लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून सुरवात; ‘या’ मतदारसंघाचा समावेश

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेस आजपासून सुरवात; ‘या’ मतदारसंघाचा समावेश


Lok Sabha Second Phase Election 2024 : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Second Phase) निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघात आज अधिसुचना जारी केली जाणार आहे. ज्यात मराठवाड्यातील (Marathwada) परभणी (Parbhani), नांदेड (Nanded), हिंगोलीसह (Hingoli) विदर्भातील बुलढाणा (Buldhana), अमरावती (Amravati), वाशीम (Washim), यवतमाळ (Yavatmal), अकोला (Akola), वर्धा (Wardha) जिल्ह्याचा समावेश आहे. आज अधिसुचना जारी केल्यानंतर या 8  ही लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज विक्री करण्यास सुरवात होईल. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. 

लोकसभा निवडणूक दुसरा टप्पा वेळापत्रक

  • नामांकन : 28 मार्च 2024
  • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 04 एप्रिल 2024
  • नामांकनांची छाननी : 05 एप्रिल 2024
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2024
  • मतदान : 26 एप्रिल 2024

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

  1. परभणी 
  2. नांदेड 
  3. हिंगोली
  4. बुलढाणा 
  5. अमरावती
  6. वाशीम 
  7. यवतमाळ 
  8. अकोला 

अनामत रक्कम भरावी लागणार…

इच्छुकांना ऑफलाईनसह सुविधा तसेच संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी कोरे अर्ज मिळणे, अनामत रक्कम स्वीकारणे, नामांकन अर्ज स्वीकारणे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार, तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये नामांकन अर्ज सादर करताना भरणे आवश्यक आहे. 

स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे

उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र बँक खाते नव्याने उघडावे. हे खाते उमेदवाराला स्वत:चे नावे किंवा निवडणूक प्रतिनिधीसोबत संयुक्तरित्या काढता येईल. सदर बँक खाते नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर उघडलेले असणे आवश्यक असून यात केवळ निवडणुकीशी संबंधीतच व्यवहार करायचे आहेत.

एनओसी अनिवार्य 

लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन भरताना उमेदवारांना निवडणूक आयोगामार्फत विविध सूचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोणत्याही वेळी शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला असल्यास त्याच्या वापराचे संबंधीत विभागाचे भाडे, विद्युत आकार, पाणीपट्टी व दूरध्वनी आदी देयके भरुन सक्षम प्राधिकाऱ्याच्या स्वाक्षरीचे ना-देय (NOC) प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मान्यताप्राप्त पक्षांना ए व बी फॉर्म दाखल करणे बंधनकारक 

मान्यताप्राप्त राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने पक्षाचे विहित नमुन्यातील ए व बी फॉर्म नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकास दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करणे बंधनकारक आहे. 

अपक्ष उमेदवारांना 10 प्रस्तावक आवश्यक 

उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करताना याच लोकसभा मतदार संघातील प्रस्तावक असणे बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षाच्या उमेदवारांना एक मतदार प्रस्तावक तर अपक्ष आणि इतर राज्यातील मान्यताप्राप्त अथवा नोंदणीकृत पक्षाच्या उमेदवारांना 10 मतदार प्रस्तावक असावे. उमेदवार जर इतर जिल्ह्यातील अथवा मतदार संघातील असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रासोबत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Satara : उदयनराजेंना भाजपची उमेदवारी जाहीर होताच आमदाराने अजितदादांना स्पष्टच सांगितलं; म्हणाला, अनेकदा सांगूनही तुम्ही …

अधिक पाहा..



Source link

प्रकाश आंबेडकरांचा पॅटर्नच वेगळा, जे बोलले ते करुन दाखवलं, कोणते 8 उमेदवार मैदानात?

प्रकाश आंबेडकरांचा पॅटर्नच वेगळा, जे बोलले ते करुन दाखवलं, कोणते 8 उमेदवार मैदानात?


अकोला: लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर नेमकं कुणाशी राजकीय आघाडी करणार?हा प्रश्न आज निकाली निघालाय. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) महाविकास आघाडीसोबत राजकीय आघाडीपेक्षा मनोज जरांगे पाटलांशी सामाजिक आघाडी करीत असल्याचं जाहीर करीत खळबळ उडवून दिलीय. आज अकोल्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाचे 8 उमेदवार जाहीर केले. उमेदवार जाहीर करतांना त्यांनी राजकीयदृष्ट्या उपेक्षित समाजांना यादीत स्थान देत त्यांच्या ‘अकोला पॅटर्न’मधील ‘सोशल इंजिनिअरींग’ साधण्याचा प्रयोग केलाय. 

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ‘आंबेडकर’ हे ‘ब्रँड नेम’ असलेले प्रकाश आंबेडकर ओळखले जातात त्यांच्या नवनव्या आणि अचाट राजकीय प्रयोगांसाठी… त्यांनी रूढ केलेला ‘अकोला पॅटर्न’ हा अलिकडच्या ‘सोशल इंजिनिअरींग’ संकल्पनेचा जन्मदाता आहेत. आपल्या दलित समाजासोबत अठरापगड जाती, राजकीय व्यवस्थेत ओळख नसलेल्या छोट्या जातींची मोट बांधत त्यांनी या लोकांना सत्तेत स्थान दिलंय.  2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी कट्टर मुस्लिम विचारधारा मानणाऱ्या तेलंगणातील ‘एमआयएम’सोबत आघाडी करीत राजकीय पटलावर खळबळ उडवून दिली होतीय. दलित, मुस्लिम, मायक्रो मायनॉरिटीज, आंबेडकरांना मानणारा ओबीसी याची मोट बांधत 2019 मध्ये लोकसभेत आंबेडकरांनी 42 लाख मतं घेतली होती. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तीयाज जलील यांच्या नावानं ‘एमआयएम’चा एक खासदारही निवडून आणला होता. गेल्यावेळी ‘एमआयएम’शी राजकीय आघाडी करणार्या आंबेडकरांनी यावेळी मात्र मनोज जरांगे पाटलांशी लोकसभेसाठी सामाजिक आघाडी केलीय. 

आंबेडकरांनी आज अकोल्यात राजकीय भूमिका मांडतांना प्रस्थापित राजकारणावर कठोर प्रहार केलाय. भटके-विमुक्त, दलित आदिवासी, मुस्लिम, जैन या राजकीय दुर्लक्षित घटकांना आपल्या नव्या राजकीय प्रयोगात सामावून घेणार असल्याचे आंबेडकर म्हणालेय. त्यातच त्यांनी आज जाहीर केलेल्या 8 उमेदवारांत आठ जातींना स्थान दिलंय. यात मराठा, बौद्ध, तेली, माळी, बंजारा, गोंड, ढिवर, खाटीक अशा समाजघटकांना स्थान देण्यात आले आहे.

वंचितने आज जाहीर केलेले लोकसभा उमेदवार आणि त्यांची जात : 

1)भंडारा-गोंदिया- संजय गजानंद केवट – ढिवर 
2)गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी : गोंड
3)चंद्रपुर -राजेश वारलुजी बेले : तेली
4)बुलढाणा -वसंत राजाराम मगर : माळी 
5)अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर : बौद्ध
6)अमरावती – प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान : खाटीक
7)वर्धा-  प्रा.राजेंद्र साळुंके : मराठा
8)यवतमाळ-वाशीम -सुभाष खेमसिंग पवार : बंजारा

उमेदवार, त्यांची जात आणि आंबेडकरांची राजकीय व्यवहार्यता 

1) अकोला : प्रकाश आंबेडकर

स्वत: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष. 1998 आणि 1999 असे दोनदा अकोल्यातून काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदार. अकोला जिल्हा परिषद आणि बहुतांश पंचायत समित्यांवर सत्ता. अकोल्यात दलित, मुस्लिम, कुणबी आणि अल्प समाजघटकांना सोबत घेत विजयासाठी प्रयत्न. 

2) चंद्रपूर : राजेश बेले 

राजेश बेले हे तेली समाजाचे असून गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात कार्यरत आहेत, संजीवनी सामाजिक पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील पर्यावरण आणि प्रदूषणाचे अनेक मुद्दे लावून धरले आहे, गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ओबीसी समाजाचे मुद्दे उचलून आंदोलने केली आहे, मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधात अनेक आंदोलनं केली, चंद्रपूर आणि वर्धा मतदारसंघातील तेली मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न. 

3) यवतमाळवाशिम : सुभाष पवार

सुभाष पवार हे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात असलेल्या बंजारा समाजाचे. मतदारसंघातील पुसद आणि दिग्रस विधानसभेत सध्या बंजारा समाजाचे आमदार. राज्यातील 10 लोकसभा मतदारसंघात निर्णायक असलेल्या बंजारा समाजाला या माध्यमातून आपलंस करण्याचा प्रयत्न. बंजारा, मुस्लिम, दलित आणि ओबीसींची मोट मतदारसंघात बांधण्याचा प्रयत्न. 

4) वर्धा : प्रा. राजेंद्र साळुके

राजेंद्र साळुके  हे मराठा समाजातील उमेदवार. या माध्यमातून राज्यात जरांगे पाटलांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या मराठा आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न. जरांगे यांच्याशी असलेल्या आघाडीचा फायदा या मतगारसंघास इतर ठिकाणी होईल असा कयास. 

5) अमरावती : प्राजक्ता पिल्लेवान

अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात आंबेडकरांनी तिशीतील तरुणीला दिली संधी. हिंदू खाटीक असल्याने हिंदू मतदार आपलेसे करण्याचा प्रयत्न. नवनीत राणांसमोर तरुण महिला उमेदवार देत त्यांचं स्टारडम कमी करण्याचा प्रयत्न.

6) भंडारागोंदिया– संजय गजानंद केवट

 संजय केवट हे ढिवर समाजातील उमेदवार. या मतदारसंघात या समाजाला उमेदवारी देत सामाजिक संतुलन साधण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न. इतर समाज या माध्यमातून वंचितसोबत जोडण्याचा प्रयत्न. 

7) गडचिरोली-चिमूर -हितेश पांडुरंग मडावी

अनुसुचित जमातीसठी: राखीव असलेल्या या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या गोंड समाजाला आंबेडकरांची उमेदवारी.अहेरीचे राजघराणे याच समाजाचे. त्यामूळे समाजमनावर या समाजाचा मोठा पगडा आहे. गोंड, माडिया या आदिवासी समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अणत त्याचा राजकीय फायदा व्हावा हा मानस. 

8) बुलडाणा : वसंतराव मगर

मगर या मतदारसंघात निर्णायक असलेल्या माळी समाजाचे. या मतदारसंघात तब्बल 3.50 लाख माळी मतदार आहेत. मागच्या निवडणुकीत वंचितच्या माळी समाजातील उमेदवाराने या मतदारसंघात 1 लाख 78 हजार मतं  घेतली होती. दलित, माळी, ओबीसी आणि मुस्लिमांची मोट या मतदारसंघात बांधण्याचा प्रयत्न. 

आणखी वाचा

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर जरांगेंच्या भेटीसाठी थेट आंतरवालीत; लोकसभेबाबत तासभर चर्चा

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी, पहिली उमेदवार यादी जाहीर

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी, पहिली उमेदवार यादी जाहीर


Prakash Ambedkar, Lok Sabha Election 2024 : अकोला :  राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) नवा ट्विस्ट आला आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, नव्या आघाडीची घोषणा केली. दुसरीकडे प्रकाश आंबडेरांनी जरांगेंसोबत आघाडी केल्यानं ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडी सांगलीतून प्रकाश शेंडगे (ओबीसी बहुजन पार्टी) यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. तसेच, राज्यातील सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, रामटेकमधील उमेदवाराचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल अशी माहितीही प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. 

प्रकाश आंबेडकरांनी एकूण 7 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये प्रामुख्यानं अकोला, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच, मनोज जरांगे त्यांच्या उमेदवारांबाबत 30 मार्चनंतर निर्णय घेतील असंही आंबेडकरांनी सांगितलं. 

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की, “काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत.  काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो. विस्ताराने बोलणे झाले. त्यात ओबीसीसोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला.  मुस्लिम, जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील.  पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल. ते त्यांची अंतिम भूमिका 30 तारखेला घेतील. जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायची विनंती केली. त्यांची विनंती मान्य केली. जरांगे आणि दोघे मिळून लढणार”

“सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे. नवी आघाडी करतांना आमच्यावर टीका होईल. आरोप होतील.  शेती, किमान आधारभूत मूल्य, कृषी आधारीत उद्योग हे मुद्दे घेऊन लोकांमध्ये जावू. जरांगे पाटलांसोबची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन. लोक हे स्वीकारतील. ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे. ओबीसी, भटके-विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार. भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचे जे राजकारण सुरू केलं त्याला उत्तर म्हणून मुस्लीम उमेदवार देणार. जैनांनाही प्रतिनिधित्व देणार.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

“ही राजकारणातील नवी वाटचाल. या वाटचालीला समूह पाठींबा देईल. राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैशांचा वापर. यामुळे निवडून गेल्याची बांधिलकी मतदारांसोबत न राहता डोनेशन देणाऱ्यांसोबत राहते.  यामुळे कार्यकर्त्यांनी स्वत:च्या खर्चाने प्रचार करावा. कमीत कमी पैशात उमेदवाराने निवडणूक लढवावी हा प्रयत्न.”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

वंचितची पहिली उमेदवार यादी जाहीर 

पाहा व्हिडीओ : Prakash Ambedkar : मोठी बातमी : प्रकाश आंबेडकरांची मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी ABP Majha

अधिक पाहा..



Source link

Akola West Assembly Constituency मधील पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश

Akola West Assembly Constituency मधील पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश



<p>अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिलेत. &nbsp;न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत. निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता?, असा सवाल याचिकाकर्त्यांने निवडणूक आयोगाला केला होता. अकोल्यातील शिवमकुमार दुबे या नागरिकाने याचिका दाखल केली होती. 26 एप्रिलला अकोला पश्चिम पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होतं. तर 4 जूनला निकाल लागणार होता. काँग्रेसकडून साजिदखान पठाण यांची उमेदवारी जाहीर झाली होती. भाजपकडून माजी महापौर विजय अग्रवाल आणि दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांचा मुलगा कृष्णा शर्मा यांची नावं होती चर्चेत</p>



Source link

Bacchu Kadu : निवडणूक आली मुद्यावर बोला! आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ‘प्रहार’

Bacchu Kadu : निवडणूक आली मुद्यावर बोला! आमदार बच्चू कडूंचा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर ‘प्रहार’


Amravati Lok Sabha Election 2024होळीच्या (Holi 2024) पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)हे वेगवेगळ्या उपक्रम राबवत असतात. अशातच यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपल्या घराच्या भिंतीवर अनेक ज्वलंत मुद्दे लिहत शासनाचे लक्ष वेधले आहे. निवडणूक आली मुद्द्यावर बोला असे लिहत बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या लावून धरल्या आहे. गेल्या वर्षी बच्चू कडू यांनी जिल्हा परिषदेची शाळा रंगावत आपले लक्ष वेधले होते. मात्र यंदा बच्चू कडू यांनी स्वत: आपल्या घरावर विविध मागण्या लिहून आपल्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांचा ‘प्रहार’

या विषयी भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, अशा प्रकारचे संदेश खऱ्या अर्थाने प्रत्येक नेत्याने आपल्या घरावर लिहिले पाहिजे. ज्यांचे मत आम्ही घेतो त्या मतदाराला असे वाऱ्यावर कोणीही सोडू नये. जातीपातीचे मुद्दे समोर करून त्यावर मत मिळवणारी एक जमात आता निर्माण व्हायला लागली आहे. धर्माचे जातीचे झेंडे हातात घेऊन मूळ मुद्द्यापासून आपल्याला दूर ठेवल्या जात आहे. त्यामुळे आम्ही म्हणतोय की निवडणूक आली मुद्द्यावर बोला.

यात मुख्य मुद्दे म्हणजे स्वामीनाथन आयोग हा गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसने स्वीकारला नाही तसाच तो भाजपने देखील स्वीकारला नाही. त्यामुळे आता हा आयोग  पूर्णता स्वीकारावा. कारण 50 टक्के नफा धरून भाव  कळायला पाहिजे. असे नसेल होत तर शेतकऱ्यांची पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व मजुरीची कामे मनरेगा मधून झाली पाहिजे, अशा अनेक मागण्या आम्ही केल्या असून सरकारने त्यावर बोलायला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले. 

निवडणूक आली मुद्यावर बोला! 

राज्यात घरकुलाचे प्रश्न देखील तसेच प्रलंबित आहे. तर दुसरीकडे राज्यात सातत्याने पेपर फुटीच्या घटना घडत आहेत. शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे पोरं ज्यावेळी पेपर द्यायला जातात तेव्हा पेपर फुटी होतं असते. त्यामुळे  विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने कठोर कायदा करून युवा वर्गासाठी चांगले धोरण तयार केले पाहिजे. हल्ली दिव्यांगाना देखील अनेक अडीअडचणींना समोर जावे लागत आहे. त्यांना तीन हजार रुपये प्रति महिना मानधन द्यावा. सोबतच केंद्र आणि राज्याच्या निधीमध्ये पाच टक्के वाटा हा दिव्यांगांसाठी राखीव ठेवला पाहिजे. सोबतच शेतमजूर आणि प्रकल्पग्रस्तांचे स्वातंत्र्य वित्त महामंडळ तयार करावे, इत्यादी अनेक मुद्दे घेऊन आम्ही सरकारकडे मागणी करत असल्याचेही बच्चू कडू म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद? त्याचीच मस्ती आहे; बच्चू कडूंचा नवनीत राणांसह भाजपवर निशाणा

तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद? त्याचीच मस्ती आहे; बच्चू कडूंचा नवनीत राणांसह भाजपवर निशाणा


Amravati Lok Sabha Election 2024 : रंगबाजीने निवडणूक लढवली जात असेल तर आम्ही भिणारे नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहेत? त्याची मस्ती आहे, असं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत. आमची नाराजी नवनीत राणांवर आहे, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.

आम्ही कुणाला भिणार नाही : बच्चू कडू

आमची लढत मैत्रीपूर्ण आहे. इतक्या रंगबाजीने जर निवडणूक लढवली जात असेल तर, आम्ही कोणाला भिणारे नाहीत. ही पैशाची, सत्तेची मस्ती आहे की, तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहे? त्याची मस्ती आहे का, असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे. स्वतः उमेदवार अशा पद्धतीने वागत असेल तर कार्यकर्त्यांची मानसिकता राहिलेली नाही. दिनेश बुब आमचे चांगले मित्र आहेत. पण आमचा उमेदवार हा भाजपातून आलेला असेल, असंही आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

विदर्भाबाबत लवकरच निर्णय घेऊ

सुप्रीम कोर्ट काहीही करणार नाही. कोर्टाने तीन चार वर्ष काहीही केलं नाही. आताही ते काही करणार नाहीत. न्यायालयातील भूमिका फार समाधानकारक आहे असं नाही. राज्यात काही चांगले उमेदवार आहेत, ज्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, जसं राजू शेट्टी आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणारा उमेदवार आहे, पण सध्या फक्त अमरावती आणि विदर्भात काय करायचं ते पाहू.

आमची नाराजी नवनीत राणांवर

जालना येथून कार्यकर्त्यांनी बरेचदा आग्रह केला, पण ते शक्य झालं नाही. मात्र वर्धा मतदार संघात दोन तालुके अमरावती जिल्ह्यातील येतात. कार्यकात्यांसोबत बोलून चाचपणी करू, निवडून येण्याची शक्यता दिसली तर पुढे जाऊ. आमची नाराजी नवनीत राणांवर आहे. मी समजून घेईल पण कार्यकर्ते समजून घ्यायला तयार नाही. उद्या जर माझाच पक्ष अडचणीत येत असेल तर कसं शक्य आहे? हे होणार नाही. काही गोष्टी नाही ऐकल्या जाऊ शकत. 

अमरावतीत बच्चू कडू स्वतंत्र लढणार

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अजून सुटत नाहीय. अशातच महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती लोकसभा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच बच्चू कडू आणखीनच नाराज झाल्याचं दिसतं आहे. याच नाराजीमुळे बच्चू कडू महायुती सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसंच, अमरावतीमध्ये चांगला उमेदवार मिळाला, अशी भूमिका बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. बच्चू कडूंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवलं आहे. येत्या 26 तारखेला बच्चू कडू मुंबईत येऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp