गाडी फोडणार, घरावर दगडफेक करणार; अमोल मिटकरींना अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावाने धमकी

गाडी फोडणार, घरावर दगडफेक करणार; अमोल मिटकरींना अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावाने धमकी


Amol Mitkari, Akola : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना अकोला पोलीस अधिक्षकांच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. घरावर दगडफेक आणि गाडी फोडणार असल्याची धमकी या व्यक्तीने दिली आहे. नरेश राऊत (Naresh Raut)नामक युवकाने ही धमकी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार अमोल मिटकरी यांचे अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्याशी फोनवरचे कथित संभाषण झालं. पोलिसांचा अपमान केला,असा आरोप करत युवकाकडून आमदार मिटकरींना धमकी देण्यात आली आहे. 

आमदार अमोल मिटकर पोलीस ठाण्यात दाखल 

आमदार अमोल मिटकरी अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. मिटकरी यांनी संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय धमकी देताना युवकाने आपल्याला तुमच्या घरावर आणि गाडीवर हल्ला करण्यासाठी दहा हजार रुपये मिळाले, असल्याचा दावा युवकाने केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती आमदार मिटकरींकडून  जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना देण्यात आली आहे.

अमोल मिटकरींचे पोलिसांवर गंभीर आरोप 

अमोल मिटकरी यांनी अकोला पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ही धमकी पोलिसांच्या आशीर्वादाने देण्यात आली. त्यामुळेच दोषी युवकावर कारवाई करण्यात येत नाही. खदान पोलिसांनी आपल्याला अतिशय अपमानास्पद वागणूक दिल्याचा आमदार अमोल मिटकरी यांचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी माहिती देणार असल्याचेही मिटकरी यांनी म्हटले आहे. 

पोलीस अधिक्षकांच्या संवादावरुन मिटकरींचे स्पष्टीकरण 

 मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचावर दबाव आणण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. उलट मी त्यांना विनंती केली आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याने मी त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली. अकोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि अपराध यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करून जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावा अशी, मागणी देखील एक लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही केली आहे, असे स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिले होते. अमोल मिटकरी यांचा पोलिस अधिक्षकांसोबतचा संवाद व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

 

अधिक पाहा..



Source link

नितेश राणे म्हणजे ‘वेडा आमदार’, त्यांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

नितेश राणे म्हणजे ‘वेडा आमदार’, त्यांच्या वक्तव्याकडे फार लक्ष देऊ नये; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका


Akola News अकोलाभाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून सातत्याने होणाऱ्या पोलिसांवरील वादग्रस्त व्यक्तव्यानंतर विरोधकांनी नितेश राणे यांच्यासह सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नितेश राणे यांचा उल्लेख ‘वेडा आमदार’ असा केलाय. प्रकाश आंबेडकरांनी नितेश राणेंच्या पोलिसांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना त्यांना फार महत्त्व देऊ नये असं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही. यासोबतच पोलिसांनी आणि जनतेनेही त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नये, असंही आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. 

 नितेश राणे म्हणजे ‘वेडा आमदार’

पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही, आपला बॉस ‘सागर’ बंगल्यावर बसलाय. तुम्ही कार्यक्रम करा, तुम्हाला सुखरूप घरी पोहचवण्याची जबाबदारी आमची असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केले होते. माळशिरसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू आक्रोश मोर्चात राणे बोलत होते. त्यानंतर अकोल्यातील एका सभेत भाषण करताना पुन्हा नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते.

पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी देखील नितेश राणेंच्या त्या  वादग्रस्त वक्तव्यावर बोलतांना त्यांना वेडे ठरवले आहे. 

महाराष्ट्राचा अतिसंयमी नेता आज हरपला 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज पहाटे मुंबईला  वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोहर जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केलंय. ‘रिडल्स’च्या वेळेस राज्यात जो वाद निर्माण झाला, त्यावेळी मनोहर जोशींनी अतिशय संयमाने हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे आंबेडकर म्हणाले. यासोबतच लोकसभेत सभापती असताना त्यांनी अनेक निकराचे प्रसंग त्यांनी हसत-खेळत सहजपणे निभावून नेल्याचंही आंबेडकर म्हणाले. त्यांच्या कालावधी मध्ये राज्यातील अनेक नाजुक प्रश्न त्यांनी मोठ्या कुशलतेने सांभाळून नेले. त्यात कुणाच्याही मानत कटुता निर्माण होऊ दिली नाही. आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झाला असल्याच्या भावना देखील प्रकाश आंबेडकरांनी बोलतांना व्यक्त केल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

Akola Copy Case  : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर

Akola Copy Case  : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर


Akola Copy Case  : बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तरूण तोतया पोलीस बनून बारावी परीक्षा केंद्रावर  
बारावीच्या परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागानं विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. असं असलं तरी बारावीच्या पहिल्याच पेपरदरम्यान कॉपी पुरवण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा केद्रावर बहिणीला कॉपी देण्यासाठी तरुण चक्क तोतया पोलीस बनला. अकोला जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये परीक्षेदरम्यान काल हा प्रकार घडला. तरुण चक्क पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने कॉपी पुरवण्यासाठी आला, परंतु सॅल्यूट करतानाच त्याचं बिंग फुटल आणि हा प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे असं  या तोतया पोलिसाचं नाव आहे.



Source link

बारावीच्या परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी द्यायला बनला तोतया पोलीस, सॅल्यूट करताच घडलं असं काही…

बारावीच्या परीक्षा केंद्रावर बहिणीला कॉपी द्यायला बनला तोतया पोलीस, सॅल्यूट करताच घडलं असं काही…


Akola News अकोलामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (12th Board Exam) बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेमधील गैरप्रकार टाळ्यासाठी शिक्षण विभागाने सर्वत्र चोख बंदोबस्त करून कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला असला तरी, कॉपी बहाद्दर नवनवीन युक्त्या शोधून कॉपी केल्याचे प्रकार घडत असतात. असाच एक धक्कादायक प्रकार अकोला (Akola) जिल्ह्यातील पातुर (Patur) शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूल इथं बारावीच्या परीक्षा केंद्रावर घडला आहे.

यात चक्क भावाने पोलिसांचा गणवेश धारण करून या केंद्रावर रुबाबाने आपल्या बहिणीला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न केला. मात्र हा कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तोतया पोलिसाचं सॅल्यूट करतानाच हे बिंग फुटलं (Exam Cheating Copy Case) आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला. अनुपम मदन खंडारे (24, रा. पांगरा बंदी) असं या तोतया पोलिसांचं नाव आहे.

सॅल्यूट करताच फुटलं बिंग

इयत्ता बारावीच्या परीक्षांना बुधवार 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला आहे. तर त्यानंतर 1 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने परीक्षेची तयारी सुरू केली असली तरी, यंदा जिल्हा प्रशासनापुढे कॉपीमुक्त परीक्षेचे आव्हान असणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यात 25 हजार 873 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्याच्या 87 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. पातुरच्या शाहाबाबु हायस्कुलच्या परीक्षा केंद्रावर एका परीक्षार्थींचा भाऊ अनुपम खंडारे हा कॉपी पुरवण्यासाठी थेट पोलीसाचा गणवेश परिधान करून तोतया पोलीस बनला.

त्यानंतर बहिणीला कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्रावर इकडे तिकडे फिरू लागला. तेवढ्यात पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा सेंटरवर बंदोबस्तासाठी पोहचले असता, तोतया पोलिसाची एकच तारांबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहता तोतया अनुपमनं त्यांना सॅल्यूट ठोकला. परंतु पोलिसांनी त्याचा सॅल्यूट पाहून त्याच्यावर संशय आला. तसेच त्याने घातलेला गणवेश, त्यावरील नेम प्लेट चुकीची असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला.

तोतया पोलीसाविरुद्ध गुन्हा दाखल  

पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी तोतया पोलीस असलेल्या अनुपमला अधिक विचारपुस केली असता, हा सर्व प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. पोलिसांनी त्याची चौकशी आणि झडती घेतली असता त्याच्या जवळ इंग्रजी विषयाची चिटोरे सापडून आले आणि सत्य समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी अनुपम विरोधात 417, 419, 170, 171 आणि अधिनियम 1982 चे कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nagpur News : रस्त्यांची कामे ठरताय डोकेदुखी, वाहतूक कोंडीचा फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना

अधिक पाहा..



Source link

सराईत गुन्हेगाराची आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून पाठराखण?, पोलीस अधीक्षकांसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल

सराईत गुन्हेगाराची आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून पाठराखण?, पोलीस अधीक्षकांसोबतच्या संवादाची ऑडिओ क्लिप वायरल


Akola News : अकोला : एका सराईत गुन्हेगारावर गुन्हा दाखल करू नका म्हणून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अकोल्याचे (Akola News) जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्यावर आगपाखड केली आहे. आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यातील संवादाची ऑडिओ क्लिप ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. मारहाणीच्या प्रकरणात गुंड सतीश वानखडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार मिटकरी यांनी जिल्हा पोलीस (Akola Police) अधीक्षकांकडे आग्रही मागणी केली आहे. राज्यात एकीकडे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप होत असतानाच, आमदार मिटकरी यांची कथित ‘ऑडिओ क्लिप’ समोर आली आहे. अकोला शहरातील सतीश वानखडे यांच्यावर यापूर्वी अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असतांना, अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर पुढील कारवाईस मनाई केल्याने एकप्रकारे मिटकरी यांनी संशयित गुन्हेगारांची पाठराखण केल्याचे बोलले जात आहे.

अमोल मिटकरी यांच्याकडून पाठराखण?

सतीश वानखडे अकोल्यातील कृषीनगर भागातल्या पंचशीलनगर भागातला एक सराईत गुन्हेगार आहेत. अकोल्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये वानखडे यांच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 2015 मध्ये वाणखडे यांना अकोला पोलिसांनी तडीपारीची देखील कारवाई केली आहे. सोबतच नगरसेवक अजय रामटेके प्रकरणातील आरोपी धनंजय बिल्लेवारवर यांचावर वानखडे यांनी जीवघेणा हल्ला करत या हल्यात त्यांच्या हाताची बोटे कापली होती. सुदैवाने या हल्ल्यात त्यांचे प्राण वाचले होते. मात्र, असे असताना पोलिसांनी वानखडेंवर केलेले कारवाई विरोधात अमोल मिटकरी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या विषयी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, वानखडेवर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना याबाबत बोलल्या जाईल. सोबतच आपण कायम माझ्याशी मोठ्याने बोलता, मी एक सत्ताधारी आमदार आहे. या बाबत मी आधिवेशनात आवाज उचलून तक्रार देईल. एखादी गुन्हेगार सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधि दिली पाहिजे. नाही ते माझा पक्षाशी संबंधित आहे, नाही ते माझे कार्यकर्ते आहे. याबाबत मी तुमच्याशी इथून पुढे बोलणार नाही, बोलायचे असल्यास मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल, असे देखील अमोल मिटकरी म्हणले.   

दबाव नव्हे विनंती- अमोल मिटकरी

याबाबत अमोल मिटकरी यांना विचारले असता ते म्हणाले की,  मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचावर दबाव आणण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही, उलट मी त्यांना विनंती केली आहे. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे चुकीच्या पद्धतीने काम करीत असल्याने मी त्यांची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे देखील अमोल मिटकरी म्हणाले. अकोला शहरात वाढती गुन्हेगारी आणि अपराध यावर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करून जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावा अशी, मागणी देखील एक लोक प्रतिनिधी म्हणून आम्ही केली आहे. मात्र, आमच्याशी योग्य प्रकारे वर्तन केल्या जात नसल्याचे आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. 

वानखडेवर कोणत्या वर्षी किती गुन्हे?

2015 : 2 आणि तडीपारी
2016 : 1
2018 : 02
20 : 01
23 : 01
2024 : 01 

महत्वाच्या इतर बातम्या 

अधिक पाहा..



Source link

पोलीस नितेश राणेंना बायकोसमोर गाXXवर फटके मारुन उचलतील : नितीन देशमुख

पोलीस नितेश राणेंना बायकोसमोर गाXXवर फटके मारुन उचलतील : नितीन देशमुख


अकोला : पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नितेश राणेंना (Nitesh Rane) काय माहिती आहे, पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता जेवता उचलून आणलं होतं, आता त्यांच्या बायकोसमोरच फटके मारून उचलतील असं वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) केलं आहे. अकोल्यातील सभेत पोलिसांबद्दल वक्तव्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी अपशब्द वापरले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना नितीन देशमुखांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली.

पोलीस आपल्या संरक्षणासाठी असतात, ते त्यांची ड्युटी प्रामाणिकपणे करतात. त्यांच्याबद्दल नितेश राणे यांनी अपशब्द वापरले असं आमदार नितीन देशमुख म्हणाले. ते म्हणाले की, पोलीस आपलं काय करणार, फार तर व्हिडीओ काढणार आणि त्यांच्या बायकोला दाखवणार, यापलिकडे ते काहीही करणार नाहीत असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. त्यावर आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी टीका केली.

नितेश राणेंना पोलीस उचलून आणतील

आमदार नितीन देशमुख म्हणाले की, “नितेश राणे बोलले की पोलीस काय करतील? माझा व्हिडिओ काढतील आणि बायकोला दाखवतील. त्यांचं हे वक्तव्य चुकीचं आहे. नितेशला माहिती नाही काय? पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता-जेवता उचलून आणलं होतं. एक दिवस असा येईल पोलीस याच्या बायकोसमोर गाXXवर फटके मारतील आणि उचलून आणतील. भाजप आमदारांना सत्तेची मस्ती आलीय. ती लवकरच उतरेल.”

नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

अकोल्यातील एका सभेत भाषण करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या विषयावर बोलताना पोलिसांबद्दल अपशब्द वापरले होते. पोलीस फक्त आपल्या सभेचे व्हिडीओ काढतील आणि घरी बायकोला दाखवतील, त्यापेक्षा पोलीस जास्त काही करू शकत नाहीत, आपण पोलिसांना घाबरत नाही असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. 

आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावर आता राज्यभरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदारांनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नितेश राणे यांच्यावर त्यांच्याच भाषेत टीका केल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp