गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने! तुषार गांधींच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांकडून उत्तर

गांधी-आंबेडकरांचे पणतू पुन्हा आमने-सामने! तुषार गांधींच्या टीकेला प्रकाश आंबेडकरांकडून उत्तर


Prakash Ambedkar On Tushar Gandhi : महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी  (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम( MIM) ही भाजपची (BJP) बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्यांना मतदान करू नका, असे आवाहन करत महात्मा गांधीचे पणतू तुषार गांधी (Tushar gandhi) यांनी वंचितवर हल्लाबोल केला आहे. त्यांच्या या खळबळजनक आरोंपाना आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनीही (Prakash Ambedkar) खरपूस समाचार घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

तुम्ही अलीकडे केलेले विधान अत्यंत चुकीचे, कोणताही आधार नसलेले आणि वंचित बहुजनांच्या राजकारणात अडथळा निर्माण करणारे आहेच, पण संसदीय लोकशाही आणि स्वतंत्र राजकीय नेतृत्वासाठीच्या प्रयत्नांना, तसेच वर्ग, जात आणि धर्माच्या पलीकडे जावून सुरू असलेल्या सर्वसमावेशक राजकारणालाही नाकारणारे असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणले आहेत. तुमच्या आजोबांची ब्रिटिशांविरुद्धची चळवळ सर्वसमावेशक होती, पण तुमचे विचार आणि राजकारणामध्ये तशी स्पष्टता दिसत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून सडेतोड उत्तर 

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर तुमच्याकडे राजकीय ज्ञान आणि समज नसेल, तर निरर्थक गोष्टी करण्यात आणि निराधार आरोप करण्यात तुमचा वेळ घालवू नका. काळच सत्य परिस्थिती समोर आणेल. खरं तर, आताच सगळे संकेत दिसत आहेत. पण, तुम्ही डोळे झाकल्यासारखे संदर्भहीन ज्याला काहीही आधार नाही, असे वक्तव्य करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करीत असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. तुषार गांधी यांची कानउघडणी करताना आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीसोबत कसा व्यवहार केला, हे तुम्हाला माहिती नाही का? त्यांचे राजकारण किती अलिप्त आहे, हे तुम्हाला माहीत नाही का? महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये झालेली तडजोड तुम्हाला माहिती नाही का? असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ब्रिटिशांविरुद्ध उभारलेला लढा सर्वसमावेशक होता, मात्र… 

तुषार गांधी यांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या अज्ञानातून आलेले आहे. तुषार गांधी यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की त्यांच्या आजोबांनी ब्रिटिशाविरुद्ध जो लढा उभारला होता, तो सर्वसमावेशक होता. मात्र, तुषार गांधी यांचे विचार हे सर्व-समावेशक असल्याचे दिसत नाही. भारतात असलेल्या संसदीय लोकशाहीने इथल्या शोषित, वंचित समूहाला त्यांचे राजकारण करण्याचा अधिकार दिला आहे. तसेच त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे. तो अधिकारास तुषार गांधी असे विधान करून नाकारत आहेत आणि प्रस्थापित पक्षाना मतदान करण्याचे आवाहन करत आहे. खरंतर तुषार गांधी भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करण्याचे सांगत आहेत.  मात्र, त्या महाविकास आघाडीतील पक्ष आणि त्यातील नेते हे कधी भाजपसोबत जातील याची कुठली शाश्वती नाही.

वंचित, बहुजनांचा राजकीय हक्क नाकारने हे अतिशय दुर्दैवी बाब

काल-परवापर्यंत भाजप विरुद्ध बोलणारे पक्ष प्रवक्ते आणि नेते हे भाजप आणि शिंदे सेनेमध्ये जाताना दिसत आहेत. त्यावर मात्र तुषार गांधी काहीही बोलताना दिसत नाही. तुम्ही जनतेला आश्वास्त करा की आम्ही भाजप सोबत जाणार नाही, अशी मागणी आम्ही महाविकास आघाडीकडे केली होती. परंतु या मागणीला एकाही पक्षाने दाद दिली नाही. ज्या पद्धतीने यांचे भाजपसोबत मिळून-मिसळून राजकारण सुरू आहे, हे पाहता ते कधीही भाजपसोबत जाऊ शकतात, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. असे असताना तुषार गांधी इथल्या शोषित, वंचित, बहुजनांचा राजकीय हक्क नाकारने हे अतिशय दुर्दैवी बाब आहे. मला असं वाटतं त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. तसेच आपण येथील स्थानिक वंचितांवर अन्याय तर करत नाहीये ना? हा विचारही त्यांनी केला पाहिजे आणि त्यानंतर आपली भूमिका ठरवली पाहिजे, असे आमचे ठराविक मत असल्याची प्रतिक्रिया वंचितचे प्रमुख प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

दहा वर्षात काय केल, आता मतदान का करायचं? गावकऱ्यांनी भाजप उमेदवाराला घेराव घालत थेट विचारला जाब

दहा वर्षात काय केल, आता मतदान का करायचं? गावकऱ्यांनी भाजप उमेदवाराला घेराव घालत थेट विचारला जाब


Akola Lok Sabha Constituency वाशिम : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने जोरदार तयारी केली असून प्रचार-प्रसार, सभा आणि मतदारसंघात मतदारांच्या गाठीभेटी सुरु आहेत. तर कधीही मतदारसंघात दिसून न येणारे लोकप्रतिनिधी आता मतदारांच्या दारात आल्याचे बघायला मिळत आहे. अशातच वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यामन खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे पुत्र अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आलीय.

मात्र, या लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय धोत्रे इतरवेळी मतदारसंघात फारसे दिसून न आल्याने त्याचे पुत्र आणि सध्याचे महायुतीतील भाजपचे (BJP) उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागतो आहे. आज प्रचारदरम्यान अनुप धोत्रे यांनी मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असतांना स्थानिक नागरिकांनी थेट सवाल करत दहा वर्षांत काय काम केलेत, याचा लेखाजोखा मागितला आहे. त्यामुळे मतदारसंघाचा रोष या निमित्याने चर्चेचा विषय बनला आहे.  

पुन्हा तुम्हाला का मत द्यायचं? 

अकोला-रिसोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र आणि भाजप लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी रिसोड आणि मालेगाव तालुक्यात प्रचार मोहीम हाती घेतली आहे. त्यांचे पिता संजय धोत्रे हे या भागाचे खासदार आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील होते. मात्र त्यांनी कायमच अकोला रिसोड लोकसभा मतदारसंघात रिसोड तालुका आणि मालेगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

परिणामी, आज प्रचारादरम्यान अनुप धोत्रे मतदारसंघात उपस्थित असताना स्थानिकांनी त्याच मुद्याला हात घालत आपला रोष व्यक्त केलाय. निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी आणि ठराविक गावांनाच निधी दिल्याची चर्चा मतदार संघात आहे. मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाहीत. रस्ते, रोजगार, आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड आणि मालेगाव तालुक्यात कायम आहेत. असे असताना आम्ही पुन्हा तुम्हाला का मत द्यायचं, असा प्रश्नही गावकऱ्यांनी विचारला आहे.  

घराणेशाहीवर बोलणाऱ्या पक्षाने काय वेगळं केलं? 

अकोला-रिसोड लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय धोत्रे यांची प्रकृती बरी नसल्याने भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारी मिळताच त्यांना प्रत्यक्ष प्रचाराचा मैदानात उतरावं लागलं. मात्र, वडिलांचा मतदारसंघात अकार्यक्षम कार्यकाळाचा रोष मतदारांनी त्यांना बोलून दाखवलाय. खासदार संजय धोत्रे यांनी मतदारसंघाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचे पुत्र अनुप धोत्रे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी दहा वर्षात काय केले? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता, त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे ? असा प्रश्न वजा जाब गावातील मदारांनी थेट उमेदवारांना विचारलाय.

याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. घराणेशाहीवर बोलणाऱ्या पक्षांनी पिता नंतर पुत्राना उमेदवारी देऊन घराणेशाही भाजप मध्ये नाही का, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आलाय. तर भाजप हे मतदारांना गृहीत धरते असा आरोपही नागरिकांकडून करण्यात आले आहे. असे असताना नवंउमेदवार अनुप धोत्रे मतदारांना कशा पद्धतीने विश्वासात घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट

सलग चौथ्या दिवशी विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी; ‘या’ जिल्ह्यांना आजही ऑरेंज अलर्ट


Vidarbha Weather Update: हवामान विभागानं (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यासह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) सलग चौथ्या दिवशी दमदार हजेरी लावली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून विदर्भात उष्णतेची लाट आल्याचे चित्र असतानाच आता अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार एन्ट्री केल्याने तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. तर ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच आजही विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

सलग चौथ्या दिवशी विदर्भात पावसाची हजेरी

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) दमदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. आजही अनेक भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain) नागपूर हवामान विभागाने वर्तवली होती, त्याप्रमाणे आज पहाटेपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. विदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली होती. त्यामुळे वातावरणात प्रचंड उकाडा वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, अलिकडे झालेल्या अवकाळी पावसामुळं वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांची उकडया पासून सुटका झाली आहे. तर दुसरीकडे या अवकळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना झाल्याचेही चित्र आहे. 

शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट, बाळापुर आणि लगतच्या तालूक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. तर पातुर तालुक्यातल्या मळसुर भागात गारपीटीसह जोरदार अवकाळी पाऊस पडला आहे. या गारपीट आणि अवकाळीमुळे आंबा, निंबू, टरबूज आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकळीने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. परिणामी या पिकांच्या नुकसानाची तात्काळ पाहणी आणि पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

किमान तापमानात मोठी घट 

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज विदर्भातील वाशिम, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये गारपीट, विजांचा कडकडाटासह, 30-60 प्रति तास सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर आज उर्वरित विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या, 13 एप्रिलला विदर्भला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भातील तापमानात देखील मोठे बदल झाले असून आज गोंदियातील कमाल तापमानाचा पारा 11. 5 अंशाने घसरून 28. 8 अंशांवर पोहचला आहे. तर नागपूर 14. 6 अंशाने घसरून 25. 8 अंशावर आले आहे. तर तिकडे वर्धा जिल्ह्याच्या पारा 12. 1 अंशाने घसरून 29. 01 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे वातावरणात कमालीचा गारवा अनुभवायला मिळत आहे. तसेच हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही हवामान विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

प्रचारसभांच्या प्रचारधडाडत असताना अवकाळी ढगाचाही गडगडात; विदर्भात ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

प्रचारसभांच्या प्रचारधडाडत असताना अवकाळी ढगाचाही गडगडात; विदर्भात ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 


Vidarbha Weather Update : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्याला पूर्व विदर्भापासून सुरुवात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षानी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली असून रोज अनेक सभा, बैठका आणि प्रचार-प्रचारांचा धुरळा सध्या विदर्भात अनुभवायला मिळतोय. अशात आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकाच आढवाड्यात सलग दुसऱ्यांदा विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर पाठोपाठ आज मोदींची नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील कन्हान येथे सभा पार पडणार आहे. असे असले तरी विदर्भात एकीकडे निवडणुकांच्या प्रचारसभांच्या तोफ धडाडत असताना, मध्येच अवकाळी ढगाचाही गडगडाट होतानाचे चित्र आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून(IMD) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. परिणामी, मोदींच्या या सभेवर पावसाचे सावट असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे. 

विदर्भात ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट 

नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने आज नागपूरसह विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरही पावसाचे सावट असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मंगळवारी, 9 एप्रिलला रात्रीच्या सुमारासही नागपूर शहरासह लगतच्या परिसरात जोरदार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा गडगडाट बघायला मिळाला.  हवामान विभागाने वर्तविल्या अंदाजानुसार, मंगळवारी दमदार पावसाने एंट्री केल्याने त्याचे काही परिणाम मोदींच्या सभास्थानी देखील दिसून आला आहे.

सभास्थळी साचले पावसाचे पाणी 

नागपुरातील कन्हान येथील मोदींच्या सभास्थानी गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. या परिसरात तीन डोम  उभारण्यात आले असून प्रत्येक डोममध्ये अनेक सेक्शनमध्ये खुर्च्या लावण्यात आले आहेत. मात्र दमदार पावसामुळे सखल भागातील काही सेक्शनमध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. तर खुर्च्यांवरही पावसाचं पाणी साचलेलं आहे. त्यामुळे सखल भागातील पाणी संध्याकाळच्या सभेपूर्वी सुकवणे किंवा बाजूला करणे हे मोठे आव्हान आता असणार आहे. दरम्यान, पोलिसांनी सभास्थान आणि अवतीभवतीच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावला असून काही कठोर नियमही आखून दिले आहेत.

पोलिसांकडून सभेसंदर्भात अनेक निर्बंध

रामटेक लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची आज कन्हान येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अनेक निर्बंध ही पोलिसांकडून लावण्यात आले आहे. कन्हान परिसरातील जड वाहतूक आज दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सभास्थानी कोणालाही काळे झेंडे, अथवा काळे फडके घेऊन येता येणार नाही. एवढेच नाही तर काळे कपडेही परिधान करून येण्यास पोलिसांनी मज्जाव केला आहे.

तसेच काळे कपडे परिधान करून येणाऱ्यांना परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. सभास्थानी जेवणाचे डबे आणि पिण्याच्या पाण्याची बॉटल घेऊन जाण्यासही मज्जाव असणार असून पिण्याच्या पाण्याची सोय सभास्थानी आयोजकांकडूनच केली जाणार आहे. सभा होत असलेल्या ब्रूक बॉण्ड कंपनीच्या परिसरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर राहणाऱ्या नागरिकांनी 8 तारखेपासूनच त्यांच्याकडे येणाऱ्या मित्र मंडळ आणि पाहुण्यांची माहिती पोलिसांना देण्यात आलीय. 

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..



Source link

विदर्भात अवकाळीसह गारपरीटीचा तडाखा, आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका 

विदर्भात अवकाळीसह गारपरीटीचा तडाखा, आंब्यासह लिंबू भाजीपाला पिकांना मोठा फटका 


Maharashtra Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात अवकाळी पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झालाय. तर काही भागात गापटीनं तडाखा दिलाय. विशेषत: विदर्भाच्या काही भागात अवकाळी झालाय. विदर्भातील अकोल्यासह (Akola) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झालीय. यामुळं शेती पिकांना मोठा फटका बसलाय. आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळं आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झालीय. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापुर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय.

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये आज विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या 4 तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

लातूर शहर आणि परिसरामध्ये जोरदार पाऊस

काही वेळापूर्वी लातूर शहर आणि परिसरामध्ये वातावरण ढगाळ झालं होतं. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झालीय. मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड उकाडा जाणवत होता. काही वेळापासून ढगाळ वातावरण तयार झाला आहे. पावसाच्या हलक्या सरीमुळं वातावरणात गारवा निर्माण झालाय. मागील काही दिवसापासून उकाड्यांना हैराण असलेल्या लातूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यानुसरा विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा शेती पिकांना चांगलाच फटका बसलाय.  

उष्णतेपासून काही प्रमाणात नागरिकांना दिलासा

दरम्यान, एका बाजूला राज्यात उन्हाचा चटका वाढला होता. बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा 40 अंशावर गेला होता. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 42 अंशाच्या आसपास गेला होता. त्यामुळं नागरिकांच्या अंगाची काहीली सुरु झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसानं हजेरी लावल्यामुळं उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. 

यंदा देशात चांगला पाऊस होणार

अशातच सर्वांसाठी एक खुषखबर आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याची शक्यता स्कायमेट या खासगी संस्थेनं वर्तवली आहे. देशात यंदा सरासरीच्या 102 टक्के सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच राज्याच्या अवर्षणग्रस्त भागातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. सध्या एल निनो कमरोज होत आहे आणि ला निनाची परिस्थिती निर्माण होतेय. त्यामुळं पावसासाठी हे चांगले संकेत मानले जातायेत. 

महत्वाच्या बातम्या:

Monsoon : यंदाचा मान्सून कसा असेल? काही राज्यांमध्ये कमी पावसाची शक्यता; स्कायमेटचा अंदाज वाचा सविस्तर…

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp