभय पाटील म्हणालेय. 

अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका भाजपला पूरक 

अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील अनुप धोत्रे या निवडणुकीत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. मात्र संजय धोत्रे आजारी असल्याने यंदा अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. मात्र, विदर्भात नागपूरनंतर केवळ अकोल्यात भाजपला यश आले आहे.

अशातच अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही भाजपाला पूरक असल्याचा आरोप काँग्रेसचे पराभूत उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केला आहे. संपूर्ण निवडणुकीच्या काळात त्यांनी भाजप एवजी सर्वाधिक टीका ही आपल्यावरच केल्याचे डॉ. अभय पाटील म्हणाले आहेत. शिवाय अकोल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही परस्परविरोधी भूमिका असल्याचेही ते म्हणाले आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?

देशपातळीवरील समीकरणं

एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17

महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल

महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1

महायुतीमधील पक्षीय बलाबल

भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1

महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?

काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

बारामतीच्या पराभवाचे खापर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा, म्हणाले..

बारामतीच्या पराभवाचे खापर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर; अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा, म्हणाले..


Amol Mitkari अकोला : महाराष्ट्र आणि बारामतीत (Baramati Lok Sabha Election)अजितदादांना (Ajit Pawar) भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मत भेटली नसल्यानेच अजित पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी  (Amol Mitkari) यांनी केलाय. ते अकोला येथे एबीपी माझा शी बोलत असताना त्यांनी हे मोठे विधान केले आहे. बारामतीत सुनेत्रा पवारांना मिळालेली मतं ही फक्त अजित दादांचीच असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय.

दरम्यान, पक्ष आणि पक्ष चिन्ह हातातून गेल्यानंतरही चांगली कामगिरी करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर त्यांनी स्तुतिसुमनं देखील उधळलीय. लोकसभेवर निवडून गेलेल्या निलेश लंकेचेही त्यांनी अभिनंदन केलंय. मात्र, विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आपले पाय जमिनीवरच ठेवावेत, असा टोलाही यावेळी मिटकरी यांनी लगावलाय. 

अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या असत्या तर आज चित्र वेगळं असतं

लोकशाहीमध्ये जनता ची सर्वस्वी असते. जनतेने जो कौल दिला तो आम्हाला प्रामाणिकपणे मान्य आहे. कदाचित त्यांना आमचे काही निर्णय पटले नसावे, असेच एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे. आम्हाला नाशिक,गडचिरोली, धाराशिव, इत्यादी अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या असत्या तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. मात्र एकंदरीत राज्याचे समीकरण बघितले तर महायुतीच्या इतर घटक पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नक्कीच फायदा झाला आहे. मात्र त्या दोन्ही पक्षांचा राष्ट्रवादी पक्षाला फायदा झाला असता तर आज बारामतीचे चित्र वेगळं असतं आणि आमचा पराभव झाला नसता, असा मोठा दावा अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.

बारामतीतील पराभव हा नक्कीच धक्कादायक  

हाती आलेले निकाल हे नक्कीच अनपेक्षित आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नक्कीच आम्हाला कमी वेळ मिळाला. मिळालेल्या वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र जनतेने जो काही कौल दिला आहे तो आम्हाला मान्य आहे. बारामतीतील पराभव हा नक्कीच धक्कादायक आहे. कारण विकासाचे राजकारण करण्यासाठी अजित पवार यांनी भर दिला होता त्यांनी कुठेही भावनिक मुद्द्यांना हात घातला नाही. मात्र बारामतीकरांनी भावनिक मुद्द्यांनाच अधिक महत्त्व दिल्याचे या निकालातून पुढे आल्याचे दिसत आहे. यातून आम्ही बरेच काही गोष्टी शिकणार आहोत आणि पूर्ण ताकदीनिशी परत पुढे जाऊ कारण या राज्यात अजितदादांचे नेतृत्व महत्वाचे आहे.  सर बारामतीच्या पराभवाची सर आम्ही भरून काढू, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Baramati Result : ना लेकाला निवडून आणता आलं ना पत्नीला; अजित पवारांच्या पदरी पराभवाची मालिका

अधिक पाहा..



Source link

विदर्भातील दहा मतदारसंघात कुणाच्या विजयाचा गुलाल? कोणाचा पराभव, तर कोणत्या पक्षाचे किती खासदार?

विदर्भातील दहा मतदारसंघात कुणाच्या विजयाचा गुलाल? कोणाचा पराभव, तर कोणत्या पक्षाचे किती खासदार?


Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) आता हाती येऊ लागले आहे. त्यानंतर आता देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेला मतदानाचा कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसले आहे. अशातच विदर्भातील महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक 21 जागा या शिवसेना ठाकरे गटाने लढल्या. तर त्यानंतर काँग्रेसने 17 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 10 जागा लढवल्या. तर दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक 23 जागा या भाजपने लढवल्या, तर शिंदे गटाने 15 आणि अजित पवारांनी चार जागा लढवल्या आहेत. तर त्यापैकी विदर्भात 10 मतदारसंघाचे अंतिम निकाल पुढे आले आहे.  

विदर्भातील दहा मतदारसंघात कुणाच्या विजयाचा गुलाल?  

राज्यासह विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेचा आणि हायव्होल्टेज मतदारसंघांमध्ये समावेश असलेल्या नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढतीत गडकारींनी विजय माळ आपल्या गळ्यात घातली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Result 2024) पहिल्या फेरी पासून  नितीन गडकरींची सरसी कायम असल्याचे  चित्र होते. तर अखेरच्या फेरीत नितीन गडकारींनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे अकोल्यातून भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले आहे. यात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचाही  दणदणीत पराभव केला आहे. त्यामुळे चाळीशीतील अनुप धोत्रे या मतदारसंघात जायंट किलर ठरत पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा  दारूण पराभव केला आहे. तर अमरवती, वर्धा, चंद्रपुर, गडचिरोली-चिमूर या मतदारसंघात देखील महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. 














  लोकसभा मतदारसंघ विजयी  पराभव   
बुलडाणा प्रतापराव जाधव नरेंद्र खेडेकर  
अकोला अनुप धोत्रे  प्रकाश आंबेडकर, अभय पाटील  
अमरावती बळवंत वानखडे  नवनीत राणा   
वर्धा अमर काळे  रामदास तडस   
रामटेक श्याम बर्वे राजू पारवे  
नागपूर नितीन गडकरी विकास ठाकरे  
भंडारागोंदिया प्रशांत पडोळे सुनील मेंढे  
गडचिरोली-चिमूर  नामदेव किरसान अशोक नेते  
चंद्रपूर प्रतिभा धानोरकर सुधीर मुनगंटीवार  
10  यवतमाळ – वाशिम संजय देशमुख  राजश्री पाटील  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

वंचितला मतदारांनी नाकारले; पुणे, बीड, धाराशिव, परभणी अन् अकोल्यातून कुणाला किती मतं?

वंचितला मतदारांनी नाकारले; पुणे, बीड, धाराशिव, परभणी अन् अकोल्यातून कुणाला किती मतं?


मुंबई: लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत येणार की नाही, यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच खलबतं झाली. मात्र, अखेर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, वंचतने बहुतांश मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, एकाही मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आघाडी घेता आली नाही. वंचितने उमेदवार उभे केलेल्या 5 मतदारसंघातील उमेदवारांची पहिल्या 5 फेरीतील मतांची आकडेवारी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, परभणीतून पंजाबराव डख हे वंचितचे उमेदवार आहेत. तर, पुण्यातून वसंत मोरे (vasant More) आणि धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर वंचितचे उमेदवार आहेत. बीडमध्ये अशोक हिंगे हे वंचितचे उमेदवार आहेत. 

लोकसभा मतदारसंघातील निवडणूक निकालांची आकडेवारी समोर येत असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार सध्या महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत पाहायला मिळत आहे. त्यामध्ये , दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाच्या साईटवरील आकडेवारीनुसार 5 मतदारसंघातील उमेदवारांच्या मतांची माहिती देण्यात येत आहे. 

5 मतदारसंघातील वंचितचे उमेदवार

पुणे लोकसभा मतदारसंघातून वंचितच्या वसंत मोरे यांना केवळ 11,840 मिळाली आहेत. तर, मुरलधीर मोहोळ हे 1 लाख 29 हजार 359 मतांनी सर्वात आघाडीवर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रविंद्र धंगेकर हे 1 लाख 5 हजार 976 मतांसह आहेत. 

अकोल्यातून वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना दुपारी 12 वाजेपर्यंत 84,556 मतं मिळाली आहेत. तर, या मतदारसंघातून काँग्रेसचे अभय पाटील हे 1 लाख 30 हजार मतांसह प्रथम क्रमांकावरील आघाडीवर आहेत. येथून भाजपचे अनुप धात्रे 14443 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. 

बीडमधून वंचितचे अशोक हिंगे यांना 3199 मतं मिळाली असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. येथून बजरंग सोनवणे 66599 मतांसह प्रथम क्रमांकाच्या आघाडीवर आहेत. तर, पंकजा मुंडे ह्या बीडमधून 59793 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात मुंडे आणि सोनवणे यांच्यात जोरदार लढत आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार पंजाबराव डख हे 20348 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर, या मतदारसंघातून शिवसेनेचे संजय जाधव 1 लाख 1 हजार 477 मतांसह प्रथम क्रमांकाची आघाडी घेऊन आहेत. या मतदारसंघात महादेव जानकर 81,352 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आघाडी घेऊन आहेत. 

वंचितचे धाराशिवमधील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना 9141 मतं मिळाली आहेत. तर, ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख 82 हजार 805 मतं घेऊन मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे. तर, अर्चना पाटील यांना 1 लाख 9 हजार 915 मतं आहेत.  
 
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार दुपारी 12 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यामुळे, अद्याप तरी वंचितने स्वतंत्र निवडून लढवल्याचा जास्त परिणाम झाल्याचं दिसून येत नाही. 

अधिक पाहा..



Source link

Lok Sabha Result : विदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी; दहा मतदारसंघात कोण आघाडीवर, कोणाची पिछाडी?

Lok Sabha Result : विदर्भात महाविकास आघाडीची मुसंडी; दहा मतदारसंघात कोण आघाडीवर, कोणाची पिछाडी?


Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) येत्या काही तासात स्पष्ट होणार आहे. तर त्यानंतर देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्रही स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या समोर आलेल्या कल लक्षात घेता राज्यातल्या लोकसभा महालढतीचे अपेडेट्स क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहे. अशातच विदर्भात (Vidarbha) महायुतीला काहीसा धक्का बसताना दिसत आहे. विदर्भात सध्याघडीला महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. विदर्भात महाविकस आघाडी 6 ठिकाणी आघाडीवर आहे. तर महायुती 4 ठिकाणी पुढे आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

विशेष बाब म्हणजे पश्चिम विदर्भातील महत्वाची जागा असलेल्या चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे सुरवातीपासून  पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. तर चौथ्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर तब्बल 32,468 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16,200 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे. तसेच गडचिरोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नामदेव किरसान 5,217 मतांनी आघाडीवर आहे. त्यामुळे विदर्भात मतमोजणीमध्ये सकाळी दहा 11 वाजेपर्यंत महाविकास आघाडीला कुठेतरी यश येताना दिसत आहे.  

विदर्भात कोणाला धक्का? कोणाची सरशी?

नागपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसऱ्या फेरीअखेर 32 हजार 580 मतांनी आघाडीवर आहेत. नितिन गडकरी यांना आता पर्यंत 1 लाख 16 हजार 600 मत मिळाले आहेत.  तर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे सुरवातीपासून पिछाडीवर आहे.

गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अशोक नेते (भाजप) पिछाडीवर आहे. तर काँग्रेसचे नामदेव किरसान 8853 मतांनी आघाडीवर आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार हे पाचव्या फेरीतही पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तब्बल 42, 182 हजार मतांनी आघाडीवर आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर असल्याचे बघायला मिळाले आहे. यात मात्र काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांनी एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसचे डॉ. अभय पाटील सहाव्या फेरी अखेरीस  5693 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर असून वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर मोठ्या पिछाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

भंडारागोंदिया लोकसभा मतदारसंघात बाराव्या फेरीत महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे 81493 मते घेत आघाडीवर आहे. तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे 73903 मत घेत पिछाडीवर आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 16,200 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे राजू पारवे हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

वर्धा  लोकसभा मतदारसंघात चौथ्या फेरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर काळे 9146 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रामदास तडस 76974 मत घेत पिछाडीवर आहे.

यवतमाळवाशिम मतदारसंघात सातव्या फेरीत काँग्रेसचे संजय देशमुख यांनी 1,56,253 मते घेऊन 32,213 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील 1,24,040 मते घेत पिछाडीवर आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Lok Sabha Result : नागपुरात नितीन गडकरींची सरशी कायम; चंद्रपुरमध्ये सुधीर मुनगंटीवारांची पिछाडी

Lok Sabha Result : नागपुरात नितीन गडकरींची सरशी कायम; चंद्रपुरमध्ये सुधीर मुनगंटीवारांची पिछाडी


Maharashtra Lok Sabha Election 2024 Result :  देशभरात लोकसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Lok Sabha Result) मतमोजणी सुरु झाली आहे. सकाळी आठ वाजेपासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. येत्या काही तासात देशात कुणाची सत्ता येणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. देशभरासह महाराष्ट्रातील मतदानाचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. तर लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीची सुरुवात ज्या विदर्भापासून सुरवात झाली त्या विदर्भातील सुरुवातीचे कल हाती आले आहे.विदर्भातील सर्वात प्रतिष्ठेची निवडणूक समजल्या जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यात थेट लढत होत आहे.

मात्र, नागपूर लोकसभा मतदारसंघातील (Nagpur Lok Sabha Result 2024) पहिल्या फेरी पासून  नितीन गडकरींची सरसी कायम असल्याच्या चित्र आहे. पहिल्या फेरीची अधीकृत घोषणा करण्यात आली असून यात नितीन गडकरी (Nitin Gadkari) 11 हजार 675 मतांनी आघाडीवर आहे. तर दुसरीकडे चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी आघाडी घेतली असून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची पिछाडी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

विदर्भात कुणाची हवा?

पहिल्या फेरीत समोर आलेल्या आकडेवारी नुसार महायुतीत भाजप 4 ठिकाणी आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना 2 उमेदवार आघाडीवर आहे. तर महाविकस आघाडीत ठाकरे गटाचे खाते खुले झाले असून 1 जागी सरसी आहे तर काँग्रेसने 3 जागी  आघाडी घेतली आहे. दुसऱ्या फेरी नंतर रामटेक मतदारसंघात काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 7440 मतांनी आघाडीवर आहेत तर शिवसेनेचे राजू पारवे पिछाडीवर  आहेत. नागपुरात नितीन गडकरी 11 हजार 675 मतांनी आघाडीवर आहे. चंद्रपूर मतदारसंघात दुसरी फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर 19 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.तर विदर्भातील हॉट सीट असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.तर मविआचे उमेदवार बळवंत वानखडे 3539 मतांनी आघाडीवर आहे. अकोल्यात  पाचव्या फेरी अखेर काँग्रेसचे डॉ.अभय पाटील 2983 मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपचे अनुप धोत्रे दुसर्या क्रमांकावर आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

मतदारसंघ –  अकोला

उमेदवार – अभय पाटील : 65452
उमेदवार – अनुप धोत्रे : 42469
उमेदवार : प्रकाश आंबेडकर : 46186
फेरी –पाचवी
मतांची आघाडी – 2983 : अभय पाटील : काँग्रेस

मतदारसंघ– यवतमाळवाशिम

उमेदवार – संजय देशमुख- 88565
उमेदवार – राजश्री पाटील-66540
फेरी – 4 फेरी 
मतांची आघाडी – संजय देशमुख – 22025

मतदारसंघ – अमरावती

फेरी – दुसऱ्या फेरी अखेर

नवनीत राणा – 7115
बळवंत वानखडे – 15098

मतांची आघाडी – बळवंत वानखडे 7983 मतांनी आघाडीवर

मतदारसंघ – भंडारागोंदिया

उमेदवार (महायुती) सुनील मेंढे : 30488
उमेदवार (महाविकास आघाडी) – डॉ प्रशांत पडोळे : 29210
फेरी : पाचवी 
मतांची आघाडी – 
नाव :सुनील मेंढे 
आकडा : 1278

वर्धा – ईव्हीएम मतमोजणी

फेरी – तिसरी

रामदास तडस( भाजप) – 46506
अमर काळे (राष्ट्रवादी कॉग्रेस) – 53235 

आघाडीवर – 6729 मतांनी अमर काळे आघाडीवर

बुलढाणा मतदारसंघ- चौथी फेरी अखेर

फेरी – चौथी फेरी अखेर

प्रतापराव जाधव – १५१९९

नरेंद्र खेडेकर – ११६८७

रविकांत तुपकर – १०१५९

प्रतापराव जाधव ३५१२ मतांनी आघाडीवर

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp