ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार, मविआतील समावेशाचं काय?

ठरलं! प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, ‘या’ मतदारसंघातून लढणार, मविआतील समावेशाचं काय?


मुंबई : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) जागावाटपावरून तणाव चालू आहे. अजूनही काही जागांवरील तिढा सुटलेला नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षाला सामावून घेण्यातही महाविकास आघाडीला (मविआ) अद्याप यश आलेले नाही. मविआने आंबेडकरांना 4 जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र हा प्रस्ताव त्यांनी फेटाळला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी 24 मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मोठी घोषणा केली आहे. मी अकोला (Akola) मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

आमची अद्याप तयारी झालेली नाही

पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान होणार आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीकडून जागावाटप झालेले नाही. असे असताना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते त्यांना आपला अर्ज भरण्यासाठी वेळ लागतो. ज्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड नाही तो दोन तासांतच उमेदवारी अर्ज भरतो. आम्ही आमच्या उमेदवारांचे रेकॉर्ड तपासलेले आहेत. त्यामुळे आमच्या उमेदवारांचे अर्ज दोन तासांत भरता यावा, याची आम्ही काळजी घेतलेली आहे. आमची तयारी अद्याप झालेली नाही. आमची तयारी काय आहे हे आम्ही 26 मार्च रोजी सांगू, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

मी अकोल्यातून अर्ज दाखल करणार

गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीविषयी चर्चा होती. ते नेमकं कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आज मात्र त्यांनी या चर्चेवर पडदा पाडला असून मी येत्या 27 मार्च रोजी अकोल्यातून उमेदवारी अर्ज भरणार आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून अर्ज भरणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आम्ही साथ देत नाही, असं चित्र निर्माण केलं जातंय

भाजपकडून इतर पक्षांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला जातोय. इतर पक्षांना कमजोर केल्यावरच आम्हाला विजयी होता येईल, असे भाजपला वाटत आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही भाष्य केलं. मविआत 15 जागांचा तिढा संपलेला नाही. ते एकत्र लढणार आहेत की स्वतंत्रपणे लढणार आहेत, हे अजूनही ठरलेलं नाही. काँग्रेस आणि शिवसेना गोंधळ घालत आहेत. तशा प्रकारचा गोंधळ आम्ही अद्याप घातलेला नाही. आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत की तुमच्यातील 15 जागांचा वाद मिटवा. मात्र आम्हीच त्यांना साथ देत नाहीत, असे चित्र निर्माण केले जात आहे. आमच्यातील 15 जागांचा वाद मिटलेला आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी द्यावी, असेही आंबेडकर म्हणाले.

अधिक पाहा..



Source link

अकोला पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं ठरलं! मात्र, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? 

अकोला पोटनिवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचं ठरलं! मात्र, आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? 


Lok Sabha Election 2024अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Akola Lok Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज उमेदवाराची अखेर घोषणा करण्यात आली आहे. मावळत्या महापालिकेतील शिवसेना (Shiv Sena) गटनेते राजेश मिश्रांच्या उमेदवारीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राजेश मिश्रा हे यापूर्वी दोन टर्म नगरसेवक राहिले असून त्यांची आई तसेच मिश्रा यांच्या पत्नी या देखील नगरसेवक राहिल्या आहेत. त्यामुलळे अकोला पश्चिम मतदारसंघात राजेश मिश्रा यांची ओळख तळागाळातला नेता म्हणून प्रचलित आहे.

आज अकोला (Akola) येथे आयोजित आढावा बैठकी मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (MLA Nitin Deshmukh) राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात इतर पक्षांना चांगलाच जोर लावावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता? 

अकोला पश्चिम मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. मात्र आज आमदार नितीन देशमुखांनी महाविकास आघाडीतून राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेसला लोकसभा जिंकायची असेल तर अकोला पश्चिम मतदारसंघ ठाकरे गटाला सोडावा लागेल, असा ठाकरे गटाने काँग्रेसवर दबावतंत्राचा अवलंब केल्याचे देखील बोलले जात आहे. परिणामी, महाविकास आघाडीत बिघाडी तर होणार नाही ना, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता.

तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे या मंतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी जवळ जवळ सर्वच पक्षानी जोरदार तयारी केल्याचे बघायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

‘भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात फुटणार’; अमोल मिटकरींच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी? 

‘भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात फुटणार’; अमोल मिटकरींच्या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी? 


Amol Mitkari : राज्यात सध्या अनेक ठिकाणी महायुतीतील (Mahayuti) कुरबुरी वाढल्याचे चित्र आहे. त्यातच आता अकोल्यातही महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे (Anup Dhotre) आणि आमदार रणधीर सावरकर (Randhir Savarkar) यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिले नाही. भाजपचा (BJP) अकोल्यातील व्यवहार हा हेकेखोरपणाचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे. 

त्यांचं सन्मानपूर्वक बोलवणं आल्याशिवाय अकोल्यात भाजपचा प्रचार करणार नसल्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे. तसेच बारामतीत अजितदादांना त्रास देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे पडसाद कल्याण आणि ठाण्यात उमटतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

अनुप धोत्रे आणि रणधीर सावरकरांवर मिटकरींची टीका

अकोल्यात स्थानिक भाजप पक्ष लोकसभेच्या प्रचारात आपल्याला दूर ठेवत आहे. उमेदवाराचं बोलायचं काम आहे. त्यांना माझं गांभीर्य वाटत नसेल तर मी माझा आत्मसन्मान कसा सोडणार? भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांनी कुठलाही संपर्क आणि निमंत्रण दिलं नाहीय. तुम्ही अद्याप उभे राहिले नाहीय. एवढे हवेत राहिले तर लोक तुम्हाला कसे निवडून देतील. तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता आमचाच विजय म्हणत असाल तर कुणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलं नाही हे लक्षात ठेवावे. 

भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात लवकरच फुटेल

त्यांना भ्रम आहे की, आपण म्हणजे अंतिम, लोकशाहीत जनता अंतिम असते हे लक्षात ठेवावं. त्यांनी आपला हेकेखोरपणा सोडावा, सर्वांना विश्वासात घ्यावं. अजितदादा आणि तटकरेंच्या कानावर हा विषय घातलाय. आपणच म्हणजे सर्वकाही हा भाजपच्या भ्रमाचा भोपळा अकोल्यात लवकरच फुटेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

विजय शिवतारेंचा स्क्रिप्ट रायटर कोण ? 

विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सतत टीका करत आहेत. याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, टीका, कुरघोड्या सुरूच राहणार आहेत. हेच मविआमध्येसुद्धा आहे. शिवतारेंची एवढं बोलण्याची ताकद नाही, ते पाच वर्ष बोलले नाहीत. अजितदादांच्या मागे-पुढे फिरणारी व्यक्ती आज एवढ्या ताकदीने कसं बोलत आहे. याचा ‘स्क्रिप्ट रायटर’ शोधला पाहिजे. याच्या मागे पाणी कुठे तरी मुरतंय, असे त्यांनी म्हटले.

…तर आम्हाला ठाण्याचा विचार करावाच लागेल

आमच्या बोलण्याचा रोख स्पष्ट केला तर महास्फोट होईल, त्यामूळे रोख थांबून ठेवा. जेव्हा याचा थांगपत्ता लागेल तेव्हा चित्र क्लियर होईल. शिवतारे त्यांचे बोलणे थांबवणार असतील तर आम्हाला ठाण्याचा विचार करावाच लागेल, त्यासाठी आम्ही कंबर कसली आहे. तुम्ही इकडे हालचाल केली तर आम्ही तिकडे करू. ‘ईट का जवाब ईट से देंगे’, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. 

आणखी वाचा

राधाकृष्ण विखे-पाटील, शिवेंद्रराजे भोसले, राम सातपुते सागर बंगल्यावर; नगर, माढा आणि साताऱ्याचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांच्या मॅरेथॉन बैठका

अधिक पाहा..



Source link

मोदींच्या फोटोचा वापर करत आचारसंहिता भंग केल्याचा वंचितचा आरोप; फोर्स मोटर्सविरोधात तक्रार दाखल

मोदींच्या फोटोचा वापर करत आचारसंहिता भंग केल्याचा वंचितचा आरोप; फोर्स मोटर्सविरोधात तक्रार दाखल


Lok Sabha Election 2024: देशभरात लोकसभा निवडणुकांची आचार संहिता लागू करण्यात आली असून सर्वत्र प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आज फोर्स मोटर्सकडून एका वर्तमानपत्रात पहिल्याच पानावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यात भारतीय सशस्त्र दलाचे नाव, छायाचित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) फोटोचा वापर करण्यात आला आहे. ही जाहिरात म्हणजे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून या प्रकरणी आक्षेप घेत वंचित बहुजन युवा आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी सी व्हिझील वर तक्रार दाखल केली आहे. सोबतच या प्रकरणाची वेळीच दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील वंचितकडून करण्यात आली आहे.

आचारसंहिता भंग केल्याचा वंचितचा आरोप

आदर्श आचारसंहिता असताना सैन्य दलाच्या छायाचित्र आणि नाव वापरून कुठलीही जाहिरात प्रकाशित करता येत नाही. मात्र तरीही आज जवळ जवळ सर्व जिल्हा आवृत्ती मध्ये पहिल्या पानावर फोर्स मोटर्सकडून जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाजपच्या ‘आत्मनिर्भर भारत ‘ ह्या घोषवाक्य आणि प्रधानमंत्री मोदींचे छायाचित्र देखील आहे. सदर जाहिराती मध्ये “आत्मनिर्भर” भारताच्या संकल्पनेला सशक्त करणारा फोर्स, संरक्षण क्षमतांमध्ये भारताला आत्मनिर्भर बनवल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार मानतो. असा आशय लिहलेला आहे. सोबतच  फोर्स मोटर्सला भारतीय सशस्त्र दलांसाठी खास विकसित केलेल्या लाईट स्ट्राइक व्हेइकल्स (एलएसव्ही) चा पुरवठादार असल्याचा सार्थ अभिमान आहे. असे नमूद करून फोर्स मोटर्सच्या वेबसाईटची लिंक देखील देण्यात आली आहे.

गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी 

हा अतिशय गंभीर प्रकार असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी आता वंचितने केली आहे.  भारतीय आर्म फोर्सेसचे नाव, छायाचित्र एका खाजगी कंपनीने केवळ वाहन पुरवठा केले म्हणून निवडणुक काळात भाजपचे आणि मोदीच्या प्रचार करण्यासाठी वापरणे,  हा सरळ सरळ देशद्रोह असून लोकसभा निवडणुकीचे निष्पक्ष निवडणुकीवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारा आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी जाहीर केल्या नुसार 90 मिनिटात कार्यवाही करून फोर्स मोटर्स व्यवस्थापन विरूद्ध गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा देखील वंचित युवा आघाडीचे वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्त्व मोठं करणं ही भाजपची जबाबदारी, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करु; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी

हर्षवर्धन पाटलांचं नेतृत्त्व मोठं करणं ही भाजपची जबाबदारी, त्यांच्या सगळ्या अडचणी दूर करु; देवेंद्र फडणवीसांची गॅरंटी


अकोला: हर्षवर्धन पाटील हे जेव्हापासून भाजपमध्ये आले आहेत, तेव्हापासून ते अत्यंत समर्पित वृत्तीने काम करत आहेत. त्यांनी कायमच भाजप पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या नेत्यांचं नेतृत्त्व मोठं झालं पाहिजे, ही पक्ष म्हणून भाजपची जबाबदारी आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते बुधवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातील अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यात सुरु असलेल्या वादाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, हर्षवर्धन पाटील यांची काहीच नाराजी नव्हती. पण त्यांचे काही प्रश्न आहेत. इतकी वर्षे एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे असे प्रश्न निर्माण होतात. हे सर्व प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहे. किंबहुना काही प्रश्न सोडवले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी इंदापूरमधील अजितदादा गटाच्या एका पदाधिकाऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात आक्षेर्पाह वक्तव्य केले होते. तसेच त्यांना मतदारसंघात फिरुन देणार नाही, अशी धमकीची भाषा वापरली होती. या प्रकारानंतर हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. तर हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादीचा संबंधित कार्यकर्ता आणि अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात सुप्त तणाव निर्माण झाला होता. हर्षवर्धन पाटील उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या नाराजीचा फटका बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि हर्षवर्धन पाटील यांच्या आजच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या भेटीत फडणवीसांना हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर करण्यात यश मिळाल्याचे सांगितले जाते.

माढ्यातील मोहिते-पाटलांची नाराजीही दूर करु; फडणवीसांना विश्वास

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरोधात मोहिते पाटील घराण्याच्या असलेल्या नाराजीविषयी विचारण्यात आले. यावर फडणवीसांनी म्हटले की, आम्ही मोहिते-पाटील यांच्याशीही लवकर चर्चा करु. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. जो महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत काम केले पाहिजे. त्यामुळे आता राजी-नाराजी असेल, ती दूर केली जाईल. मोहिते-पाटील यांच्याशी मी चर्चा केली आहे, चंद्रशेखर बावनकुळेही त्यांच्याशी बोलत आहेत. गिरीश महाजनही परवा त्यांच्याकडे जाऊन आले. आमचा हाच प्रयत्न आहे की, सगळ्यांनी एकत्र राहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

संजय राऊतांविषयी विचारताच देवेंद्र फडणवीसांचा बोलण्यास नकार

संजय राऊत यांनी बुलढाणा येथील आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख औरंगजेब असा केला होता. याविषयी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश: तोंड फिरवले. तुम्ही मला संजय राऊतांविषयी प्रतिक्रिया काय विचारता, माझी काहीतरी प्रतिमा ठेवा, असे म्हटले.

आणखी वाचा

अजित पवारांनी दुखावलेले हर्षवर्धन पाटील, शिवतारे, तावरे, जाचक, कुल, थोपटे कुणाला साथ देणार?

अधिक पाहा..



Source link

दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली अन् पतीचाच काढला काटा; आकस्मिक मृत्यूचा बनाव रचला, मात्र पुढे…

दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली अन् पतीचाच काढला काटा; आकस्मिक मृत्यूचा बनाव रचला, मात्र पुढे…


Akola News अकोलाअकोल्यात एका महिलेने दिराच्या प्रेमात वेडी होऊन चक्क आपल्याच पतीची हत्या (Crime) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पतीचा चुलत भाऊ हा सातत्यानं घरी यायचा. दरम्यान दोघांची नजरभेट झाली आणि त्यांच्यात हळूहळू संवाद वाढला. त्यातूनच जवळीकता निर्माण होऊन दोघांचं सूत जुळलं. परंतु आता पती प्रेमात अडसर ठरू लागल्यानं पत्नीनं प्रियकराच्या (दिराच्या) मदतीनं पतीला(Crime News) संपवलं. विशेष म्हणजे ही हत्या नसावी, अपघाती मृत्यू असल्याचा दोघांनी बनावही रचला. मात्र 2 दिवसांत त्यांचे हे बिंग शवविच्छेदनातून फुटले आणि पत्नी व तिचा प्रियकर दिराला गजाआड व्हावे लागले. हे प्रकरण आहे अकोला (Akola News)जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील तामशी गावातले

नेमकी काय आहे संपूर्ण घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील रहिवासी असलेले मेसरे नामक एक जोडपं बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी आलं होतं. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं या दोघा पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, इथं काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला.

या संदर्भात पत्नीनं बाळापुर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. रात्री गाढ झोपीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं मंगलाने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. सुरुवातीला पत्नीनं सांगितलं की आपला पती दारूच्या प्रचंड आहारी गेला असून तो त्यात व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे हा आकस्मित मृत्यू असावा, असे तिने पोलिसांना भासवून दिले होते. 

वैद्यकीय अहवालात फुटलं बिंग

दरम्यान, दोन दिवसानंतर प्रमोद यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यात त्याचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी या प्रकरणात धागेदोरे तपासले असता, मृत प्रमोदची पत्नी मंगला हिचे पतीचा चुलत भाऊ गोटू मेसरे याच्यासोबत सूत जुळलं असल्याचे समोर आलं. या प्रकरणात बाळापूर पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी करता मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतले.  दरम्यान त्यांनी दोरीने गळा आवळून प्रमोदची हत्या केल्याची कबूली दिली. अखेर पोलिसांनी वहिनी आणि दिर दोघांनाही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. 

प्रेमात अडसर ठरत असल्याने काढला काटा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला आणि गोटू यांचं प्रेम खूप पुढं गेलं होतं. गोटू हा अविवाहित असून त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला लागली होती. प्रमोदनं दोघांचं भेटणं बंद केलं होतं. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा तिने निश्चय घेतला आणि अखेर त्यांनी पतीला संपवलं.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp