पीएम मोदी, उद्धव ठाकरे जो कुर्ता घालतात,तो बाबराने भारतात आणला होता;असदुद्दीन ओवैसी यांचा दावा

पीएम मोदी, उद्धव ठाकरे जो कुर्ता घालतात,तो बाबराने भारतात आणला होता;असदुद्दीन ओवैसी यांचा दावा


Asaduddin Owaisi :  “इथे किती लोक कुर्ता घालून आले आहेत. मोदीपण कुर्ता घालतात. उद्धव ठाकरे पण कुर्ता घालतात. इम्तियाज जलिल कुर्त्यामध्ये चांगले दिसतात. हा कुर्ता कुठून आला माहिती आहे का? हा कुर्ता बाबराने आणलेला आहे. कांदा सगळे खातात ते कोणी दिला. औरंगजेबाने दिला. आता तुम्ही सांगत आहात की, देशात राहायचे असेल तर असे वागा. तुम्ही कुर्ता कशाला घालता. कुर्ता घालूच नका. आम्हाला मुघलांशी काही देणेघेणे नाही”, असे असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले. अकोला येथे एमआयएमची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

नारे तकबीर अल्लाहू-अकबरचे नारे 

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, सारख म्हणतात मंदिरे तोडली. मंदिर कोणी तोडली माहिती आहेत का? जम्मू काश्मीरचा बादशहा होता राजा हर्ष..त्याच्याकडे एक फौज होती. त्याच काम एवढचं होतं की, मंदिर तोडा. मी भडकावू भाषण देत नाही. तुमच्या मनात बाबरी मशीदीबाबत आस्था आहे की नाही? असे म्हणत ओवीसींनी नारे तकबीर अल्लाहू-अकबरचे नारे दिले. हिटलरने 60 लाख यहूदींना संपवले. 1930 मध्ये हिटरलने हे कृत्य केलं. आता आपण 2024 मध्ये आलो आहोत. दरवर्षी यहुदी हा दिवस आठवतात. तर भारतातील मुस्लीमांनी 6 डिसेंबर हा दिवस लक्षात ठेवले पाहिजे. तुम्ही 6 डिसेंबर विसरु नका. तुम्ही 6 डिसेंबरला विसरलात तर तुमच्या आयुष्यात 6 डिसेंबरप्रमाणे घटना घडू नयेत. 

काँग्रेसमध्ये काय राहिलं हे काँग्रेस वाल्यांनी सांगावे

महाराष्टात कोणीही सेक्युलर राहिलेले नाही. उद्धव ठाकरे म्हणतात, बाबरी पाडल्यामुळे आम्ही खूश आहोत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सध्या कोण आहे? शरद पवार साहेब, काँग्रसचे नेते हे त्यांच्यासोबत आहेत. हीच काँग्रेस पुन्हा येऊन म्हणेल की, वाचवा. अरे तुम्ही आम्हाला म्हणत आहात. पंजाबमध्ये सिद्धू भाजपमध्ये जात आहे. काँग्रेसमध्ये काय राहिलं हे काँग्रेस वाल्यांनी सांगावे. आता आपल्या देशात काय होत आहे. देशात मुस्लीमांसंबधीत ज्या गोष्टी आहेत, त्याला इथे ठेवले जाऊ शकत नाही, असं बोललं जाऊ लागलं आहे. आम्ही आणि मुगल एक असल्याचे सांगतात. मी काय औरंगजेबाचा प्रवक्ता आहे का? असा सवालही ओवेसी यांनी केला. अशोक चव्हाण भाजप-मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेत. माझ्यावर यांनी सातत्याने भाजपची बी टीम आहे, अशी टीका केली. मात्र, हेच आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, असे म्हणत ओवैसी यांनी अशोक चव्हाण आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Narayan Rane : राज्यसभेला पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही, पण तरीही..! नारायण राणेंच्या मनात नेमकं काय?

अधिक पाहा..



Source link

‘तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून…’; नवनीत राणांवर बोलतांना जलील यांची जीभ घसरली

‘तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून…’; नवनीत राणांवर बोलतांना जलील यांची जीभ घसरली


Imtiyaz Jaleel On Navneet Rana : ‘या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल’, असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एमआयएम) चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, अकोला येथील सभेत आपल्या भाषणातून नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना जलील यांची जीभ घसरली.

नवनीत राणा यांच्यावर टीका करतांना जलील म्हणाले की, “असुदुद्दीन ओवेसी यांचे संसदेतील भाषण पाहा, त्यांनी म्हटले आहे की, आम्ही भगवान रामाचं आदर करतो. मात्र, आम्ही नथुराम गोडसेचं आदर करणार नाही. तर, नवनीत राणा म्हणतात की, ‘या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. तुझ्या बापाच्या लग्नात आहेर म्हणून हे देश आला आहे का?, एकतर आम्ही अशा हलक्या लोकांच्या तोंडी लागत नाही. राणा यांनी माझ्यावर टीका केली असती तर मी सहन केले असते. मात्र, ओवेसी यांच्याबद्दल एक शब्द देखील बोलल्यास ते व्याजासह अमरावतीमध्ये आणि तुझ्या घरी येऊन परतफेड करेल, असे जलील म्हणाले.

तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. 

तुम्हाला वाटत असेल की, दिल्लीत तुमचा बाप बसला आहे. त्या बापाच्या जीवावर तुम्ही काहीही बोलणार असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या बापाचा बाप येथे उभा आहे. चांगले राहाल तर आमच्याकडून देखील चांगली अपेक्षा ठेवा. पण तुम्हाला वाटत असेल की, मी काहीही बोलणार, पण लक्षात ठेवा महिला असल्याने सन्मान करतोय. स्वतःच घर सोडून रस्त्यावर ढोल वाजवण्यासाठी जाणाऱ्या याच राणा आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचण्यासाठी जाणाऱ्या राणा यांनी आपल्या घरात हनुमान चालीसा वाचली पाहिजे. असली नौटंकी आमच्यासोबत चालणार नाही. ‘आगाज तुमने किया है, अंजाम तक हम ले जायेंगे’ असे म्हणत जलील यांनी राणा  यांच्यावर टीका केली.

नेमकं काय आहे प्रकरण? 

असुदुद्दीन ओवेसी यांनी अधिवेशनादरम्यान संसदेत बोलतांना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी ओवैसी यांनी “बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद”, असे नारेही दिले होते. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे प्रमुख ओवेसी यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. “तुम्हाला या देशात राहायच असेल तर जय श्रीराम म्हणावेच लागेल. रामाचा आदर करावाचा लागेल” असे नवनीत राणा म्हणाल्या होत्या. आता त्यांच्या टीकेला जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Navneet Rana : देशात राहायचं असेल, तर जय श्रीराम म्हणावंच लागेल, नवनीत राणा भर सभागृहात ओवेसींना भिडल्या

अधिक पाहा..



Source link

खासदार ओवेसी आणि आमदार नितेश राणे यांची अकोल्यात एकाच वेळी सभा; दोन्ही सभांच्या हेतूवर अमोल मिटकरींना संशय, म्हणाले…

खासदार ओवेसी आणि आमदार नितेश राणे यांची अकोल्यात एकाच वेळी सभा; दोन्ही सभांच्या हेतूवर अमोल मिटकरींना संशय, म्हणाले…


Akola News अकोलाअकोला शहरामध्ये (Akola News) आज एआयएमआयएमचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) आणि भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) थेट सभेवर प्रश्न उपस्थित दोन्ही नेत्यांना समज दिली आहे. देशभर उद्या शिवजयंती साजरी होत असतानाच दोन नेत्यांच्या अकोल्यात सभा का होत आहे? हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

भाषणादरम्यान दोन्ही नेत्यांनी समाजात वाद निर्माण होईल, अशी प्रक्षोभक वक्तव्य टाळावीत. अकोला शहरात हिंदू-मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यात वाद होईल अशी वक्तव्य त्यांनी करू नये, अशी कळकळीची विनंती आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. सोबतच पोलिसांना देखील आवाहन करीत म्हटले आहे की, या दोन्ही नेत्यांना समज देऊन जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्था कुठे अडचण निर्माण येईल, असा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यावर लक्ष ठेवण्याचे देखील आवाहन मिटकरींनी केले आहे. 

अकोल्यात एकाच वेळी दोन सभा

भाजप आमदार नितेश राणे यांची आज अकोला जिल्ह्यातील निंबा फाटालगतच्या लोहारा गावातील मशिदीच्या अतिक्रमणामुळे निंबा फाटा येथे जाहीर सभा घेणार आहे. तसेच ते लोहारा गावाला देखील भेट देतील, अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काही वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसरीकडे  खासदार असदुद्दीन ओवेसींची जाहीर सभा आज अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फीकारबाबा मैदानावर संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम अकोल्यात उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. मात्र त्यापूर्वीच अकोला शहरातील सामाजिक वातावरण बिघडू नये, असा सावध पवित्रा आमदार अमोल मिटकरी यांनी घेत या दोन्ही नेत्यांना समज दिली आहे. 

या विषयावर भाष्य करताना अमोल मिटकरी म्हणाले की,  अकोला जिल्हा हा धार्मिक सलोखा जपणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षाचा इतिहास आहे की इथे हिंदू मुस्लिम एकत्र गुण्यागोविंदाने नांदत आले आहेत. जे काही बेकायदेशीर असेल त्या ठिकाणी त्यांनी नक्कीच भाष्य करावं, त्याबद्दल कुणाचेही दुमत नाही. अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ज्याने त्याने तो बाजवला देखील पाहिजे. मात्र अकोला शहराचा इतिहास पाहता जिल्ह्यामधली कायदा आणि सुव्यवस्था कुठे अडचणीत येईल असा प्रयत्न कोणी करू नये. मी ज्या पक्षात आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे. मात्र ओवेसी असतील किंवा नितेश राणे असतील यांनी हिंदू आणि मुस्लिम मध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करू नये. या दोन्ही नेत्यांना भाषण दरम्यान प्रक्षोभक वक्तव्य करू नये ही त्यांना विनंती असल्याचे देखील आमदार अमोल मिटकरी म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! वाहनाचा कट लागला म्हणून रागाच्या भरात थेट तरुणाला संपवलं; अकोल्यातील घटना

धक्कादायक! वाहनाचा कट लागला म्हणून रागाच्या भरात थेट तरुणाला संपवलं; अकोल्यातील घटना


Akola Crime News अकोला : वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील ( Akola Crime News) हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल (दि. 16) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. देवानंद उत्तम तायडे (28) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. लाठ्या-काठ्यानी देवानंदवर हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी ( Akola Police) तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला असून मारेकरांचा शोध आणि पुढील तपास पोलीस करत आहे. मात्र किरकोळ वादातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच दहशत पसरली आहे. 

शुल्लक कारणावरुन हत्या

हिवरखेड येथील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात होता. दरम्यान, वाटेत उभ्या असलेल्या वाहनाला त्याच्या वाहनाचा कट लागला. यावरून काही अज्ञात व्यक्ती आणि देवानंद यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी देवानंदला अश्लील शिव्यागाळही केली. परिणामी शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यातून रागाच्या भरात चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठिने वार केले. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला.  त्यानंतर या मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

फरार आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या शासकीय पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून सध्या देवानंदच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे. लवकरच देवानंदच्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिली. दरम्यान आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी एक पथक नेमण्यात आले असल्याचे देखील  पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी सांगितले. मात्र अगदी शुल्लक कारणावरुन झालेल्या हत्येच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच देवानंदच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मनोज जरांगे पाटील यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

मनोज जरांगे पाटील यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा


Akola News अकोला : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या जीवाला धोका असून त्यांच्यावर विष प्रयोगाची शक्यता नाकारता येत नसल्याचा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलाय. जरांगे पाटील यांना दिली जाणारी औषधं, जेवण, इंजेक्शन आणि सलाईन हे सर्व तपासूनच द्यावीत. कारण सध्या राज्यात ज्या पद्धतीने जरांगे पाटलांचे राजकारण चाललंय किंवा त्यांची आंदोलन चाललेली आहेत, त्या आंदोलनामुळे अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता जरांगे पाटील यांनी दक्षता घ्यावी असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. 

घातपाताची शक्यता नाकारता येत नाही

मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला काही लोकांपासून धोका. याच्यामागे नेमकं कोण आहे ते सांगणार नाही, मात्र जरांगे यांच्यामुळे अनेकांचा राजकीय भवितव्य धोक्यात आल्याने त्यांच्या घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना दिले जाणारे जेवण, औषध हे अतिशय विश्वासू व्यक्ती आणि डॉक्टरांच्या समोर दिली जावी. मनोज जरांगे यांनी स्वतःबद्दल दक्षता आणि काळजी घ्यावी. जेव्हा शासनाने जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी डॉक्टर्स आणि इतर सगळं ठेवलेले आहे, त्याप्रमाणे त्या डॉक्टरला सक्त ताकीद दिली पाहिजे की, जरांगे पाटील यांना काहीही तपासल्या शिवाय अथवा बघितल्या शिवाय  देऊ नये. ही व्यवस्था शासन करेल, अशी अपेक्षा माल असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान

ज्या पद्धतीने जरांगे पाटील यांचे राजकारण चाललंय किंवा त्यांची आंदोलन चाललेला आहेत, त्या आंदोलनामुळे अनेक जणांना धक्का लागण्याची शक्यता आहे. या धक्क्यामुळे हल्ली बरेच जण धास्तावलेले सुद्धा आहेत. अशा मध्ये जरांगे पाटील हे एक्स्ट्रीम स्टेप घेत आहेत.  जरांगे पाटील यांच्या राजकारणामुळे मोठी उलथापालत होत असते. त्यामुळे एक दक्षता म्हणून मी शासनाला या माध्यमातून इशारा देत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून शासनाने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. जरांगे पाटील यांनी निजामी मराठ्यांच्या राजकारणाला आव्हान दिले आहे. त्यामुळे ही दक्षता घेऊन त्यांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; हिंगोली लोकसभा संघटक बी. डी. चव्हाण यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश

मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; हिंगोली लोकसभा संघटक बी. डी. चव्हाण यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश


Akola News: अकोला : मराठवाड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या शिवसेनेला (Shiv Sena) वंचितनं मोठा धक्का दिला आहे. पक्षाचे जेष्ठ नेते आणि हिंगोली लोकसभा संघटक डॉ. बी. डी. चव्हाणांनी (Dr. B.D. Chavan) ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत वंचितमध्ये प्रवेश केला आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) यशवंत भवन या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला.

डॉ. चव्हाण राज्य सरकारच्या वसंतराव नाईक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. यानिमित्ताने आंबेडकरांनी मराठवाड्यातील बंजारा समाजाच्या मतांना जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे. यासोबतच अकोला (Akola News) जिल्ह्यातील ठाकरे गटाचे मुर्तिजापूर तालूकाप्रमुख संगीत कांबे यांनीही वंचितमध्ये प्रवेश केला आहे. संगीत कांबे यांच्या पत्नी गायत्री कांबे पंधरा वर्षांपासून ठाकरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच राज्याचे राजकारणात मोठे फेरबदल होत असतांना मराठवाडा विदर्भाच्या राजकारणात देखील मोठे बदल होत असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्यात ठाकरे गटाला मोठा धक्का

मराठवाड्यात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे बंजारा समाजातील मोठे नेते डॉ. बी.डी चव्हाण यांचा आज वंचित मध्ये प्रवेश झाला. आज सकाळी अकरा वाजता अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत डॉ. बी. डी. चव्हाण यांच्यासह 300 प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. चव्हाण हे 2009 पासून हिंगोली लोकसभा लढवण्यास इच्छुक होते. तब्बल तीन वेळा चव्हाण यांची लोकसभेची उमेदवारी नाकारली गेली. चव्हाण हे वंचितमध्ये प्रवेश करून हिंगोली लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे. वंचितकडून उमेदवारीही निश्चित असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप हे स्पष्ट झालं नाहीये.

चव्हाण यांनी 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती. नंतर 2009 साली त्यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढवली, तर 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला होता. चव्हाण यांच्या पत्नी डॉ. निकिता चव्हाण या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक आहेत. त्याही काही दिवसातच प्रा. अंजली आंबेडकर आणि प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान आता नांदेड आणि हिंगोलीत ओबीसीचे बडे नेते उबाठा गटासाठी महत्वाचे होते. आता हे दोन्ही नेते वंचितकडे गेल्यानं वंचित साठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये बळ मिळणार, असेही बोलले जाते

कोण आहेत डॉ. बी.डी. चव्हाण? 

  • मराठवाड्यातील बंजारा समाजाचे मोठे नेते.
  • सर्वात आधी प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बहूजन महासंघातून राजकीय सुरूवात.
  • भारिप, बसपा, ठाकरे गट असा राजकीय प्रवास.
  • मराठवाड्यासह विदर्भातील ‘बंजारा बेल्ट’मध्ये चांगला प्रभाव.
  • 1997 साली जनता दल पक्षाकडून हिंगोली लोकसभा लढवली होती.
  • 2009 साली त्यांनी बसपच्या वतीने निवडणूक लढवली, # 2014 मध्ये किनवट विधानसभा त्यांनी लढवली. ज्यात त्याचा थोडक्यात पराभव झाला.
  • चव्हाण यांच्या पत्नी डॉ.निकिता चव्हाण या शिवसेना ठाकरे गटाच्या नांदेड जिल्हा महिला संघटक. 

अकोल्यातही ठाकरेंना धक्का; संगीत कांबे ‘वंचित’मध्ये 

अकोला जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संगीत कांबे यांचाही असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित मध्ये प्रवेश झाला आहे. कांबे हे 20 वर्षापासून राजकरणात आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य देखील राहिले आहे. तसेच ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख आणि सुरुवातीला भाजपमध्ये होते त्यानंतर ठाकरे गटात प्रवेश केला. कांबे यांच्या पत्नी गायत्री कांबे 15 वर्षापासून मुर्तिजापूर तालुक्यातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. ठाकरे गटाचे आमदार नितीन देखमुख यांची शेतकरी संघर्ष पदयात्रा आज मुर्तिजापूर तालूक्यात असतांना वंचितनं ठाकरे गटाला हा धक्का दिल्याचं बोलले जात आहे.  

‘महाविकास आघाडी’ने आपल्या मसुद्याचं काय केलं माहीत नाही : प्रकाश आंबेडकर

दरम्यान, किमान समान कार्यक्रमासाठी आपण दिलेल्या मसुद्यावर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी काय चर्चा केली?, याची आपल्याला माहिती नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. यासोबतच याला ते विलंब का लावतायेत?, याचे उत्तरही त्यांच्याकडेच असल्याचंही आंबेडकरांनी सांगितलं आहे. आपल्या पक्षाची सर्व 48 जागा लढण्याची तयारी असल्याचं आंबेडकर म्हणालेत. मात्र, आपण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची वाट पाहणार असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp