उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढणार?

उत्कर्षा रुपवतेंनी निवडली नवी वाट, काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये दाखल, शिर्डीतून लढणार?


अकोला/ अहमदनगर :  शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Seat) महाविकास आघाडीकडून (MVA) उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. उत्कर्षा रुपवते यांनी अकोला  येथे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी प्रवेश केला. यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, मविआच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. या मतदारसंघात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे आणि वंचितनं उमेदवारी जाहीर केल्यास वंचितकडून उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत होऊ शकते. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी कालचं काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर तातडीनं त्यांनी अकोल्यात  वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. 

प्रकाश आंबेडकर यांच्याशी काही दिवसांपूर्वी चर्चा

शिर्डीसाठी उत्कर्षा रुपवते या वंचितच्या संपर्कात असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. रुपवतेंनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आंबेडकरांची भेट घेतली होती.  

भाऊसाहेब वाकचौरेंना उमेदवारी जाहीर होताच रुपवते आक्रमक झाल्या होत्या. गेली अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला डावलत असल्याचा आरोप करण्यात आला होता. उत्कर्षा रूपवते या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडे ही जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी करत होत्या.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उत्कर्ष रूपवते या आक्रमक झाल्या  होत्या. त्यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली होती. 

देशभर न्याय यात्रा काढणारे राहुल गांधी पक्षातीलच युवकांना न्याय देणार का असा सवाल सुद्धा उत्कर्षा रुपवते यांनी यापूर्वी   एबीपी माझाशी बोलताना उपस्थित केला होता. शिर्डी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून ठाकरे गटाने दिलेला उमेदवार चुकीचा असून भाऊसाहेब वाकचौरे यांच्या बद्दल जनतेत उदासीनता असल्यानं त्याचा फेरविचार पक्षाने केला पाहिजे, असं रुपवते यांनी म्हटलं होतं. 

दरम्यान, शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचितकडे पुण्यातील नामवंत उद्योजक विनोद अहिरे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. अहिरे मुळचे नगर जिल्ह्यातील कोपरगावचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अकोल्यातील आंबेडकरांच्या ‘यशवंत भवन’ या निवासस्थानी आंबेडकरांची भेट घेतली होती.यामुळं वंचित कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

संबंधित बातम्या : 

पश्चिम महाराष्ट्रात महायुती आणि मविआचं आज जोरदार शक्तीप्रदर्शन, हायव्होल्टेज जागांवर होणार अर्ज दाखल; दिग्गजांच्या लढतींचं काऊंटडाऊन सुरु

Kolhapur Loksabha : 17 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांचा कोल्हापुरात शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा!

अधिक पाहा..



Source link

निलंबनानंतर पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल, अकोला पोलीस अधीक्षकांची कारवाई

निलंबनानंतर पोलीस उपनिरीक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल, अकोला पोलीस अधीक्षकांची कारवाई


अकोला : पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या एका संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह एका पोलिस कर्मचाऱ्याचं निलंबन झालं होतं. या प्रकरणात अकोला पोलिसांनी (Akola Police) वरिष्ठांनी लक्ष घातल्यानंतर संशयित पीएसआय राजेश जवरेसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध अकोट पोलिसांत खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातीलच अकोट पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध हे गुन्हे दाखल झाले. 302, 34 नूसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल झालेत.

वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे

या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी ‘सोळंके’ या दोघांचं आधी निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत आहे असे आदेशात नमुद आहे. 

अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. याच अहवालानुसार जवरेसह तिघांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आता जवरेसह दोषींच्या बडतर्फीची मागणी नातेवाईक करीत आहेत. 

नेमकं काय आहे प्रकरण? 

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे’ आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. 

पुढे  पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजतादरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला. 

सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी दवाखान्यात उपचार 

या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भितीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं. 

मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केलेत अंत्यसंस्कार 

गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटुबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला मात्र, त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे. 

मृतकाच्या कुटूंबियावर पोलिसांचा दबाव

या संपूर्ण प्रकरणानंतर गोवर्धनचं कुटुंब प्रचंड दहशतीत होतं. मात्र प्रकरणाच्या तब्बल दोन महिन्यांनंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार करण्याचा निर्णय घेतली. दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्तीमार्फत आपल्याला धमकावत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गोवर्धनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार अकोल्यातच करण्यासाठी आकाश चावरे या व्यक्तीमार्फत त्याच्या कुटुंबीयांना धमकवण्यात आलं. 

हा आकाश चावरे कोण? आणि त्याचा बोलविता धनी कोण?, हेही पोलीस तपासात समोर येणं गरजेचं. विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही. गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण गरजेचं होतं. पण झालं नाही, असेही तक्रारीत म्हटलं आहे. 

शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे  

गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबीयांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करताहेत. 

दोन वर्षांपूर्वी अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावच्या सराफावर असेच अत्याचार केले होतेय. त्या प्रकरणात ‘एबीपी माझा’च्या पाठपुराव्यानं मोठी कारवाई होत तीनजण बडतर्फ तर दोनजण निलंबित झाले होते. निष्णात गुन्हेगारासारख्या वागणाऱ्या राजेश जवरे आणि इतर साथीदारांवर सरकार अशीच बडतर्फीची कारवाई करणार का?, हाच खरा प्रश्न आहे. 

ही बातमी वाचा :

 

अधिक पाहा..



Source link

ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव?

ABP C Voter Opinion Poll : प्रकाश आंबेडकरांचं अकोल्यात काय होणार? विजय की पराभव?


मुंबई : लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election 2024) सध्या देशातह महाराष्ट्राती वातावरण राजकारणमय झाले आहे. या निवडणुकीत विजयी कामगिरी करण्यासाठी प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागलाय. वंचित बहुजन आघाडीनेही या निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले आहेत. खुद्द वंचितचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हेदेखील या निवडणुकीत अकोला या मतदारसंघातून उभे आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांना धक्का बसण्याची शक्यता आहे. एबीपीच्या सी वोटर्स सर्व्हेनुसार या जागेवर भाजपचा (BJP) उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. 

ओपीनियन पोलनुसार कोण जिंकणार? 

अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची मोठी ताकद आहे. याच कारणामुळे त्यांनी या जागेवरून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही डॉ. अभय पाटील यांना तिकीट दिले आहे. महायुतीकडून अनुप धोत्रे यांना तिकीट देण्यात आलंय. धोत्रे हे भाजपचे उमेदवार आहेत. या जागेवर तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र येथे चुरशीची लढत होण्याची शक्यता असली तरी तेथे भाजपाचेच धोत्रे बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 

वंचितला किती जागा मिळणार? 

निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासून महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र या प्रयत्नाला यश आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाअंतर्गत वंचितने महाराष्ट्रात अनेक जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. मात्र यातील एकाही जागेवर वंचित बहुजन आघाडीची कामगिरी नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. वंचितचा एकाही जागेवर विजय होणार नाही, असे एबीपी सी वोटर्सच्या सर्वेक्षणातून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   

महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll)

महायुती- 30 
महाविकास आघाडी- 18
—————
एकूण जागा- 48

महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा? (Lok Sabha Election 2024 Opinion Poll Mahayuti seats)

भाजप- 21-22
शिवसेना (शिंदे गट)- 9-10
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 0
——————
एकूण जागा- 30-32

महाविकास आघाडीला किती जागा? 

काँग्रेस- 03
शिवसेना ( ठाकरे गट)-  09-10
राष्ट्रवादी- (शरद पवार गट)-  05
——————–
एकूण जागा- 18 

हेही वाचा :

 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा फडकणार का? किती जागांवर होणार विजय?

एकनाथ शिंदेंची शिवसेना मैदान मारण्याच्या तयारीत, ‘माझा’च्या सर्व्हेत किती जागा?

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, ‘माझा’च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा!

अधिक पाहा..



Source link

अकोटमध्ये पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू? नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप 

अकोटमध्ये पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू? नातेवाईकांचा पोलिसांवर गंभीर आरोप 


अकोला : एका प्रकरणात अकोला पोलिसांच्या वागणुकीनं अक्षरश: क्रूरतेचा कळस गाठला आहे. ‘सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय’चं ब्रिद घेतलेल्या पोलीस दलातील अकोट पोलिसांतील अधिकारी असलेल्या राजेश जवरे या पोलीस उपनिरीक्षक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘खलपुरूषां’नाही लाजवणारं काम केलं आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे एका संशयिताचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला असून हे प्रकरण पोलिसांनी दोन महिन्यांपासून दडपून ठेवलं आहे. 

दोन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यातील आरोपाखाली संशयित म्हणून अकोट शहर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. यादरम्यान पोलिसांकडून त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. अकोट पोलिसांनी त्याच्या पार्श्वभागात दांडा टाकून त्याला क्रूर मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या अंगावर गंभीर जखमा झाल्यात. यासोबतच त्याच्या छातीची हाडं तुटलीत. 

त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी मृत्यू झाला. ‘गोवर्धन हरमकार’ असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो अकोट तालूक्यातील सुकळी गावाचा रहिवाशी आहे. तो अतिशय गरीब कुटुंबातील आहे.

दोन महिने प्रकरण दडपून ठेवलं 

विशेष म्हणजे एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. जानेवारी महिन्यात घडलेलं हे प्रकरण तब्बल दोन महिने अकोला पोलिसांनी दाबून ठेवलं. मात्र मृताच्या नातेवाईकांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. यानंतर आता या प्रकरणात एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता सद्यस्थितीत या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि एका पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

15 जानेवारीला नेमकं काय झालं होतं? 

मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका गुह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे’ आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला ताब्यात घेतलं. त्यानंतर 16 जानेवारीला त्याला त्याच्या सुकळी या गावात आणत घरझड़ती घेतली. त्यावेळी पोलिसांच्या हाती काहीच लागलं नव्हतं. 

पुढे  पोलिसांनी गोवर्धनसह त्याचे सध्या तक्रारदार असलेले त्याचे काका सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. 16 जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजतादरम्यान दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यानंतरही पोलिसांकडून मृत गोवर्धनला अमानुषपणे मारहाण सुरूच होती. एवढ्यावरच न थांबता पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि त्यांच्या साथीदारांनी मृतक गोवर्धनच्या पार्श्वभागात दांडा टाकून क्रूरतेचा कळस गाठला. 

सरकारी दवाखान्यात न नेता खाजगी दवाखान्यात उपचार  

या गंभीर मारहाणीत गोवर्धनच्या छातीची हाडं तुटली. गंभीर अवस्थेत असलेल्या गोवर्धनला एका बाहेरील व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी अकोटमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं. त्या दवाखान्यानं उपचारास नकार देत त्याला अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवायचा सल्ला दिला. अकोट ग्रामीण रुग्णालयाने त्याची गंभीर परिस्थिती पाहून पुढील उपचारासाठी त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र जवरेच्या सांगण्यावरून त्याला अकोला जिल्हा रूग्णालयात भरती न करता पोलिस कारवाईच्या भितीने अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात त्याला भरती करण्यात आलं. 

मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 जानेवारीला उपचार दरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि वैद्यकीय कागदपत्रांनुसार त्याच्या छातीची हाडं तुटली होती असा आरोपही मृत गोवर्धनच्या नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केला आहे. 

प्रकरण दाबण्यासाठी अकोल्यातच केलेत अंत्यसंस्कार 

गोवर्धनचं निधन झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली. त्याचे कुटुंबीय अकोल्यात आल्यानंतर त्यांनी मृतदेह गावी नेण्याचा आग्रह केला. मात्र त्यांना धमकावत त्यांच्याकडून आमची परिस्थिती नसल्यामुळे आम्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार करू शकत नसल्याचं जबरदस्तीने लिहून घेण्यात आलं. त्यानंतर अकोल्यात गरीब आणि अनोळखी मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असलेल्या संस्थेशी संपर्क साधून अकोल्यातील मोहता मिल स्मशानभूमीत मृतदेहाला अग्नी देण्यात आला. गावात अंत्यसंस्कार झाले असते तर प्रकाराचा बोभाटा झाला असता म्हणून अकोल्यात घाईघाईत गोवर्धनवर अंत्यसंस्कार करवून घेतल्याचं बोललं जात आहे. 

मृतकाच्या कुटुंबीयावर पोलिसांचा दबाव

या संपूर्ण प्रकरणानंतर गोवर्धनचं कुटूंब प्रचंड दहशतीत होतं. मात्र, प्रकरणाच्या तब्बल दोन महिन्यांनंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार करण्याचा निर्णय घेतली.  दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी काही बाहेरील व्यक्तीमार्फत आपल्याला धमकावत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. गोवर्धनचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार अकोल्यातच करण्यासाठी आकाश चावरे या व्यक्तीमार्फत त्याच्या कुटूंबियांना धमकविण्यात आलं. हा आकाश चावरे कोण? आणि त्याचा बोलविता धनी कोण? हेही पोलीस तपासात समोर येणं गरजेचं. विशेष म्हणजे या प्रकरणात अकोट शहर पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही. गोवर्धनला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण गरजेचं होतं. पण झालं नाही असेही तक्रारीत म्हटलं आहे. 

शवविच्छेदनाच्या वैद्यकीय अहवालात धक्कादायक खुलासे  

गोवर्धन याच्या मृत्यूप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून वैद्यकीय अहवालात मृत्यूचं कारण आतापर्यंत समजू शकल नाही. मात्र प्राथमिक अहवालात गोवर्धन याच्या अंगावर मोठ्या प्रमाणात जखमा आढळून आल्या. अशी माहिती आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांनी दिली आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्याप याप्रकरणी गंभीर भूमिका घेतली नाही. अखेर कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली. आता या प्रकरणात चौकशी समिती गठित झाली आणि पुढील चौकशी पोलीस करताहेत. 

वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरेसह एका पोलीस कर्मचाऱ्याचं निलंबन

या प्रकरणात आरोप असलेला पोलीस उपनिरिक्षक राजेश जवरे’ आणि पोलीस कर्मचारी ‘सोळंके’ या दोघांचं निलंबन करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अहवालानूसार मृतक गोवर्धन याच्या अंगावर जखमा असून मारहाणीमूळे त्याचा मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळ आपल्या गैरवर्तनाच्या संशयावरुन दोघांनाही निलंबित करण्यात येत, असे आदेशात नमुद आहे. पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांनी हे आदेश काढले. विशेष म्हणजे अकोटचे आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून एक अहवाल तयार केला आहे. आणि तो अहवाल वरिष्ठांना पाठविला, अशी माहिती त्यांनी दिली आहे. परंतु  तपासात नेमकं काय आहे, यावर त्यांनी बोलायला टाळलं.

अकोला पोलिसांना ‘एबीपी माझा’चे सवाल 

मृत गोवर्धनला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं? नेमकं पोलिस ठाण्यात काय घडलं? वैद्यकीय अहवालात नेमकं काय समोर येणार?, पोलिसांकडून माहिती द्यायला टाळाटाळ का केली जातंय?, कुटुंबियांना धमक्या देणारे ‘ते’ व्यक्ती कोण? कुटुंबीयांचे आरोप कितपत सत्य? यासह अन्य प्रश्नांची उत्तरं अकोला पोलिसांना शोधावी लागणार आहेत.

राजेश जवरेंवर खुनाचा गुन्हा दाखल होणार का?, कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा सवाल  

या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आणि त्याचे सहकारी असलेल्या काही लोकांवर संशयाची सुई फिरते आहे. मृतकाच्या पार्श्वभागात दांडू घालणे, मारहाणीत त्याच्या छातीची हाडं मोडणं इतका अमानुषपणा जवरेकडून होत असताना त्याचे वरिष्ठ असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक इतके अनभिज्ञ कसे? प्रकरण दाबण्यासाठी नंतर दिल्या गेलेल्या धमक्या, आकाश चावरे याने कुणाच्या सांगण्यावरून त्याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्यात? गावात जावून मृतकाच्या कुटुंबीयांना धमक्या देणारे कोण? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधावी लागणार आहे? यासोबतच जवरेचे या काळातील कॉल डिटेल्स शोधले तर अनेक प्रश्नांची उकल होऊ शकेल. या संपूर्ण प्रकरणात जवरे आणि इतर दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला बडतर्फ करण्याची मागणी मृतकाचे नातेवाईक आणि गावकरी करीत आहेत. 

विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांच्याकडून प्रकरणाची दखल 

दरम्यान, या गंभीर प्रकरणाची दखल विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी घेतली आहे. आज त्यांनी यासंदर्भात अमरावती परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांच्याशी चर्चा करीत प्रकरणाची माहिती घेतली. यात दोषींवर कठोर कारवाईचे आदेश त्यांनी पोलिसांना दिलेत. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

वंचितचा जाहीरनामा प्रकाशित; भाजपवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांनी केल्या ‘या’ घोषणा

वंचितचा जाहीरनामा प्रकाशित; भाजपवर निशाणा साधत प्रकाश आंबेडकरांनी केल्या ‘या’ घोषणा


Prakash Ambedkar अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच पक्षानी आपला जाहीरनामा प्रकाशित करत मतदारांना साद घातली आहे. अशातच आज वंचित बहुजन आघाडीनेही आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय. वंचितचे सर्वेसर्वा आणि  राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करत अनेक मुद्यांवर भाष्य केलंय.

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता एनआरसी (NRC) आणि सीएए (CAA) कायद्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हे कायदे पूर्णपणे असंवैधानिक आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे असे दाखवले जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळात ज्यांना पेंढारी म्हटले जात होते आणि आता ज्याला विजेएनटी (VJNT) आपण म्हणतो, त्यांच्यावर होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. भारतीय जनता पक्ष (BJP) इथल्या हिंदू मतदारांना फसवत असून एन आर सी (NRC) आणि सीएए (CAA) कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भासवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ते देशातल्या 20 टक्के हिंदू समाजाच्या विरोधात असल्याचेही या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

वंचितच्या जाहीरनाम्यात हे महत्वाचे मुद्दे

कंत्राटी कामगाराला 58 वर्षांपर्यंत निवृत्त करायचे नाही, असा धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा आणि हमीभावाच्या कायद्याचे कोणी उल्लंघन करेल त्याला आर्थिक शिक्षेबरोबरच गुन्हेगारी शिक्षा देखील असेल, असेही जाहिरनाम्यात नमूद करण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितलय. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशात जातात आणि त्याचा बोजा आपल्या अर्थव्यवस्थेवर येतो असे आम्ही मानतो. शिक्षण हे खासगी करून शिक्षण महर्षींनी कैदी केले आहे. या शिक्षण धोरणाला कैदेतून मुक्तता देत शिक्षणाबाबत सरकार आणि सार्वजनिक संस्था संमिश्र भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रात शिक्षणावर फक्त 3 टक्के तरतूद आहे. तर राज्यात 5 टक्के तरतूद आहे. शिक्षण ही सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. म्हणून त्याला 9 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात असल्याचेही  प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य

पुढे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक क्षेत्र हे देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. सध्या सार्वजनिक क्षेत्र विकण्याची प्रक्रिया चालली आहे. तिला आम्ही थांबवणार आहोत. त्याकरिता नवीन औद्योगिक धोरण आम्ही राबवणार आहोत. ज्यामुळे शेतीपूरक उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. आम्ही सत्तेत आल्यावर कापसाचा प्रती क्विंटल भाव किमान 9 हजार आणि सोयाबीनला 5 ते 6 हजार भाव दिला जाईल. शेतीला औद्योगिक दर्जा मिळावा या दृष्टीने आमचा जाहीरनामा सर्वसमावेशक आहे. ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण असले पाहिजे, ही मागणी देखील आम्ही करत आहोत. आम्ही सरकारमध्ये आल्यावर एस.सी, एस. टी यांना जे आरक्षण मिळत आहे त्या संदर्भातली स्पष्ट भूमिका घेणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

आमच्या विरोधात लढणारे जे उमेदवार आहेत त्यांच्या संदर्भातली माहिती आम्ही जाहीर करणार आहे. त्यावरून आपल्याला कळेल की त्या उमेदवाराचा समाज आम्ही का अधोरेखित केला आहे, हेही  आम्ही सांगणार असल्याचे  प्रकाश आंबेडकर म्हणाले. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, मिलिंद इंगळे, ॲड. नरेंद्र बेलसरे, सचिन शिराळे, पराग गवई आदी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

कोल्हेंचं हसणं म्हणजे दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्यासारखं; अमोल मिटकरींची बोचरी टीका

कोल्हेंचं हसणं म्हणजे दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्यासारखं; अमोल मिटकरींची बोचरी टीका


Amol Mitkari On Amol Kolhe : शरद पवारांनी (Sharad Pawar) सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) बाहेरून आलेल्या पवार संबोधल्याने मोठं राजकीय रणकंदन माजलंय. ज्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोललेत त्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर शरद पवारांच्या या वक्तव्यावर हसणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) जोरदार टीका केलीये. डॉ. कोल्हेंच्या हसण्याची तुलना त्यांनी दुर्योधन, दु:शासन आणि रावणाच्या हसण्याशी केलीय. डॉ. कोल्हे आपल्या आई आणि पत्नीवर असं वक्तव्य झाल्यावर असेच हसले असते का? असा सवाल त्यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. डॉ. कोल्हेंच्या या हसण्याचा बदला मतदानातून शिरूरची जनता नक्कीच घेणार असल्याचही अमोल मिटकरी म्हणालेय. शरद पवारांना असं विधान नक्कीच शोभणारं नसल्याचं ते म्हणालेय. 

त्या जागी तुमची आई, पत्नी असत्या तर…

हा वाद घरगुती जरी वाटत असला तरी शरद पवार यांनी जे वक्तव्य केलंय त्याचा सर्वच पक्षातून निषेध होत आहे. याबाबत आता स्वतः सुनेत्रा पवारांनी सांगितले आहे कि, पवार कुटुंबियांनी त्यांना सून म्हणून निवडलं. मात्र, बारामतीकरांनी त्यांना एक उमेदवार म्हणून निवडले आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहील. मात्र ही पत्रकार परिषद सुरू असताना खासदार पदावार असलेले डॉ. अमोल कोल्हे ज्या उन्मादात हसत होते हे बघता आम्हाला अमोल कोल्हेंनां असा प्रश्न विचारायचा आहे की त्या जागी तुमची आई, किंवा पत्नी असत्या तर ते अशाच प्रकारे हसले असते का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा हक्क आहे. कधीकाळी अजित पवारांच्या मदतीने अमोल कोल्हे त्या मतदारसंघातनं खासदार म्हणून निवडून आले आहेत. तेथील स्थानिकांना वाटलं असेल की खासदार बदलावा तर त्यात गैर काय, मात्र खासदार अमोल कोल्हे ज्या उन्मदातं हसले ते हास्य इतिहास कधीही विसरणार नसल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले. 

खान हाक मारितो हसरी

अशा पद्धतीने कुणावर हसणं हे अतिशय विकृतीच दर्शन घडवणारे असून ‘खान हाक मारितो हसरी’ हे पोवाड्यातील कवन खासदार अमोल कोल्हेंवर लिहिण्यात आले आहे का, याचा तपास केला पाहिजे. असे देखील अमोल मिटकरी म्हणाले. ज्याप्रमाणे दुर्योधन, दु:शासन आणि रावण हसले होते त्याच पद्धतीने हसण्याचा पाप कोल्हे यांनी केले आहे. कोल्हेंच्या प्रवृत्तीचे खरे दर्शन या निमित्ताने समोर आले आहे. मात्र याचा हिशेब सर्वसामान्य जनता त्यांच्याच मतदारसंघातून घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केलाय.

इतर महत्वाच्या बातम्या  

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp