विधानसभा अध्यक्षच मॅनेज, आमदाराचा आरोप; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना

विधानसभा अध्यक्षच मॅनेज, आमदाराचा आरोप; शरीरसुखाची मागणी करणाऱ्यांविरुद्ध लक्षवेधी मांडू देईना


Nitin Deshmukh अकोला : अकोल्यातल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यलयात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचे ठिय्या आंदोलन सुरुये. गेल्या 2 तासापासून आमदार देशमुख यांचं ठिय्या आंदोलन सुरुये. मूर्तिजापूर येथील जीवन प्राधिकरण कार्यलयातील कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर महिलेला कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी शरीर सुखाची मागणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुर्तिजापूर उपविभागीय अधिकारी डि.बी कपिले आणि शाखा अभियंता राजेंद्र इंगळे असे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची नावे आहे. दरम्यान, या दोघांनाही पदावरून बडतर्फ करण्यात यावं, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आमदार नितीन देशमुख यांच ठिय्या आंदोलन सुरू आहे.

विधानसभा अध्यक्ष मॅनेज झालेत : आमदार नितीन देशमुख 

दरम्यान, या लक्षवेधीसाठी विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली होती, मात्र या संपूर्ण प्रकारणात लक्षवेधी न होण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष मॅनेज झाले असावे, कारण, असे आरोपी असलेले अधिकारीच सांगत असल्याचं स्पष्टपणे देशमुख म्हणालेय. अध्यक्षांनी लक्षवेधी जाणीवपूर्वक न घेतल्याने आपण आज अधिवेशनाला हजर न राहता आज एका बहिणीच्या न्यायासाठी अकोल्यात ठिय्या आंदोलन केल्याचं ते म्हणालेय. 

मुर्तीजापुर मतदारसंघाच्या आमदाराचे पाठबळ,  पिडीत महिलेचा आरोप

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महिला कम्प्युटर ऑपरेटर हिने ज्यांच्यावर आरोप केलेत त्या कपिले यांच्यामागे मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदाराचे पाठबळ असल्याचा आरोप केलाय. आपल्याला वारंवार तक्रारी करूनही पैशांमुळे कुठेच न्याय मिळाला नसल्याचा आरोप पिडीत महिलेने केलाय. 

विधानपरिषदेत आज मध्ये महत्वाचे काय?

1) पंडिता रमाबाई मुक्ती मिशन तालुका दौंड या संस्थेमध्ये गरीब असह्य मुली महिला यांच्या करिता सेवेच्या नावाखाली ख्रिच्छन धर्मामध्ये धर्मांतर केली जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी आमदार उमा खापरे यांनी लक्षवेधले आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आहे 

2) राज्यातील गोवंशीय प्राण्यांच्या कत्तलीस, विक्रीस, वाहतुकीस बंदी असून देखील अनधिकृत पणे वाहतूक होत असल्याची बाब उघडकीस अली आहे. नुकतीच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 56 हजार किलो गोमांस घेऊन जाणारे दोन कंटेनर जप्त करण्यात आले होते. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दररोज 20 ते 25 टन गोमांस विक्री तेलंगणा येथे होत असल्याची बाब समोर आली आहे. सातत्याने उघडकीस येणाऱ्या या घटना पाहता अशा गुन्हे करणाऱ्या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी तसेच गो तस्करी रोखण्यासाठी स्वतंत्र कडक कायदा हिवाळी अधिवेशनात करावा अशी मागणी आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे. 

3) मुंबईतील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या कमी आहे.पुरुषांसाठी असलेल्या एका सामुदायिक शौचालयाचा वापर 86  पुरुष करत आहे तर स्त्रियांसाठी असलेल्या एका शौचालय हे 81 महिला वापरत आहेत. मुंबईतील ह्या सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे आमदार सुनील शिंदे आणि प्रसाद लाड यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.

4) राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी एकाही जिल्हा नियोजन समितीला मागील तीन महिन्यांपासून निधी मिळाला नाही. याकडे नियम 93 अन्वये आमदार अरुण लाड लक्ष वेधतील 

5) मुंबईतील कबुतर खाणे बंद केल्यानंतर कबुतर निवासी इमारतीमध्ये आश्रय घेण्याची शक्यता असल्याने त्यांना विजनवासात सोडण्याबाबत ठोस उपाययोजना हाती घेण्यात बाबत नियम 93 अन्वये आमदार सुनील शिंदे निवेदन करतील.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

अबब..! चक्क 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; चिखदऱ्यात पर्यटकांची तूफान गर्दी

अबब..! चक्क 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; चिखदऱ्यात पर्यटकांची तूफान गर्दी



Chikhaldara :अबब..! चक्क 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; चिखदऱ्यात पर्यटकांची तूफान गर्दी



Source link

‘एबीपी माझा’च्या बातमीचा दणका! दारू पिऊन बस चालवणाऱ्या अकोट आगारमधील चालक अन् वाहकाचं निलंबन, र

‘एबीपी माझा’च्या बातमीचा दणका! दारू पिऊन बस चालवणाऱ्या अकोट आगारमधील चालक अन् वाहकाचं निलंबन, र


पंढरपूर: पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना समोर आली होती. या प्रकारामुळं 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू होता. अकोला जिल्ह्यातील अकोट आगाराच्या दारू पिऊन बस चालविणाऱ्या चालक आणि वाहकाचे निलंबन करण्यात आले आहे. ‘एबीपी माझा’च्या बातमीनंतर हा  दणका देण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागीय नियंत्रकांने ही कारवाई केली आहे.

 पंढरपूरवरून वारकऱ्यांना घेऊन बस अकोटकडे येत असताना बीड,-अंबड मार्गावर चालक आणि वाहक दारूच्या नशेत धुंद झाले होते. बसमध्ये दोन लहान मुलांसह होते 37 प्रवासी प्रवास करत होते. दारूचे अति सेवन केल्यामुळे चालक आणि वाहकाला बसचं नियंत्रण करण्यात अडचणी येत होत्या. चालक संतोष रहाटे आणि वाहक मनीष झालटे यांचं निलंबित करण्यात आलं आहे. चौकशी अहवालात दोघांनीही दारूचे सेवन केल्याचे उघड झाल्यानंतर दोघांवरही बडतर्फीच्या कारवाईची शक्यता वर्तवली होती. या धक्कादायक प्रकाराची बातमी ‘एबीपी माझा’ने काल दाखवली होती.

37 प्रवाशांचा जीव धोक्यात

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पिऊन असल्याचे निदर्शनास आले होते. यावेळी बसमध्ये 37 प्रवाशी प्रवास करत असून या साऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशातच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र एकीकडे राज्यात होणारे अपघात आणि त्यात नाहक बळी पडणाऱ्या घटना लक्ष्यात घेता बस चालकाचा असा बेजबाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभाग या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालक व वाहकाने दारूच्या नशेत सेवा बजावल्याचा धक्कादायक प्रकार अकोट आगाराच्या बसमध्ये समोर आला आहे. MH-14-6140 क्रमांकाची एसटी बस गुरुवारी दुपारी पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत असताना हा प्रकार उघडकीस आला. मिळालेल्या माहितीनुसार, चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे दोघेही या बसमध्ये ड्युटीवर होते. दुपारी 4 वाजता बस पंढरपूरहून निघाली, त्यामध्ये एकूण 37 प्रवासी होते. त्यात महिला, पुरुष तसेच दोन लहान मुलांचाही समावेश होता. बसने प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळातच प्रवाशांना चालक आणि वाहकच्या वागणुकीत काहीतरी गडबड असल्याची शंका आली. त्यांचा दारूच्या नशेत असल्याचा संशय प्रवाशांनी व्यक्त केला आणि हा प्रकार पुढे आला

 

 

आणखी वाचा



Source link

धक्कादायक! चक्क दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात, कारवाईकडे लक्ष

धक्कादायक! चक्क दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा प्रकार; प्रवाशांचा जीव धोक्यात, कारवाईकडे लक्ष


Akola News: पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक आणि वाहकाने चक्क दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घटना घडलीय. या प्रकारामुळ 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी संताप व्यक्त करत रोष व्यक्त केला. दरम्यान, यातील संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस आणि एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.

37 प्रवाशांचा जीव धोक्यात, परिवहन विभागाच्या कारवाईकडे लक्ष

पुढे आलेल्या माहितीनुसार, अकोट आगाराची एमएच-14-6140 क्रमांकाची ही बस असून ही बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. यातील चालक संतोष रहाटे आणि वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान हे दोघे दारू पिऊन असल्याचे निदर्शनात आले. यावेळी बसमध्ये 37 प्रवाशी प्रवास करत असून या साऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. अशातच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र एकीकडे राज्यात होणारे अपघात आणि त्यात नाहक बळी पडणाऱ्या घटना लक्ष्यात घेता बस चालकाचा असा बेजवाबदारपणा समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर संबंधित विभाग या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

केडीएमटीच्या एसी बसेस बंद! प्रवाशांचा “गारेगार” प्रवास थांबला 

वातानुकुलीत गारेगार प्रवासाचे गाजर दाखवणाऱ्या केडीएमटी कडून  प्रत्यक्षात प्रवाशाच्या पदरात उपेक्षित प्रवासच पाडण्यात आलाय . डोंबिवली आणि कल्याणमध्ये धावणाऱ्या केडीएमटीच्या अत्याधुनिक एसी बसेस ‘नो विमा, नो पासिंग’ या कारणांनी अचानक गायब झाल्या असून प्रवाशांना पुन्हा एकदा रिक्षा चालकांच्या लुटमारीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे नवी मुंबई, ठाणे परिवहनच्या एसी बसेस नियमित कल्याण डोंबिवलीत सेवा देत असताना केडीएमटीला मात्र आपल्या सेवा सुधारण्याबाबत उदासीन असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशनअंतर्गत तब्बल ९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून २०७ इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदीचा डंका कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून पिटण्यात आला होता. कल्याण डोंबिवली महापालिकेची परिवहन सेवा सुधारण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा मिशन उपक्रमातून 207 इलेक्ट्रिक एसी बसेस खरेदी करण्यासाठी 99 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या निधीतून केडीएमटीने मे कॉसीस मोबलिटी सर्व्हिसेस आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंत्राटदाराची नियुक्ती करत त्यांच्या माध्यमातून मोठ्या मिडी आणि मिनी अशा 207 बसेसची खरेदी करून चालविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जर्मनी बनावटीच्या अत्याधुनिक युरो बसेस शहरात प्रवाशांना गारेगार सेवा देणार असल्याचे स्वप्न यावेळी परिवहन विभागाकडून दाखविण्यात आले होते.

मात्र प्रत्यक्षात या कंपनीची बसेस निर्मितीची क्षमताच नसल्याने पहिल्या 10 बसेस बनवतानाच कंपनीला घाम फुटला पुढील बसेस तयार करण्यास असमर्थता दाखवत कंपनीने कशाबशा 8 बसेस अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुरवल्या. कोसिस मोबिलिटी आणि बुथेलो प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांकडे एसी बसचा ठेका दिला, पण त्यांची तितकी निर्मिती क्षमत नसल्याने केडीएमटी प्रशासन पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे . जर्मनी बनावटीच्या युरो टेक्नॉलॉजी बस कल्याण-डोंबिवलीत दाखल होणार, प्रवाशांना गारेगार सेवा मिळणार असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते  . पण प्रत्यक्षात प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली . केडीएमटीच्या ताफ्यातकेवळ 8 बस अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दाखल झाल्या. त्यापैकी 4 बस काही महिन्यांतच बंद पडल्या आणि उर्वरित 4 बस विमा नुतनीकरणाच्या फेऱ्यात अडकून शेवटी आगारात उभ्या आहेत.आता सुटे भाग मिळत नाही, विमा भरलेला नाही, बस थांबल्या आहेत अशी कारणे  सांगत जबाबदारी एकमेकांवर ढकलली जाते.

याबाबत केडीएमसीच्या परिवहन विभागाकडून मात्र “एसी बस कंत्राटदाराच्या माध्यमातून चालवल्या जात असून बस पासिंग, विमा, पीयूसी यासारख्या गोष्टीची पूर्तता त्यानेच करायची असून विमा पॉलिसी नूतनीकरण करून घेण्याबाबत त्याला कळविण्यात आले आहे. लवकरच नुतनीकरण करून या बसेस रस्त्यावर उतरतील” असे स्पष्ट केले. 

आणखी वाचा



Source link

दिव्याखालीच अंधार, बच्चू कडूंच्या प्रहारची कोंडी;  जिल्हाध्यक्षावर ज्वारी भ्रष्टाचाराचा आरोप

दिव्याखालीच अंधार, बच्चू कडूंच्या प्रहारची कोंडी; जिल्हाध्यक्षावर ज्वारी भ्रष्टाचाराचा आरोप


Akola News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रहारचे नेते बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu) उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून निघालाय. मात्र, बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्यामूळे पक्ष अडचणीत आलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट बाजार समितीच्या (Akot Market Committee) ज्वारी खरेदीत वसु यांच्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत या घोटाळ्यावर लक्ष वेधलंय आणि त्यानंतर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केलीय. त्यामुळे एकीकडे पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी सरकारला धारेवर धरत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील पदाधिकार्‍यावर फसवणूक केल्याचा आरोप होत असल्याने  बच्चू कडूंच्या पक्षाची कोंडी झाली असल्याचे बोललं जात आहे.

ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार, वंचितच्या नेत्याची तक्रार

अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली आहे ती ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या आरोपामुळे. हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी करण्यात आलेला बनावट व्यवहार या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि या सगळ्याचा थेट संबंध प्रहार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी जोडला जात आहे. या घोटाळ्यात संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या संस्थेचं नाव समोर आलंय. ही संस्था आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि या ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ आणि कुलदीप वसु अध्यक्ष असलेल्या संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती. यात संत श्री नरसिंग महाराज फार्मर्स प्रोडूसर कंपनीकडे जवळपास 1100 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर खरेदी-विक्री संघाकडे 1200च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती. यात वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून 180च्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप होतोय. अकोट तालुक्यातील जळगाव नहाटेच्या रामेश्वर साबळे यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली. मात्र त्यांचा नंबर लवकर न लागल्यामुळे त्यांना आपली ज्वारी कमी व्हावा व्यापाऱ्याला विकावी लागलीय. अन् हक्काच्या 3500च्या हमीभावावर त्यांना पाणी सोडावं लागलंय.

ज्वारीचा पेराच न केलेल्या शेतकऱ्यांचा सात-बारा वापरायचा. त्यावरील पेरे पत्रकावर फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा‌. ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून पंधराशे ते 2000 अशा कमी भावात ज्वारी खरेदी करायची आणि हिच ज्वारी शासनाला 3500 या हमीभावाने विकायची, अशी ही मोड्स ऑप्रेंडी असल्याचा आरोप होतोय. 

 दरम्यान, या प्रकरणी विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावर थेट आवाज उठवलाय. यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी चौकशीची घोषणा देखील केलीये.

काय सांगते आकडेवारी? 

– तब्बल 5,1,27क्विंटल ज्वारी खरेदी
– शेतकऱ्यांकडून 1500-2000 रुपये दराने ज्वारी खरेदी.
– सरकारकडे विक्री 3500 च्या हमीभावाने
– सरळसरळ लाखो रुपयांचा गैरव्यवहार!

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा



Source link

कापूस खरेदी घोटाळ्याची SIT चौकशी होणार, दोन हजार कोटींहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

कापूस खरेदी घोटाळ्याची SIT चौकशी होणार, दोन हजार कोटींहून अधिक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप


अकोला : राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक, दलालांचे राजकारण, बाजार समित्यांतील व्यवस्थेचा बळी ठरणारा सामान्य शेतकरी. हे चित्र आज नवीन नाही. पण जेव्हा हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा ठरतो, तेव्हा केवळ बातमी नसते, ती जाब विचारण्याची ठिणगी बनते. आता या ठिणगीनेच आता सरकारला हलवलं आहे. ‘एबीपी माझा’ने उघड केलेल्या कापूस खरेदीतील महाघोटाळ्याची SIT चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी ही घोषणा विधान परिषदेत केली. हा निर्णय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या लक्षवेधीवर घेण्यात आला.

Cotton Purchase APMC Scam : काय आहे हा घोटाळा?

राज्यातील भारतीय कापूस महामंडळ (CCI) मार्फत शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत दराने कापूस खरेदी केली जाते. ही खरेदी बाजार समित्यांच्या सहकार्याने होते. मात्र, कापसाच्या खरेदीपासून रुईच्या प्रेसिंगपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे धक्कादायक वास्तव ‘ABP माझा’ने मार्च महिन्यात समोर आणले.

अंदाजे 2000 कोटी रुपयांहून अधिक घोटाळ्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, फक्त अकोट बाजार समितीमध्ये सुमारे 50 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

असा झाला घोटाळा आकडे स्पष्ट बोलतात.

– एक क्विंटल कापसात प्रत्यक्ष रुईचे प्रमाण – 38 किलो

– सीसीआयने स्वीकारलेले प्रमाण – 32.5 किलो

– अफरातफर प्रमाण – 5.5 किलो

– एका किलो रुईची किंमत – 155 रुपये

– प्रती क्विंटल अफरातफर – 852 रुपये

– एक गाठी तयार होण्यासाठी लागणारा कापूस – 5 क्विंटल

– एका गाठीमागे अफरातफर – 4,262 रुपये

एकट्या अकोटमध्येच 55,000 गाठींचे काम झाले. राज्यात एकूण 46 लाख गाठींची प्रक्रिया झाली. म्हणजेच, हजारो शेतकऱ्यांचा घाम चक्क दलालांच्या तिजोरीत ओतला गेला.

भ्रष्टाचारात कुणाचा सहभाग असल्याचा आरोप

– CCI मधील काही अधिकारी

– जिनिंग धारक

– व्यापारी व दलाल

– बाजार समित्यांतील पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग

– विविध केंद्रांवरचे संशयास्पद व्यवहार

हिवरखेड, चौहोट्टा बाजार, राजुरा आदी केंद्रांवर देखील अशाच प्रकारच्या अफरातफरीच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी बाजार समित्यांकडून नोंदणी न करताच बिलं तयार करण्यात आली. CCI ची खरेदी बंद असतानाही बिले तयार करण्यात आल्याचे आरोप आहेत.

तक्रारकर्ते आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी यासंदर्भात सरकारकडे पत्र लिहिलं होतं. प्रत्यक्ष प्रमाणाच्या तफावतीसह, नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी, रेकॉर्ड्सचा अभाव, आणि बिलांच्या बनावट नोंदी याकडे लक्ष वेधलं आहे.

आमदार अमोल मिटकरींनी विचारला सरकारला जाब

राज्याच्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट सरकारवर निशाणा साधला. शेतकरी हिताच्या असलेल्या महायुती सरकारच्या काळातच सरकारी यंत्रणेकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. प्रशासनातील काही भ्रष्ट लोकांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्यास परखड मत आमदार मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. ही केवळ आर्थिक बाब नाही, हा शेतकऱ्याच्या श्रमांवरचा घाला आहे, असं म्हणत त्यांनी SIT चौकशीची मागणी केली आणि सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडलं.

यामुळे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रवीण फडणवीस, अमरावती जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, अकोला जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, जिल्हा विपणन अधिकारी मारोती काकडे आणि अकोटच्या तालुका सहायक निबंधक सहकारी संस्था श्रीमती रोहिणी विटणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारी खरेदीतही अनियमितता

अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 5000 क्विंटल ज्वारी खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. काही खासगी कंपन्यांना शेतकरी दर्शवून सरकारी योजनांचा लाभ घेतला गेल्याचा आरोप आहे. ही चौकशीही SITमार्फतच होणार आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्वारी खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी अकोट तालुका खरेदी विक्री संघ, संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांसह इतरांच्या सहभागाची चौकशी होणार आहे.

Akola APMC Scam : आता पुढे काय?

SIT चौकशीचा निर्णय झाला असला, तरी हजारो शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, हे अजून अनिश्चित आहे. पणन व सहकार विभागाचे काही अधिकारी आता कारवाईच्या रडारवर आले आहेत. पण या चौकशीतून फक्त दोषी सापडतील की संपूर्ण व्यवस्था सुधारली जाईल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ही केवळ भ्रष्टाचाराची बातमी नाही.‌ तरीही शेतकऱ्यांच्या घामाने फुलवलेल्या कापसाच्या भरवशावर चाललेली अफरातफर आहे.

‘एबीपी माझा’च्या पत्रकारितेचा हा प्रभाव, शासनालाही जबाबदारीची जाणीव करून देत आहे. असाच आग्रह राहिला, तरच व्यवस्था सुधारेल आणि शेतकरी सन्मानाने उभा राहील. ‘एबीपी माझा’च्या पत्रकारितेचा कायम हाच आग्रह राहिला आहे आणि राहणार आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link