विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान! हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला, शेतकरी हवालदिल

विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचं थैमान! हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला, शेतकरी हवालदिल


Vidarbha Unseasonal Rain: हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात (Vidarbha) पुन्हा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. अशातच आज विदर्भातील बुलढाणा आणि अकोला वगळता उर्वरित जिल्ह्यांत अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. 

एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना, दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. तर कुठे अनेकांना यात आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आल्याने संकटाचे ढग आणखी गडत होण्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

अवकाळीमुळं 257 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचं नुकसान

उन्हाळा लागलेला असतानाच एप्रिल महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावलीय. यात काही ठिकाणी गारपीट तर कुठं वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं आहे. 1 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनानं तयार केला आहे. यात 257 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचं प्रचंड नुकसान झालं असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसला आहे. अवकाळी पावसामुळं उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला आणि फळपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. यात 18 घरांचं अंशतः नुकसान झालं असून वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा प्रशासनाचा हा प्राथमिक अहवाल असून यात नुकसानीचा आकडा आधिक वाढू शकतो. असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.  

सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाची हजेरी

यवतमाळ जिल्ह्यातील काही भागामध्ये पहाटे तीन वाजताच्या दरम्यान जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी काही भागात गारही पडली. यात अर्धातास झालेल्या अवकाळी मूसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. प्रामुख्याने यात तीळ  पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा काही काळ खंडित झाला असून अद्यापही विधुत पुरवठा खंडित आहे.

यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पार्डी परिसरात रात्री तीन वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचे व गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतपिकांचे आणि गावातील घराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर कुठे मोठमोठी झाडे पडली असून घरावरील टिन-पत्रे उडाली. तसेच विजेची तारे तुटल्याने बराच वेळ वीज पुरवठाही खंडित झाला आहे.

हाता तोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावला 

वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. कारंजा तालुक्यात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळ  पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.गारपिटीमुळे बागायत पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा फटका हा संत्रा,आंबे अशा झाडांना बसला असून अनेक झाडाची अक्षरक्ष: पडझड झाली आहे. तर नारा येथील रामकृष्ण मानमोडे यांच्या तीन एकर शेतात टमाटर ,भेंडी, वांगे, कांदे असा भाजीपाला पीक लावले होते. मात्र अवेळी आलेले अवकाळी आणि गारपीटीने तोडणीला आलेल्या टमाटर मातीमोल केले आहे. हात तोंडाशी आलेले  टमाटर गारपीटत फुटल्याने जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे.

अद्याप एकदाही तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचलं नाही 

विदर्भात उन्हाळा म्हणजे एप्रिल आणि मे महिना. मात्र यावर्षी एप्रिल महिना संपत आला तरी विदर्भात खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही. नागपुरात एकदाही कमाल तापमान 43° अंशांपर्यंत पोहोचलेलं नाही. दर चार-पाच दिवसानी होणाऱ्या अवकाळी पावसामुळे उन्हाळ्याची तीव्रता जाणवत नसली. तरी हवामानातील ही अनिश्चितता जून महिन्यात मान्सूनच्या विलंबाचा कारण तर बनणार नाही ना, अशीही चिंताही निर्माण झाली आहे

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली; अभय पाटील, अनुप धोत्रे की प्रकाश आंबेडकर, नेमका कौल कुणाला?

अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली; अभय पाटील, अनुप धोत्रे की प्रकाश आंबेडकर, नेमका कौल कुणाला?


Akola Lok Sabha constituency : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटी बंद झाला आहे.  तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाची उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. असे असताना, अकोल्यात (Akola) मात्र काही अंशी मंतदानाची टक्केवारी वाढल्याचे बघायला मिळाले आहे. तर या मतदारसंघात तिरंगी लढत असताना याचा फायदा आपल्यालाच होईल, असा विश्वास या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारांनी बोलून दाखवला आहे.      

अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली    

अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढलाय. 2019 मध्ये अकोल्यात 59. 76 टक्के मतदान झालं होतं. तर काल झालेल्या मतदानात अकोल्याचा टक्का हा 61.79 टक्क्यांवर गेला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 68 हजार 348 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

तिरंगी लढतीत नेमका कौल कुणाला?

दरम्यान, या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केलाय. लोकांमध्ये असलेला रोष मतदानातून व्यक्त होत आहे. म्हणूनच ही आकडेवारी वाढल्याचे डॉ. अभय पाटील म्हणालेत. तर आपण एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा, विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. दरम्यान, निवडणुकीच्या काळात काही लोकांकडून आपल्याला धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही डॉ. पाटील यांनी केलाय. निवडणुकीच्या काळात आपल्यावर विविध माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हाती घेतली आहे. बहुतांश ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मतदानाला मिळाले आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील राग आणि चीड मतदानातून व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही डॉ. अभय पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय.

 











मतदारसंघ एकुण मतदान झालेलं मतदान टक्केवारी
अकोट   300362  192283 64.02%
बाळापूर  300662 200170  68.58%
अकोला (पश्चिम) 332763  182599  54.87%
अकोला (पूर्व) 340802  202294   59.36%
मुर्तिजापूर  300296 193761   64.52%
रिसोड  315929 197241 62.43
एकूण   1890814   1168348  61.79%

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..



Source link

महाराष्ट्र कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष ने खड़गे को चिट्‌ठी लिखी:  कहा- MVA ने एक भी मुसलमान को टिकट नहीं दिया, उन्हें सिर्फ हमारा वोट चाहिए

महाराष्ट्र कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष ने खड़गे को चिट्‌ठी लिखी: कहा- MVA ने एक भी मुसलमान को टिकट नहीं दिया, उन्हें सिर्फ हमारा वोट चाहिए


मुंबई4 दिन पहले

  • कॉपी लिंक

महाराष्ट्र में लोकसभा की 48 सीटें हैं। उद्धव ठाकरे की शिवसेना और शरद पवार की NCP के साथ गठबंधन में कांग्रेस 17 सीटों पर चुनाव लड़ रही है।

महाराष्ट्र कांग्रेस के कार्यकारी अध्यक्ष और पूर्व मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान ने पार्टी की कैंपेन कमेटी से इस्तीफा दे दिया है। उन्होंने पार्टी अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे को चिट्‌ठी लिखकर इसकी जानकारी दी।

नसीम ने कहा- महाराष्ट्र की 48 लोकसभा सीटों पर महा विकास अघाड़ी (MVA) ने एक भी मुस्लिम कैंडिडेट को टिकट नहीं दिया। गठबंधन को सिर्फ मुसलमानों का वोट चाहिए। मैं लोकसभा चुनाव के बाकी बची सीटों पर पार्टी के लिए प्रचार नहीं करूंगा। मैं कैंपेन कमेटी से इस्तीफा देता हूं।

उन्होंने कहा कि पूरे महाराष्ट्र के कई मुस्लिम संगठन, नेता और पार्टी कार्यकर्ता उम्मीद कर रहे थे कि कांग्रेस अल्पसंख्यक समुदाय से कम से कम एक उम्मीदवार को टिकट देगी, लेकिन दुर्भाग्य से ऐसा नहीं हुआ। ये सभी पार्टी नेता और कार्यकर्ता अब उनसे पूछ रहे हैं- कांग्रेस को मुस्लिम वोट चाहिए, उम्मीदवार क्यों नहीं।

आरिफ खान मुंबई उत्तर मध्य से टिकट की दौड़ में थे
मोहम्मद आरिफ खान मुंबई उत्तर मध्य से टिकट की दौड़ में थे, लेकिन पार्टी ने यहां से वर्षा गायकवाड़ को टिकट दिया है। इससे पहले आरिफ 2019 में मुंबई के चांदीवली से विधानसभा चुनाव लड़े थे। हालांकि, वह 409 वोटों के मामूली अंतर से हार गए थे।

महाराष्ट्र में 17 सीटों पर लड़ रही कांग्रेस
महाराष्ट्र में लोकसभा की 48 सीटें हैं। गठबंधन के तहत कांग्रेस को 17 सीटें मिली हैं। इसके अलावा उद्धव ठाकरे की पार्टी शिवसेना (UBT) 21 और शरद पवार की NCP (शरदचंद्र पवार) 10 सीटों पर चुनाव लड़ रही है।

कांग्रेस की 17 सीटें: नंदरबार, धुले, अकोला, अमरावती, नागपुर, बांद्रा, गढ़चिरौली, चंद्रपुर, नांदेड़, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापुर, कोल्हापुर और नॉर्थ मुंबई।

शरद पवार की 10 सीटें: बारामती, शिरपुर, सतारा, भिवंडी, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड, मधा, डिंडौरी, रावेर।

उद्धव ठाकरे की 21 सीटें: जलगांव, परभणी, नासिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगढ़, मवाल, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, शिरडी, संभाजीनगर, सांगली, मुंबई नॉर्थ वेस्ट, मुंबई साउथ, मुंबई नॉर्थ ईस्ट, मुंबई साउथ सेंट्रल, यवतमाल, हिंगोली और हातकणंगले।

ये खबरें भी पढ़ें…

राहुल बोले- आजकल मोदी घबराए हुए हैं, कुछ दिनों में स्टेज पर उनके आंसू निकल आएंगे

कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कर्नाटक के बीजापुर में चुनावी रैली के दौरान अपने संबोधन में कहा कि आजकल PM नरेंद्र मोदी अपने भाषण के दौरान काफी घबराए हुए रहते हैं। शायद कुछ दिनों में स्टेज पर उनके आंसू निकल आएं। पूरी खबर पढ़ें…

लोकसभा चुनाव- केरल, महाराष्ट्र, राजस्थान में I.N.D.I.A की सहयोगी पार्टियों ने एक-दूसरे के खिलाफ उम्मीदवार उतारे

लोकसभा चुनाव 2024 के दूसरे फेज की शुक्रवार (26 अप्रैल) को वोटिंग होगी। इस फेज में 88 सीटों के लिए मतदान किया जाना है। बीजेपी की एनडीए वाली सरकार के सामने विपक्ष का I.N.D.I गठबंधन है। 28 दलों वाले I.N.D.I गठबंधन में शामिल पार्टियों ने गठबंधन की सहयोगी पार्टियों के कैंडिडेट के खिलाफ भी उम्मीदवार उतारे हैं। पूरी खबर पढ़ें…

खबरें और भी हैं…



Source link

वेळ संपली तरी मतदान केंद्रावर मतदारांची एकच झुंबड; हिंगोलीत मोठी रिघ

वेळ संपली तरी मतदान केंद्रावर मतदारांची एकच झुंबड; हिंगोलीत मोठी रिघ


Hingoli Loksabha Election 2024 : राज्यातील आठ मंतदारसंघासह आज हिंगोली (Hingoli) लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्या अनुषंगाने सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले होते. तर आता मतदानाची वेळ जवळ जवळ संपली असली तरी हिंगोली शहरातील जिल्हा परिषद शाळा आजम कॉलनी येथील मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. या मतदान केंद्रावर 1455 इतक्या मतदारांची नोंदणी असून आत्तापर्यंत फक्त 800 मतदारांचे मतदान झालं आहे. दुपारी तापमान मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर शुकशुकाट बघायला मिळाला.

तर, संध्याकाळी उष्णतेच्या पारा घटल्याने मतदारांनी मतदान करण्यासाठी एकच गर्दी केल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, या मतदान केंद्रामध्ये फक्त एकच मशीन असल्याने मतदान केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने मतदान केंद्र परिसरामध्ये रांगेत असलेल्या मतदारांना टोकन देण्यात आले  आहे. तसेच सर्व मतदारांचे मतदान करून घेतले जाईल, अशी सुद्धा माहिती हाती आली आहे. 

अखेरच्या टप्प्यात मतदान केंद्रावर मोठी रिघ

अठराव्या लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली होती. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी  मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून अनेक उमेदवारांचे भवितव्य आता मतदानपेटीत  कैद झाले आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगला आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे.

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात 56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदान केंद्रावरी मतदार यादीतील घोळ, वाढते तापमन आणि इतर कारणास्तव मतदार अपेक्षे प्रमाणे मतदान केंद्रापर्यंत न आल्याचे बघायला मिळाले. तर दुसरीकडे उष्णतेचा पारा कमी होताच मतदारांनी मतदान केंद्रावर एकाच झुंबड केल्याचे बघायला मिळत आहे. हिंगोली शहरातील आजम कॉलनी परिसरातील जिल्हा परिषद शाळा येथील मतदान केंद्रावर शेवटच्या टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी, या साऱ्यांना आता टोकन देऊन त्यांचे मतदान ग्राह्य धरल्या जाईल, अशी सुद्धा माहिती पुढे आली आहे. 

आधी मतदान, नंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार

मनात दुःख, डोळ्यात आसवं, तरी राष्ट्रीय कर्तव्याला सर्वस्वी मानत आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडत एका कुटुंबाने नवा आदर्श निर्माण केला आहे. घरात ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यु तरी कुटुंबातील सर्व जण मतदान केंद्रावर दाखल होत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. हा सर्व प्रकार घडला आहे तो अकोला शहरातल्या न्यू तापडीया नगर येथे. 

दरम्यान, न्यू तापड़िया नगर इथं पिल्लै कुटुंब वास्तव्यास आहे. या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती रांचचंद्र दुर्गय्या पिल्लै यांचं आज 26 एप्रिल रोजी सकाळी वयाच्या 88 व्या वर्षी दुःखद निधन झाले. असे असताना कुटुंबियांनी लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. घरात वडिलांचा पार्थिव, त्यात दूसरीकड़ं मतदानाचं कर्तव्य. अशा दुःखद परिस्थितीत दिनेश पिल्लै यांनी आधी मतदान नंतरचं वडिलांवर अंत्यसंस्कार, असा निश्चय केला. त्यानंतर दिनेश पिल्लैसह कुटुंबातील सर्वांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावलं. इतक्या दुःखाच्या क्षणातही त्यांनी मतदान केंद्र गाठत आपलं मतदान केलं. अशा प्रकारे दिनेश पिल्लै यांनी आदर्श घडवला असून सर्वत्र त्यांचं कौतूक होतंय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Lok Sabha Election Phase 2: दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान

Lok Sabha Election Phase 2: दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात संध्याकाळ पर्यंत 53.51 टक्के मतदान


Lok Sabha Election Phase 2 : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या आठ मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या  मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा  रणसंग्राम रंगणार आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पाच वाजेपर्यंत राज्यातील आठ मतदारसंघात सरासरी 53.51 टक्के मतदान झाले आहे. जे की देशातील सर्वात कमी टक्के मतदान असल्याचेही समोर आले आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक मतदान हे वर्धा मतदारसंघात  56.66 टक्के तर सर्वात कमी हिंगोली लोकसभा मतदारसंघात 52.03 टक्के इतके मतदान झाले आहे.

5 वाजेपर्यंत मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

वाढत्या उन्हाचा मतदानाला फटका?

विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघात होऊ घातलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडनुकाच्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यात कुठे उन्हाचा तडाखा बघायाला मिळतोय, तर कुठे अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे संभाव्य वातावरण बघता सकाळच्या सत्रात मतदारांनी अधिका-अधिक मतदान करण्याला पसंती दिली आहे. मात्र दुपारी उन्हाचा पारा वाढताच मतदानात देखील काहीशी घसरण होताना दिसली आहे. तर आता उर्वरित वेळेत मतदार मतदान केंद्रापर्यंत येतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदार यादीतील घोळ कायम असतानाचे चित्र आहे. तर काही ठिकाणी चक्क जेवणासाठी काही काळ मतदान प्रक्रिया बंद केल्याचे देखील बघायला मिळाले आहे. त्याचा थेट परिणाम हा मतदानाच्या टक्केवारीवर पडला असल्याचे बोलले जात आहे.        

काय सांगते मतदानाची टक्केवारी?

परभणी लोकसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 44. 49 टक्के मतदान झाले असून येथे कमाल तापमान 41.04 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 40. 50 टक्के इतका मतदान झाले आहे. तर हिंगोलीचं तापमान 41 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 42. 42 टक्के मतदान झाले आहे. यात भोकर येथे 43.85 टक्के, नांदेड उत्तर 41.69 टक्के, नांदेड दक्षिण 44.35 टक्के, नायगाव 40.79 टक्के तर देगलूर 46.30 टक्के आणि मुखेड येथे 37.55 टक्के मतदान झाले आहे. तसेच नांदेड तापमान 40 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे.

यवतमाळ वाशिम मतदान टक्केवारी

यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी दुपारी 3 वाजतापर्यंत 42.55 टक्के मतदान झाले आहे. तर या मतदारसंघात आतापर्यंत कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यात दिग्रस : 45.33 टक्के, कारंजा : 43.20 टक्के, पुसद : 41.67 टक्के, राळेगाव : 48.72 टक्के, वाशिम : 42.58 टक्के आणि यवतमाळ : 35.72 टक्के मतदान झाले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

मतदार यादीतील घोळ दुसऱ्या टप्प्यातही कायम; शेकडो मतदार आल्या पावली माघारी

मतदार यादीतील घोळ दुसऱ्या टप्प्यातही कायम; शेकडो मतदार आल्या पावली माघारी


Lok Sabha Election 2024 Phase 2 अकोला : अठराव्या लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील एकूण 88 जागांसाठी सुमारे 15.88 कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठ मतदारसंघात आज मतदानाचा रणसंग्राम रंगणार आहे. अशातच या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात (Akola) देखील सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. मतदारांनी आज सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मोठी गर्दी केली असून उन्हाचा तडाखा लक्षात घेता सकाळच्या सत्रात मतदान करण्यास मतदारांनी अधिक पसंती दिली आहे.

परंतु, असे असताना मतदार यादीती घोळ अद्याप कायम असल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर काही मतदारांना आपले नाव मतदान यादीत आढळून न आल्याने, आल्या पावली माघारी जावं लागलंय. मात्र, या गोंधळाचा फटका मतदानाच्या टक्केवारीला बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. तर दुसरीकडे वंचितच्या (Vanchit Bahujan Aghadi) मतदारांची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीतून गहाळ केल्याचा गंभीर आरोप या मतदारांकडून करण्यात येतोय.

जाणीवपूर्वक मतदार यादीतून नाव गहाळ केल्याचा आरोप     

विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदान केन्द्रावर आज मतदानाची रणधुमाळी रंगात आहे. अशातच अकोल्यात सकाळपासून मोठ्या उत्साहात मतदानाला सुरूवात झालीये. गेल्या काही दिवसांपासून आकोल्याती तापमानाने कमालीचा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे उन्हाची दाहकता लक्षात घेता मतदारांनी सकाळच्या सुमारास मतदान केंद्रांवर मोठी गर्दी करत आपला हक्क बाजवण्याला पसंती दिली आहे. मात्र, अनेक मतदान केंद्रांवर मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना आल्या पावली माघारी जावं लागतंय.

अकोल्यातील कृषीनगर भागातील मतदान केंद्रांवर हा घोळ मोठ्या प्रमाणात दिसतोय. सकाळपासून शेकडो मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाला मुकले आहेत.  कृषीनगर भागातच वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकराचं निवासस्थान असून हा भाग त्यांचा गड समजला जातो. परिणामी, वंचितच्या मतदारांची नाव जाणीवपूर्वक मतदार यादीतून गहाळ केल्याचा गंभीर आरोप या मतदारांनी केलाय. त्यामुळे मतदारयादीतील घोळ सलग दुसऱ्या टप्प्यातील निवडनुकांमध्ये कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. 

ईव्हीएम मशीन बंद पडल्याने गोंधळ 

वाशिम शहरातील बाकलीवाल विद्यालयामधील असलेल्या बूथ क्रमांक 243 या मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याचा प्रकार समोर आलाय. यामध्ये  जवळ जवळ 20 ते 25 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद होती. त्यामुळे मतदारांनी संताप व्यक्त केला असून मतदान केंद्र निरीक्षकाला तक्रार करून वेळ का लागत आहे, असा जाब मतदारांनी विचारला. शेवटी बॅटरी बदलण्यात आल्यावर आता मशीन सुरू झालीये. मात्र काहीकाळ मशीन बंद झाल्याने एकच गोंधळ त्या ठिकाणी झाल्याचे बघायला मिळाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp