चांदीवाल आयोगानं ‘क्लिन चीट’ दिल्यानेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

चांदीवाल आयोगानं ‘क्लिन चीट’ दिल्यानेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहवाल दडवून ठेवला; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप


Anil Deshmukh अकोला : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काल (ता. 2 मार्च)  नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर स्कॉर्पिओमध्ये बॉम्ब ठेवणारा मास्टर माईंड कोण होता. याबाबत त्यांनी वक्तव्य केले होते. तसेच माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील मोठा नेता असून वेळ आल्यास त्याचे नाव देखील सांगेन, असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आज पुन्हा अनिल देशमुख यांनी मोठे वक्तव्य करत थेट गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

आपल्याला चांदीवाल आयोगानं ‘क्लिन चीट’ दिली असल्याची माहिती गृहमंत्री फडणवीसांना असल्यानेच त्यांनी हा अहवाल दडवून ठेवल्याचा गंभीर आरोप शरद पवार गटाचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केलाय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलेय. 

खोटं शपथपत्र देण्यामागे भाजपच्या बड्या नेत्याचा दबाव

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी परमवीरसिंगांच्या (Parambir Singh) आरोपांनंतर विदर्भातील भाजपच्या एका बड्या नेत्यानं आपल्यावर खोटं शपथपत्र देण्यासाठी दबाव टाकला होता. आपण त्यांनी सांगितलं तसं शपथपत्र दिलं असतं तर तेंव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं, असा गौप्यस्फोट देखील अनिल देशमुखांनी केलाय. मी नकार दिल्यानंतर माझ्यावर छापे आणि इतर कारवाई करण्यात आली. या कारवाई मागे नेमके कोण हे आपल्याला ठाऊक आहे. मात्र त्या नेत्याचं नाव सांगायला त्यांनी नकार दिलाय. पुढे ते म्हणाले, आपल्याला चांदीवाल आयोगानं ‘क्लिन चीट’ दिली असल्याची माहिती गृहमंत्री फडणवीसांनी असल्यानेच त्यांनी हा अहवाल दडवून ठेवला आहे. आपला अहवाल ज्या कपाटात दडवून ठेवलाय त्या कपाटाच्या दोन-तीन किल्ल्या  असल्याचा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावलाय. या किल्ल्या मुख्यमंत्र्यांसह, गृहमंत्री आणि इतर काही जणांच्या ताब्यात असल्याचं देखील ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले पाहिजे आणि ते कायम आमच्या सोबतच राहतील, असा विश्वासही अनिल देशमुखांनी व्यक्त केलाय. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र बसून यातून मार्ग काढतील. ज्या पक्षाकडे सक्षम उमेदवार, त्या पक्षाला जागा हा मविआचा फार्म्युला आहे. लवकरच यातील चित्र स्पष्ट होणार असल्याचे देखील अनिल देशमुख म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांचा राज्यात सभांचा धडाका; सांगलीची सभा ठरणार निर्णायक

मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांचा राज्यात सभांचा धडाका; सांगलीची सभा ठरणार निर्णायक


Maharashtra News : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबतचा तिढा कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर  (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra News) सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात पाच सभा 

आगामी लोकसभा निवडणूकीपूर्वी (Lok Sabha Election 2024) सर्व पक्षांकडून जागावाटपांची तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीत 33 जागांसंदर्भात वाटप पूर्ण झालं असून 15 जागांचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. वंचितला महाविकास आघाडीत सामील केले असल्याचे सांगण्यात येत असले तरी, येत्या 5 किंवा 6 मार्चला उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि कांग्रेस नेत्यांच्या होणाऱ्या बैठकीत अंतिम फाॅर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी देखील महाराष्ट्रभरात आपले शक्तिप्रदर्शन दाखवण्याचा निर्धार केला आहे. मार्चच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका लावणार असून पहिल्या 15 दिवसांत आंबेडकरांच्या पाच सभा होणार आहेत. यात महाराष्ट्रातील साकोली, नवी मुंबई, मुंबई, हातकणंगले,आणि  सांगली येथे या सभा होणार आहेत. या सभामध्ये सांगलीतील सभा ही निर्णायक ठरणार आहे. सांगलीच्या सभेपर्यंत महाविकास आघाडीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास आंबेडकर आपली भूमिका स्पष्ट करत मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

सांगलीत वंचितचा उमेदवार ‘फायनल’

सांगली येथे 14 किंवा 15 मार्च रोजी प्रकाश आंबेडकरांची सभा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना वंचितच्या वतीने उमेदवारी देण्याबाबत जवळ जवळ पक्क झाले असल्याची देखील माहिती पुढे आली आहे. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा वंचितच लढणार असल्याची माहिती देखील वंचितच्या सूत्रांनी दिलीय. महाविकास आघाडीकडे प्रकाश आंबेडकर सांगलीची मागणी करणार आहे.  या अनुषंगाने मागच्या महिन्यात चंद्रहार पाटील  यांनी मुंबईत प्रकाश आंबेडकरांची भेट देखील घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात उमेदवारीसंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र चंद्रहार पाटलांची उमेदवारीबाबत या आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  

या तारखेला होणारप्रकाश आंबेडकरांच्या सभा 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यांसह सात जणांना शिक्षा; तब्बल 24 वर्षानंतर लागला निकाल

रेशन धान्य घोटाळ्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्यांसह सात जणांना शिक्षा; तब्बल 24 वर्षानंतर लागला निकाल


Akola News अकोला : रेशन धान्य घोटाळा (Ration Grain Scam) प्रकरणात एका आयएएस (IAS) अधिकारी आणि तत्कालिन उपजिल्हाधिकारी असे एकत्रित सात जणांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अकोल्याच्या (Akola News) मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे. दरम्यान, रेशन धान्य हे सरकारी धान्य गोदाम आणि इतर संबंधित ठिकाणी पोहोचवण्याऐवजी या संशयित आरोपींनी संगनमताने रेशन धान्य परस्पर गायब केले होते. या खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकाऱ्यांसह सात जणांना शिक्षा ठोठावली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? 

अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डवर वितरित करण्यात येणारा 45 लाख 73 हजार 226 रुपये किमतीचे 48 ट्रक गहू परस्पर गायब केल्याचा आरोप प्रकरणातील संशयित आरोपींवर होता. तेव्हा ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल गुप्ता हा 48 ट्रकमधून गहू मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड आणि वाशीम इथं न पोहोचवता इतर अधिकाऱ्यांशी संगनमत करून रेशन धान्य परस्पर गायब केले होते.  या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण 2000 साली समोर आले होते.

आता पोलीस तपासात गुप्ता, त्याचे ट्रकचे चालक, मॅनेजर, तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश मुन्नासिंग चव्हाण, पुरवठा अधिकारी (विद्यमान IAS अधिकारी) संतोष पाटील हे दोषी सिद्ध झाल्याने न्यायालयानं संशयित आरोपी कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता तसेच सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, अशा 7 जणांना शिक्षा सुनावली आहे. कॉन्ट्रॅक्टर गुप्ताला पाच वर्षांची तर सर्व सरकारी अधिकाऱ्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे 24 वर्षानंतर हा निकाल लागलाय. यामध्ये विद्यमान कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांचाही समावेश आहे.  

आयएएस अधिकाऱ्यांसह 7 जणांना सुनावली शिक्षा

न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासात 41 साक्षीदारांचे साक्ष नोंदवली. यात संशयित आरोपी कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता याला कलम 407, 420, 468, 201 अन्वये पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच सातही सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केले म्हणून त्यांना कलम 407, 420, 468 अन्वये दोन वर्षे शिक्षा ठोठावली. तसेच ट्रकच्या चालकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली. विशेष म्हणजे 24 वर्षानंतर हा निकाल लागलाय. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल दौपक काटे आणि विद्या सोनटक्के यांनी काम पाहिले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंडावर मोठी कारवाई; थेट एक वर्षासाठी केलं तुरुंगात स्थानबद्ध

पोलिसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या कुख्यात गुंडावर मोठी कारवाई; थेट एक वर्षासाठी केलं तुरुंगात स्थानबद्ध


Akola News अकोलाअकोला जिल्ह्यातून गुन्हेगारी (Akola Crime News) क्षेत्रातील एक बातमी समोर आलीये. कुख्यात गुन्हेगार विश्वास सरकटे याच्यावर अकोला पोलिसांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई केलीय. विश्वासवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने याआधी अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर चाकूने (Crime) वार केले होते. यात पोलीस गंभीर जखमी झाले होते. कुठल्याही कारवाईवर विश्वास जुमानत नसल्याने अकोला पोलिसांनी (Akola Police) त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. विश्वास सरकटे याला अकोला जिल्हा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आलंय. 

विश्वासने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय गोपनारायण आणि पोलीस कर्मचारी वीर नारायण शिंदे आणि बोबडे या चौघांवर चाकू हल्ला केला होता. त्यात पोलीस गंभीररित्या जखमी झाले होते. या प्राणघातक हल्यानंतर सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती.  विश्वास मूळ अकोला जिल्ह्यातील रामगाव येथील रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून तो बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत रहिवासी आहे.

विश्वासवर दाखल असलेले गुन्हे

खूनाचा प्रयत्न करणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे, घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहचवणे, लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचवणे, शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा, बेकायदेशिर रित्या अग्निशस्त्र बाळगणे इत्यादि अनेक गुन्हे  त्याच्यावर दाखल असुन यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती, परंतु त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम झालेला नव्हता. 

आतापर्यंत 7 गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाई

अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अकोला पोलिसांनी थेट सराईत गुन्हेगारांना एका वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखवला आहे.  दरम्यान अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करणारे आणि कारवाईला न जुमानणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. येणाऱ्या निवडणुका तसेच आगामी काळात सण-उत्सवाच्या अनुषंगाने अनेक गुन्हेगार पोलिसांच्या वाटेवर असून या गुन्हेगाराविरुध्द एमपीडीएनूसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात आतापर्यंत 7 गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाई करण्यात आली असून ही कामगिरी पीएसआय आशिष शिंदे यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..



Source link

रामदास आठवलेंच्या निकटवर्तीयावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला पोलिसांची मोठी कारवाई

रामदास आठवलेंच्या निकटवर्तीयावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई; अकोला पोलिसांची मोठी कारवाई


Akola News अकोलाअकोल्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले गटाचा अकोला महानगराध्यक्ष आणि कुख्यात गुन्हेगार गजानन काशिनाथ कांबळे (Gajanan Kamble) याला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. कांबळे याच्यावर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी अकोला जिल्हा (Akola Crime News) कारागृहात स्थानबद्ध केलंय. गजानन कांबळे (वय 49 ) हा केंद्रीय मंत्री  रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. तसेच अनेक राजकीय आणि अधिकाऱ्यांशी त्याचे संबध असल्याने गुन्हेगारी आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई

अकोला पोलिसांचा प्रतिबंधक कारवाईवर चांगलाचं जोर वाढला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता अकोला पोलिसांनी थेट सराईत गुन्हेगारांना एका वर्षासाठी तुरुंगाचा मार्ग दाखवला आहे. अकोला पोलिसांनी गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील 6 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केलीय. या सर्वांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय.

अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले आणि रिपाइं आठवले गटाचा अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे याला विविध गंभीर गुन्हात सक्रिय असल्याने एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. कांबळे याच्यावर यापूर्वी विविध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. परंतु त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम न झाल्याचे दिसून आले. प्रतिबंधक कार्यवाही करून सुद्धा कायद्याला जुमानत नसल्याने पोलिसांनी कांबळे विरूध्द गंभीर दखल घेतली आहे.  कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या कांबळे याच्या गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता अकोला पोलिसांनी मोठी कारवाई करत त्यांना एक वर्षासाठी अकोला जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

गंभीर गुन्हे दाखल

बलात्कार, जबरी चोरी करताना इच्छापूर्वक दुखापत करणे, बलादग्रहण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला मृत्यू किंवा जबर दुखापतीची भीती घालणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी धाकाने परावृत्त करण्यासाठी हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छापूर्वक दूखापत पोहचविणे, फसवणूक करणे, प्राणघातक शस्त्रानिशी सज्ज होवून दंगा करणे, शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, फौजदारीपात्र धाकदपटशा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, प्रतिबंधक आदेशाचे उल्लंघन करण,  असे बरेच गंभीर गुन्हे गजानन कांबळे याच्यावर दाखल आहेत. 

गजानन कांबळे रामदास आठवलेंचा निकटवर्तीय

गजानन कांबळे हा रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा निकटवर्तीय आहे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून तो आठवलेंच्या पक्षाचा अकोला महानगराध्यक्ष आहे. खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतरही आठवलेंनी त्याला पदावरून दूर केलं नाही. 2017 मध्ये गजानन कांबळेच्या पत्नीला आठवले गटाकडून महापालिकेचं तिकीट मिळालं होतं. मात्र, त्या यात पराभूत झाल्या होत्या.

रामदास आठवले यांनी गजानन कांबळेच्या मुलाच्या लग्नाला देखील उपस्थिती लावली होती. गजानन कांबळेवर या आधी खून, खंडणी, मारहाणीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही वर्षांपूर्वी झालेल्या सुनिल धोपेकर हत्याकांडात गजानन कांबळे हा मुख्य आरोपी होते. अकोला शहरातील वाशिम बायपास परिसरात कांबळेचं मोठं प्रस्थ आहे. या भागातल्या गुन्हेगारी जगतातही गजानन कांबळेचा यांचा दबदबा असल्याचे बोलले जाते.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; अकोला  मनपा शाळेतील धक्कादायक प्रकार

शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा; अकोला मनपा शाळेतील धक्कादायक प्रकार


Akola News : अकोला शहरातील मनपाच्या शाळेत (Municipal School) विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून (Nutritional Food) विषबाधा (Food Poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोषण आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पोषण आहारातून विषबाधा 10 विद्यार्थ्यांना 

अकोला शिवसेना वसाहतमधील शाळा क्रमांक 26 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मनपा शाळेतील 10 विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ झाल्यामुळे त्यांना अकोला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मृत उंदराचे अवशेष सापडल्यामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

गंभीर आणि किळसवाणा प्रकार

अकोला मनपा शाळेतील गंभीर आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पोषण आहाराच्या खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडले. यामुळे त्यांना विषबाधा झाली आहे. मृत उंदराचे अवशेष आढळलली खिचडी खाल्लेल्या विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 10 विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. 

विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात

मनपा शाळेत पोषण आहारत खिचडी दिली जाते. खिचडी खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागला, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारात मंगळवारी दुपारी विद्यार्थ्यांना खिचडी देण्यात आली. या खिचडीमध्ये मृत उंदराचे अवशेष सापडले आहेत. हीच खिचडी या विद्यार्थ्यांनी सेवन केली होती, ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्यावर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

हलगर्जीपणा! विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ

मंगळवारी संध्याकाळी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर आता विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. शालेय पोषण आहारात मृत उंदर सापडणे हे फार मोठा हलगर्जीपणा असून विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्याचा प्रकार आहे. यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभाग या प्रकरणातील दोषींवर काय कारवाई करतो, याकडे साऱ्यांचंलक्ष लागलं आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp