दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला उरला अवघा तीन दिवसांचा अवधी; दिग्गज नेत्यांची अकोल्यात मंदियाळी

दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला उरला अवघा तीन दिवसांचा अवधी; दिग्गज नेत्यांची अकोल्यात मंदियाळी


Akola Lok Sabha constituency : देशभरात सध्या सरू असलेल्या सर्वात्रिक लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची रणधूमाळीची सांगता झालीय. तर लगेच दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे वेध आता साऱ्याच राजकीय पक्षाना लागले आहे. येत्या 26 एप्रिलला विदर्भ आणि मराठवाड्याच्या आठ मतदारसंघात निवडणुकांची रणधूमाळी रंगणार असून यात अनेक उमेदवारांचे पुढील भवितव्य ठरणार आहे. असे असताना या निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यास आता अवघा तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे लाखों मतदारांपर्यंत पोहचणे हे मोठे आव्हान आता उमेदवारांपूढे असणार आहे. त्यामुळे पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून अखेरचा मास्टर स्ट्रोक मारण्याचा प्रयत्नांत आहे. आज आणि उद्या एकट्या अकोला (Akola) मतदारसंघात महाविकस आघाडी (MVA)आणि महायुतीच्या (Mahayuti) दिग्गज नेत्यांची भव्य जाहीर सभा पार पडणार आहेत. 

योगी आदित्यनाथ ऐवजी अमित शाहांची अकोल्यात सभा  

विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे.अशातच राजकीय पक्षानी (Mahayuti) आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. मात्र नुकतीच आकोल्यात (Akola) महायुतीकडून आयोजित अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा अचानक रद्द करण्यात आल्याने मोठे गोंधळ निर्माण झाला होता. शिवाय अनेक राजकीय टीकाटिपणीही झाली होती. यात अगदी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांच्या सभेचा देखील समावेश होता. मात्र आता पुन्हा भाजपने आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ अकोल्यात कंबर कसली आहे.

उद्या, 23 एप्रिलला भाजपचे उमेदवार अनुप धोत्रेंच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अकोल्यात येते आहेत. दुपारी 3 वाजताच्या अमित शाह यांची अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी 21 एप्रिलला याच मैदानावर योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र काही कारणास्तव ही सभा ऐन वेळेवर रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अमित शाहांना मैदानात उतरवत भाजपचे डॅमेज कंट्रोल करत तर नाहीये ना, असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित करण्यात येतोय. 

आज होणाऱ्या सभा 

अकोला मतदारसंघात महाविकास आघाडीचा वतीने काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे त्यांच्या प्रचारार्थ आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेतून ते नेमकं कुणावर निशाण साधतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर आज मविआची दुसरी सभा अकोला शहरातील गडंकी येथे आजोजित करण्यात आली आहे. डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत ही भव्य जाहीर सभा पार पडणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन

तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन


अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ‘प्रेशर कुकर’ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांकडून जनतेला भावनिक आवाहन

औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही दोन ते तीन तासात संपवून टाकला, ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे, असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.

संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचं

आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

कधी भाजपासोबत समझोता करणार नाही

आज ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मी काही महिन्यांपासून म्हणत आहे की, लोकांना आतून बदल पाहिजे आहे. 24 लाख हिंदू परिवार 2014 पासून नागरिकत्व सोडून स्थलांतरित झाले आहेत की, ज्यांची संपत्ती 50 करोडपेक्षा कमी नाही, या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मी इथल्या पक्षांना म्हणत होतो की, आता एक नवीन चेहरा दाखवणे गरजेचे आहे. एकता दाखवणे गरजेचे आहे आणि एकता अशा संघटनांची दाखवणे गरजेचे आहे की, जी कधी भाजपासोबत समझोता करणार नाही, याचीही आठवण आंबेडकरांनी यावेळी करून दिली.

सरकारने जनतेची निराशा केली

लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल, पण त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी 100 टक्के मतदान करावे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिलं, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांचे प्रश्न सोडवावेत

मुस्लिमांची लढाई ही NRC, CAA आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची आहे. मी आशा करत होतो की, काँग्रेस आमच्यासोबत समझोता करेल तो केला नाही, पण काँग्रेस पार्टी एवढं करू शकत होती की, काही जागा या मुस्लिमांना देईल, पण राजस्थान असो किंवा अन्य ठिकाणी काँग्रेस जागा देत नव्हती. मुस्लिमांच्या प्रश्नांना जोपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत नाहीत, तोपर्यंत या देशात शांती राहणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितलं आहे.

 

अधिक पाहा..



Source link

पंतप्रधान मोदी अन् योगी आदित्यनाथ यांच्या अकोल्यातील सभा रद्द, आमदार देशमुखांनी सांगितलं कारण

पंतप्रधान मोदी अन् योगी आदित्यनाथ यांच्या अकोल्यातील सभा रद्द, आमदार देशमुखांनी सांगितलं कारण


Nitin Deshmukh अकोला: अकोल्यात भाजपचा (BJP) पराभव होत असल्याने अकोल्यातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अणि पंतप्रधान मोदींच्या (PM Narendra Modi) सभा रद्द करण्यात आल्या आहेत. अकोला लोकसभेची जागा भाजपनं ‘ड गटा’त म्हणजेच ‘डेंजर झोन’ मध्ये असल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत स्पष्ट झाल्याचा दावा, उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुखांनी  (Nitin Deshmukh) केलाय. त्यामुळेच संभाव्य पराभव लक्षात घेता योगी अणि मोदींच्या अकोल्यातल्या सभा रद्द झाल्या असल्याचेही नितीन देशमुखांनी म्हटलय.

अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात महाविकास आघाडीची सभा सुरू आहे. या सभेत काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे महासचिव खासदार मुकूल वासनिक आणि काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकरीही उपस्थित आहे. या सभेदरम्यान बोलताना आमदार नितीन देशमुखांनी महायुतीवर ही बोचरी टीका केलीय.

आपला पराभव दिसत असल्याने सर्व सभा रद्द 

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे. मात्र, आकोल्यात महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या सभा अचानक रद्द करण्यात आल्या आहेत.

यात उद्या अकोला येथे होणारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचा देखील सहभाग आहे. मात्र या सभा रद्द करण्यामागील नेमके कारण काय, हे महायुतीच्या नेत्यांकडून अद्याप कळू शकलेले नाही. मात्र अचनाक सभा रद्द करण्यात आल्याने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असतानाच आता विरोधकांकडूनही टीकेची झोड होत असल्याचे चित्र आहे.  

पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा अचानक रद्द

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा  प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे भाजपकडून अनुप धोत्रेच्या प्रचारार्थ मोठी ताकद लावली जाण्याची शक्यता होती. यापूर्वी अनुप धोत्रे यांच्या अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपचे नेते उपस्थित झाले होते.

मात्र, त्यानंतर अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ भाजपकडून कोणताही मोठा नेता अकोला मतदारसंघात आला नाही. अशातच पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा अचानक रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तर दुसरीकडे या सभेवरुन विरोधीबाकावरील नेत्यांनीही टीका करण्याची ही संधी सोडलेली नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यातील दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा रद्द; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचाही समावेश

अकोल्यातील दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा रद्द; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेचाही समावेश


Akola Lok Sabha constituency : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. पूर्व विदर्भातील पाच मतदासंघातील मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला असून अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता निकालानंतर ठरणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे.

अशातच महायुतीच्या (Mahayuti) वतीने आपल्या उमेदवारच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात मेगा प्लान तयार करण्यात आला आहे. मात्र आकोल्यात (Akola) महायुतीकडून आयोजित करण्यात आलेल्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यात उद्या अकोला येथे होणारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ  (Yogi Adityanath) यांच्या सभेचा देखील समावेश आहे. मात्र या सभा रद्द करण्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र अचानक सभा रद्द करण्यात आल्याने भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  

अकोल्यातील दिग्गज भाजप नेत्यांच्या सभा रद्द          

अकोल्यात महायुतीकडून भाजपचे नेते अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ उद्या, 21 एप्रिलला अकोल्यात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. या सभेला प्रामुख्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ हे उपस्थित राहणार होते. मात्र उद्या होणारी ही सभा अचानक रद्द करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यासोबतच आज दुपारी 4 वाजता मुर्तिजापूर येथे होणारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुद्धा रद्द करण्यात आली आहे.

अनुप धोत्रे यांच्या अर्ज दाखल करण्याच्या दिवशी  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपचे नेते उपस्थित झाले होते. त्यानंतर भाजपच्या सभेसाठी कोणताही मोठा नेता अकोला मतदारसंघात आला नाही. अशातच पूर्व नियोजित नेत्यांच्या सभा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तर दुसरीकडे  या सभा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय, हे अद्याप कळू शकलेले नाही.
 

अकोला लोकसभेत तिरंगी लढत

अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा  प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीकडून भाजपचे अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद आहे. याच कारणामुळे त्यांनी या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील यांना तिकीट दिले आहे. मात्र ओपीनियन पोलनुसार येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता असली तरी तेथे भाजपाचेच धोत्रे बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

रणरणत्या उन्हात पूर्व विदर्भात मतदानाची रणधुमाळी; दुसरीकडे पुन्हा पाच दिवस अवकाळी ढग गडद

रणरणत्या उन्हात पूर्व विदर्भात मतदानाची रणधुमाळी; दुसरीकडे पुन्हा पाच दिवस अवकाळी ढग गडद


Vidharbha Unseasonal Rain Update : जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून देशात सुरुवात झाली आहे. तर राज्यात या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीचा नारळ आज पूर्व विदर्भातील (Vidharbha) पाच मतदारसंघात फुटला आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेची (Heat Wave) पाऱ्याचा जोर वाढत असताना मतदानाचा जोर देखील वाढताना दिसतोय. राज्यसह विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना आता पुन्हा विदर्भात अवकळी ढग दाटणार आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा नागपूर प्रादेशिक हवामान (IMD) विभागाने दिला आहे. आधीच मागे पडून गेलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असताना आता परत अवकळी पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.  

पुढील पाच दिवस पावसाचे    

पूर्व विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज 19 एप्रिलला अवकळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर आगामी काळात पूर्व विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते माध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांच्या कडकड, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलाडली असताना दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे अवकळी पावसाने मोठे नुकसान केले असताना आता परत अवकाळी पावसाने आणखी संकटाचे ढग गडत होतानाचे चित्र आहे.

विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट  

विदर्भात आज सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे. अकोल्यात आज कमाल तपामन 43.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल चंद्रपूर येथे 43.2 इतके तर अमरावती, यवतमाळ येथे  42 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. एकुणात अशीच काहीशी स्थिथी उर्वरित विदर्भातली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसतानाचे चित्र आहे

या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

दरम्यान, काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं 21 एप्रिलपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं या राज्यातील नागरिकांनी खबदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola Crime News : डबल मर्डरच्या घटनेनं अकोला हादरलं! धारदार शस्त्रांनी वार करत दोघांना संपवलं

Akola Crime News : डबल मर्डरच्या घटनेनं अकोला हादरलं! धारदार शस्त्रांनी वार करत दोघांना संपवलं


Akola Crime News अकोला : शहरातील  कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरात काल मध्यरात्री दोन खुनाच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे दोन्ही खून रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या (Ramdaspeth Police Station) हद्दीत झालेत. दोन्ही खुनाच्या घटनामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. अतुल रामदास थोरात (40) आणि राज संजय गायकवाड (18) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

अतुल थोरात (Atul Thorat) याची धारदार शस्त्रांनी रेल्वे स्टेशन चौकातच हत्या करण्यात आली. तीन अज्ञात मारेकर्‍यांनी अतुलवर धारदार शस्त्राने वार करून त्याला जागीच संपवलं. तर शहरातीलच देशमुख फैल भागातील राज गायकवाडवर (Raj Gaikwad) तीन अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करत हल्ला चढवला आणि यामध्ये राजचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात रामदास पेठ पोलीस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे अकोला शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

धारदार शस्त्रांचा वापर करीत संपवलं

अतुल थोरात रेल्वे स्टेशनजवळील गुजराथी उपहार गृहासमोरुन दुचाकीवरून येत असताना तीन अज्ञातांनी त्याला थांबवून घेरले. त्यांच्यात वाद झाला, वादादरम्यान हाणामारी सुरू झाली. अतुलने प्रतिकार केला, परंतु थोड्याच काळात आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करीत त्याच्यावर वार केले. जखमी अतुलची आजूबाजूच्या नागरिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. परंतु मारेकऱ्यांनी नागरिकांना धमकावले. अतुलची हत्या करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान रामदास पेठ पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. अद्यापपर्यंत अतुल थोरात यांच्या हत्येचं मूळ कारण समजलं नसून पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.

पहिल्या घटनेचा पंचनामा होत नाही तोच दुसरी हत्या 

विशेष म्हणजे अतुलच्या हत्येच्या घटनास्थळीचा पंचनामा सुरू असतानाच याच पोलीस स्टेशन हद्दीतील भवानी पेठेत हत्येची दुसरी घटना घडली. देशमुख फाईलजवळच्या भागात राहणाऱ्या राज संजय गायकवाड (18) याचीही तीन अज्ञात आरोपींनी हत्या केल्याचं समजते. काल अकोल्यात श्रीराम नवमीनिमित्त शोभायात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं. या शोभायात्रेत हजारो संख्येने नागरिक उपस्थित होते. 

सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरु 

या दरम्यान राजूचा काही युवकांशी वाद झाला होता. हा वाद मित्रांच्या मदतीने इथंचं शांत झाला. परंतु रात्री 2 वाजताच्या सुमारास राजूच्याच घरी काही तरुण आले. त्यांनी लगेचच धारदार शस्त्रांनी राजूच्या अंगवार वार केले. राजूचे नातेवाईक आरोपींना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तोपर्यंत त्याचा या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान या दोन्ही हत्येच्या घटनांमध्ये तीनच आरोपी होते, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अतुल थोरात यांच्या हत्येच्या ठिकाणचे पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ जप्त केले असून त्या आधारावर आरोपींचा शोध घेतला जात आहे. 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp