मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही, अमरावतीतील पोस्टरबाजीने नवनीत राणांची डोकेदुखी वाढली

मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही, अमरावतीतील पोस्टरबाजीने नवनीत राणांची डोकेदुखी वाढली


Navneet Kaur Rana, Amravati Lok Sabha Constituency : अमरावती लोकसभा खासदार नवनीत राणा (Navneet Rana) पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, अमरावती लोकसभा मतदारसंघात अज्ञात लोकांनी “मोदीजी आपसे बैर नही,राणा तेरी खैर नही”,अशी पोस्टरबाजी करत नवनीत राणांची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. खासदार राणा (Navneet Rana) भाजपकडून निवडणूक लढणार, अशी माहिती अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरली. त्यानंतर सायंकाळी राणांविरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली. 

राणा यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस यांची भेट

नवनीत राणा (Navneet Rana) यांचे पती रवी राणा यांनी गुरुवारी नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. रवी राणा फडणवीस यांची भेट घेण्यासाठी तातडीने नागपूरला रवाना झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये ही भेट झाली होती. त्यावेळी दोघांमध्ये 2 तास चर्चा देखील झाली होती. दरम्यान, या भेटीमध्ये कोणती चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेले नसले तरी लोकसभा निवडणुकीबाबतचं ही भेट होती, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. 

अमरावतीच्या जागेबाबत शिंदेगट आग्रही

नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपला नेहमीच पाठिंबा दिला. शिवाय, आगामी लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवण्यासाठी त्या इच्छुक आहेत. मात्र, भाजपचे या मतदारसंघात काम नाही. राणा निवडून येण्यापूर्वी अमरावतीत शिवसेनेचं वर्चस्व होतं. शिवाय शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करुनच नवनीत राणा निवडून आल्या होत्या. त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेबाबत आग्रही आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांना ही जागा भाजपकडून लढवायची असल्याचे बोलले जात आहे. 

निवडून आल्यानंतर राणांचा नेहमीच भाजपला पाठिंबा 

खासदार नवनीत राणा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवणीत राणा राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे भाजपला पाठिंबा दिला. लोकसभेतही प्रत्येकवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. शिवाय, महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना त्यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे निवडून आल्यानंतर त्यांनी भाजप पुरस्कृत भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार का? हा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

ABP Majha C Voter Opinion Poll : उद्धव ठाकरेंची मशाल धगधगणार, शिंदे आणि अजितदादा दोघांना मिळून केवळ 6 जागाच मिळणार, एबीपी माझा आणि सी व्होटर्सचा ओपिनियन पोल काय सांगतो?

अधिक पाहा..



Source link

Navneet Rana : नवनीत राणा कमळ चिन्हावर लोकसभा लढणार? उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Navneet Rana : नवनीत राणा कमळ चिन्हावर लोकसभा लढणार? उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


Amravati News अमरावती : गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची (Amravati Lok Sabha Election 2024) जागा विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. एक महिला चेहरा म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याबाबत केंद्रीय पार्लमेंट बोर्डाकडून शिक्कामोर्तब झाल्याची खात्रीपूर्वक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा ह्या आगामी लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर उभ्या राहणार, अशी चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. मात्र, काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना तातडीने नागपूरला बोलावून घेतलं.

यावेळी दोन तास आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चर्चा झाली. ही चर्चा सकारात्मक झाली, इतकीच माहिती रवी राणा यांनी दिली असली तरी मिळालेल्या माहितीनुसार नवनीत राणा यांची भाजप कडून उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे.  

महिला चेहरा म्हणून नवनीत राणा यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. महाराष्ट्रात भाजप किती जागेवर लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची ही जागा भाजप घटक पक्ष म्हणून युवा स्वाभिमान पक्षासाठी सोडणार, की थेट राणा दाम्पत्य भाजपमध्ये प्रवेश करत भाजपच्या तिकिटावर ही लोकसभा लढवणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. परंतु, आमदार रवी राणा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल झालेल्या भेटीमुळे या चर्चाना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता बळावली आहे.

आमदार रवी राणा यांनी काल रात्री तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी नागपूरला रवाना झाले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात भेट झाली असून खासदार नवनीत राणा यांच्या भाजपा उमेदवारीवरून फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र याबाबत अधिक बोलणे आमदार रवी राणा यांनी टाळले असले तरी खासदार नवनीत राणा 2024 ची लोकसभा निवडणूक ही भाजपकडूनच लढवणार हे जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

माझी निवड म्हणजे अतिशय आनंदची गोष्ट- नवनीत राणा

याविषयी खासदार नवनीत राणा यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, मी रात्री काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांच्यात झालेल्या चर्चेत सहभागी नव्हती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल एकच सांगते,  ते नेहमी माझ्यासोबत राहतील. मी कमळावर लढणार की नाही हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा हे ठरवतील. कारण आई वडिलांवर शंका घेणं हे चुकीचं आहे. जर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ठरवलं तर मी शंका घेणार नसल्याचे नवनीत राणा  म्हणाल्या. महिला चेहरा म्हणून जर माझी निवड पंतप्रधान आणि अमित शहा यांनी केली असेल तर, माझ्यासाठी आणि अमरावतीसाठी ही अतिशय आनंदची गोष्ट असल्याचे सूचक विधान देखील त्यांनी केले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

मी कोरं पाकीट, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो; भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच

मी कोरं पाकीट, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो; भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत चंद्रकांत पाटलांचे सुतोवाच


Lok Sabha Election 2024: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा (Lok Sabha Election 2024) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजपकडून (BJP) राज्यातील 20 नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर उर्वरित जागांबाबतचा ‘सस्पेंस’ अद्याप कायम असून याबाबत विविध कयास लावण्यात येत आहे. अशातच भाजपच्या संभाव्य उमेदवारांबाबत मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मोठे विधान करत पक्षाने आदेश दिल्यास आपण निवडणूक लढणार असल्याचे सुतोवाच केले आहे.

यावेळी बोलतांना त्यांनी आपल्या खास शैलीत आपल्या उमेदवारी बाबत भाष्य केलंय. आपण कोरं पाकीट आहोत, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो. असं वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील  यांनी केलंय. ते अकोला येथे माध्यमांशी बोलत होते. सध्या कोल्हापूरमधून लोकसभेसाठी चंद्रकांत पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरूये. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला फार महत्व आलंय. पक्षाने उमेदवारी दिली तर लढणार असल्याची तयारी असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.

मी कोरं पाकीट आहे, जो पत्ता टाकला त्या पत्त्यावर पोहोचून जातो

नुकतीच भाजपने दुसरी यादी जाहीर केली आणि देशातील काही चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे. तर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रथमच लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर उर्वरित महाराष्ट्रतील काही जागांसाठी उमेदवार जाहीर न झाल्याने तेथील ‘सस्पेंस’ वाढला आहे. दुसऱ्या यादीत उमेदवार जाहीर न झाल्याने भाजपची भूमिका काय? याबाबत विविध अंदाज वर्तविण्यात येत आहेत. अशातच सध्या कोल्हापूरमधून सध्याचे विद्यामन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांना पक्षाने आदेश दिला तर आपण नक्की ही निवडणूक लढणार असल्याची तयारी दाखवली आहे.

‘त्या’ जागेबाबत घोषणा करण्याचीही गरज

दरम्यान, राज्यात मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत अनेक चर्चा रंगत असताना या बाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी याबद्दल आपल्याला माहीत नसल्याचे म्हणत बोलणे टाळले आहे. तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्न पुरस्काराबद्दल योग्यवेळी निर्णय होईल. त्याची संजय राऊतांनी काळजी करू नये, असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना लगावलाय. बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवारच लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यामुळे बारामतीत आगामी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा जंगी सामना रंगणार आहे. या बाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, बारामतीची जागा अजित पवारांना दिली आहे, त्यासाठी घोषणा करण्याचीही गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

BJP Candidate list: प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात भाजपने उमेदवार बदलला, कोण कोण रिंगणात?

BJP Candidate list: प्रकाश आंबेडकरांच्या अकोल्यात भाजपने उमेदवार बदलला, कोण कोण रिंगणात?


मुंबई: भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी बुधवारी महाराष्ट्रातील 20 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळाला महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर भाजपने यामध्ये आघाडी घेत आपल्या 20 उमेदवारांची नावे (BJP Candidate list) जाहीर केली आहेत. यामध्ये अकोल्यातून भाजपने अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये अकोल्यातून भाजपचे संजय धोत्रे (Sanjay Dhotre) निवडून आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संजय धोत्रे यांची प्रकृती खालावली आहे. अंथरुणाला खिळून असल्याने ते बराच काळ सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह हे अकोला दौऱ्यावर आले होते. तेव्हाही खासदार संजय धोत्रे हे अकोल्यातील भाजपच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे भाजप नेतृ्त्त्वाने संजय धोत्रे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना अकोल्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. 

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता अकोल्यात प्रकाश आंबडेकर विरुद्ध अनुप धोत्रे अशी हायव्होल्टेज लढत रंगणार आहे.  अकोल्यामध्ये अकोट, बालापूर, अकोला पश्चिमस, अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि रिसोड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे आता याठिकाणी कोण बाजी मारणार, हे आता पाहावे लागेल. सध्या प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची बोलणी करत आहे. या चर्चेअंती वंचित आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यास अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी मोठे बळ मिळणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना संजय धोत्रे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर 2014 मध्ये प्रकाश आंबेडकर अकोल्यातून तिसऱ्या स्थानावर होते. अकोला लोकसभा मतदारसंघ हा गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. केवळ 1999 मध्ये प्रकाश आंबेडकर भारिप बहुजन महासंघाच्या तिकीटावर अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर त्याची पुनरावृत्ती करणार का, हे आता पाहावे लागेल. 

कोण आहेत अनुप धोत्रे?

भाजपचे अकोला लोकसभा प्रमुख असलेल्या अनुप धोत्रे यांना वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी चालून आली आहे. पुण्याच्या सिंबायोसिस महाविद्यालयातून अनुप धोत्रे यांचे शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यांचे वडील संजय धोत्रे हे गेल्या अनेक वर्षांपासून अकोला लोकसभा मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राखून आहेत. अनुप धोत्रे यांच्याकडे आपल्या वडिलांप्रमाणेच संघटनकौशल्य आहे. त्यामुळे अकोल्यातील भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा चांगला संपर्क आहे. मात्र, या सर्वानंतरही त्यांची सर्व मदार ही त्यांचे वडील संजय धोत्रे यांच्या राजकी पुण्याईवर अवलंबून आहे. अनुप धोत्रे यांचा अकोला औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग समूह आहे. त्यात अनुप इंजिनीअरिंग वर्क्स, सोनल इंजिनीअरिंग वर्क्स, नकुल इंडस्ट्रीज, स्प्रिंकलर सेट, एचडीपीई पाईप्स उत्पादन, रेपोल प्लास्टिकसाठी, थर्मल पॉवर प्लांटसाठी जॉब वर्क, अन्न प्रक्रिया युनिट, बांधकाम आणि शहरी भू-विकास आदींचा त्यात समावेश आहे.

भाजपने महाराष्ट्रातील 4 उमेदवारांचं तिकीट कापलं

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांच्या यादीत 4 बड्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीडमधून प्रीतम मुंडे, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, ईशान्य मुंबईतून मनोज कोटक आणि जळगावमधून उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी बीडमध्ये पंकजा मुंडे, उत्तर मुंबईतून पियूष गोयल, ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा आणि जळगावमधून स्मिता पाटील यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.

आणखी वाचा

भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

अधिक पाहा..



Source link

मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड शांत ठेवावं, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर हल्लाबोल

मोठी माणसं बोलत असताना आपलं तोंड शांत ठेवावं, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर हल्लाबोल


Akola News अकोलाशरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कधीही राष्ट्रीय नेता होण्याचा प्रयत्न करू नये. आमच्या राष्ट्रवादी पक्षात अजित पवार  (Ajit Pawar) आणि तिकडे शरद पवार (Sharad Pawar) याबाबत निर्णय घेण्यासाठी समर्थ आहेत. त्यामुळे दोन मोठ्या माणसांच्यामध्ये आपण आपलं तोंड शांत ठेवलेलं कधीही चांगले असल्याचा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) रोहित पवरांना दिला आहे. 

अजित पवार गटाचे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. अशातच सोमवारी सकाळपासून निलेश लंके हे आजच शरद पवार गटात घरवापसी करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांनी याबाबत कोणतेही ठोस भाष्य न करता या प्रकरणातील सस्पेन्स कायम ठेवला आहे. या प्रकरणावर बोलतांना आमदार रोहित पवार यांनी निलेश लंके यांनी लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि जर का ते पुन्हा  शरद पवार साहेबांकडे येणार असतील तर, आम्ही त्यांचे स्वागतच करणार असल्याचे रोहित पवार म्हणाले आहे. यावरून आता अमोल मिटकरींनी रोहित पवरांना खडे बोल सुनावले आहे. 

निलेश लंके यांना अजितदादांनी पाठबळ दिलंय

स्वत: शरद पवार साहेबांनीच या चर्चेचं आज खंडन केलंय. त्यामुळे आज किंवा उद्या त्यांच्या पक्षप्रवेशाचं कुठेही काही दिसत नाहीये. लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत, असं गेल्या काही दिवसापासूनच्या चर्चा मी देखील ऐकतोय. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना अजितदादांनी मोठे पाठबळ देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मला तरी असं वाटतेय लंके साहेब तिकडे जाणार नाही, असा विश्वास अमोल मिटकरींनी  बोलतांना व्यक्त केलाय. 

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

निलेश लंके पुन्हा तुमच्या पक्षात प्रवेश करणार आहेत का, असा प्रश्न सोमवारी सकाळच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांना विचारण्यात आला होता. परंतु, त्यावेळी शरद पवार यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगितले. या सगळ्या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंके यांना पुन्हा आमच्या पक्षात घेण्याची चर्चा एकदम कशी काय सुरु झाली? आमच्या पक्षात येण्यासाठी निलेश लंके यांच्यासारखे अनेक लोक इच्छूक आहेत. मग त्यांना विचारलं नसतं का? निलेश लंके यांचा आज आमच्याकडे पक्षप्रवेश आहे, हे मलाच माहिती नाही. मी तुमच्याकडूनच ही गोष्ट ऐकतोय, असे शरद पवार यांनी म्हटले होते.

परंतु, त्याच्या काहीवेळानंतरच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश लंके यांनी सोमवारी सकाळी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेतली. याठिकाणी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड काहीवेळ चर्चा झाली. या चर्चेचा नेमका तपशील अद्याप समजू शकलेला नाही. परंतु, या भेटीनंतर अमोल कोल्हे यांनी, ‘निलेश लंके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येतील’, असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे निलेश लंके यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशाविषयीचा सस्पेन्स आणखीनच वाढला आहे.

आणखी वाचा

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी! गडकरींना अडकवण्याचा भाजपच्या लोकांकडून कट रचला जातोय; आंबेडकरांचा गौप्यस्फोट

मोठी बातमी! गडकरींना अडकवण्याचा भाजपच्या लोकांकडून कट रचला जातोय; आंबेडकरांचा गौप्यस्फोट


Prakash Ambedkar On Nitin Gadkari : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) भाजपाच्या (BJP) पक्षांतर्गत सत्तासंघर्षावर एक मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपमधील काही लोकांना नितीन गडकरींची (Nitin Gadkari) अडचण होत आहे. त्यामूळे ते गडकरींना बाजूला करण्याचा घाट घालतायेत. मात्र, गडकरी बाजूला व्हायला तयार नसल्याने, त्यांना अडकवण्याचा कट भाजपाचे काही लोकं रचत असल्याचा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. यासाठी नागपुरातील काही अधिकाऱ्यांना पकडत त्यांच्याकडून गडकरींनी लाच मागितल्याचे वदवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. ते काल रात्री अकोल्यात मुस्लिम समाजाच्या एका बैठकीत बोलत होते. 

याच बैठकीत त्यांनी मुस्लिम समाजालाही उपदेशाचे खडे बोल सुनावलेत. मुस्लिम समाजाने कानात सांगणाऱ्यांचं ऐकायचं बंद करावं. यासोबतच या निवडणुकीत तुम्ही मुस्लिम म्हणून मतदान केलं तरच टीकू शकाल असा इशारा दिलाय. असं केलं नाहीय तर पुढच्या काळात तुमच्या नशिबात पुन्हा गोध्रा, अखलाख आणि पॅलेस्टाईनसारखी परिस्थिती येईल असा इशारा आंबेडकरांनी दिलाय. 

आपणच सिकंदर ठरणार 

महाविकास आघाडीच्या आपसातील जागा वाटपाच्या शक्यतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दरम्यान, आपण हारलो किंवा जिंकलो तरी आपणच सिकंदर ठरणार असल्याचं सांगत आंबेडकरांनी त्यांच्या भूमिकेविषयी आणखी संदिग्धता वाढवलीय. 

वायकरांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला.

काही दिवसातच निवडणुकीचे दिवस सुरू होतायेत. ही साधी निवडणुक नाही. संविधान बदलाचं आणि मुस्लिमांना लक्ष्य करण्याची सुरूवात आता होईल. गोळवलकरांच्या एका पुस्तकावर हे सरकार चालतंय. रवींद्र वायकर यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहायचा खूप प्रयत्न केला. मात्र, जेव्हा पलीकडून फास आवळला गेला तेव्हा त्यांना पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर राहिला नाही. त्यामुळे ते शिंदे गटात गेले. मला वाटतं महाविकास आघाडी होण्यात मोठ्या अडचणी आहेत. पंधरा जागांवर तीनही पक्षांची भांडणं आहेत. 14 तारखेपर्यंत त्यांची भांडण सुटली तरच आमच्याशी वाटाघाटी होऊ शकेल. तसेच आम्ही दिल्या तेवढ्या जागा लढू, असेही आंबेडकर म्हणाले. 

मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव…. 

मॉब लिंचिंगपासून आपल्याला वाचायचं असेल, तर त्याच गर्दीशी मैत्री करा. त्या गर्दीचा एक भाग व्हा, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करा, त्यामुळे मॉब लिंचिंगची वेळ येणार नाही. देशात दलित आणि आदिवासींची जेवढी ताकद आहे, तेवढीच मुस्लिमांची आहे. मात्र, मुस्लिम आपली ताकद ओळखत नाही हेच त्यांचे दुर्दैव आहे. तुम्ही जागे झाले नाही, तर पुन्हा एक नवीन गोधरा, अखलाक किंवा फिलिपिन्स होईल हे लक्षात ठेवा, असे आंबेडकर म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

BJP Candidate list 2024 : मोदी सरकारकडून पहिल्या यादीत 34 मंत्र्यांना उमेदवारी जाहीर, पण नितीन गडकरींचे नाव घोषित नाही!

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp