Vanchit Bahujan Aghadi On Abhay Patil: अकोल्यातील काँग्रेस उमेदवार अभय पाटलांवर वंचितचा गंभीर आरोप

Vanchit Bahujan Aghadi On Abhay Patil: अकोल्यातील काँग्रेस उमेदवार अभय पाटलांवर वंचितचा गंभीर आरोप


Vanchit Bahujan Aghadi On Abhay Patil: अकोल्यातील काँग्रेस उमेदवार अभय पाटलांवर वंचितचा गंभीर आरोप अकोल्यातून काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल, अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि नारायणराव गव्हाणकर यांच्यात चौरंगी सामना.



Source link

अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य

अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील; नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य


Nana Patole : अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, पण निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. त्यानंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी सारवासारव करीत संजय धोत्रे हे माझे मित्र असल्याचे सांगितले. नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अकोल्यात नाना पटोले आले असता त्यांनी हे वक्तव्य केले.

नाना पटोले म्हणाले की, सावित्रीबाई फुलेंचा कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) अपमान केला. एका मंत्र्यांच्या तोंडावर शाई फेकल्यावर पोलिसांना निलंबित केले गेले. हे लोक असेच करू शकतात. मी 2014 ते 2017 सालापर्यंत खासदार होतो. त्याकाळात नोटबंदी (Demonetisation) आणि जीएसटी (GST) आली, त्यावेळेस मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Prime Minister Narendra Modi) विरोध केला. 

अकोल्याचे खासदार व्हेंटिलेटरवर 

त्यावेळी अकोल्याचे (Akola) खासदार देखील होते. ते आता व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. व्हेंटिलेटर केव्हा काढतील मला माहिती नाही. पण निवडणुकीतच (Lok Sabha Election 2024) त्यांचा व्हेंटिलेटरवर काढतील, असे वादग्रस्त विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केले आहे.  त्यावेळेस  मी सर्व खासदारांसोबत नोटबंदी आणि जीएसटीचा प्रश्न उपस्थित केला आणि सांगितले की, यातून तुम्ही लोकांचा पैसा घेणार आणि मुठभर लोकांकडे पोहोचवणार. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr Babasaheb Ambedkar) आर्थिक धोरण बदलवले जात आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. मात्र त्यानंतर नाना पटोले यांनी संजय धोत्रे (Sanjay Dhotre) हे माझे मित्र असल्याचे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण?

डॉ. अभय पाटलांची (Dr Abhay Patil) उमेदवारी मागे घेणार आहेत, अशी हवा अकोल्यात उडवण्यात आली. 400 पार नाही 420 करायची आहे. आंबेडकरांनी शिरूरमध्ये दिलेल्या उमेदवाराचे आडनाव चुकीचे आहे. मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबासाहेबांनी एका मिनिटात राजीनामा दिला. मग बाबासाहेबांचा खरा अनुयायी कोण? असा सवालही नाना पटोले यांनी यावेळी उपस्थित केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Anandraj Ambedkar: आनंदराज आंबेडकरांनी वंचितला रोखठोक भाषेत सुनावलं, पाठिंबा धुडकावत अमरावती लोकसभेच्या रिंगणातून माघार

पाटील-निंबाळकर घराण्यात पुन्हा संघर्ष पेटणार, ओमराजेंशी दोन हात करण्यासाठी अर्चना पाटलांच्या मनगटावर घड्याळ

अधिक पाहा..



Source link

भाषण सुरु असताना फडणवीस अचानक म्हणाले, ‘पवारसाहेब आपल्या पाठिशी’; अकोल्यात नेमकं काय घडलं?

भाषण सुरु असताना फडणवीस अचानक म्हणाले, ‘पवारसाहेब आपल्या पाठिशी’; अकोल्यात नेमकं काय घडलं?


अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पवार साहेब आपल्या पाठिशी आहेत, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अकोल्यातील भाषणात केले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून क्षणभरासाठी उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. देवेंद्र फडणवीस यांनी उल्लेख केलेले पवार साहेब म्हणजे कोण, अशी शंका अनेकांच्या मनात निर्माण झाली. परंतु देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ या गोष्टीचा खुलासा करत पवार साहेब म्हणजे अजित पवार, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

महायुतीचे अकोल्यातील लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या प्रचारासाठी बुधवारी अकोल्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात देशात पुन्हा पंतप्रधान मोदींची सत्ता आली पाहिजे, असे म्हटले. विरोधक मोदीजींना पंतप्रधान करण्यास नकार देत असतील तर मग तुम्ही सांगा तुम्हाला पंतप्रधान म्हणून कोण हवंय? या देशाचा विकास कोण करु शकते?, असा सवाल फडणवीस यांनी विचारला.

मोदींमुळे चीन आणि पाकिस्तान आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही: देवेंद्र फडणवीस

देश तर सोडा पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैश्विक स्तरावर आपली प्रतिमा निर्माण केली आहे. पाकिस्तान आणि चीन हे देश भारताकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाहीत. असा मजबूत भारत पंतप्रधान मोदी यांनी निर्माण केला आहे. आज चंद्रावर आपलं यान उतरलं आहे, आपण सूर्याला गवसणी घातली आहे. कालपर्यंत प्रगत देशांना जे जमत होतं, ते भारतालाही जमू लागले आहे. इतर देश म्हणत आहेत की, आता भारताशिवाय जगाची कल्पना करता येणे शक्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी भारताला या स्तरावर नेऊन ठेवले आहे. त्यामुळे आपल्या पंतप्रधान मोदींच्या बाजूने उभे राहायचे आहे, असे फडणवीसांनी म्हटले.

लोकांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतली पाहिजे. आपल्या अनुपला दिल्लीला पाठवा. अनुप दिल्लीत आला की, आम्ही सगळे त्याच्या पाठिशी आहोत. शिंदे साहेब असतील, आमचे पवार साहेब असतील, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. पवार साहेब म्हणजे कन्फ्युजन नको, पवार साहेब म्हणजे अजितदादा, असे फडणवीस यांनी म्हटले. आमचे महायुतीचे नेते अनुपच्या पाठिशी आहेत, आम्ही अनुपला विकासात मदत करु. मी विश्वासाने सांगतो की, आमच्या संजयभाऊंनी 15 वर्षे विकास केला, पण अनुप हा रेकॉर्ड तोडेल. बापापेक्षा बेटा सवाई निघेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

मी पुन्हा अडीच वर्षांनी आलो, पण दोन पक्ष फोडून आलो, जगाला उत्तर द्यावं लागतं : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..



Source link

Anup Dhotre : अकोल्यात शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Anup Dhotre : अकोल्यात शक्तिप्रदर्शन करत भाजपच्या अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल


Anup Dhotre : अकोल्यात शक्तिप्रदर्शन करत भाजपचे धोत्रे उमेदवारी अर्ज दाखल 
अकोला लोकसभेसाठी भाजप उमेदवार अनुप धोत्रेंचा उमेदवारी अर्ज दाखल, यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राधाकृष्ण विखेपाटलांह अन्य नेते आण पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. 



Source link

Anup Dhotre Akola : अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार

Anup Dhotre Akola : अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार


Anup Dhotre Akola : अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार
अकोल्यात भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे लोकसभेसाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अकोला, वाशिम जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असणार आहेत.



Source link

Akola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत !

Akola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत !


Akola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत ! अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील अशी तिरंगी लढत, अकोल्यात डॉ. अभय पाटीलच विजयी होणार, ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांचं वक्तव्य. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp