राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर जळजळीत टीका

राऊतांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, प्रकाश आंबेडकरांची संजय राऊतांवर जळजळीत टीका


अकोला : वंचित बहुजन आघाडी (Vanchit) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळे वंचित महाविकास आघाडी सामील होण्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. भाजपाबरोबर राहिलेत त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. वंचितने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याच्या राऊतांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट

गेल्या दोन निवडणुकीत काँग्रेसने माझ्याविरोधात मुस्लिम उमेदवार दिला. असं झाल्याने काँग्रेसचा जनाधार कमी झाल्याचं अकोल्यातील मुस्लिम समाजाचं मत, यावेळी असं झालं तर मुस्लिमांचे मत असेच राहील, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे. चंद्रहार पाटलांवरून उद्धव ठाकरेंशी कोणतेही मतभेद नसल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

पक्ष आणि आंबेडकरांचं मत-मतांतरे 

मी पक्षाने सांगितलं तसेच निर्णय घेतो. पक्षाच्या आदेशाने काम करतो. माझ्या मताने झाले असते, तर कधीचाच निर्णय घेतला असता. युतीला विलंबाबत पक्ष आणि आंबेडकरांचं मत-मतांतरे आहेत का, असा प्रश्न निर्माण करणारे हे आंबेडकरांचं वक्तव्य आहे. 

महाविकास आघाडी सोबतच्या युतीबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं की, महाविकास आघाडीतील पक्षांत भांडणे आहेत, तेच भांडण मिटवत नाहीत. त्यांनी दिलेला तीन जागेचा प्रस्ताव आम्ही फेटाळून लावला आहे. भाजपला हरवण्यासाठी जी पाऊले उचलायला लागतील ती आम्ही उचलणार, असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे.

वंचितचा 7 जागांचा प्रस्ताव

सात जागांचा प्रस्ताव आम्ही काँग्रेसकडे दिला आहे. मल्लिकार्जुन खरगेंना आम्ही एक पत्र लिहिलं आहे. महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत 10 जागांवरती काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. पाच जागा शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आघाडीसंदर्भात आमचं काही मत नाही. आम्ही काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस त्यावर निर्णय घेईल.

शेवच्या क्षणापर्यंत ऑफर कायम राहिल

आमची ऑफर शेवच्या क्षणापर्यंत कायम राहिल. अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही वाट पाहू त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. संजय राऊतांवर निशाणा साधला आंबेडकरांनी म्हटलं आहे की, आधी भाजपसोबत राहिलेल्या संजय राऊतांनी त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये.

महत्त्वाच्या इतर बातम्या :



Source link

भाजपा उमेदवाराचा मामा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, अर्धा तास बंद दाराआड चर्चा; भाच्याला धक्का देणार?

भाजपा उमेदवाराचा मामा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, अर्धा तास बंद दाराआड चर्चा; भाच्याला धक्का देणार?


अकोला : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर सध्या देशासह महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आलाय. महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात जागावाटपावर चर्चा चालू आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. असे असतानाच भाजपाचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांचे मेहुणे तथा अकोला जिल्ह्यातील शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेतली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यातील यशवंत भवन या निवासस्थानी ही भेट झाली आहे. या द्वयींमध्ये बंद दाराआड साधारण अर्धा तास चर्चा झाल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अद्याप महाविकास आघाडीचा भाग झालेला नाही. तसं खुद्द प्रकाश आंबेडकर यांनीच अनेकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश पोहरे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.    

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीवर पोहरे काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर प्रकाश पोहरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. आमची ही भेट राजकीय स्वरुपाची नव्हती. यातून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असं प्रकाश पोहरे यांनी सांगितलं आहे. मी संपादक असलेल्या वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी मी प्रकाश आंबेडकरांना भेटायला आलो होतो, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलंय.  

प्रकाश पोहरे कोण आहेत? 

प्रकाश पोहरे हे अकोला जिल्ह्यात सर्वपरितचित असे नाव आहे. ते भाजपचे खासदार संजय धोत्रे यांचे मेहुणे तर भाजपचे अकोला मतदारसंघाचे उमेदवार अनुप धोत्रे यांचे मामा आहेत. विशेष म्हणजे प्रकाश पोहरे हे विदर्भातील एका दैनिकाचे मुख्य संपादकही आहेत. अकोला जिल्ह्यात त्यांना शेतकरी नेते म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत काम केलेलं आहे. त्यांनी 1991 साली अकोला लोकसभा मतदारसंघातून शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते किसान ब्रिगेड या शेतकरी संघटनेचे संस्थापक आहेत. त्यांनी काही दिवस तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षातही काम केलेलं आहे.

प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीचे अल्टिमेटम!

दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे अजूनही अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील झालेले नाहीत. वेळ आलीच तर आम्ही एकट्याने निवडणूक लढवू, अशी भूमिका वंचितच्या नेत्यांकडून घेतली जात आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने वंचितला अल्टिमेटम दिलंय. प्रकाश आंबेडकरांनी 19 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत आपला निर्णय न सांगितल्यास आम्ही त्यांच्याशिवाय निवडणूक लढवू, असं महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेसने ठरवलंय. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाल्यास ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 9 आणि वंचितला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर वंचितने आपली वेगळी चूल मांडल्यास ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष 10 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी कळात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.   

संबंधित बातम्या

Madha Lok Sabha: मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची डोकेदुखी वाढणार?

अधिक पाहा..



Source link

मविआचं ठरलं! प्रकाश आंबेडकरांना 24 तासांची डेडलाईन, संध्याकाळपर्यंत निरोप आला तर ठीक, अन्यथा….

मविआचं ठरलं! प्रकाश आंबेडकरांना 24 तासांची डेडलाईन, संध्याकाळपर्यंत निरोप आला तर ठीक, अन्यथा….


अकोला: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला तरी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही सुटायला तयार नाही. भाजपकडून महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर होऊन बरेच दिवस उलटले तरी मविआच्या जागावाटपाचं (MVA Seat Sharing) गुऱ्हाळ अजूनही सुरुच आहे. यासाठी प्रामुख्याने प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी सोबत येणार की नाही, याबाबत असलेला संभ्रम कारणीभूत ठरत आहे. प्रकाश आंबडेकरांनी मविआसमोर थेट 27 जागांचा प्रस्ताव मांडत खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मविआच्या जागावाटपाचे घोडे अडून बसले आहे. प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायला तयार नाहीत. एकीकडे संजय राऊत (Sanjay Raut) हे वंचित आमच्यासोबत येईल, असे वारंवार सांगितले तरी प्रकाश आंबेडकर तितक्याच तत्परतेने, अद्याप आमचं काहीच ठरलं नाही, असे सांगत आहेत.  या सगळ्यामुळे वंचित पक्ष आपल्यासोबत येण्याच्या मविआच्या नेत्यांच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. आता फक्त ही संभाव्य युती तुटली, असे जाहीर करुन चर्चा फिस्कटवण्याचा आळ स्वत:वर कोण घेणार, यासाठी बहुधा दोन्ही पक्ष एकमेकांची वाट पाहत असावेत. परंतु, लोकसभेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने आता मविआनेच पहिले पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. मविआकडून आता प्रकाश आंबेडकर यांना २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

संजय राऊत खोटं बोलतात, नवनीत राणा जेलमध्ये जाणार, वेळकाढूपणामुळे मविआचं जागावाटप रखडलं, प्रकाश आंबेडकर आक्रमक

महाविकास आघाडीचे नेते मंगळवारी संध्याकाळपर्यंत प्रकाश आंबेडकर यांची वाट पाहणार आहेत. उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रकाश आंबेडकरांकडून येणाऱ्या निरोपाची वाट पाहिली जाईल. त्यानंतर महाविकास आघाडी स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीसोबत येण्यावर आंबेडकरांच्या नवनवीन अटी शर्तींमुळे ते महाविकास आघाडीसोबत येणार की नाही?, याबाबत मविआला शंका आहे. त्यामुळे मविआने आता हा सस्पेन्स संपवण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीत सहभागी होण्याबद्दल आंबेडकरांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही शेवटची संधी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा स्वतंत्र प्रचार सुरु

प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या नेत्यांकडून जागावाटप अंतिम होण्याची वाट न पाहता एकट्यानेच प्रचाराला सुरुवात केली आहे. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सध्या त्यांच्या सभा सुरु आहेत. या सभांमध्ये ते पंतप्रधान मोदी आणि भाजपवर सडकून टीका करत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर सभा घेण्यात आली होती. त्यावेळीही प्रकाश आंबेडकर यांनी, ‘ आपण एकत्र असू किंवा नसू पण आपल्याला भाजपविरोधात लढायचे आहे’, असे वक्तव्यही केले होते.

आणखी वाचा

वंचितला नव्याने प्रस्ताव नाही, जो दिला त्यावर प्रकाश आंबेडकर चर्चा करतील; संजय राऊतांची स्पष्टोक्ती

अधिक पाहा..



Source link

भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव; पवार कुटुंबातील वादावर मिटकरींची…

भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव; पवार कुटुंबातील वादावर मिटकरींची…


Amol Mitkari On Shrinivas Pawar  : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar) वादात अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांची एन्ट्री झाली आहे. तर,  श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करत शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यावर आता अजित पवार गटाची देखील प्रतिक्रिया येतांना पाहायला मिळत आहे. तर,  भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव असून, शरद पवार गट भावनिक वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) केला आहे. 

श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या व्यक्तव्यावर बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, “आजपर्यंत श्रीनिवास पवार साहेब राजकीय क्षेत्रात दिसले नाही. ते त्यांचा व्यवसाय सांभाळत होते. पण, काही दिवसांपूर्वी अजितदादांनी भाष्य केलं होतं की, माझ्या परिवारातील काही लोक माझ्यासोबत नसतील, पण बारामतीतील जनता माझं परिवार असेल. श्रीनिवास पवार काटेवाडीमध्ये काल जे काही बोलले, ही जुनीच पद्धत आहे. घरात एकमेकांच्या विरोधात लोकांना उभं करायचं. एकमेकांच्या विरोधात सख्खे भावांना उभे करून, आपण निवडणूक जिंकू असे त्यांना वाटत असेल, तर हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे हे वरिष्ठांनी लक्षात घेतलं पाहिजे. बारामतीची जनता अजित पवारांचं कुटुंब आहे. अजित पवार आतल्या गाठीचे राजकारणी नसून, त्यांना डाव कपट जमत नाही. अजित पवारांच्या विरोधात त्यांच्या सख्ख्या भावाला उभं करण्याचा हा कुटील डाव असल्याचं अमोल मिटकरी म्हणाले. 

भावनिक वातावरणाचा कुठलाही फरक पडणार 

पुढे बोलतांना अमोल मिटकरी म्हणाले की, “आम्ही साहेबांच्या सोबत आहोत असे सांगून तुम्ही भावनिक वातावरण निर्माण करत आहात. मात्र, साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच आजपर्यंत अजित पवार घडले आहे. आतापर्यंत ज्या ज्या घडामोडी घडल्या किंवा 2019 मधील भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय साहेबांचाच होता. 2019 ला भाजपने पाठिंबा न मागता त्यांना शरद पवार पाठिंबा देऊ शकतात आणि आता तीच अधिकृत भूमिका घेतली असेल तर अजित पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात कशासाठी उभा करत आहे. त्याच्यामुळे हे भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भावनिक वातावरणाचा कुठलाही फरक पडणार नाही. अजित पवारांचा परिवार हा तेवढा पुरता नाही, त्यांच्या आईच्या पोटी आम्ही जन्माला आलो नसलो तरी वैचारिकदृष्टीने आम्ही त्यांच्यासोबत बांधील आहोत. आम्ही रक्ताचं पाणी करू, रात्रीचा दिवस करू, मात्र एवढेच प्रतिष्ठेची जागा तुम्ही करत असाल, तर आम्ही देखील सुनेत्रा पवार यांचा विजय खेचून आणणार असल्याचे मिटकरी म्हणाले. 

त्यांनी अलीकडेच राजकारणात एन्ट्री केली

श्रीनिवास पवार साहेब यांनी अलीकडेच राजकारणात एन्ट्री केली आहे. एवढे दिवस ते का बोलले नाही. सातबारा ज्येष्ठांच्या नावाचा आहे मान्य आहे, पण कर्तुत्व लागत असते. एखादाच्या वडिलाकडे चारशे एकर शेती असेल, तो सातबारा वडिलांच्या नावावर असेल. पण, त्या शेतीची मशागत करणारा त्यासाठी पात्र असेल तरच त्या शेतीला अर्थ आहे. शरद पवारांचा, यशवंतरावांचा वारसा अजित पवारांनी सांभाळला आहे हे श्रीनिवास पवारांनी मान्य केले पाहिजे. असे भावनिक विषय निर्माण करून जाणीवपूर्वक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्यात कोणतेही अर्थ नाही. जनता हुशार आहे. लोकसभेचे रणांगण जवळ आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या भूमिकेत दादांना राहावं लागेल. मात्र, सारथी ही जनता आहे. मग समोर द्रोणाचार्य असो की आणखी कुणी शकुनी मामा असो त्याचा नीतपात केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.

इतर महत्वाच्या बातम्या : 

भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही, अजित पवारांच्या सख्ख्या भावाने साथ सोडली; घरातून दुसरा मोठा विरोध!

अधिक पाहा..



Source link

अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; 26 एप्रिलला निवडणुकांची रणधुमाळी

अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; 26 एप्रिलला निवडणुकांची रणधुमाळी


Lok Sabha Election 2024लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रणधूमाळीत राज्यातील अकोला जिल्ह्यातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अकोला लोकसभा आणि अकोला पश्चिम विधानसभेच्या (Akola Lok Sabha Constituency) मतदानची प्रकिया येत्या 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात 3 लाख 28 हजार 76 एवढी मतदार आहे. तर त्याकरिता 307 मतदान केंद्रवर निवडणुकांची ही रणधुमाळी रंगणार आहे. या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून सर्व यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलीय.

पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केलीय. अकोला लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा आहे. ज्यामध्ये अकोट, बाळापुर, अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापुर, रिसोड या मतदारसंघाचा समावेश आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात 3 लाख 28 हजार 76 एवढी मतदार असून त्याकरिता 307 मतदान केंद्र असणार आहेत. तर लोकसभा मतदारांची संख्या 18 लाख 75 हजार 637 एवढी आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 70 हजार 663 तर महिला मतदार 9 लाख 4 हजार 924 एवढी असून इतर 50 मतदारांचा समावेश आहे. दरम्यान 18 ते 19 वयोगटातील 25 हजार 963 मतदार असून ज्यामध्ये 15 हजार 623 पुरुष आणि 10 हजार 339 महिला तर 1 इतर मतदार असल्याचीही माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिलीय. 

दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

आणखी वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा; 26 एप्रिलला निवडणुकांची रणधुमाळी

अकोला पश्चिम मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा; 26 एप्रिलला निवडणुकांची रणधुमाळी


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024)तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात 7 टप्प्यात, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. सोबतच संपूर्ण लोकसभा निवडणूकांचा महानिकाल 4 जून रोजी असेल. यात प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यात अकोला पश्चिम विधानसभा(Akola Lok Sabha Constituency) मतदारसंघासाठी पोटनिवडणुक होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

भाजप आमदार गोवर्धन शर्मा (Gowardhan Sharma) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे  (Election Commission of India) मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि आयुक्त सुखविंदर  संधू (Sukhbir Singh Sandhu ), ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar ) यांनी केलीय.

दुसऱ्या टप्प्यात पोटनिवडणुकीची घोषणा

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री गोवर्धन शर्मा यांच्या विजयाने तब्बल 29 वर्षांनंतर सत्ता मिळवण्यात यश आले होते. मात्र 4 नोव्हेंबर 2023 रोजी गोवर्धन शर्मा यांनी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाल्याने भाजपची मोठी राजकीय हानी झाली. त्यांच्या निधनाने हा मतदारसंघ रिक्त होता. तर त्यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षाही कमी कालावधी असल्याने पोटनिवडणूक होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. तर अनेक राजकीय पक्षानी संभाव्य पोटनिवडणुकीची शक्यता लक्षात घेता या मतदारसंघातून लढण्याची तयारी देखील सुरू केली होती. अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर  संधू , ज्ञानेश कुमार यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात येत्या 26 एप्रिलला पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. 

कोण होते आमदार गोवर्धन शर्मा ? 

गोवर्धन शर्मा यांचा जन्म 2 जानेवारी 1949 रोजी यवतमाळमधील पुसद तालुक्यात झाला. त्यांनी अकोल येथील एलआरटी वाणिज्य महाविद्यालयातून बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केले. 1985 ते 1995 पर्यंत अकोला नगरपालिकेत डाबकीरोड भागातून नगरसेवक म्हणून ते विजयी झाले. 1995 मध्ये पहिल्यांदा अकोला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांचा विजय झाला. जून 1995 ते 7 मे 1998 या कालावधीत युती सरकारमध्ये मनोहर जोशी यांच्या मंत्रीमंडळात पशु, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास खात्याचे ते राज्यमंत्री होते. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. 

1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असं सलग सहा वेळा अकोल्यातून ते भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. अकोला जिल्ह्यात आणि भाजपच्या वर्तुळात ‘लालाजी’ नावाने लोकप्रिय होते.  अतिशय साधं राहणीमान आणि लोकांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी त्यांची ओळख होती. लोकांशी थेट जनसंपर्क असल्याने सलग सहावेळा ते निवडणुकीच्या रिंगणात विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी कधीही चारचाकी किंवा फोनही वापरला नाही. त्यांच्या या राहणीमानाचं विशेष कौतुक केलं जायचं. 

संबंधित बातम्या

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp