राज्यातील 11 लोकसभेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असल्याचा अमोल मिटकरींचा दावा; अमित शाह करणार ‘त्या’ प्रस्तावावर शिक्कामोर्तब?

राज्यातील 11 लोकसभेच्या मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद असल्याचा अमोल मिटकरींचा दावा; अमित शाह करणार ‘त्या’ प्रस्तावावर शिक्कामोर्तब?


Amol Mitkari अकोला: देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या सगळ्यात आता नेमका कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार, हे अंतिम यादी जाहीर झाल्यावरच त्याबाबतचा शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज्यातील लोकसभेच्या 11 मतदारसंघात आपली ताकद असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या 11 जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी त्यांनी अमित शाहांकडे (Amit Shah) केली असल्याचे देखील ते म्हणाले आहे. 

या 11 जागामध्ये  बारामती, सातारा, रायगड, माढा, परभणी, गडचिरोली, बुलढाणा, दिंडोरी, शिरूर, धाराशिव आणि माढा या जागांचा समावेश असल्याचं मिटकरी म्हणालेय. त्यामूळे भाजपा आणि राष्ट्रवादीत जागावाटपावरून आणखी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, रोहीत पवारांची भाजपसोबत जाण्यासाठीची शपथपत्र आमच्याकडे असल्याचा दावा पुन्हा एकदा बोलून दाखवला आहे.

आमच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब?

महायुतीतील जागा वाटपासंदर्भात दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बोलणी सुरू आहे. आम्हाला नक्कीच सन्मानजनक जागा मिळतील. असा विश्वास अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने 11 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलाय, त्या ठिकाणी आमची मोठी ताकद असल्याने या 11 जागा आम्हाला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही अमित शाहांकडे केली असल्याचे देखील ते म्हणाले. या संबंधित प्रस्ताव आमचा महायुतीकडे असून यावर अमित शाहा लवकरच शिक्कामोर्तब करतील. सोबतच आचारसंहितापूर्वी महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय लागलेला असेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणाले. 

शिरूरसाठी दादा जो उमेदवार देतील तोच अंतिम 

येत्या काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील. यासाठी सर्वच राजकीय पक्ष जोमाने तयारी करत आहे. निवडणुकांपूर्वीच शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला आहे. शिरूर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao) इच्छुक असल्याची जोरदार चर्चा असताना आज त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या दिलीप मोहितेंची आढळरावांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत आपापसातील वैर संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आढळरावांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा नाराजीचा सूर अद्याप कायम आहे. याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की, शिरूरसाठी बरेच लोक आमच्या संपर्कात आहे. ज्यामध्ये विलास लांडे, आढ़ळराव पाटील आणि नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा आहे. असे असले तरी, आजितदादा जो उमेदवार शिरूरसाठी देतील तोच उमेदवार अंतिम असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. 

आणखी वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून संपवले जीवन

15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल; शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून संपवले जीवन


Akola News अकोला : अकोल्यात (Akola News) एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेत आपलं जीवन संपवलंय. 15 वर्षीय अल्तमेश बेग इम्रान बेग असं या आत्महत्या (Suicide) करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. दोन शालेय शिक्षकांच्या मानसिक जाचाला आणि त्यांनी केलेल्या मारहाणीतून आत्महत्या (Suicide) सारखं टोकाचं पाऊल अल्तमेशनं उचलल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलाय. ही घटना अकोला (Akola) शहरातील खदान परिसरात राहणाऱ्या अल्तमेशच्या राहत्या घरी घडली असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

15 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

अल्तमेश हा इयत्ता 9 वीचा विद्यार्थी असून त्याची याच परिसरात गुरुनानक विद्यालय नावाने शाळा आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे अल्तमेश काल शाळेत गेला असता, काही किरकोळ कारणांवरून शाळेतील दोन महिला शिक्षकांनी त्याला बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्याला शाळेतून निलंबित करण्याचीही धमकी देण्यात आली. या धमकीने भयभीत झालेल्या अल्तमेश सायंकाळी घरी परतला आणि स्वत:ला एका खोलीत डांबून घेतले. त्यानंतर याबाबत त्याला विचारणा केली असता, त्याने  शाळेत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. तेव्हा आई-वडिलांनी याकडे फार लक्ष न देता त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. 

शिक्षकांकडून मारहाण आणि मानसिक जाचाला कंटाळून संपवले जीवन

त्यानंतर बराच वेळ अल्तमेश त्याच त्या विचारत असतांना तो प्रचंड मानसिक तणावात गेला, परिणामी, सायंकाळी त्याने आपल्या राहत्या घरातीलचं वरच्या खोलीमध्ये अभ्यासासाठी जातो असं सांगून खोलीत गेला. त्यानंतर रात्री बराच वेळ झाल्यावरही तो खाली जेवणासाठी न आल्यानं घरचे लोक त्याच्याकड गेले. पण त्यावेळी त्यांना आपला मुलगा फासावर लटकतांना दिसला. हे दृश्य बघून कुटुंबियांना जबर धक्का बसला. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर  खदान पोलिसांनी घटनास्थाळ गाठत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.  

पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच गुरुनानक शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर या प्रकरणाचे नेमके कारण काय हे देखील तपासले जाणार असल्याची माहिती खदान पोलिसांनी दिलीय. मात्र, किरकोळ कारणावरून ही आत्महत्येची घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

…तर बैठका आणि चर्चेतून ‘वंचित’ला दूर का ठेवले? जवाब दो! महाविकास आघाडीसोबतच्या जागावाटप तिढ्यावर वंचितची हटके बॅनरबाजी

…तर बैठका आणि चर्चेतून ‘वंचित’ला दूर का ठेवले? जवाब दो! महाविकास आघाडीसोबतच्या जागावाटप तिढ्यावर वंचितची हटके बॅनरबाजी


Akola News : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा (Maharashtra Maha Vikas Aghadi Seat Sharing)अद्याप सुटला नसून वंचितला किती जागा द्यायच्या यावरून घोडं अडल्याची चर्चा आहे. शिवाय वंचितला किती जागा द्यायचा, यावरुनही महाविकास आघाडीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचे देखील वंचितच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. असे असतांना आता या जागा वाटपाच्या तिढ्यावरुन अकोल्यात (Akola News) हटके बॅनरबाजी करत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

… तर  बैठका आणि चर्चेतून ‘वंचित’ला दूर का ठेवले? जवाब दो!

अकोलेकरांच्या नावाने महाविकास आघाडीला सवाल करणारे अनेक बॅनर शहरभर लावण्यात आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला उधाण आले आहे. महाविकास आघाडी जर वंचित बहुजन आघाडीसोबत आहे, तर 2 फेब्रुवारीपासून 27 फेब्रुवारीपर्यंत अंतर्गत बैठका आणि चर्चेतून ‘वंचित’ला दूर का ठेवले?  30 जानेवारीच्या बैठकीत वंचितच्या प्रतिनिधीला बैठकीचे बाहेर का बसवले?, महाविकास आघाडी जर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे, तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना आपले उमेदवार म्हणून घोषित का करत नाही? असे अनेक प्रश्न या बॅनरच्या  माध्यमातून मविआला विचारल्या गेले आहेत.

शहरातील नेहरू पार्क, अशोकवाटीका, कृषीनगर, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, बॅनर लावणारे कोण?, तसेच हे बॅनर कोणाच्या आदेशावरून लावण्यात आले, या बाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आलेली नाही. मात्र या हटके बॅनरबाजीची सर्वत्र चर्चा रंगतांना दिसत आहे. 

नेमका बॅनरबाजीतील आशय काय ?

  • 30 जानेवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधीला बाहेर बसवले.
  • 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीच्या सर्व बैठका आणि चर्चेपासून दूर ठेवले गेले.
  • वंचित बहुजन आघाडीला जाणीवपूर्वक हरणाऱ्या 2 जागा दिल्या. ज्या मविआमधील कोणत्याच पक्षाने गेल्या 10-15 वर्षांपासून स्वतः कधीच जिंकलेल्या नाहीत.
  • महाविकास आघाडी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला योग्य मान सन्मान का देत नाही ?
  • अकोलाकरांचा सवाल..महाविकास आघाडी जर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आहे, तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांना आपले उमेदवार म्हणून घोषित का करत नाही? जवाब दो !

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

कुठे तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद, कुठे मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी; महाशिवरात्रीनिमित्त विदर्भातील शिवमंदिरे गजबजली  

कुठे तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद, कुठे मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी; महाशिवरात्रीनिमित्त विदर्भातील शिवमंदिरे गजबजली  


Mahashivratri 2024 : महाशिवरात्री (Mahashivratri 2024) हा हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र असा सण आहे. आज, 8 मार्च रोजी हा सण देशभर मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत आहे. देशभरातील सर्व शिवमंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून तमाम शिवभक्तांची मोठी गर्दी मंदिरांमध्ये झाल्याचे बघायला मिळत आहे. अशातच विदर्भातील (Vidarbha)अनेक शिवमंदिरात भाविकांच्या गर्दीने गजबजली असल्याचे चित्र आहे. त्यात कुठे तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद म्हणून वितरित करण्यात येत आहे. तर कुठे महाशिवरात्रीच्या पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे.    

तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ प्रसाद

बुलढाणा जिल्ह्यातील 350 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पळशी झाशी येथील श्री शंकर गिरी महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी गावातील शिवमंदिरात  दरवर्षी महाशिवरात्रीचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो.  विशेष म्हणजे या ठिकाणी महाशिवरात्रीचा प्रसाद म्हणून तब्बल साडेनऊ क्विंटलचा महारोठ तयार करण्यात येतो. परिसरात या महारोठाला फार मोठे महत्त्व असून या महारोठ तयार करण्याची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू झालेली आहे. 

साडेतीनशे वर्षांपूर्वी शंकरगिरी महाराज तपश्चर्य करत असताना त्यांना अनुभूती झाली की, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पळशी झाशी गावात एक स्वयंभू शिवलिंग आहे . साडेतीनशे वर्षांपूर्वी शंकरगिरी महाराज हिमालयातून या गावात आलेत आणि त्यांनी या स्वयंभू पिंडीचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी मंदिर बांधले. तेव्हापासून या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या ठिकाणी बनवण्यात येणाऱ्या महारोठाची राज्यभर चर्चा असून भाविक या महारोठाचा प्रसाद वर्षभर आपल्या घरात ठेवतात आणि अनेक व्याधींवर हा प्रसाद औषध म्हणून त्याचा वापर करत असल्याची देखील भाविकांची श्रद्धा आहे.

गोंदियातील 270 वर्ष पुरातन पंचमुखी शिव मंदिर

गोंदिया जिल्ह्यातील नागरा येथे 270 वर्ष पुरातन काळातील पंचमुखी शिव मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्री निमित्त या नागराधाम मंदिरात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी येत असतात. महाशिरात्रीच्या पूर्वसंध्येपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागल्याचे बघायला मिळाले. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की,  या मंदिराची बांधकाम शैली आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धेमुळे इतर वेळी देखील भविकांचा कायम राबता असतो. 

अमरावतीच्या गडगडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी

महाशिवरात्रीनिमित्त अमरावती शहरातील अतिशय पुरातन असलेल्या गडगडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. या मंदिराला 250 वर्ष पुरातन इतिहास लाभला असून शहरातील तमाम नागरिकांचे ते श्रद्धास्थान आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वर्षभर दररोज सकाळी महाअभिषेक होतो आणि महाशिवरात्री निमित्ताने पहाटे 3 ला पूजा झाल्यानंतर विशेष अभिषेक करण्यात येतो. आज पहाटेपासून मंदिरात दर्शनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे. 

विदर्भाची काशी असलेल्या कोटेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या वर्धा नदीच्या तीरावर वसलेले कोटेश्वर हे हेमाडपंथी शिव मंदिर आहे. विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या या  कोटेश्वर शिव मंदिरात काल मध्यरात्री पासूनच भक्तांची मोठी गर्दी जमली आहे. कोटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने यात्रेला देखील प्रारंभ झाला असून येथील उत्तरवाहिनी नदी आणि निसर्गरम्य वातावरणात भक्त येथे पोहचत कोटेश्वर महादेवाचे दर्शन घेत आहे. कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी अशी या कोटेश्वर महादेव मंदिराची आख्यायिका आहे.

पाच नद्यांच्या संगमावर वसलेलं आंभोरा येथील शिवमंदिरात

भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथील वैनगंगा नदीसह पाच नद्यांच्या संगमावरील अंभोरा येथील टेकडीवर महादेवाचे  मंदिर आहे. चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात आंभोरा येथील शिवमंदिराचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी रिघ लागल्याचे बघायला मिळत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

भाजप अजितदादांना एक अंकी जागा देणार? अमोल मिटकरी म्हणाले, आमच्या ‘इतक्या’ जागा फिक्स ठरल्या

भाजप अजितदादांना एक अंकी जागा देणार? अमोल मिटकरी म्हणाले, आमच्या ‘इतक्या’ जागा फिक्स ठरल्या


अकोला: राज्यात महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना (Ajit Pawar) भाजप एक अंकी जागा देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 ते 13 दरम्यान लोकसभेच्या जागा (Lok Sabha Election) मिळणार असल्याचा दावा आमदार मिटकरी यांनी केला. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते. 

निलेश लंके अजितदादांना सोडून जाणार नाहीत

नगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नसल्याचं आमदार मिटकरी म्हणाले. त्यांना अजितदादांनी अधिकाधिक विकास निधी दिला आहे, त्यामुळे ते नाराज नसल्याचं आमदार मिटकरी म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलेश लंके शरद पवारांसोबत जाणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यावर अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण दिलं.

अमोल कोल्हे यांनी नथूराम गोडसेचीही भूमिका केली

अजित पवारांवर सातत्याने जहरी टीका करणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हेंवर आमदार मिटकरींनी जोरदार शरसंधान केलंय. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेचीही भूमिकाही केल्याची आठवण आमदार अमोल मिटकरी यांनी करून दिली. पुढच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांची अजित पवारांवरील कोणतीही टीका सहन करणार नसल्याचा इशारा आमदार मिटकरींनी यावेळी दिला. . 

अमोल मिटकरी काय म्हणाले? 

– राज्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीला 10 ते 13 दरम्यान लोकसभेच्या जागा मिळणार. 
– राज्यात महायुतीत शिंदे आणि अजित पवारांना भाजप एक अंकी जागा देणार असल्याच्या चर्चामध्ये कोणतेही तथ्य नाही. 
– आमदार निलेश लंके हे अजित पवारांना सोडून कुठेही जाणार नाहीत. 
– त्यांना अजितदादांनी अधिकाधिक विकास निधी दिल्यामुळे ते नाराज नसतील. 
– छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेचीही भूमिकाही केली. 
– पुढच्या काळात डॉ. अमोल कोल्हे यांची अजित पवारांवरील कोणतीही टीका सहन करणार नाही.

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात

राज्यातील महायुतीच्या जागावाटपाची अंतिम टप्प्यात असून दोन दिवसात त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये भाजपने 32 जागा लढवण्याची तयारी केल्याचीही चर्चा असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक अंकी जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना  शंका

Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना शंका



<p>Akola Amit Shah Visit : ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी पोलिसांना &nbsp;शंका अकोल्यातील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं. शहरप्रमुख राजेश मित्रांसह अनेक कार्यकर्ते स्थानबद्ध झाले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी स्थानबद्धतेची कारवाई सुरु आहे. ठाकरे गटाचे कार्यकर्ते अमित शाहांचा विरोध करतील अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे.</p>



Source link

YouTube
Instagram
WhatsApp