अकोल्यातील चऱ्हाटे हत्याकांड प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा;जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय 

अकोल्यातील चऱ्हाटे हत्याकांड प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा;जिल्हा सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय 


Akola Crime News अकोला : अकोल्यातील बहुचर्चित चऱ्हाटे कुटूंबियांतील चार सदस्यांच्या हत्याकांडात आज एकाच कुटुंबातील तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola Crime News) अकोट न्यायालयानं आज, शुक्रवारी हा महत्वपूर्ण  निकाल दिलाय. एडीच एकर शेतीच्या वादातून बहि‍णीने पतीच्या आणि पोटच्या दोन मुलाच्या मदतीनं सख्या दोघां भावांसह त्यांच्या 2 मुलांना असे एकत्रित चौघांना संपवलं होतं. 28 जून 2015 ची घटना असून तब्बल 9 वर्षांनंतर न्यायालयाने आज  हा निर्णय दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणात हरिभाऊ राजाराम तेलगोटे, द्वारकाबाई हरिभाऊ तेलगोटे आणि मुलगा कुंदन हरिभाऊ तेलगोटे या तिघांना न्यायालयानं दोषी ठवरत मृत्यु दंडाची शिक्षा सुनवाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखी एक मारेकरी मुलाचा समावेश असून तो अल्पवयीन आहे. सध्या बाल न्यायालय मंडळात त्यांचे प्रकरण सुरु आहे.

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील चार सदस्यांची हत्या

या प्रकरणात बाबुराव सुखदेव चऱ्हाटे (वय 60, नोकरी, शिक्षक) आणि धनराज सुखदेव चऱ्हाटे (वय 50 वर्ष), गौरव धनराज चाऱ्हाटे (वय 19), शुभम धनराज चाऱ्हाटे (वय 17) असे चारही मृतकांची नावे आहे. मृत धनराज आणि बाबुराव यांची सख्खी बहिण द्वारकाबाई आणि पती हरिभाऊ आणि पोटच्या 2 मुलांच्या मदतीनं शेतीच्या वादातून 28 जून 2015 रोजी धारदार शस्त्रांनी निर्घृण खून केला होता.

या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील ग्राम मालपुरा गावात शेतीच्या जमिनीवरुन हे ह्त्याकांड घडलं होतं. त्यानंतर तब्बल 9 वर्ष न्यायालयात हे प्रकरण सुरू होतं. अखेर आज अकोटच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

 व्यावसायिक अरुणकुमार वोरा अपहरण प्रकरणात 5 जणांना अटक

अकोला शहरातील ख्यातनाम काच बॉटल सप्लायर आणि व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांच्या अपहरण प्रकरणात (Crime News) अकोला पोलिसांना (Akola Police) मोठं यशं हाती आलंय. तसेच पोलिसांना अपहरण प्रकरणात मोठा खुलासा देखील केलाय. यात अपहरण करणाऱ्या पाच व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात मुख्य संशयित आरोपी मिथुन उर्फ मॉन्टी इंगळे याच्यासह 5 लोकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

त्यांच्याकडून गुह्यात वापरण्यात आलेली कार आणि दोन बनावट देशी कट्टे तसेच चार मोबाईल फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहे. अरुणकुमार यांच्या अपहरण प्रकरणात 1 कोटि रुपयांची डिमांड अपरहरणकर्त्यांकडून झाली होती, अशी माहिती देखील पोलिसांच्या तपासणीतून पुढे आली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

नांदेड पाठोपाठ अकोल्यातही आयकर विभागाची छापेमारी;  नांदेडच्या भंडारी फायनान्सशी संबंध?

नांदेड पाठोपाठ अकोल्यातही आयकर विभागाची छापेमारी; नांदेडच्या भंडारी फायनान्सशी संबंध?


Akola News अकोला : गेल्या काही दिवसांपासून राज्यात आयकर विभागाकडून (Income Tax Department) अनेक ठिकाणी कारवायांचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी नांदेडमध्ये (Nanded News) आयकर विभागाकडून एक मोठी कारवाई केली. या कारवाई कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी संपत्ती आयकर विभागाच्या हाती लागलीय. या कारवाईत तपासाचे धागेदोरे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती येऊ लागली आहे.

अशातच आज अकोल्यातल्या (Akola News) कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर देखील आयकर विभागाने धाड टाकली आहे. आज सकाळपासून आयकर विभागाच्या पथकाकडून कुरियरच्या कार्यालयात तपासणी केल्या जात आहे.

नांदेड पाठोपाठ अकोल्यातही आयकर विभागाची छापेमारी

अशोकराज आंगडीया कुरियरवरील तपासणीचं नांदेडमध्ये झालेल्या आयकर धाडीशी कनेक्शन असल्याची प्रथमिक माहिती पुढे येऊ लागली आहे. कुरियरच्या माध्यमातून मोठ्या रकमांचा व्यवहार झाल्याचा आयकर विभागाला संशय आहे. त्यामुळेच ही तपासणी मोहीम सुरू असल्याचे समजते आहे. या धाडीबाबत मोठी गोपनियता ठेवली असल्याने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती देण्यासाठी कुणीच पुढे आलेलं नाहीये.

मात्र, अचानक आज या धाडीच्या बातमीने सध्या अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच आयकर विभागाकडून आणखी काही कुरियर कंपन्यांवर धाडीची शक्यताही वर्तवल्या जात आहे. तसेच या तपासाणी मोहीममुळे नांदेडच्या त्या कारवाईशी संबंधित काही धागेदारे उलगडणार का? असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित होतो आहे.

नांदेडच्या भंडारी फायनान्सशी संबंध? 

दरम्यान, नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने छापा टाकत मोठी कारवाई केली होती. त्यानंतर आता अकोल्यात आयकर विभागाकडून अकोल्यातल्या कोठडी बाजारातील अशोकराज आंगडीया कुरियर सर्व्हिसवर धाडी टाकत तपासणी केल्या जात आहे. आज सकाळपासून अतिशय गोपनीय पद्धतीने कोठडी बाजारातील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आंगडीया कुरियर सर्व्हिसवर कार्यालयावर ही तपासणी मोहीम सुरू आहे. आयकर विभागाचे वाहने देखील रस्त्यावर उभे आहे. आयकर विभागाच्या या कारवाईन अकोला शहरात अनेक व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणालाले आहेत. आता या कारवाईत आणखी कोणती नवी माहिती हाती येते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाची मोठी कारवाई!

नांदेडमध्ये असलेल्या संजय भंडारी फायनान्सकडे आयकर विभागाने (Income Tax Department) छापा टाकत मोठी कारवाई केली. आयकर विभागाने शुक्रवारी केलेल्या या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात आता 14 कोटी रुपये रोख, तर 8 किलोचे दागिने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. 14 कोटीची रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाला 14 तास लागल्याचे बोलले जात आहे. तर या कारवाईत काही महत्वपूर्ण दस्तावेज सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागले आहे.

आयकर विभागाची हि कारवाई गेल्या 72 तासापासून सुरु असून अद्याप पोलीस आणि आयकर विभाग पुढील तपास करत आहेत. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. अशातच या तपासाचे धागेदारे आणखी उलगडत असताना नवनवीन माहिती हाती लागत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..



Source link

Akola : खळबळजनक! अकोल्यात प्रसिद्ध व्यावसायिकाचं अपहरण; गोदामातून बाहेर येताच नेमकं काय घडलं?

Akola : खळबळजनक! अकोल्यात प्रसिद्ध व्यावसायिकाचं अपहरण; गोदामातून बाहेर येताच नेमकं काय घडलं?


Akola Crime News अकोला : अकोला (Akola) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काच बॉटल सप्लायर आणि प्रसिद्ध व्यावसायिक अरुणकुमार वोरा (Arunkumar Vora) यांचं अपहरण झाल्यानं(Crime News) अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतल्या  (Akola Police) चारजिन कपाउंड परिसरात ही अपहरणाची घटना काल रात्रीच्या सुमारास घडलीय. दरम्यान दगडीपुल भागात वोरा याचं रिकाम्या काच बॉटलचं गोदाम आहे. ते गोदाम बंद करून  बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ आली.

त्यानंतर त्यातील 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि धाक दाखवत त्यांचं अपहरण करण्यात आले. यादरम्यान त्यांनी ‘बचाव-बचाव’ म्हणून आरडाओरड देखील केली. मात्र, तोपर्यत उशीर झाला आणि अपहरणकर्त्यांनी वाहन सुसाट वेगानं पळवलं. अकोला पोलिसांकडून सध्या अरुणकुमार वोरा यांचा शोध सुरू करण्यात आला असून या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. 

दोन तासाच्या कालावधीत नेमकं काय घडलं?

जिगनेश प्रविणकुमार वोरा यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, काल 13 मे च्या रात्री पावणे 10 वाजताच्या सुमारास गोदामावर काम करणाऱ्या मजूर गणेश चंदन याने फोनवर सांगितले की, तुमचे काका अरुणकुमार वोरा यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये 2 ते 3 अनोळखी व्यक्तींनी जबरदस्ती वाहनात टाकून घेऊन गेले आहेत. अशी माहीती देताच लागलीच ते गोदामावर पोचले आणि घडलेल्या प्रकरणाबद्दल रामदास पेठ पोलिसांत तक्रार नोंदवली. 

दरम्यान प्रत्यक्षदर्शी लोकांनी आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरुणकुमार वोरा हे गोदाम बंद करून ते बाहेर पडत असतानाच पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन त्यांच्याजवळ गेली. 2 ते 3 जण वाहनातून खाली उतरले आणि त्यांच्या सोबत बोलू लागले. त्यानंतर धाक दाखवत त्यांना बळजबरी वाहनात बसून पळू लागले.

यादरम्यान वाहनातून ‘बचाव-बचाव’ म्हणून अरुणकुमार यांचा आवाज येत होता. काहींनी त्यांचा आवाज ऐकून घराबाहेर धाव घेतली. तर काहींनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यत ते सुसाट वेगात पसार झाले. दरम्यान वोरा यांचा मोबाईल घटनास्थळी पडला असून तो गोदामाजवळ पोलिसांना सापडला आहे. विशेष म्हणजे हे अपहरणकर्ते 2 तासांपासून अरुणकुमार यांच्या प्रतिक्षेत कारमध्ये एकाच ठिकाणी बसलेले होते. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घटनास्थळी भेट

दरम्यान, एका प्रसिद्ध व्यावसायिकाला त्याच्या गोदामासमोरून उचलण्यात आल्याने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्याचे कळताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. एसीपी कुळकर्णीसह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळावर पोहचला. पोलिसांकडून तत्काळ पाऊले उचलल्या गेली असून परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध सुरु आहे.त्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. अरुणकुमार यांचं नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले? अपहरणकर्ते नेमके कोण आहेत? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

वोरा कुटुंबाला बसला धक्का 

अरुणकुमार यांच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी अकोला शहरात पसरली. या घटनेनं अकोलेकर चांगलेच हादरून गेले. अकोल्यात एवढी गुन्हेगारी वाढली की, थेट गजबजलेल्या ठिकाणाहून अपहरणकर्ते येऊन अपहरण करत आहे. सध्या अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या घटनेने ‘वोरा’ कुटुंबालाही धक्का बसला. आज पहाटेपर्यत त्यांचा शोध लागलेला नाही. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जातेय.

अरुणकुमार वोरा नेमके कोण आहे?

अरुणकुमार वोरा अकोल्यात नामाकिंत व्यवसायकांपैकी एक आहेत. त्याचं अकोल्यात रिकाम्या काच बॉटल सप्लाय करण्याच मोठा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबात दोन मुली आणि एक मुलगा असून तो परदेशात आहे आणि मुली पुण्याला आहेत. ते एकटेच अकोल्यात वास्तव्यास आहे. त्याचं निवासस्थान हे अकोला जिल्हाधिकारी कार्यलयाजवळील राधे नगरात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

सावधान! विदर्भातही अवकाळी पावसाचा जोर कायम; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी 

सावधान! विदर्भातही अवकाळी पावसाचा जोर कायम; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी 


Vidarbha Unseasonal Rain : राज्यातील बहुतांश भागात आज अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावत दाणादान उडवली आहे.  दादर, मुलुंड, ठाणे, बदलापूर, घाटकोपरसह मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने (Rain) एंट्री करत हाहाकार माजवला आहे. अवघे काही तास कोसळलेल्या या अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मुंबई मेट्रो, लोकलसह वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र आहे.  काही ठिकाणी पत्रे उडून गेले तर वडाळा येथील पार्किंग टॉवर कोसळला आहे.

तसेच मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला तर कुठे भले मोठे होर्डिंग कोसळे असून त्याखाली काही वाहनांसह नागरिक अडकल्याची शक्यता आहे. मुंबईसह राज्याच्या इतर भागात देखील या अवकाळी पावसाचा जोर बघयाला मिळत आहे. विदर्भात देखील आज दमदार पावसाने हजेरी लावली असून पुढील 4 दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाचा’या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर चांगलाच वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने अचानक एंट्री केल्याने सर्वत्र एकच दाणादान उडाली आहे. तर त्याचा फटका हा शेतकऱ्यांना देखील बसतो आहे. अशातच विदर्भात सलग कोसळणाऱ्या या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावला आहे. अचानक कोसळलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही बसला आहे. तर आज 13 मे ते 16 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 40-50 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर आजपासून पुढील 16 मे पर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी 

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज सलग चौथ्या दिवशी विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. आज अकोल्यात पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात अनेक गावांना आज सोमवारी सकाळी अवकाळीचा फटका बसला आहे. सकाळी तब्बल 30 मिनिट पाऊस बरसलाय. सोबत विजेचा कडकडाट सुद्धा सुरू होता. आधीच अकोला जिल्ह्यात झालेल्या वादळाने तेल्हारा तालुक्याला मोठा फटका बसला होता. तालुक्यातल्या हिवरखेड, कार्ला यासह अनेक गावांना फटखा बसला होता. यामध्ये केळी, पपई, आंबा, यासह इतर फळबाग आणि इतर पिके भुईसपाट झाल्या आहेत. अशातच आज परत आलेल्या अवकाळी पावसाने संकाटाचे ढग आणखी गडद होण्याची शक्यता आहे. अशीच स्थिती विदर्भातील इतर ठिकाणची आहे.  

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर अवकाळी पावसाची हजेरी 

हवामान विभागानं 15 मे पर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री पुन्हा एकदा भंडाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून उन्हाची प्रखरता जाणवू लागली  असता आज आलेल्या या पावसानं नागरिकांची होणाऱ्या उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील आठवड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं असून त्याच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनानं दिले आहेत. मात्र पुन्हा अवकाळीचा जोर वाढत असल्याने आणखी नुकसान तर होणार नाही ना, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.  

वीज कोसळून बैल जोडी ठार

यवतमाळच्या झरी तालुक्यातील मार्की (बु.) येथील दिवाकर रामदास ढेंगळे यांच्या शेतात वीज कोसळून दोन बैल ठार झाल्याची घटना समोर आली आहे. दिवाकर यांनी त्यांच्या शेत शिवारात वादळी वारा आणि पाऊस आल्याने झाडाचा आसरा घेण्यासाठी लिंबाच्या झाडाच्या खाली आपल्या बैलला बांधून ठवले  होते.  दरम्यान, बांधून असलेल्या बैलावर वीज पडली आणि त्यात या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola News : कूलरचा शॉक लागून आणखी एका व्यक्तीचा मृत्यु; महिनाभरातील तिसरी घटना

Akola News : कूलरचा शॉक लागून आणखी एका व्यक्तीचा मृत्यु; महिनाभरातील तिसरी घटना


Akola News अकोला : आपण कुलरमध्ये पाणी भरताय? अथवा कूलर सुरू असताना त्याला हात लावताय? तर सतर्कता बाळगा. कारण अकोल्यात (Akola) कुलरच्या (Cooler) विजेचा धक्का लागून आणखी एका व्यक्तीला आपला जिव गमवावा लागलाय. घरात लावलेल्या कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या इसमाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. नितीन गजानन वानखडे असं शॉक लागून मरण पावलेल्या व्यक्तिचं नाव आहे. अकोला (Akola News) जिल्ह्यातील मळसुर गावात ही दुःखद घटना घडली आहे. गेल्या महिनाभरातील ही सलग तिसरी घटना असल्याने कूलर उन्हाळ्यात दिलासादायक असला तरी, तो काही अंशी जीवघेणा तर ठरत नाहीये ना? असा प्रश्न या निमित्याने उपस्थीत केला जातोय. तर दुसरीकडे, या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

महिनाभरातील तिसरी घटना

नितीन गजानन वानखडे (वय.38 वर्ष) हे कामावरुन घरी परतले असता, घरातील कूलर बंद पडला म्हणून त्यांनी कूलर चालू करायचा प्रयत्न केला. कूलरला स्पर्श करताच त्यांना विजेचा धक्का बसला आणि कूलर त्यांच्या अंगावर पडला. दरम्यान त्यांना विजेचा जोरदार शॉक लागला. ही घटना त्यांचे वडील आणि त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित केला. त्यानंतर त्यांनी  ग्रामस्थांच्या मदतीच्या नितीन यांना उपचार्थ रुग्णालयात नेले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वी वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे.

कूलरचा शॉक लागून सात वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

एकीकडे राज्यात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी उकाड्यात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक या वातावरणातील सततच्या बदलामुळे हैराण झाले आहे. अशातच प्रधान्य दिले जातंय ते कूलर सारख्या उपकरणांना. मात्र, गेल्या महिन्याभरात अकोला शहरात कूलरचा शॉक लागून वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. दरम्यान, कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला. युक्तीचे आईवडील आणि कुटुंबीय घरातच होते. 

मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा मृत्यू झाला होता. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय आणि  परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता. त्यातूनच ही दुर्घटना घडली असल्याचे स्पष्ट झाले होते.   

काही दिवसांपूर्वीचं कुलरमुळे पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना अकोल्यात घडली होती. यात पाणी भरतांना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा धक्का लागून पोलीस दलातील अंमलदार गणेश रामराव सोनोने (57, रा. अंबिका नगर, मलकापूर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केल्या गेली. आता पुन्हा  नितीन वानखडे यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यु झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

पार्श्वभागात दांडा टाकत पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू

पार्श्वभागात दांडा टाकत पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीचा कोठडीतच मृत्यू


अकोला : अकोल्यात पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीचं मृत्यू प्रकरण अकोला पोलिसांनी तब्बल अडीच महिन्यांहून जास्त काळ दडपून ठेवले होते. या प्रकरणात आणखी मोठी अपडेट समोर येत आहे. अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपण कोल्हेंच्या बदलीनंतर आता नॉटरीचेबल असलेल्या तब्बल पाच पोलिसांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. ठाणेदार कोल्हे यांची शनिवारी पोलीस नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. तर या पाच पोलीस कर्मचाऱ्यांची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

पोलिसांच्या मारहाणीत आरोपीचा मृत्यू

दरम्यान, जानेवारी महिन्यात गोवर्धन हरमकार या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यंत पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके, या 4 पोलिसांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले आहे. सध्या पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके अटकेत आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हे दाखल झाले, तेव्हापासून अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल होते. आता या पाचही कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ही बदलीची कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सीएयडी करीत आहे.

आतापर्यत अकोट पोलिसांवर झालेली कारवाई : 

  • गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात आतापर्यत चार पोलिसांवर खुणाचे गुन्हे दाखल
  • PSI राजेश जवरेसह, पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके अटकेत. तर दोन अज्ञात पोलीस कर्मचारी फरार
  • चौकशीत अडथळा ठरू नये म्हणून, अकोटच्या ठाणेदारावर तपण कोल्हे यांच्यावर बदली कारवाई
  • मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील आता बदलीची मोठी कारवाई
  • वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा

दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळंके या दोघांचं आधी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमूळे त्याचा मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत, असे आदेशात नमुद आहे. अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. याच अहवालानुसार जवरेसह तिघांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता जवरेसह दोषींच्या बडतर्फीची मागणी नातेवाईक करीत आहेत. जवरे सध्या अकोला कारागृहात आहे. 

15 जानेवारीला नेमकं काय घडलं होतं?

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पूतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजेदरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती, एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला. 

खाजगी दवाखान्यात उपचार करत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भीतीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं. 

मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती, असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केले अंत्यसंस्कार 

गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटूंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर, प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp