Akola : अकोल्यात4  नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले : ABP Majha

Akola : अकोल्यात4 नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले : ABP Majha



<p>अकोल्यात ४ नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले<br /><br />रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद शाळेजवळ आढळले अर्भक</p>
<p>शाळेच्या छतावर आढळले ४ नवजात अर्भकांचे मृतदेह&nbsp;</p>



Source link

उपोषणकर्त्या कामगारांचा रोष, राधाकृष्ण विखे पाटलांना उद्घाटन न करताच परतावं लागलं

उपोषणकर्त्या कामगारांचा रोष, राधाकृष्ण विखे पाटलांना उद्घाटन न करताच परतावं लागलं


Akola News : अकोल्यात शनिवारी रात्री उपोषणकर्ते कामगारांच्या रोषामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना एका कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय. अकोला (Akola) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या काही दिवसापासून बिर्ला कॉलनीतील कामगार कुटुंबीयांसह उपोषणाला बसले आहेत. या कामगारांच्या 70 कुटुंबांना प्रशासनाने घरे खाली करण्याची नोटीस दिल्याने हे उपोषण सुरु आहे. अकोला ऑइल इंडस्ट्रीज आणि बिर्ला ऑइल मिल हे तीस वर्षांपूर्वीच बंद पडले आहे. मात्र, 70 कामगारांची देणी थकल्याने या कामगारांचे कुटुंबीय मिलच्या जागेतच राहतायेत. त्यामुळे त्यांच्याकडून उपोषण सुरु आहे. याच उपोषणकर्ते कामगारांच्या रोषाचा सामना टाळण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना कार्यक्रमाचं उद्घाटन न करताच परतावं लागलंय.

दरम्यान शनिवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘बोलके रस्ते’ या सौंदर्यकरण प्रकल्पाचा उद्घाटन राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार होते. यासाठी विखे पाटील यांची वेळ घेऊन संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती. मात्र, याच कार्यालयाच्या परिसरात उपोषण करणाऱ्या कामगारांनी पालकमंत्र्यांनी आपल्याला भेटावं अशी मागणी केली होती. मात्र, पालकमंत्री न भेटताच निघून गेल्याने कामगारांनी पालकमंत्री आणि सरकारविरोधात मोठा रोष व्यक्त केलाय. यावेळी बोलताना कामगारांच्या भावना अनावर झाल्या होत्या. तर, यावर विखे पाटील यांचीप्रतिक्रिया मात्र मिळू शकली नाही. 

भूमी अभिलेख, मालमत्ता नोंदणीसह खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयाबाबत महत्वाचा निर्णय 

विखे पाटील अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तर, अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रांत आणि तहसील कार्यालयाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, “राज्याभरात भूमी अभिलेख आणि मालमत्ता नोंदणी आणि खरेदी विक्रीची सबरजिस्ट्रार कार्यालयं आता तहसील आणि प्रांत कार्यालय परिसरात होणार आहे. अनेक ठिकाणी ही कार्यालयं बाहेर असल्याने गैरव्यवहार होत असल्याची कबुली देखील विखे यांनी दिली. तर, चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला असल्याचा उल्लेख विखे पाटील यांनी केला. 

नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसला…

विखे पाटील यांच्या याच दौऱ्यात त्यांच्या हस्ते मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचा शुभारंभ करण्यात आले. तसेच लाखपुरी येथील श्री लक्षेश्वर संस्थानाचे 2 कोटी रुपयांच्या निधीतून सभागृह व सौदर्गीकरण कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले. तर यावेळी बोलतांना विखे म्हणाले की, “नवीन वाळू धोरणामुळे या क्षेत्रातील गुन्हेगारीला आळा बसून, सर्वसामान्यांना परवडेल अशा परात वाळ उपलब्ध होणार आहे. वाळू तस्करी संपवण्यासाठी व जनसामान्यांना स्वस्त दरात बाळू उपलब्य होण्यासाठी नवे वाळू धोरण उपयुक्त ठरत आहे, हे धोरण अधिकाधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न असल्याचे विखे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Radhakrishna Vikhe Patil : “संजय राऊतांना भरपूर शिकायचंय ते भरकटलेले नेते”; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

अधिक पाहा..



Source link

रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

रस्त्यावरच्या लढाईने यश मिळणार नाही, जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला


अकोलासरकार आर्धवट काम करतात आणि अर्धवट कामे सोडतात, त्याचे हे परिणाम आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना आजपासून पुन्हा उपोषण करावे लागत आहे, आहे त्यावर मी इतकेच बोलेल की, या आंदोलनाची वेळ यावेळी योग्य नाही. आरक्षणासंदर्भात  (Maratha Reservation) त्यांनी केलेल्या कुणबी प्रमाणपत्रानुसार त्यांना आरक्षण मिळाले आहे. आता राहिला प्रश्न गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचा. तर त्यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना सांगू इच्छितो की आरक्षण हे रस्त्यावरच्या लढाईने तुम्हाला मिळणार नाही. ते जर मिळवायचे असेल तर त्यांना लोकसभेमध्ये जावे लागेल आणि त्यासाठी जरांगे पाटील यांना निवडणूक लढवावी लागेल. तरच ते हा प्रश्न निकाली काढू शकतात, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.  

ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट वेगळे

पुढे बोलतांना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी जी भूमिका मांडली आहे, ज्यामध्ये ओबीसीचे ताट वेगळे आणि मराठा समाजाचे ताट जे करायचं आहेत ते वेगळे, अशी भूमिका त्यांनी घेतले पाहिजे. तेव्हा कुठे त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थाने यश येऊ शकतं, असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याने मनोज जरांगे आज पासून पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहे.

याबाबत जरांगे यांच्याकडून सरकारला इशारा देखील देण्यात आला आहे. मुंबईतील आंदोलनादरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत नवीन अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन थांबवले होते. मात्र, सरकारने या अध्यादेशाची तात्काळ अमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा मनोज जरांगे यांनी केली होती. मात्र, अंमलबजावणी होत नसल्याने आजपासून आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  

भाजपची दादागिरी ही काही आजची नाही

राज्यात सध्या अंदाधुंदी चालली आहे. मी अगोदरचं म्हणालो होतो, राज्यात जसे जसे इलेक्शन जवळ येतील, तसं राज्यात अराजकता आपल्याला दिसेल. म्हटल्या प्रमाणे आज त्याचं चित्र समोर आहे. सत्तेतून पैसा असं जे चित्र उभं केलं आहे किंवा तो पैसा आपल्याला मिळाला पाहिजे म्हणून एकमेकांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी चालले आहे. भाजपची दादागिरी ही काही आजची नाही, ही आधीपासूनच आहे असे देखील  प्रकाश आंबेडकर म्हणले. सत्ता आता पैसे कमवण्याचं फार मोठं साधन झालं आहे. चोरी करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही, असं असताना मला सुद्धा चोरी करता आली पाहिजे, मला सुद्धा पैसे कमवता आले पाहिजे, अशातूनच ही अंदाधुंदी चालली आहे. त्यातूनच गोळीबार, हत्येचे प्रकरण घडत आहेत. यात नवीन काहीही नाही. याचा अंदाज मी आधीच लावलेला होता असे देखील आंबेडकर म्हणाले. 

पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध

मतभेद हे चालत राहतात. मात्र पत्रकारांवर अशा पद्धतीने हल्ले होता कामा नये. टीका ही होतच राहते, मात्र टीकेला उत्तर हे एखाद्या हिंसक वृत्तीने कोणी देता कामा नये. जो हिंसक प्रकार घडला आहे, त्याचा मी निषेध करतो. असे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाविषयी ते बोलत होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

जातीबाहेरच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून वडिलांनीच केली मुलाची हत्या, अकोल्यात ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक प्रकार

जातीबाहेरच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून वडिलांनीच केली मुलाची हत्या, अकोल्यात ‘ऑनर किलिंग’चा धक्कादायक प्रकार


अकोला: जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलानं दलित मुलीवर प्रेम केल्याच्या कारणावरुन वडिलांनीच दुसऱ्या मुलाच्या मदतीनं पोटच्या मुलाला संपवलं आहे (Akola Honour Killing Case). ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. संदीप नागोराव गावंडे (वय 26) असं मृत तरुणाच नाव आहे. तर नागोराव कर्णाजी गावंडे असं मारेकरी बापाचं नाव आहे. 

मुलाची हत्या करून झाल्यानंतर वडील आणि मारेकरी भाऊ हे सर्व बाहेरगावी निघून गेले होते, त्यानंतर शुक्रवारी ते गावात परतल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास सुरू आहे. 

तरूण पुण्यात नोकरीला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अकोला बार्शीटाकळी तालुक्यातल्या टिटवा गाव आहे. या गावात नागोराव गावंडे हा व्यक्ती वास्तव्यास आहे. त्यांना दोन मुलं असून त्यातील एकाच नाव संदीप आहे. मृत संदीप हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. 

संदीपचं गावातील एका दलित कुटुंबातील मुलीवर प्रेम होतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्न करण्याचा निश्चय केला होता. परंतु हे प्रेम संदीपचे वडील नागोराव यांना मान्य नव्हतं. याचवरून अनेकदा त्यांच्या घरात वाद व्हायचा. 

संदीपच्या वडिलांच्या विरोधामुळे या दोघांनी पळवून जाऊन लग्न करण्याचं ठरवलं. ही गोष्ट संदीपच्या वडिलांना समजली आणि त्यांनी यावर कायम तोडगा करण्याचा निश्चय केलाय. त्यानंतर त्यांनी इतर मुलांच्या मदतीने संदीपची हत्या केली. 

तरुणीला बुलेटस्वार तरुणांकडून पळवून नेण्याचा प्रयत्न

राज्यात गोळीबारांचा थरार सुरू असतानाच आता छत्रपती संभाजी नगरमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातून तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायk घटना घडली. तरुणी आपल्या मैत्रिणीला रुग्णालयात घेऊन जात असतानाच बुलेटवरून आलेल्या तरणांनी भर रस्त्यात अडवून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित तरुणीने वेळीच प्रसंगावधान दाखवून आरडाओरडा केल्याने बुलेटस्वार तरुण पळून गेले. 

या प्रकरणी संबंधित तरुणीने बेगमपुरा पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. बेगमपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या तरुणांचा शोध सुरू आहे.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

shiv sena mla sanjay gaikwad counter attack on Sushma andhare I answer the accusations of women like Sati Savitri not others maharashtra marathi news

shiv sena mla sanjay gaikwad counter attack on Sushma andhare I answer the accusations of women like Sati Savitri not others maharashtra marathi news


Akola News अकोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी आपल्या माजूरड्या आमदारांना लगाम लावावा, अशी टीका शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे  (Sushma Andhare) यांनी संजय गायकवाड यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे सारख्या महिलेने जो आरोप केलाय त्यांना आपण उत्तर देणार नाही. कारण मी सती सावित्री सारख्या महिलांनी केलेल्या आरोपांना उत्तर देतो, इतरांना देत नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत

नाकावर टिच्चून आमचा मुख्यमंत्री करू, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतून बोलताना केला आहे. यावर संजय गायकवाड यांनी भाष्य करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले,  नाकावर टिच्चून मुख्यमंत्री करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी डोक्यावर टिच्चून मुख्यमंत्री करा की, नाकावर टिच्चून करा, मात्र मुख्यमंत्री करण्यासाठी 145 आमदार पाहिजेत, हे लक्षात ठेवा. त्यात आपले किती येतील ते देखील पहा. असा खोचक सल्ला देत त्यांचावर टीका केली आहे. उल्हासनगरमधील गोळीबार म्हणजे हे काही गँगवार वगैरे नाही. प्रॉपर्टी आणि दोन परिसरातला तो वाद आहे. दोघांच्या भांडणात हा विषय घडला असल्याचे देखील संजय गायकवाड म्हणाले. 

फाटक्या तोंडाचे लोक ज्याला त्याला नाव ठेवतात

आमच्या लोकांना युतीतल्या लोकांबरोबर काम करणे हे जर मोदीबिंदू दिसत असेल तर हे त्यांचे दुर्दैव. आमच्या पक्षाचे हे प्रेम आहे की , आमचा नेता वारिष्ठाशी चांगले संबंध ठेवून आहे. त्यामुळे राज्यातल्या लोकांना त्याचा फायदा होतो . हे एकनाथ शिंदे साहेबांचे कसब आहे. संजय राऊतांना कधी कोणाशी चांगले संबंध ठेवताच आले नाही. ते फाटक्या तोंडाचे ज्याला त्याला नाव ठेवतात. आता यांचा कुणी मित्र पण राहिलेला नाही.  अशी खोचक टीका संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर केली आहे.  

अशी भाषा त्यांनी यापुढे तरी बंद केली पाहिजे

मंत्री छगन भुजबळ हे राज्यातले मोठे नेते आहेत.  त्यांनी राज्यातल्या एकमेकांच्या समाजा बद्दल घाणेरडे आणि विषारी शब्द वापरून आग लावायचे प्रयत्न करू नये. आम्ही हे वारंवार सांगत आलोय, ऐवढ्या मोठ्या नेत्याबद्दल आरोप करायला आम्हालाही बर वाटत नाही. किमान अशी भाषा त्यांनी यापुढे तरी बंद केली पाहिजेत. अशा शब्दात गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळ यांना सल्ला दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या  

 

अधिक पाहा..



Source link

संजय राठोडांविरोधातील माझा लढा अजून संपलेला नाही; चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या

संजय राठोडांविरोधातील माझा लढा अजून संपलेला नाही; चित्रा वाघ पुन्हा एकदा कडाडल्या


Chitra Wagh – Akola : राज्यातील शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या विरोधातील आपला लढा अद्यापही संपलेला नसल्याचे भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या आहेत. संजय राठोड (Sanjay Rathod)  यांच्यासंदर्भात दाखल केलेली मुंबई उच्च न्यायालयातील याचिका आजही तशीच आहेत. ती आपण कधीही मागे घेणार नसल्याचे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले. अकोला येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या. चित्रा वाघ म्हणाल्या, तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने संजय राठोड यांना क्लीन चीट का दिलीय?  याचा जाब उद्धव ठाकरेंनाच विचारा असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावलाय. त्यामुळे संजय राठोड यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

चित्रा वाघ यांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप शिंदे गटाला अडचणीत आणतोय का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. मला या घटनेबद्दल फारशी माहिती नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सविस्तर उत्तर दिले आहे. वैयक्तिक चित्रा वाघ म्हणून या घटनेचं दुःख वाटतं असं व्हायला नको होते, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणी व्यक्त केली आहे. 

‘सुषमा अंधारे यांच्या आरोपांवर उत्तर द्यायला बांधील नाही’

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सटर-पटर आरोपांवर उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही. राज्यात सध्या एक मोठ्या ताई आणि दुसऱ्या सटर-फटर ताई काहीतरी बोलत असतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. तुम्ही पक्षात नवीन असाल तर माहिती घ्या. आरोप करताना तुमच्या सरकारने काय केलंय याची माहितीही घ्या. महिलांच्या गाड्या वापरणारे तुमचे आघाडी सरकार होते, असा आरोपही वाघ यांनी केला.  

संजय राठोड यांच्याविरोधातील लढा सुरुच 

मंत्री संजय राठोड विरोधातला माझा लढा आजही सुरूच आहे. यासंदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आजही तशीच आहे आणि मी ती मागे घेणार नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना या संजय राठोड यांना तेव्हाच्या राज्य सरकारने ‘क्लीन चिट’ का दिली होतीय? माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारावे की त्यांनी कोणत्या आधारावर संजय राठोड यांना ‘क्लीन चिट’दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp