संभाजीनगर पाठोपाठ अकोल्यात अमित शाहांच्या सभेच फाडले बॅनर; अद्याप कारण अस्पष्ट

संभाजीनगर पाठोपाठ अकोल्यात अमित शाहांच्या सभेच फाडले बॅनर; अद्याप कारण अस्पष्ट


Amit Shah Maharashtra अकोला :  गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)) पार्श्वभूमीवर शाहा राज्यातील 15 लोकसभा मतदारसंघांतील तयारीचा आढावा घेणार आहे. दरम्यान, अमित शाहा आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. मात्र, अमित शहांच्या या दौऱ्याला आता विरोधाची किनार लागल्याचे देखील बघायला मिळत आहे. आज सकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी (Maratha Protestors)अमित शाह यांची स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडल्याची घटना ताजी असतांना आता अकोला येथे देखील अशाच प्रकारे बॅनर फाडल्याची माहिती समोर आली आहे.  

अज्ञातांनी फाडले अमित शहांच्या स्वागताचे बॅनर 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या नियोजित महाराष्ट्रात दौऱ्याच्या निमित्याने उद्या 5 मार्च रोजी अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार आहे. यात विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहे. दरम्यान, भाजपच्या वतीने अमित शाहाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली असून शहरात अनेक ठिकाणी शाहाच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, ज्या ठिकाणी ही बैठक पार पडणार आहे, त्या बाळापूर रोडवरच्या तुषार सेलिब्रेशन हॉल आणि रिधोरा गावाजवळ अमित शहांच्या स्वागताचा लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञातांनी फडले आहे. अमित शाह हे उद्या बाळापुर रोडवरच्या हॉटेल ग्रँड जलसा येथे साधणार सहा लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे. अशातच आता अमित शहांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. 

मराठा आंदोलकांनी फाडले शाहांच्या सभेच बॅनर 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून, त्यात आता अमित शाह यांची भर पडली आहे. नुकताच गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या दौरा केला असतांना, आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा होत आहे. दरम्यान, शाहाच्या दौऱ्याला काही स्थानिकांकडून कडाडून विरोध होतांना दिसत आहे. छत्रपती संभाजीनगर उद्या होणाऱ्या सभेसाठी लावण्यात आलेले बॅनर मराठा आंदोलकांनी फाडले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन केले जाऊ देत नाही. त्यामुळे आमच्या गावात देखील  बॅनर लावतांना ग्रामपंचायतची परवानगी घ्यावी, अन्यथा बॅनर लावू देणार नाही. असे म्हणत मराठा आंदोलकाने शाह यांच्या सभेचे बॅनर फाडले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

Akolha Bhang : अकोल्यात चॉकलेटच्या रॅपरमधून चक्क भांग विक्री

Akolha Bhang : अकोल्यात चॉकलेटच्या रॅपरमधून चक्क भांग विक्री



<p>अकोल्यात भांग विक्रीचा एक अजबच प्रकार समोर आलाय.. चक्क चॉकलेटच्या रॅपरमधून भांग विक्री होत असल्याचं समोर आलंय. समाजसेवक विनय सरनाईक यांच्या निदर्शनास हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी हा सगळा प्रकार उघकीस आणला. सरनाईक हे न्यायालयीन कामानिमित्त अकोला न्यायालयात जात असताना लहान शाळकरी मुलांच्या हातात हे चॉकलेट दिसले, ते वेगळे चॉकलेट थोडा आगळंवेगळं असल्याने चॉकलेटची तपासणी केली. त्यात चक्क शाळकरी मुलांच्या चॉकलेट रॅपरमध्ये भांग दिसून आली. हा सगळा प्रकार अतिशय धक्कादायक असून याकडे संबंधित विभागानं तसेच पोलीस प्रशासनानं लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.&nbsp;</p>



Source link

Akola :  तुम्ही पित असलेल्या दूधात होतेय भेसळ? म्हशीच्या दुधात भेसळ, अकोल्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ

Akola :  तुम्ही पित असलेल्या दूधात होतेय भेसळ? म्हशीच्या दुधात भेसळ, अकोल्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ


Akola : आपल्या दैनंदिन जीवनात दुधाचा (Milk) वापर हमखास होतो. उत्तम आरोग्य आणि शरीरासाठी दूध पिणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? तुम्ही पित असलेल्या दुधामध्ये चक्क भेसळ केली जात आहे. म्हशीच्या दुधात भेसळ करत असल्याचा एक व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागला आहे. अकोल्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

 दूध उत्पादकाची आयडिया, नागरिकांच्या जीवाशी खेळ

गाय-म्हशीचं दूध आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. म्हशीच्या दूधाचं उत्पादन कमी झाल्याने दुधाचा तुटवडा झाल्याने घरोघरी दूध पोहचवणाऱ्या एका दूध उत्पादकाने चक्क म्हशीच्या दुधाच्या कॅनमध्ये पाकीटच्या दूधाची भेसळ करतांनाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडिओतून दूध भेसळीचा संपूर्ण प्रकार दिसून येत आहे. हा संपूर्ण प्रकार अकोला शहरातल्या मोठी उमरी भागात घडलाय. हा दूध भेसळीचा प्रकार उमरी भागातील एका हॉटेलवर सुरू होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरु असल्याचं समोर आलं आहे.

 

मुंबईकरांनो दूध पिताना सावधान

मुंबईमध्येही असाच प्रकार उघडकीस आला होता, दुधात भेसळ होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं समोर आलं होतं. मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार सुरू होता. पोयसर परिसरात गुन्हे शाखेने छापेमारी करुन 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. जवळपास 235 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आला होता. त्याचबरोबर भेसळ करण्यासाठी लागणारे साहित्यही यूनीट 12 व अन्न व सुरक्षा विभागाने जप्त केले होते.

 

आजवरची सर्वात मोठी कारवाई

नाशिकच्या सिन्नरमध्ये तर धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आजवरची सर्वात मोठी कारवाई होती. सिन्नर तालुक्यातील ओम सद्गुरु या दूध संकलन करणाऱ्या केंद्रावर छापा टाकत ही कारवाई करण्यात आली होती,  जिल्हा प्रशासन पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्तिक कारवाई करत लाखो लिटर भेसळयुक्त दूध नष्ट केलं होतं, मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोडा यापासून हे भेसळयुक्त दूध बनवलं जात होतं. या कारवाईत रासायनिक मिल्क लिस्ट पावडर आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कास्टिंग सोड्याचा मोठा साठाही मिळून आला होता, नाशिक जिल्ह्यात भेसळयुक्त दूध मोठ्या प्रमाणात येत असल्याचा संशयावरून जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत पोलीस आणि अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने ही धडक कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दूध संकलन केंद्र चालकासह या केंद्राला रासायनिक पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या विरोधातही सिन्नर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

 

हेही वाचा>>>

Akola : शाळकरी मुलांच्या चॉकलेट मध्ये भांग, रॅपर मधून भांग विक्रीचा अजब प्रकार, अकोल्यातील धक्कादायक घटना

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी! अमित शाह आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; संभाजीनगरात जाहीर सभा

मोठी बातमी! अमित शाह आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर; संभाजीनगरात जाहीर सभा


Amit Shah Visit Maharashtra : भाजपचे राष्ट्रीय नेते तथा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसीय महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्र राज्यातील दौरे वाढले असून, त्यात आता अमित शाह यांची भर पडली आहे. नुकताच गेल्या आठवड्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या दौरा केला असतांना, आता अमित शाह महाराष्ट्राचा दौरा होत आहे. दरम्यान शाहा आपल्या या दौऱ्यात अकोला, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे.

अमित शाह आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात 5 मार्च रोजी अकोला येथे क्लस्टरच्या बैठकीला हजर राहणार, तसेच जळगावमध्ये युवासंमेलनाला देखील अमित शाह उपस्थित राहणार आहे. यासोबतच छत्रपती संभाजीनगर शहरात शाह यांची जाहीर सभा देखील होणार आहे. 

अमित शाहांचा संभाजीनगर दौरा….

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे 4 आणि 5 मार्च रोजी संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ज्यात सोमवार 4 मार्च रोजी रात्री 10 वाजून 10 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे आगमन व हॉटेल राम इंटरनॅशनल कडे रवाना व मुक्काम करतील. दुसऱ्या दिवशी 5 मार्च रोजी सकाळी 10. 35 वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने अकोलाकडे रवाना होतील. अकोला व जळगाव येथील नियोजित कार्यक्रम आटोपून सायंकाळी 5.40 मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळ येथे हेलिकॉप्टरने आगमन व हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे आगमन व राखीव असेल. सायंकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथून मोटारीने  क्रांती चौककडे प्रयाणकरतील. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण, तेथून मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्वरकडे प्रयाण करतील. सायंकाळी सहा वाजून 35 मिनिटांनी सभेस उपस्थिती व संबोधन करतील. सायंकाळी 7.30 मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावरुन मोटारीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण. सायंकाळी 7.45 मिनिटांनी विमानाने मुंबईकडे रवाना होतील.

अकोला, जळगाव जिल्ह्याचाही दौरा…

विदर्भातील 6 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शाह मंगळवारी अकोल्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. दुपारी 1 वाजता बैठक आटोपून ते जळगावच्या सभेसाठी रवाना होणार आहे. जळगाव येथे त्यांची जाहीर सभा होणार असून, सायंकाळी 6 वाजता छत्रपती संभाजीनगरला मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची दुसरी सभा होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Rahul Gandhi Visit Kalaram Temple : मोदींनंतर आता राहुल गांधीही काळाराम मंदिराला भेट देणार; असा असणार दौरा…

अधिक पाहा..



Source link

प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार?

प्रकाश आंबेडकरांकडून लोकसभेच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर; मविआशी युतीची बोलणी फिस्कटणार?


अकोला: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महाविकास आघाडी  आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार की नाही, याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये लोकसभेच्या जागावाटपाची (Loksabha Election 2024) बोलणी सुरु असल्याच्या बातम्याही अधुनमधून येत होत्या. मात्र, मविआ आणि वंचितचे (VBA) जागावाटपाचे सूत्र निश्चित होऊ शकले नव्हते. परंतु, आता प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी परस्पर लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. त्यामुळे आता वंचित आणि मविआतील बोलणी फिस्कटल्याचे दिसत आहे. आता मविआला प्रकाश आंबेडकरांची मनधरणी करण्यात यश न मिळाल्यास 2019 प्रमाणे वंचित बहुजन आघाडी पुन्हा ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत दिसेल.

प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या कोणत्या जागांवर उमेदवार जाहीर केले?

प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभेच्या तीन जागांवरील वंचितचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये अकोल्यातून स्वत: प्रकाश आंबेडकर लढतील. तर वंचितकडून वर्धा येथे प्रा. राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मविआचे नेते हे परस्पर झालेले जागावाटप मान्य करुन वंचितला आपल्यात सामावून घेणार का, हे पाहावे लागेल. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीशी युती होणार का, असा प्रश्नही पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, आम्हीदेखील त्याबाबत अद्याप संभ्रमात आहोत. आम्ही मविआचा भाग आहोत किंवा नाही, हेच आम्हाला कळत नाही, अशी टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मविआसोबत जुळलं नाही तर पुढचं काहीच सांगू शकत नाही: प्रकाश आंबेडकर

आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती मविआकडे दिली.  मविआने 15 जागा ओबीसी आणि 3 अल्पसंख्याकांना द्यावा. माध्यमांमध्ये आमच्या मुद्द्यांना आमच्या अटी म्हणून सांगितलं गेलं, मात्र हे तसं नव्हे. मविआला आम्ही आमचं म्हणणं मांडलंय. त्यांनी निर्णय घ्यावा. कार्यकर्ते उत्साही असतात. आमच्या पक्षात भांडणं वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मविआच्या बैठकीला जाऊ नका असे सांगितल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली. 6 तारखेपर्यंत सारं काही सुरळीत होईल, या वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दल माहीत नाही. त्यांच्यातील 15 जागांवरचा तिढा सुटला तर पुढे पाहू. एकटं लढलो तर आमची लढत भाजपसोबत. मविआसोबत नाही जुळलं तर सध्या काहीच सांगू शकत नाही.  मी अकोल्यातूनच लढणार. मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यात येऊन लढावं. पुढच्या मविआच्या बैठकीचं निमंत्रण नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

आणखी वाचा

2019 ची पुनरावृत्ती करत वंचितचा ‘एकला चलो रे’ चा नारा ? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

अधिक पाहा..



Source link

2019 ची पुनरावृत्ती करत वंचितचा ‘एकला चलो रे’ चा नारा ? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

2019 ची पुनरावृत्ती करत वंचितचा ‘एकला चलो रे’ चा नारा ? प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण


Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत (MVA) अजूनपर्यंत युती पूर्ण झालेली नाहीये. तेव्हा इतर पक्षांकडून पक्ष बैठक किंवा इतर कुठल्याही कार्यक्रमाला बोलावत असतील तर त्या बैठकी, कार्यक्रमामध्ये उपस्थित राहू नये. ॲड. प्रकाश आंबेडकर किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांची सूचना येईपर्यंत कोणीही सहभागी होऊ नये, अशा सूचना प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर  पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत का? असा प्रश्न निर्माण झालाय. 

आंबेडकर ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार?

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबतचा तिढा अद्याप कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. असे असतांना वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रभरात सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाची मोर्चे बांधणीला देखील सुरवात केली असून संभाव्य उमेदवारांचे नाव जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. आंबेडकरांनी स्वत: अकोल्यात स्वत:ची उमेदवारी जाहीर केलीय. तर वर्ध्यातून प्रा. राजेंद्र साळुंके, सांगलीतून ‘डबल महाराष्ट्र केसरी’ चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलंय.

याशिवाय आंबेडकरांचा दक्षिण-मध्य मुंबई, हिंगोली, रामटेक, लातूर या जागांवरही  दावा आहे. दोन दिवसांपूर्वी वंचितने मविआच्या बैठकीत राज्यातील 27 जागांचा प्रस्ताव दिला आहे. आज सकाळी आंबेडकरांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना परवानगीशिवाय मविआच्या कोणत्याही कार्यक्रम आणि बैठकांना जाऊ नये अशी तंबी दिलीये. त्यामुळे 2019 ची पुनरावृत्ती होत आंबेडकर ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार का?  अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वंचित महाविकास आघाडीसोबत आली तर आवडेल- शरद पवार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची सहा आणि सात मार्चला मुंबई येथे बैठक होणार असून या बैठकीत जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीला सोबत आली तर त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील करून घ्यायला आवडेल, असे व्यक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा देण्याबाबत देखील निर्णय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच राष्ट्रीय समाज पक्ष आमच्या सोबत आला, तर मी माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजास देण्यास तयार असल्याची तयारी देखील शरद पवार यांनी बोलतांना व्यक्त केलीय.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp