बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अन्यथा.,अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून माफी मागा, अन्यथा.,अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

Amol Mitkari On Jitendra Awhad : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार,’एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील  (Manusmriti) काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मात्र, यावरुन आता राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे. मनुस्मृतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत वादंग सुरू असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गाटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही या निर्णयाला टोकाचा विरोध केला आहे.

त्यांनी आज (29 मे) थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. यावरून राज्याचे राजकारण नव्यानं तापले असून आता अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका करत थेट जितेंद्र आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

राज्यभरात तीव्र आंदोलन इशारा

महाडमध्ये ‘मनुस्मृती’चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये. यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल  मिटकरींनी केलीये. यासंदर्भात आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासुन माफी मागितली पाहिजे, असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदार अमोल मिटकरींनी दिलाय.

राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा- जितेंद्र आव्हाड

महाड येथील आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फडले ही फार मोठी चूक आहे. जितेंद्र आव्हाडांनी स्टंटबाजी करत असताना इतकी ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये कि, आपण पोस्टर फाडत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर पडत आहोत. ही चूक अक्षम्य आहे. याची गंभीर दखल देशानेही घेतली आहे. या घटनेचा प्रथम मी निषेध करतो आणि ज्या जितेंद्र आव्हाड यांनी हे कृत्य करून राष्ट्राचा अवमान केला आहे त्याबद्दल त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा  गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केलीय.

अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी

पुढे बोलताना ते म्हणाले की, 24 तासांमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली नाही किंवा महाडच्या डॉ. बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासून प्रायश्चित्त घेतले नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे. कारण हा अपमान कुण्या एका समाजाचा नसून  संपूर्ण देशाचा अपमान आहे. स्टंटबाजीच्या नादात  राष्ट्रद्रोह करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. असा थेट इशाराही आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी : चवदार तळ्यात ओंजळीने पाणी प्यायले, महाडमध्ये जाऊन मनुस्मृती जाळली, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

अधिक पाहा..

Source link

मोठी बातमी! 78 वर्षीय वृद्धेला तिशीतील तिघांनी शेतात नेलं, एकाने गाठला कूकर्माचा कळस!

मोठी बातमी! 78 वर्षीय वृद्धेला तिशीतील तिघांनी शेतात नेलं, एकाने गाठला कूकर्माचा कळस!

अकोला : येथील एका घटनेनं समाजमन सुन्न झालं आहे. अकोल्यात वर्षीय 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाला आहे. अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवरात या 78 वर्षीय वृद्धेवर बलात्कार झाला आहे. अकोल्यावरून एसटी बसने गावाकडे परतताना ही वृद्ध महिला दाळंबी येथे राष्ट्रीय महामार्गावर उतरली. त्यानंतर अगदी दाळंबी गावाजवळच्या शेतशिवारातच या वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आला. मंगळवारी (29 मे) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून रात्री उशिरा बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

तिन्ही आरोपी फरार

घरी सोडतो असं सांगत 30 ते 35 वयोगटातील 3 अज्ञात तरूणांनी हे कृत्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिघांपैकी एका तरुणानं या 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बतात्कार केला असून तिघेही जण फरार आहे. तिन्ही अज्ञात आरोपींचा अकोला पोलिसांकडून शोध सुरू आहे.

नेमकी काय आहे संपूर्ण घटना?

अकोला बस स्थानकावरून 78 वर्षीय वृद्ध महिला ही काल दुपारी एसटी-बसनं दाळंबी गावाला जाण्यासाठी निघाली होती. सव्वादोनला दाळंबी गावातच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर वृद्ध महिला पोचली आणि तिथे उतरली. येथून गावाकडे पायी जात असताना तिथे तीन जण मोटरसायकलनं आले आणि गावात सोडून देतो, असं सांगत तिला रस्त्यालगत असलेल्या एका लिंबाच्या शेतात घेऊन गेले. तिघांपैकी तीस ते पस्तीस वर्षाच्या एका व्यक्तीनं तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारू अशी धमकीही वृद्ध महिलेला देण्यात आली. या दरम्यान गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेला दिसले. तिने आरडाओरड सुरू केली. आवाज कानावर पडतातच त्या दोन्ही व्यक्तींनी शेताकडे धाव घेतली. हे पाहताच अत्याचार करणाऱ्या तिघांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

गावातील दोन्ही व्यक्ती म्हातारी जवळ पोहचताच त्यांनी सुखरूपपणे तिला घरी सोडलं. म्हातारीने आपल्यासोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर लागलीच कुटुंबीयांनी बोरगावमंजू पोलीस ठाणं गाठलं आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल तक्रार नोंदवली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरोपींना शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

या घटनेमुळे या तिन्ही आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान बोरगावमंजू पोलिसांसमोर आहे. यासंदर्भात ‘एबीपी माझा’शी बोलताना बोरगावमंजूचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी तिन्ही आरोपींना शोधण्यासाठी पथके तयार केल्याचं सांगितलं. तीनपैकी एका आरोपीनं वृद्धेवर अत्याचार केल्याचं सांगितलं. लवकरच आरोपींना बेड्या ठोकण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

हेही वाचा :

बुडून मृत्यू की घातपात? नांदेडच्या मारेगावात पाण्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू, पोलिसांकडून दोघांना अटक

इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात; पोलिसांनी कोल्हापूरच्या फाळकुटदादाचा रुबाब झटक्यात उतरवला

अधिक पाहा..

Source link

अस्मानी संकटानंतर बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्ताच अडवला

अस्मानी संकटानंतर बियाणे मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष; संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्ताच अडवला

Akola News अकोला : अकोल्यात बियाण्यांच्या मागणीला घेऊन शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. अकोल्यातल्या (Akola News) टिळक रोडवर थेट शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत आपला रोष व्यक्त केलाय. जादा उत्पादन देणारे तसेच पसंतीचे कपाशीचे पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मागील 4 दिवसांपासून शेतकरी (Farmers) पहाटेपासून कृषी केंद्रावर बियाणे खरेदीसाठी रांगा लावत आहेत. मात्र कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी अखेर आज रास्ता रोको करीत चक्का जाम आंदोलन केले.

संतप्त शेतकऱ्यांनी थेट रस्ताच अडवून धरला

या हंगामात बी-बियाणे खरेदीला सुरुवात झाली आहे. मात्र यंदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हाभरातील अनेक कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या बियाणे खरेदीसाठी पहाटेपासूनच रांगा दिसून येत आहेत. केंद्रावर नंबर लागल्यानंतर केवळ शेतकऱ्यांच्या हाती केवळ दोनच पॅकेट बियाण्याचे मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सध्या पोलिसांकडून शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. परिणामी परिसरात एकच गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले आहे.

बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष

गेल्या काही दिवसापासून अकोला जिल्ह्याच्या कृषी केंद्रावर कापसाचे बियाणे घेण्यासाठी रणरणत्या उन्हात शेतकऱ्यांची मोठी झुंबड लागल्याचे बघायला मिळत आहे. मात्र नंबर लागल्यानंतरही शेतकऱ्यांच्या हाती केवळ 2 किंवा 3 पॅकेटच बियाणे मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. तर कृषी केंद्रात अपुऱ्या सेवासुविधांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रासही सहन करावा लागतो आहे. या त्रासाला वैतागून अखेर शेतकऱ्यांनी रास्ता रोका आंदोलन केलंय आणि आपला रोष व्यक्त केलाय.

अनेक गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर चक्का जाम केलाय. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र शेतकरी कुणालाही जुमानत नसल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात बियाण्यांचा प्रचंड तुटवडा निर्माण करण्यात आला असून काळ्या बाजारात दुप्पट दराने बियाणे मिळत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. सकाळपासून रांगेत उभं राहावं लागत आहे आणि कूपन मिळाल्यानंतर दुपारपर्यंत तसेच ताटकळत उन्हात रांगेत उभे रहावे लागतंय. मात्र, त्यानंतरही पुरेसे बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा सयंमाचा बांध आता फुटला आहे.

रणरणत्या उन्हात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची झुंबड

अकोला जिल्ह्यात आधीच उष्णतेच्या पाऱ्याने नवा उच्चांक गाठला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश कृषी केंद्रावर भर ऊन्हात कापसाचे बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कापसाचे अजित 155 बियाण्यासाठी जिल्ह्याभरातील कृषी केंद्रांवर शेतकरी पहाटेपासून रांगेत उभे आहे.

कृषी केंद्रावरील अपुऱ्या सेवासुविधांमुळे ऊन आणि पाण्याविना शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. यात युवा शेतकऱ्यांसह ज्येष्ठ शेतकरी वर्ग देखील रांगेमध्ये उभे असल्याचे बघायला मिळाले आहे.  उन्हाचा धोका लक्षात घेता प्रशासनाने याबाबत योग्य त्या सेवा-सुविधा पुरवाव्या आणि आवश्यक तितक्या स्वरूपात बियाणे उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी आता शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

उष्णतेच्या लाटेनं हालेहाल! ब्रह्मपुरीचा पारा 47 अंशांच्या पार; तर ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट

उष्णतेच्या लाटेनं हालेहाल! ब्रह्मपुरीचा पारा 47 अंशांच्या पार; तर ‘या’ जिल्ह्यात उष्णतेची लाट

Vidarbha Weather Update नागपूर : सूर्यानं 25 मे पासून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून विदर्भात नव तपाला (Nautapa 2024) सुरुवात झाली आहे. नव तपाच्या पहिल्या दिवसापासूनच  विदर्भात (Vidarbha) विक्रमी तापमानाची नोंद (Temperature) झाली आहे. तर विदर्भातील काही जिल्ह्यातील उष्णतेचा पारा 45 ते 47 अंशांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे नव तपाचे पुढील सात दिवस विदर्भवासियांसाठी आणखी कठीण जाणार आहेत. हवामान विभागानेही 29 मे पर्यंत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा दिला आहे. तर यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भातील ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय.

नागपूर वेध शाळेने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,वाशिम, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस विदर्भातील तापमान चढेच राहील. परिणामी, वैदर्भीय जनतेने उष्माघातापासून बचाव करण्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

ब्रह्मपुरीत 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज ब्रह्मपुरीमध्ये 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूरमध्ये 45.6 अंश सेल्सिअस एवढ्या प्रचंड तापमानाची नोंद झाली. 45.6 अंश हे नागपुरातील या मोसमातील उच्चांकी तापमान आहे. विदर्भातील जवळ जवळ सर्वच जिल्ह्यामध्ये आज कमाल तापमान जास्त नोंदवलं गेलं आहे.

तर चंद्रपुरात आज 44.8 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे. ब्रम्हपुरी आणि चंद्रपूर या दोन्ही शहरात आज मौसमातील सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. तर पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे. तर दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासन आणि नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल

सध्या फक्त विदर्भातच नाही राज्यात अन् देशात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या दिवसा सूर्यदेवाचा कोप इतका असतो की, लोकांना घरातून बाहेर पडणेही कठीण होत आहे.

फक्त दुपारीच नाही तर सकाळपासूनच  उन्हाचा पारा एवढा वाढलेला असतो की, लोकांना घराबाहेर पडण्यापूर्वी विचार करावा लागत आहे. परिणामी अनेक शहरात दुपारच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही भयाण शांतात बघायला मिळत आहे. तर संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरही उष्ण वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेनं वैदर्भीयांचे पुरते हालेहाल केल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

निखळ प्रेमाची गोष्ट… पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात अंत्यसंस्कार

निखळ प्रेमाची गोष्ट… पतीच्या निधनानंतर काही वेळातच पत्नीचा मृत्यू, एकाच स्मशानात अंत्यसंस्कार

अकोला : लग्नाआधी प्रियकर अन् प्रेयसी यांच्यातील प्रेम लग्नानंतर (Marriage) अधिक घट्ट होतं, असं म्हणतात. पण, प्रेमविवाह न करता, कुटुंबाच्या सहमतीने लग्न झालेल्या पती अन् पत्नीच्या निखळ प्रेमाची कित्येक उदाहरणं समाजात आहेत. आपल्या पतीसोबत शेतात कुळव धरुन शेती करणारी पत्नी आपण पाहिली असेल. रस्त्यावर भाजीचा गाडा लावणाऱ्या पतीला मदतीची हात देणारी पत्नी तुम्ही पाहिली असेल, तर पतीच्या कामात खांद्याला खांदा लावून मदत करणारी अर्धांगिणी तुम्ही पाहिली. म्हणूनच, पती अन् पत्नीच्या प्रेमाची गोष्ट छोटी डोंगराएवढीय, असे म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अकोल्यातील (Akola) एका जोडप्यानं आपल्या याच प्रेमाची (Love) जणू कबुलीच दिल्याची घटना घडली आहे.

शहरातील एका वयस्कर दांपत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतला. 60 वर्ष वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर 82 वर्षीय रमेशसिंग आणि 76 वर्षांच्या पद्माबाई या वयस्कर दांपत्यानं जगाचा निरोप घेतला. या दोघांच्या मृत्यूमध्ये केवळ 8 तासांचा फरक होता. या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणूनच त्यांनी एकत्रपणे या जगातून निरोप घेतल्याची चर्चा आता त्यांच्या मृत्यूनंतर होत आहे. रमेशशिंग आणि पद्माबाई या दोघांची पहिली भेट साधारणता 60 वर्षापूर्वी रमेशसिंग हे लग्नासाठी मुलगी पाहायला गेले असता झाली, त्यावेळी ते 22 वर्षांचे, तर पदमाबाई अंदाजे 16 वर्षांच्या होत्या. कुटुंबातील वरिष्ठांनी दोघांचे लग्न लावले. दरम्यान लग्नानंतर पद्माबईंनी पतीसोबत अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरात अख्खं आयुष्य घालवलं. 60 वर्षापेक्षा दीर्घकाळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर दोघांचं काल मध्यरात्री निधन झाले. आज (27 मे’रोजी) सोमवारी दुपारी राहत्या बाळापुरात दोघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय भावनिक आणि प्रेमाची साक्ष देणारा हा दु:खद प्रसंग पाहून स्मशानात अनेकांचे डोळे पाणावले.

अकोला जिल्ह्याच्या बाळापुर शहरातील गुजराती पूरा भागातील ही घटना. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या 8 तासातच पत्नीचाही मृत्यू झाला. लग्नानंतर 60 वर्षे एकत्र आयुष्याचा प्रवास केल्यानंतर दोघांनी काही वेळाच्या अंतरातच जगाचा निरोप घेतला. रमेशसिंग करणसिंग गौतम (वय 82) आणि पदमाबाई रमेश गौतम (वय 72) यांचा 60 वर्षापूर्वी विवाह झाला होता. पदमाबाई यांचे माहेर धुळे जिल्ह्यातील असून, रमेशसिंग हे मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी होते. कुटुंबातील वरिष्ठांच्या एकमतांने दोघांचा विवाह पार पडला होता. दोघांनाही लग्नानंतर दोन मुलं आणि दोन मुली झाल्या. मुला-मुलींचे लग्न होऊन नातवंड झाली. दोघांनी 60 वर्षे सोबत संसार केल्यानंतर काल मध्यरात्री त्यांनी अखेरचा जगाचा निरोप घेतला.

पति रमेशसिंग यांचे दीर्घ आजाराने रविवारी रात्री 7 वाजताच्या सुमारास मृत्यु झाला. तर पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नी पद्माबाई यांचादेखील आज पहाटे मृत्यू झाला. पती-पत्नीच्या निधनानंतर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे. दरम्यान दोघांनीही आयुष्याचा बराच काळ एकत्र घालवला. त्यामुळेच पतीच्या मृत्यूचा धक्का पदमाबाईंना सहन न झाल्यानेच त्यांनीही आपाल जीव त्यागल्याचं बोललं जातंय. दरम्यान, आज दुपारी राहत्या घरापासून पती-पत्नीची अंत्ययात्रा काढण्यात आली, ज्यात मोठ्या संख्येनं नातेवाईक आणि स्थानिक लोक सहभागी झाले. दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. बाळापुरच्या स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी, दोघांमध्ये खूप प्रेम होतं, असे यावेळी कुटुंबीयांनी सांगितले.

Source link

दुपारपर्यंत उष्णतेची लाट, तर संध्याकाळी अवकाळी पावसाचं थैमान; विदर्भाला अवकाळीने पुन्हा झोडपलं!

दुपारपर्यंत उष्णतेची लाट, तर संध्याकाळी अवकाळी पावसाचं थैमान; विदर्भाला अवकाळीने पुन्हा झोडपलं!

Vidarbha Weather Update नागपूर: विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेच्या लाटेने (Temperature) हैराण झालेला नागरिकांना दुपारनंतर मात्र अवकळी पावसासह सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटाचा सामना करावा लागला आहे. अचानक आलेल्या दमदार पावसाने यवतमाळ, बुलढाणा, अकोला, नागपूरसह इतरत्र एकच दाणादाण उडवली आहे.

यात अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहे. तर काही ठिकाणी सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे घरावरची पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेच्या पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत असताना मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजा देखील आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी तापमामाची नोंद

यवतमाळ जिल्ह्यात आज 46 अंश सेल्सिअस अशी विक्रमी तापमामाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले असून गेल्या पाच वर्षांतले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर आज दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्याला अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याचा जोरदार फटका बसला आहे. या वादळामुळे अनेक घरावरील तीन पत्र उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

25 घरांची पडझड, अनेक मोठी झाडे उन्मळून पड

यवतमाळच्या आर्णी आणि महागांव तालुक्यात अचनाक झालेल्या वादळीवाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आर्णी तालुक्यातील पाभळ तर महागांव तालुक्यातील तिवरंग, चिखली, मलकापूर या गावांना वादळाचा तडाखा बसला. पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. तर अनेक घरावरील टिनपत्रे उडाल्याची माहिती समोर आली आहे. या सोबतच अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असल्याने काही रस्ते  देखील काही काळ बंद झाले होते. एकुणात अवकाळी पावसाने आज जिल्ह्यात एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.

अकोल जिल्ह्याला अवकाळी पावसाने पुन्हा झोडपलं!

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून अकोला (Akola) शहरात उष्णतेची लाट आल्याचे चित्र बघायला मिळाले आहे. परिणामी, उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे. तर पुढील तीन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असताना आज दुपारनंतर अकोला जिल्ह्यातील अकोट भागात जोराच्या वादळीवाऱ्यांसह तुरळक अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. अकोल जिल्ह्याच्या पणज गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील गोदामावरील टिनपत्रे वाऱ्यामूळ उडाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

YouTube
Instagram
WhatsApp