शेतमालाला हमीभावाची गॅरेंटी का देत नाही? आमदार बच्चू कडूंचा पीएम मोदींना करडा सवाल

शेतमालाला हमीभावाची गॅरेंटी का देत नाही? आमदार बच्चू कडूंचा पीएम मोदींना करडा सवाल


अमरावती : देशातील शेतकरी (Farmers) पुन्हा किसान आंदोलन 2.0 साठी सज्ज झाले आहे. सध्या पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थानसह देशभरातील शेतकरी दिल्लीला (Delhi) कूच करण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीला चारी बाजूंनी शेतकऱ्यांनी घेरलं असून दिल्लीत येणाऱ्या प्रमुख सीमांवर बॅरिकेड्स, काटेरी कुंपण, मोठे लोखंडी खिळे लावण्यात आले आहे. कसेही करून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. अशातच राज्यात सत्तेत सहभागी असलेले प्रहार जनशक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केंद्र सरकारला थेट इशारा देत सरकारवर निशाणा साधला आहे. 

शेतकऱ्यांना गॅरेंटी का देत नाही? 

केंद्र सरकारने जो शेतकऱ्यांवर हल्ला केला त्याचा मी निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक गोष्टीची गॅरंटी देतात. मग शतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याची गॅरंटी मोदीजी कां देत नाही, ती गॅरेंटी देखील मोदीजींनी दिली पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही सातवा-आठवा वेतन आयोग तुम्ही देता, पगाराची हमी तुम्ही देता, इतर बाबती हमी देता, त्याच त्याचप्रमाणे तुम्ही शेतकऱ्यांना का हमीभाव देत नाही. असा प्रश्न उपस्थित करत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांच्या याबाबतीत हे सरकार पूर्णपणे फेल

शेतकऱ्यांच्या याबाबतीत हे सरकार पूर्णपणे फेल झाले आहे. आजघडीला मी जरी सरकारमध्ये शामील असलो तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन- तीन गोष्टी सोडल्या, तर केंद्र आणि राज्य सरकारने कुठलीही चांगली योजना केली नसल्याचे म्हणत बच्चू कडू यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांना हमीभाव जर योग्य पद्धतीने दिला कुठलीही योजना आखण्याची गरजच पडणार नाही. शेतकऱ्यांना हमीभाव हा दिलाच पाहिजे, ही अतिशय रास्त मागणी असल्याचे देखील  बच्चू कडू म्हणाले.

सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे

जेव्हापासून हा देश स्वतंत्र झाला तेव्हापासून शेतकरी हमीभाव मागतो आहे. स्वामीनाथन आयोग हा संपूर्ण देशासाठी लागू झाला पाहिजे. आज शेतमालाला 15% नफ्याने सुद्धा भाव मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. कपासाचे भाव हे सहा हजारावर गेले. आज कापसाला क्विंटल मागे 12 हजार रुपये खर्च लागतो. हे मी सांगत नाही तर, राज्य सरकार असे सांगत आहे. म्हणजे नफा तर दूर आज शेतकरी तोट्यात जाऊन शेती करत आहे. अशी जर शेतकऱ्यांची अवस्था राहिली, तर मला असं वाटतं,  तुमच्या त्या विकासाच्या योजनांचं काय करावे. शेतकऱ्यांच्या खिशात जर पैसेच येणार नसतील, शिवाय उरले सुरले पैसे ही फुकट शेतीत जात असतील तर सरकार एक प्रकारे शेतकऱ्यांच्या खिशावर डाकाच टाकत आहे. त्यामुळे सरकारने ही डाकेखोरी बंद केली पाहिजे, असे देखील आमदार बच्चू कडू म्हणाले.

दोन वेळा मुख्यमंत्री राहूनही भाजपसोबत का गेले?

हे सर्व विकासाचे जाळे आहे. विकासाचा जाळ्यामध्ये अशोक चव्हाण फसले आहे. मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतं की अशोकराव दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. कॅबिनेट पंधरा वर्षे राहिले मात्र तरी देखील ते भाजपमध्ये का गेले. असे असले तरी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र लोकांच्या मनात जो संभ्रम आहे इतके सगळे मिळून देखील ते भाजपमध्ये का गेले, हे स्पष्ट व्हायला पाहिजे. असा टोला देखील बच्चू कडू यांनी अशोक चव्हाण यांना लगावला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

बेखौफ-बेबाक ‘हिम्मतवाला’…; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात झळकले अनोखे बॅनर्स

बेखौफ-बेबाक ‘हिम्मतवाला’…; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात झळकले अनोखे बॅनर्स


अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) देखील राज्यभर दौरे आणि सभा करत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हटलं की, चर्चा होते अकोला लोकसभा मतदारसंघाची (Akola Lok Sabha Constituency), याच मतदारसंघात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ‘नया साल, नया खासदार’ अशा आशयाचे बॅनर लागले होते. आता पुन्हा अशाच प्रकारचे बॅनर्स अकोल्यात सगळीकडे लागले आहेत. 

‘अकोला में तो बस प्रकाश आंबेडकर चल रहे हैं, हिम्मतवाला, ये दिल मांगे… बालासाहब आंबेडकर, यही है राईट चॉईस, जिंदा बंदा, निडर – बेखौफ – बेबाक, अशा आशयाचे बॅनर्स प्रकाश आंबेडकर यांच्या छायाचित्रांसह अकोल्यात झळकत आहेत. त्यामुळे शहरात या बॅनर्सची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांसह आता कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. 

शहरातील अनेक भागात लागले बॅनर…

वंचित बहुजन आघाडीने अकोला मतदारसंघाची बांधणी मजबूतरित्या केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने वंचित बहुजन आघाडीत दररोज पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदारसंघात वाढल्याचे दिसत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात बदल होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळासह सामान्य जनतेमध्ये आहे. या संदर्भाने अकोला शहरातील जिल्हा परिषद प्रवेश द्वाराजवळ, राधाकृष्ण टॉकीज चौक, नेहरू पार्क, दुर्गा चौक, आदी ठिकाणी वेगवेगळ्या मजकुराचे बॅनर लागले आहेत. या बॅनरने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अकोल्याची जागा महाविकास आघाडीत आंबेडकरांच्या ताब्यात…

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपबाबत देखील चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील बहुतांश मतदारसंघावर आघाडीतील नेत्यांचे एकमत झाले आहे. ज्यात अकोला लोकसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीला सोडण्याचा देखील निर्णय झाला आहे. त्यामुळे सहाजिक या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून प्रकाश आंबेडकर स्वतः रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघातील यंदाची निवडणूक देखील रंगतदार होणार आहे. विशेष म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात चर्चेत राहणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

 Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभा मतदारसंघात ‘राजकीय वादळा’ पूर्वीची शांतता; प्रकाश आंबेडकर विरुद्ध भाजपची थेट लढत

अधिक पाहा..



Source link

भाजप म्हणजे, इतरांच्या मदतीनं बाळ जन्माला घालण्याचा प्रकार; नितीन देशमुखांची टीका

भाजप म्हणजे, इतरांच्या मदतीनं बाळ जन्माला घालण्याचा प्रकार; नितीन देशमुखांची टीका


Nitin Deshmukh अकोला: येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) जे आमदार, खासदार निवडून येतील ते सगळे काँग्रेसच्या (Congress) विचारधाराचे आणि इतर वेगळ्यावेगळ्या विचारधाराचे दिसतील. भाजपच्या (BJP) विचारधारेने लोक कुठल्याही परिस्थितीत निवडून येत नसल्याने, त्यांनी आता दुसऱ्या इतर पक्षातून लोकांना आपल्या पक्षात आयात करण्याचे उद्योग चालवले आहे. हे म्हणजे आपण मूल जन्माला आणू शकत नाही म्हणून, दुसऱ्याच्या हाताने बाळ जन्माला घालण्याचा हा प्रकार असल्याची घाणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी भाजपवर केली आहे.

भाजपला काँग्रेसच्याच विचारधारेवर चालावे लागेल

एखादा माणूस कुठल्या विचारधारेचा असल्यावर तो कुठल्याही पक्षात गेला तरी त्याची विचारधारा बदलत नसते. म्हणजे आता जे इतर पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये गेले आहेत ते जर निवडून आले, तर हे निवडून येणारे लोक असतील त्यांची विचारधारा ही त्या त्या पक्षाची विचारधारा असेल. ती भाजपची विचारधारा कधीही होऊ शकत नाही. भविष्यात भाजपला काँग्रेसच्याच विचारधारेवर चालावे लागेल, असे एकंदरीत परिस्थिती निर्माण होणार असल्याचे देखील आमदार नितीन देशमुख म्हणाले.

कुठलाही नेत्याचे अशा पद्धतीने पक्षातून निघून जाण्याने पक्षाला फार काही परिणाम होत नाही. शेवटी कुठलाही नेता ही जनता घडवत असते. जनता ज्यांच्या सोबत असते, तोच खरा नेता ठरत असतो. त्यामुळे ज्याच्यासोबत जनता नाही तो कधीही नेता होऊ शकत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला किंवा कुठल्या पक्षाला याचा कुठलाही फरक पडणार नाही, असे देखील देशमुख म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबत काही आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. विधानपरिषदेचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही काँग्रेसच्या पदाचा राजीनामा दिला आहे. अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्येही अस्वस्थता असल्याचं काँग्रेस नेते भाई जगताप यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चाही होतेय. 

गेल्या 24 तासांत अशोक चव्हाणांच्या हालचाली (काँग्रेस सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार)

  • शनिवार-रविवार महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत प्रदेश कार्यालयात बैठका होत्या
  • रविवारी दुपारी 12 वाजता चेन्निथला यांच्यासोबत बैठकीला अशोक चव्हाण पोहचले.
  • त्यानंतर तासभर चेन्निथला यांच्यासोबत बैठक झाली आणि बैठकीतून बाहेर पड़ून दुपारी तीन पर्यंत अशोक चव्हाण टिळकभवनमध्ये बसून होते
  • सकाळी 8 वाजता – राहुल नार्वेकरांची भेट घेतली
  • सकाळी 11  वाजून 24 मिनिटांनी – आमदारकीचा राजीनामा दिला
  • दुपारी 12.15 वाजता – राजीनाम्याची प्रत त्यांच्या मदतनीसाने प्रदेश कार्यालयात आणून दिली
  • दुपारी 1.45 वाजता – अशोक चव्हाणांची ट्विटरवरून राजीनाम्याची घोषणा

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंग मास्टर, त्यांना हवे तसे ते काँग्रेसला नाचवतील; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी रिंग मास्टर, त्यांना हवे तसे ते काँग्रेसला नाचवतील; प्रकाश आंबेडकरांची घणाघाती टीका


Akola News अकोला : आगामी निवडणुकांच्या पूर्वीच राज्याच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहे. दरम्यान, आज महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) मोठा भूकंप झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या आमदारकी आणि काँग्रेस पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर अशोक चव्हाण (Ashok Chavan) लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असताना आणि या सगळ्या घडामोडी पाहता ते भाजपच्या वाटेवर (BJP) असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर टीकास्त्र डागले आहे. 

कुणाच्या जाण्याने पक्षाला फरक पडत नसतो 

अशोक चव्हाण यांच्या देलेल्या आमदारकी आणि काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनाम्या संदर्भात भाष्य करतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपाला असं वाटत असेल की या निर्णयामुळे आपण सेफ होऊ. मात्र मला हे फार कठीण वाटतं. याचं कारण असं की, एखादी नेता त्या पक्षाला सोडून गेला कि त्या व्यक्तीलाच फार त्रास होतो. आमच्याकडे असलेले अनेक आमदार, मंत्री होते हे देखील आम्हाला सोडून गेले. मात्र पक्ष म्हणून त्याचा फार परिणाम झाला, असे नाही. सोडून गेलेल्या व्यक्तीच्या जवळचे मित्र किंवा संपर्कात असलेले तेच फक्त त्या ठिकाणी जात असतात. मात्र पक्ष हा कायम होता तिथेच असतो. त्यामुळे एखाद दुसरा व्यक्ती जाणं हे धक्कादायक आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र त्याच्या जाण्याने पक्षाला फरक पडतो, असे अजिबात नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर

मला व्यक्तिगत असे वाटत नाही की या सर्व परिस्थितीचा मतदानावर परिणाम होईल. राज्यात 60 ते 70 टक्के लोकांनी आपले मत कोणाला द्यायचे आणि कोणाला नाही, याबद्दल विचार करून ठेवलेला आहे. भाजपला वाटतं तसं होईल असे अजिबात नाही. मी यापूर्वी देखील अनेकदा म्हणालो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहे. ईडीच्या चौकशीवर त्यांना हवे त्याने ते नाचवणार. मग ते काँग्रेस पक्षातील वरिष्ठ असतील किंवा तळागाळातील असतील. त्यांना ते नाचवल्या शिवाय राहणार नाही, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

देशभरात साडेचारशे धाडी

कालचीच एक बातमी जी सर्वांसमोर आली नाही. ती म्हणजे काल देशभरात साडेचारशे धाडी टाकण्यात आल्या. या धाडी राजकीय नाही. मात्र या धाडी टाकण्यामागील कारण म्हणजे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ते कितीही बोलत असले की आम्ही चारशेचा आकडा गाठू हे केवळ एका भीतीपोटी बोलण्यात येत असल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले.

एका बाजूला भीती निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या धाडी टाकण्यात येत आहे. ज्यामध्ये राजकीय आणि बिना राजकीय लोक, व्यापारी आदींवर देखील या धाडींमधून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जागावाटप संदर्भात अद्याप तरी माझे कोणाशी बोलणे झालेले नाही. जे आमचे ठरलेले आहे, त्या प्रमाणात आगामी काळात होईल असा विश्वास देखील प्रकाश आंबेडकर यांनी बोलतांना व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात गारपिटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल

Unseasonal Rain : सलग दुसऱ्या दिवशी विदर्भात गारपिटीचा तडाखा; बळीराजा हवालदिल


Unseasonal Rain in Vidarbha : अवकाळी पावसाने विदर्भाला (Unseasonal Rain) सलग दुसऱ्या दिवशी अक्षरशः झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील(Vidarbha)  शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आज पुन्हा एकदा पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. विदर्भातील वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गडचिरोली चंद्रपूर इत्यादि जिल्ह्यात पावसानं झोडपून काढले आहे. तर वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बोराच्या आकाराच्या गार पडत असल्याची माहिती सामोर आली आहे. या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार असल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

वर्धा जिल्ह्यातील  25 गावांना गारपिटीचा तडाखा

वर्धा जिल्ह्यातील  सालापुर, मारडा, कळमना, कोरा, काकरापार, मंगरूळ, रासा, मोहगा इत्यादिसह लगतच्या 25 गावांमध्ये दमदार गारपीट होत असल्याचे चित्र आहे. 11 जानेवारीच्या सायंकाळी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे. बोराच्या आकारांच्या या गारीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी डबघाईस जाण्याची शक्यता बाळवली आहे. या नुकसान भरपाईचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जोर धरू लागली आहे. 

यवतमाळमध्ये रब्बी हंगामातील पिकांना फटका 

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील बोरी, चातारी, सावळेश्वर, माणकेश्वर, गंजगाव, कोपरा,देवसरी इत्यादींसह आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीटने हजेरी लावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र तारांबळ उडवली आहे. त्याचा सर्वाधिक फटका रब्बी हंगामातील काढणीला आलेले गहू, चना, तूर आणि ज्वारी पिकांना बसला असून शेतमालाचे मोठे नुकसान त्यात झाले आहे.  

सोमवारीही याच जिल्ह्यांना पावसाचा इशारा

हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादि जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ते विरळ पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात देखील कालपासून पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी विजांसह गारपीटची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना धमकीचं पत्र नेमकं कुठून आलं? समोर आली मोठी अपडेट

अधिक पाहा..



Source link

Amol Mitkari : …तर तुमचं थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नाही;  शाईफेकप्रकरणी अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari : …तर तुमचं थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नाही; शाईफेकप्रकरणी अमोल मिटकरी आक्रमक


Akola News अकोला : बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar)  यांचे होर्डिंग लावण्यात आले होते. या होर्डिंगवर काही अज्ञातांकडून शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय. शाईफेक करणारे समोर आल्यानंतर आम्ही त्या नालायकांचे थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा आमदार मिटकरी यांनी यावेळी दिलाय.

अज्ञातांकडून बॅनरवर शाईफेक

काऱ्हाटी गावाच्या वेशीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते. या फलकावर शाई फेक झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी पाहणी करून हा फलक तात्काळ काढला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  या निवडणूक लढवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी द्या, अशी राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असतानाच ही शाई फेकीची घटना समोर आली आहे. या बॅनरवर नेमकी कोणी शाईफेक केली यासंदर्भात अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी त्यादिशेने तपास सुरू केला असतांनाच आता राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत. अशातच आमदार अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

थोबाड काळं केल्याशिवाय राहणार नाही

बारामती परिसरामध्ये आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या होर्डिंगवर ज्या नालायकांनी शाईफेक करण्याचा प्रयत्न केला किंवा ती फेकली असेल, त्या नालायकांना सांगू इच्छितो की, अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही. लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं. या पद्धतीचा अपमान आणि उपहास करत असाल, तर  ज्या दिवशी तुम्ही दिसाल किंवा आम्हाला हे कृत्य करणारे कळतील,  त्या दिवशी तुमचं थोबाड आम्ही काळ केल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

पुढे ते म्हणाले, आजची घटना अतिशय निंदनीय आहे. त्याबद्दल आम्ही सर्व त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. पण ज्यांनी ही घटना केली आहे, ते इतक्या लवकर सुटणार नाहीत. ते जिथे कुठे दिसतील त्याचं थोबाड रंगवल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शांत बसणार नाही. असा इशारा देखील मिटकरी यांनी दिला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp