मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच

मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच


अकोला: प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर आणि नागपूर या दोन लोकसबा मतदारसंघांमध्ये पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाकडून अकोल्यात उमेदवार दिला जाणार नाही, या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. कारण, काँग्रेस पक्षाकडून सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत अकोल्याचा (Akola Loksabha) समावेश आहे. काँग्रेसने अकोल्यातून डॉ. अभय काशिनाथ पाटील (Abhay Patil) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे आता अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे वि. वंचितचे प्रकाश आंबेडकर वि. काँग्रेसचे अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्याविरोधात अकोल्यातून उमेदवार दिल्याने वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये याविषयी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. 

आज सकाळपर्यंत काँग्रेस पक्ष अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, अशी चर्चा होती. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही 7 जागांवर पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली होती. त्याची परतफेड म्हणून काँग्रेस पक्ष अकोल्यातून त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नाही, असा अंदाज होता. प्रकाश आंबेडकर यांनी आपण अकोल्यात काँग्रेसचा पाठिंबा मागितला नसल्याचे अगोदरच स्पष्ट केले होते. परंतु, महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी हायकमांडकडे केली होती. परंतु, हायकमांडने ही मागणी मान्य केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अकोल्याच्या रिंगणात प्रकाश आंबेडकर विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगताना पाहायला मिळेल.

 

अकोल्यात काँग्रेसचा ट्रॅक रेकॉर्ड निराशाजनक

काही दिवसांपूर्वीच डॉ. अभय पाटील यांनी आपल्याला अकोल्यातून काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. आपण 4 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. परंतु, काँग्रेसकडून अकोल्याचा उमेदवार जाहीर केला जाणार की नाही, याबाबत साशंकता कायम होती. परंतु, दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचा प्रचार सुरू केला होता.

काँग्रेस पक्षाने अकोल्यातून अभय पाटील यांना रिंगणात उतरवले असले तरी या मतदारसंघातील काँग्रेसची गेल्या काही वर्षांतील कामगिरी फारच निराशाजनक आहे. 1989 सालापर्यंत अकोला मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1984 साली मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता. त्यानंतर काँग्रेसला एकाही निवडणुकीत अकोल्यात विजय मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे भाजपच्या अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

राजकारणात लवकरच मोठा ट्विस्ट, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता? पडद्यामागे हालचाली!

अधिक पाहा..





Source link

राजकारणात लवकरच मोठा ट्विस्ट, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता? पडद्यामागे हालचाली!

राजकारणात लवकरच मोठा ट्विस्ट, प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता? पडद्यामागे हालचाली!


मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा ट्विट्स येण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीची स्थापना होऊ शकलेली नाही. मात्र मविआचा (MVA) भाग नसला तरी काँग्रेस वंचितला (VBA) अकोल्यात (Akola) पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे या जागेवरून काँग्रेस (Congress) आंबेडकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्याबाबत पडद्यामागे हालचाली होत आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत यावर चर्चा केली जात आहे.  

काँग्रेस आंबेडकरांना पाठिंबा देण्याची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला अकोल्यात पाठिंबा देऊ शकते. या जागेवर वंचितकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे  या जागेवर आंबेडकरांना पाठिंबा देण्याचा विचार काँग्रेसकडून केला जातोय. वंचितला महाविकास आघाडीत सामावून घेण्याचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे. मात्र तरीदेखील प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला कोणत्याही 7 जागांवर पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळेच आता काँग्रेसदेखील आंबेडकरांना अकोल्यातून पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

नाना पटोले आंबेडकरांना 5 जागांची यादी देणार

प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात आम्ही तुम्हाला कोणत्याही सात जागांवर पाठिंबा देण्यासाठी तयार आहोत, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आंबेडकरांनी नागपूर आणि कोल्हापूर या दोन जागांसाठी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर केला होता. आणखी कोणत्या पाच जागांवर आम्ही पाठिंबा द्यावा हे काँग्रेसने सांगावे असे आंबेडकर म्हणाले होते. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उर्वरित पाच जागांची यादी प्रकाश आंबेडकरांना देण्याची शक्यता आहे. 

सात जागांच्या बादल्यात आंबेडकरांना अकोल्यातून पाठिंबा

या सात जागांच्या बदल्यात काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी तशी मागणी काँग्रेसच्या हायकमांकडे केली आहे. तशी माहिती काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. हायकमांडने ही मागणी केल्यास काँग्रेस अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना बळ पुरवू शकते. 

वंचितने जाहीर केले 20 उमेदवार 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र या प्रयत्नांना अपयश आल्याचं दिसतंय. प्रकाश आंबेडकरांनी एकूण 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत. त्यामुळे आता वंचित ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार, हे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा >>

सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेटस, पवारांच्या फोटोसोबत हार्ट इमोजी! म्हणतात ‘कितीबी समोर येऊदे….’

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी: अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांविरोधात उमेदवार रिंगणात उतरवलाच

मोठी बातमी: अकोला लोकसभेच्या रिंगणात काँग्रेसची एन्ट्री, डॉ. अभय पाटलांना उमेदवारी; प्रकाश आंबेडकर काय करणार?


अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरुन झाले असले तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून आतापर्यंत वाद नसलेल्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. परंतु, अंतिम जागावाटपाचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. अशातच आता काँग्रेसने (Congress) अकोला लोकसभा मतदारसंघातून (Akola Loksabha) उमेदवार रिंगणात उतरवण्याचे ठरवले आहे. 

काँग्रेसची उमेदवारी डॉ. अभय पाटील यांना देण्याबाबत काँग्रेस संसदीय मंडळाकडून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या निर्णयावर स्वत: डॉ. अभय पाटील यांनी ‘एबीपी माझा’सोबत बोलताना दुजोरा दिला.  4 एप्रिल रोजी डॉ. अभय पाटील अकोल्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. या निर्णयामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात काँग्रेस पाठिंबा देणार या चर्चांना मिळणार पुर्णविराम मिळाला आहे. डॉ. अभय पाटील यांनी अकोल्यात महाविकास आघाडीकडून प्रचारही सुरु केला आहे.

अकोल्यात भाजपने संजय धोत्रे यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून स्वत: प्रकाश आंबेडकर लढणार आहेत. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जरी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतला तरी आतापर्यंत नागपूर आणि कोल्हापूर या  दोन मतदारसंघात काँग्रेसला पाठींबा दिला आहे. त्यामुळे अकोल्यात काँग्रेस आंबेडकरांना पाठींबा देणार असल्याची एक चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र, अकोल्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काँग्रेसचे उमेदवार म्हणून डॉ. अभय पाटील यांचा प्रचार सुरू केला आहे. 

अकोल्यात काँग्रेसची कामगिरी निराशाजनक

काँग्रेसने अकोल्यात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला असला तरी या मतदारसंघातील काँग्रेसची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नाही. 1989 सालापर्यंत अकोला मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 1984 साली मधुसूदन वैराळे यांच्या रूपाने या मतदारसंघात काँग्रेसला शेवटचा विजय मिळाला होता. त्यानंतर या जिल्ह्याच्या राजकीय क्षितिजावरून काँग्रेस हद्दपार झालीय ती कायमचीच. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. मात्र, काँग्रेसला 1984 नंतर एकाही निवडणुकीत अकोल्यात विजय मिळालेला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डॉ. अभय पाटील हे भाजपच्या अनुप धोत्रे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर आव्हान निर्माण करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

अकोला लोकसभा मतदारसंघात ‘राजकीय वादळा’ पूर्वीची शांतता; प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपची थेट लढत

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! अकोल्यात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये दुषित पाणी प्यायल्याने 70 मुलींना उलट्या,  बातमी फुटू नये म्हणून…

धक्कादायक! अकोल्यात पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये दुषित पाणी प्यायल्याने 70 मुलींना उलट्या, बातमी फुटू नये म्हणून…


अकोला: अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 70 प्रशिक्षणार्थी मुलींना दुषित पाण्यामुळे विषबाधा, कॉलरा आणि कावीळ झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी सर्वात आधी हे प्रकरण ‘एबीपी माझा’ने समोर आणलं होतंय. आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले. त्यांनी गडंकी भागातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला (Police Training Center) भेट देत पाहणी केलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या ‘एसआयटी’ (SIT) चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील तब्बल 70 हून अधिक महिला पोलिसांना खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दुषित पाणी प्यायल्याने ट्रेनिंगवर असलेल्या या पोलीस महिला पोलिसांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यात वाढत्या उन्हाच्या पाऱ्यामुळे या सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झाला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांना मळमळ आणि उलट्या (Vomiting) होत होत्या. काल या सर्व महिला पोलिसांना अकोल्यातल्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस प्रशिक्षण केंद्राने या गंभीर प्रकाराबाबत आधी चुप्पी साधलीय. काल ‘माझा’ने यासंदर्भातील बातमी सर्वात आधी दाखवलीय. आमच्या बातमीनंतर आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याच्या पोलीस प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर अकोल्यात आले.

निलम गोऱ्हे यांच्याकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या राज्यात विविध जिल्ह्यातून पोलीसांत भरती झालेल्या 741 मुली प्रशिक्षण घेतायेत. काल उपचार सुरू असलेल्या खाजगी रुग्णालयात आमदार अमोल मिटकरी, भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचितच्या नेत्या प्रा. अंजली आंबेडकरांनी भेट दिलीय. दरम्यान, या प्रकरणाच्या ‘एसआयटी’ चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्य सरकारकडे केलीये. तर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारला दिले आहेत.

आणखी वाचा

गूड न्यूज! महाराष्ट्र राज्य पोलीस दलात बंपर भरती, 17471 रिक्त जागांवर भरती

अधिक पाहा..



Source link

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत – प्रकाश आंबेडकर


Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत – प्रकाश आंबेडकर  शिवसेना उबाठा गटाने लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीनेही नऊ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा नारा दिल्यावर संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली.. वंचितसोबत चर्चा पुढे गेली असती तर  त्यांना सहावी जागाही कदाचित दिली असती, मविआचं वंचित आघाडीला सोबत घेण्याचं ठरलं होतं असा दावा संजय राऊत यांनी केला.. संजय राऊत सातत्याने करत असलेल्या या दाव्यावर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.. ट्वीटरवर एक फोटो ट्वीट करत संजय राऊत, तुम्ही किती खोटं बोलणार? असा थेट सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलाय.. तर ट्वीट केलेल्या फोटोमध्ये संजय राऊत वंचित बहुजन आघाडीच्या पाठीत चाकू खुपसत आहेत असं चित्र दिसतंय

अकोला व्हिडीओ


Prakash Ambedkar : अकोल्यात आम्हाला पाडण्याचा प्रयत्न संजय राऊत करताहेत – प्रकाश आंबेडकर

अधिक पाहा..



Source link

Akola Records Highest Temperature : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात, पारा 41 अंशांवर

Akola Records Highest Temperature : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात, पारा 41 अंशांवर



<p class="title style-scope reel-player-header-renderer">Akola Records Highest Temperature : राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात, पारा 41 अंशांवर</p>
<div id="multimix-attribution-label" class="style-scope reel-player-header-renderer">&nbsp;</div>
<div id="reel-multi-format-link-view-model" class="style-scope reel-player-header-renderer">&nbsp;</div>
<div id="channel-container" class="style-scope reel-player-header-renderer">
<div id="channel-info" class="style-scope reel-player-header-renderer">&nbsp;</div>
</div>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp