भरदुपारी रस्त्यात कारमध्ये ‘युनिट मॅनेजर’ तरूणीवर अत्याचाराचा प्रयत्न; तिने आरोपीच्या गुप्तांगा

भरदुपारी रस्त्यात कारमध्ये ‘युनिट मॅनेजर’ तरूणीवर अत्याचाराचा प्रयत्न; तिने आरोपीच्या गुप्तांगा


अकोला : अकोला शहरात भरदिवसा, गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न (Akola Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत कार्यरत असलेल्या 22 वर्षीय युनिट मॅनेजर तरुणीवर, कंपनीच्याच एजंटने कारमध्ये ही जबरदस्ती  (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारत स्वतःची सुटका करून घेतली. अकोला शहरातील जठारपेठ चौकात भरदुपारी ही घडली घटना घडली आहे. (Akola Crime News)

नेमकं काय घडलं? 

16 जून रोजी पीडित तरुणी रोजच्या प्रमाणे ड्युटीवर होती. एजंट गणेश ठाकूर याने “कस्टमर कॉल” असल्याचं सांगून तिला सोबत बाहेर नेलं. दोघंही कारने शहरात फिरत होते. सायंकाळी 6 च्या सुमारास जठारपेठ चौकात, एका दूध डेअरीसमोर कार थांबवण्यात आली. अचानक आरोपी कारच्या मागच्या सीटवर आला आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरड केली असता त्याने तिचं तोंड दाबलं, मारहाण केली आणि शरीरसुखाची मागणी करत दबाव टाकला. मात्र पीडितेने आत्मविश्वासाने लढा दिला. तिने त्याच्या गुप्तांगावर जोरदार लाथ मारली आणि कारमधून बाहेर पडत घटनास्थळावरून सुटका केली. (Akola Crime News)

धमकी, मानसिक त्रास आणि कायदेशीर कारवाई 

आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनीत कार्यरत असलेल्या 22 वर्षीय युनिट मॅनेजर तरुणीवर, कंपनीच्याच एजंटने कारमध्ये ही जबरदस्ती  (Akola Crime News) करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत तरुणीने थेट आरोपीच्या गुप्तांगावर लाथ मारत स्वतःची सुटका करून घेतली. घटनेनंतरही आरोपीने तिला मोबाईल मेसेजद्वारे धमकी देत बदनामी आणि आत्महत्या  (Akola Crime News) करून गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. अखेर या सर्व प्रकाराची तक्रार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात करण्यात आली. आरोपी गणेश ठाकूरविरुद्ध BNS कलम 75(2), 76, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याचं वाहनही पोलिसांनी जप्त केलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. (Akola Crime News)

महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 

या घटनेमुळे कार्यालयीन जागेत किंवा सहकाऱ्यांसोबत होणाऱ्या व्यावसायिक संवादांतील सुरक्षिततेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. महिलांनी अशा प्रसंगी घाबरून न जाता, प्रसंगावधान ठेवून जशी या तरुणीने शौर्य दाखवलं, तसं सामर्थ्याने उभं राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी महिला सहकाऱ्यांचा आदर राखत सुरक्षित कार्यसंस्कृती तयार करणं, ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.

आणखी वाचा



Source link

कल्याण रेल्वे स्थानकात नराधमाने मुलीला हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार, घरच्यांनी हाकललं

कल्याण रेल्वे स्थानकात नराधमाने मुलीला हेरलं, चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार, घरच्यांनी हाकललं


Akola Crime news: कल्याण रेल्वे स्थानकात फिरण्यासाठी आलेल्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिला रेल्वेने अकोल्याला नेत असताना इगतपुरी ते अकोला (Akola News) दरम्यान एका नराधमाने या अल्पवयीन मुलीवर बलात्कार(Rape News) केल्याची घटना उघडकीस आली आहे . धक्कादायक म्हणजे या नराधमाने तिला अकोला येथील आपल्या घरी नेले. मात्र, घरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात सोडून तो पसार झाला . यानंतर अकोला रेल्वे पोलिसांच्या नजरेस हि मुलगी पडली त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

अकोला रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी सीसीटीव्ही च्या आधारे या नराधमाचा शोध सुरू केला . धक्कादायक म्हणजे दोन वर्षांपूर्वी याच अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार   केला होता . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे .

कल्याण पूर्वेत राहणारी 16 वर्षीय तरुणीची मानसिक स्थिती ठीक नव्हती . 29 जून रोजी ही तरुणी कल्याण स्टेशन परिसरात आली होती. कल्याण पश्चिमेकडून पूर्वेकडे पादचारी पुलावरून जात असताना एका तरुणाने तिला हेरत तिच्याशी ओळख वाढवत तिच्याबरोबर चालत तो कल्याण पूर्वेकडे आला. त्याने तिच्याशी गप्पा मारत तिला आपल्या भावाच्या घरी नेले. मात्र भावाने घरात घेण्यास नकार दिल्याने तो तिला परत कल्याण रेल्वे स्थानकात घेऊन आला.

कल्याण स्थानकातून त्याने मुलीसोबत अकोल्याकडे जाणारी एक्स्प्रेस पकडली. दरम्यान इगतपुरी ते अकोला दरम्यान त्याने या मुलीशी लगट करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो तिला त्याच्या अकोला येथील घरी घेऊन गेला. मात्र, घरच्यांनीही तिला स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याने पुन्हा तिला अकोला रेल्वे स्थानकात आणून सोडून दिले. यानंतर पोलिसाच्या नजरेस पडलेल्या या पिडीत तरुणीला रेल्वे पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेत तिची चौकशी केली असता तिने घडलेली घटना कथन केली. या गंभीर घटनेची दखल घेत पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत हा गुन्हा कल्याण रेल्वे पोलिसाकडे वर्ग केला आहे. तर या तरुणीला कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु असल्याचे कल्याण रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.

आणखी वाचा

मुंबईत गे रिलेशनशिपमधील प्रसिद्ध CAचं टोकाचं पाऊल, शरीरसंबंधांची क्लीप व्हायरल करण्याची धमकी, 22 वर्षांच्या तरुणीला अटक

आणखी वाचा



Source link

संतापजनक! ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून अकोल्याच्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार

संतापजनक! ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून अकोल्याच्या ट्रेनमध्ये लैंगिक अत्याचार


Crime news:  राज्यात लैंगिक छळ,बलात्कार,अत्याचाराच्या वारंवार समोर येणाऱ्या घटना ताज्या असताना ठाण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे . ठाण्यातल्या 16 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिला अकोल्याला घेऊन जात असताना ट्रेनमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीस अकोला स्टेशनवर टाकून तो घरी परतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . यानंतर 20 वर्षीय तरुणाच्या विरोधात पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अकोला रेल्वे कर्मचाऱ्यांनी मुलीला स्टेशनवर पाहिले .तिच्याकडे चौकशी केल्यानंतर घडला प्रकार समोर आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने PTI या वृत्तसंस्थेला दिली. 

नेमके प्रकरण काय?

राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका सोळा वर्षीय मुलीचा अपहरण करून तिला अकोल्याला घेऊन जाताना ट्रेनमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी एका विरोधात गुन्हा दाखल केलाय .ही मुलगी डोंबिवली परिसरातील मानपाडा येथील आडिवली रहिवासी आहे.  20 वर्षीय आरोपीने पीडित मुलीला ट्रेनने अकोला येथे नेले .वाटेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला .

अकोल्यातील आरोपीच्या पालकांनी त्याला आणि मुलीला त्यांच्या घरात येऊ दिलं नाही .त्यामुळे मुलाने पीडित मुलीला अकोला रेल्वे स्थानकावर सोडून दिले .व नंतर तो घरी परतला असे कल्याण येथील सरकारी रेल्वे पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सोमवारी PTI ला सांगितले . अकोल्यातील रेल्वे पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण त्यांच्या समकक्षांकडे वर्ग केले आहे .त्यानंतर कल्याण रेल्वे प्रशासनाने आरोपी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64,कलम 74, तसेच विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला व गुन्हेगारी बळाचा वापर तसेच 137 कलमांतर्गत गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे.पोक्सो कायद्याच्या तरतुदीनुसार आरोपीवर एफआयआर दाखल केला .इतर आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं .

मुल गेलं, शरिरसंबंधासाठी दबाव, घर सोडून गेली पण ट्रेनमध्ये घात झाला

हरियाणातील पानिपतमध्ये एका महिलेवरील क्रूरतेची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. पानिपतमध्ये स्टेशनवर उभ्या असलेल्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात तीन जणांनी एका 35 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कार झालेल्या महिलेने तिच्यावर झालेल्या क्रूरतेची संपूर्ण कहाणी सांगितली आहे. तिच्या मुलाच्या मृत्यूनंतर ती मानसिक तणावाखाली गेली होती. 24 जून रोजी तिचा नवरा तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होता. जबरदस्ती करत होता, त्यावेळीतिने नकार दिल्यावर नवऱ्याने तिला मारहाण केली. तसेच तिला तिच्यावर बाहेर बलात्कार केला जाईल असंही त्याने म्हटलं होतं.

महिन्यापूर्वी मुल गेलं, पतीचा शरीरसंबंधासाठी दबाव, वैतागून घर सोडलं अन् घात झाला, रिकाम्या ट्रेनमध्ये सामूहिक अत्याचार

 

आणखी वाचा



Source link

WCL मध्ये नोकरी लावून देतो असं सांगून तब्बल 25 बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा; गुन्हा दाखल

WCL मध्ये नोकरी लावून देतो असं सांगून तब्बल 25 बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा; गुन्हा दाखल


Akola Crime News : वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड अर्थातच “WCL मध्ये नोकरी लावून देतो असं सांगून अकोला आणि परिसरातील तब्बल 25 बेरोजगार तरुण-तरुणींना कोट्यवधी रुपयांनी गंडवण्यात आलंय. नोकरीच्या आमिषाने फसवणूक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. दरम्यान, यामध्ये फसवणूक करणारा शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नावाने धमक्या देत असल्याचा आरोप फसवणूक झालेल्या कुटुंबीयांनी केलाय. 

“नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांना नागपूर आणि अकोल्यातील दलालांनी मिळून डमी अधिकाऱ्यांची भेट घालून दिली. ‘WCL मध्ये पक्की नोकरी लावतो’ म्हणत प्रत्येकी 10 लाख रुपये वसूल करण्यात आलेय. संपर्कात होते वासुदेव हालमारे आणि अकोल्यातील आशुतोष चंगोईवाला. आठ महिने उलटले, ना नोकरी मिळाली ना पैसे परत मिळाले. “बाजोरिया नाव घेत धमकावलं जातंय. आम्ही आता पोलिसात तक्रार केली आहे. अशी प्रतिक्रिया तक्रारकर्ता प्रफुल्ल वाघमारे यांनी दिली. तर सुरवातीला आम्हाला डमी ऑफिस दाखवले आणि त्यात आमची फसवणूक झाली. पैसे मागितल्यावर धमक्या दिल्या जातायत. असे मत नागपूरमधील तक्रारकर्ता वासुदेव हालमारे म्हणाला. 

तब्बल 25 मुला मुलींची झाली फसवणूक 

यश गुप्ता, स्वाती ढोरे, समृद्धी पवार, आनंद बोरतने, अक्षय बडगे, अमृता श्रोतरी, राहुल ठाकूर, श्रेयस देशमुख, किरण कोकुलवार, किरण कोकुलवार, कविता सपात्कार, मकरंद व्यवहारे, पराग वाघमारे, श्रद्धा वाघमारे, जानवी चक्रपाणी, मयूर बाचांवरे, राकेश शेलार, अशोक लोडम, जयेश खुलेकर, पूजा इंगळे, दर्शन धोटे, सौरभ तागडे, शिवम बदरके, श्याम कदम, दीक्षा खुलेकर आणि रोशन तायडे रोशन तायडे असे सर्व मुला-मुलींची नोकरीच आमिष दाखवत फसवणूक झालेल्यांची नावे आहेत.

शिंदे गटाचे माजी आमदाराचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

या सगळ्या प्रकारात शिंदे गटाचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचं नाव आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. मात्र बाजोरियांनी हे आरोप फेटाळले आहेत. तर आरोपी आशुतोष चंगोईवालाने आपण बाजोरियांच्या नावाने कोणतीही धमकी दिली नसल्याचं म्हटलंय. चंगोईवालाशी माझा दहा वर्षांपासून काहीही संबंध नाही असे मत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. 

चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यातील नागपूरातला आरोपी असलेल्या वासुदेव हालमारे याचे नागपूर येथील काही राजकीय नेत्यांशी संबंध असल्याची माहिती मिळतीये. “WCL नोकरी फसवणूक प्रकरणात अजून बळी पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेरोजगार युवकांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या टोळीवर कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा



Source link

AI नं संत्रा बागेचं अर्थकारणच पालटलं! 5चे 25 लाख झाले; अमरावतीच्या विजय बिजवेंनी केलं केलं काय?

AI नं संत्रा बागेचं अर्थकारणच पालटलं! 5चे 25 लाख झाले; अमरावतीच्या विजय बिजवेंनी केलं केलं काय?


Nagpur: आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा शेतीत योग्य वापर केल्याने काय करिश्मा होऊ शकतो, हे अमरावती जिल्ह्यातील खरपी गावातील संत्रा उत्पादक शेतकरी विजय बिजवे यांनी दाखवून दिलं आहे. दोन वर्षांपूर्वी आर्थिक नुकसान आणि निराशेमुळे संत्रा बाग तोडण्याचा निर्णय घेतलेल्या अमरावती जिल्ह्यातील विजय बिजवे या शेतकऱ्याने त्यांच्या मुलाच्या आग्रहावरून शेतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वापर केला आणि बागेत नवा बहर आला. पूर्वी केवळ 4–5 लाख रुपयांचे उत्पन्न देणारी संत्रा बाग आता तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचे उत्पादन देईल, असा विश्वास बिजवे यांनी व्यक्त केला आहे.

परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. 10 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने बागायत करत असताना त्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नव्हतं. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाने AI वापरण्याचा सल्ला दिला आणि त्यानंतर शेतीत क्रांती झाली.

 नेमकं केलं काय या शेतकऱ्यानं?

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा तालुक्यातील खरपी गावात विजय बिजवे यांची 8 एकरांची संत्रा बाग आहे. मागील 10 वर्षांपासून ते पारंपरिक पद्धतीने बागायत करत होते. मात्र, खर्च आणि उत्पन्नाचं गणित जमत नव्हतं. त्यामुळे त्यांनी बाग तोडण्याचा विचार केला होता. मात्र B.Sc. Agriculture करणाऱ्या मुलाच्या आग्रहामुळे त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून AI तंत्रज्ञानाचा अवलंब केला.  AI वापरण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम शेतीचं गुगल मॅपिंग केलं आणि पुण्यातील “Map My Crop” कंपनीच्या मदतीने काही सेन्सर बसवले. या सेन्सरमधून पाण्याची उपलब्धता, मातीचा ओलावा, तापमान आणि आवश्यक पोषकतत्त्वांची माहिती मिळू लागली. त्यानुसार त्यांनी झाडांना आवश्यक तेवढंच पाणी व औषधं वापरायला सुरुवात केली. परिणामी खर्च कमी झाला आणि उत्पादन वाढलं. सध्या बिजवे यांच्या प्रत्येक झाडावर 800 ते 1200 संत्री लागलेली आहेत. AI तंत्रज्ञान वापरण्यापूर्वी त्यांचा खर्च सुमारे 5.5 लाख रुपये आणि उत्पन्न 5 ते 6 लाख रुपये होतं. आता त्यांचा खर्च 4 लाखांपर्यंत आला असून उत्पन्न 25 ते 30 लाख रुपये होण्याची शक्यता आहे.

AI तंत्रज्ञान वापरणं थोड्या प्रशिक्षणानेही शक्य

बिजवे यांच्या म्हणण्यानुसार, AI तंत्रज्ञान वापरणं कोणत्याही शेतकऱ्यासाठी कठीण नाही. थोडं प्रशिक्षण घेतल्यास अल्पशिक्षित शेतकरीही याचा प्रभावी वापर करू शकतो. त्याशिवाय, त्यांनी रासायनिक फवारणी न करता गूळ, साखर आणि दूध यांच्या मिश्रणाची फवारणी केली, त्यामुळे मधमाशांचा वावर वाढला आणि परागसिंचन अधिक प्रभावी झालं. परिणामी फळांची वाढ आणि गुणवत्ताही सुधारली. जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांच्यानुसार, AI तंत्रज्ञानामुळे शेतीतील सर्वेक्षण, सिंचन आणि खत व्यवस्थापन अचूकपणे करता येतं. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ शक्य आहे. मात्र, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मार्केटिंगची सुविधा मिळावी यासाठी अमरावतीत प्रक्रिया प्रकल्प आणि मोठ्या बाजारपेठांशी थेट संपर्काची गरज आहे.

हेही वाचा

माझ्या धन्याच्या खांद्यावरचं जू उतरलं, माऊलीच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या, लातूरच्या 75 वर्षीय शेतकऱ्याला अशी मिळाली बैलजोडी

आणखी वाचा



Source link

कुठं जायचंय? मी सोडतो..नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा नराधम रिक्षाचालकाकडून विनयभंग, अकोल्यात संता

कुठं जायचंय? मी सोडतो..नीटची तयारी करणाऱ्या मुलीचा नराधम रिक्षाचालकाकडून विनयभंग, अकोल्यात संता


Crime News: राज्यभरातून लैंगिक अत्याचाराच्या होणाऱ्या घटना वारंवार समोर येत असताना कायद्याचा, पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. बीडच्या कोचिंग क्लासमध्ये ‘नीट’ परीक्षेची तयारी करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अकोल्यातून नीटच्या क्लाससाठी जाणाऱ्या 16 वर्षांच्या मुलीला रिक्षाचालकानं कुठे जायचंय?..मी सोडतो म्हणत विनयभंग केल्याची घटना समोर आलीय. (Akola Crime)

या प्रकरणी आरोपी जाफरखान सुभेदार खान याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.4 जुलै रोजी परतवाड्याहून अकोला बसस्टँडवर उतरलेल्या 16 वर्षांच्या मुलीला जवाहरनगरला सोडण्याच्या बहाण्याने विनयभंग केला.

कुठे जायचंय? मी सोडतो म्हणत…

पीडित मुलगी गेल्या वर्षभरापासून अकोल्यात राहून NEET परीक्षेची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी ती बस स्थानकावरून जवाहरनगरला जाण्यासाठी ऑटो शोधत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ऑटोचालकाने नकार दिल्यानंतर जाफरखान नावाचा ऑटोचालक तिला घेऊन जाण्यास तयार झाला. मात्र, मुख्य मार्ग टाळून त्याने मुख्य पोस्ट ऑफिस रोडवरील एका अनोळखी आणि सुनसान रस्त्याने ऑटो वळवला.

हा मार्ग बघून मुलीला संशय आला आणि तिने विरोध केला. यावेळी आरोपी ऑटोचालकाने तिचा हात जबरदस्तीने पकडला आणि दंडाला चावा घेतला. घाबरलेली मुलगी तात्काळ ऑटोतून खाली उतरून मदतीसाठी आरडाओरड करू लागली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नराधम रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली.

पुण्यात 73 वर्षांच्या थेरड्याकडून क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग

सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात 73 वर्षीय वृद्धाकडून क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. क्लिनिकमध्ये एकटीला पाहून पप्पी दे म्हणत रिसेप्शनिस्ट तरुणीचा लज्जा उपस्थित केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खाजगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या 27 वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली, या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा:

Pune Crime: पोटच्या 40 दिवसांच्या लेकराला पैशासाठी विकलं, डील फसल्यावर पोलीस ठाणं गाठलं, पुण्यात धक्कादायक प्रकार

आणखी वाचा



Source link