तुम्ही तर प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आलात, अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल

तुम्ही तर प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आलात, अमोल मिटकरींचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल


अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या (Last Election) भावनिक सादावर केलेल्या भाष्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात टोकाचा वाद उफाळला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काकाच्या मृत्यूची वाट बघताय का? शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता, जनता तुम्हाला तुमची औकात दाखवेल,असा हल्लाबोल अजित पवारांवर केला होता. त्याला आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्ही तर प्रतिभाकाकींच्या कुंकवालाच हात घातला, असं मिटकरी म्हणाले. ते अकोल्यात बोलत होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असल्यापासूनच पक्षातील एक गट नेहमीच अजितदादांना त्रास देत होता. या गटाचं नेतृत्व आधीपासूनच डॉ. जितेंद्र आव्हाड करीत होते. काल बारामतीतील अजितदादांच्या वक्तव्याचा विपर्यास करीत आव्हाड यांनी हा विषय थेट प्रतिभाकाकीच्या कुंकवापर्यंत आणला असा घणाघात अमोल मिटकरींनी. आव्हाडांच्या या कृतीला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले? (Amol Mitkari on Jitendra Awhad)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आदरणीय अजितदादांविरुद्ध एक सुप्त टोळी तेव्हापासून काम करत होती. आमच्या अनेक गोष्टी लक्षात आल्या. पण वरिष्ठांसमोर आम्ही बोलण्याची हिंमत केली नाही. त्या टोळ्यांमधला एक टोळकं म्हणजे डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जे वारंवार प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करतात. काल बारामती येथे असताना अजितदादांनी जे भाषण केलं त्या भाषणाचा वेगळा अर्थ काढून थेट प्रतिभा काकीच्या कुंकावासोबत त्यांनी ते विधान जोडण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की या टोळक्याचा जो म्होरक्या आहे आणि त्या म्होरक्याच्या अधिपत्याखाली काम करणारी सूप्त टोळी आहे, ती आव्हाडांच्या माध्यमातून उफाळून आली. 

 बारामतीकर फार हुशार आहेत आव्हाडांनी स्वतःच्या मतदारसंघाची काळजी करावी. अजितदादांच्या विधानाचा विपर्यास करून, पवार साहेबांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्न करून, प्रतिभा काकीचा कुंकू काढणाऱ्या जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्रात कोणीही माफ करू शकणार नाही. आव्हाडांचा मी निषेध व्यक्त करतो. जो व्यक्ती रामाबद्दल अपशब्द वापरू शकतो, जो व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक अधिकाराबद्दल बोलू शकतो, ती व्यक्ती अजितदादांबद्दल चांगले बोलू शकेल अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. दादांवर बोलले असते तर एक वेळ मी मान्य केलं असतं, पण ज्या पवार साहेबांच्या ताटात खाता, ज्यांच्या डाळ दाण्यावर जगता, त्यांचांच कुंकू जर काढून त्यांच्या मरणाची वाट पाहत असाल तर जितेंद्र आव्हाड तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले. 

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते? (Jitendra Awhad statement on Ajit Pawar)

लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते, तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही.  ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडं राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही. एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणं कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय . शरद पवार अजरामर राहतील, त्यांचं योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवार काय म्हणाले होते? (Ajit Pawar statement on Sharad Pawar) 

येत्या निवडणुकीत वरिष्ठांकडून शेवटची निवडणूक आहे असे सांगितले जाऊन भावनिक आवाहन केलं जाईल. कधी शेवटची असणार आहे काय माहित, असं अजित पवार बारामतीतील कार्यक्रमात म्हणाले. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले आता माझं ऐका. उद्या आपल्या विचाराचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेल की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे आता माझी कामे झाले पाहिजेत. आपल्या अडीला कोण उपयोगी करतो याचा विचार करा, असं अजित पवारांनी सांगितलं. 

Amol Mitkari on Jitendra Awhad : अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?

संबंधित बातम्या  

चुलत्याच्या मरणाची वाट पाहतोय, अजित पवारांनी हद्द केली, लाज वाटते तुमच्यासोबत काम केल्याची; जितेंद्र आव्हाडांचा घणाघाती प्रहार

Anil Deshmukh : “अजित पवारांचे वक्तव्य भयानक, महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही”; अनिल देशमुखांनी सुनावले खडेबोल   

Ajit Pawar : शरद पवारांवर थेट हल्लाबोल, भावनिक फूंकर; अजित पवारांनी बारामती लोकसभेला जाहीर शड्डू ठोकला!

अधिक पाहा..



Source link

भाजप प्रदेशाध्यक्षांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले,

भाजप प्रदेशाध्यक्षांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात; म्हणाले,


Amravati News अमरावती : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एवढे बावचळले आहेत की जसं मुघलांना संताजी धनाजी दिसायचे, त्यांनी मुघलांना इतकं घाबरवलं होतं, तसं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) घाबरली आहे. त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आता आपल्याला भोपळाही मिळणार नाही. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार इतकं चांगले काम करत आहे की, मोदीजींनी ज्याप्रमाणे देशाला आणि महाराष्ट्राला गती देत गॅरंटी दिली आहे त्याचे चित्र आज स्पष्ट झाले आहे.

2019 ला झालेल्या निवडणुकांमध्ये मोदीजींनी  (PM Narendra Modi) ज्या आश्वासनावर जनतेकडून मतांचे कर्ज घेतलं होतं, ते आश्वासन भाजपमधील नेते आणि मोदीजींनी आपल्या कामातून आपले कर्ज फेडले आहेत. जनता ही मोदीजींच्या आणि महायुती सोबत आहे. जसं जसं मोदीजींचे वादळ महाराष्ट्रात आणि देशात येईल, तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडाल्या शिवाय राहणार नाही. असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर करत महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.

मर्द मराठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

एकनाथजी शिंदे सारखा एक मर्द मराठा नेता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. देवेंद्रजींसारखा अष्टपैलू कर्तुत्वाचा धनी नेता या महाराष्ट्राला मिळाला आहे. अजित पवार सारखा पूर्णपणे काम करणारा उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आहे. राज्यातले डबल इंजिन सरकार मोदीजींचा नेतृत्वात आपला पूर्ण वेळ महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देत आहे. उलट उद्धव ठाकरेंना मझा एक प्रश्न आहे की, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता, तेव्हा तुम्ही अडीच वर्षात दोनच मंत्रालयात आणि विधिमंडळात झाले होते. आता खरा राज्याला न्याय देणारा मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे कि एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे जनता ही या महायुती सारकारच्या मागे उभी असल्याचे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही

एकनाथ शिंदे देवेंद्रजी आणि अजित दादा हे आपल्या राज्याचे चांगले बॅट्समन आहे. ते राज्यात चांगलं काम करत असल्याने याबद्दल महाराष्ट्राची जनता समाधानी आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुती लवकरच आपल्या जागा घोषित करेल. आमचं केंद्रीय नेतृत्व जी जागा ज्यांना घोषित करेल त्यांना 51 टक्क्यांनी निवडून आणणं, ही आमची जबाबदारी आहे. जो उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा राहील. मला शंभर टक्के विश्वास आहे अमरावती लोकसभेची जागा  51% मत घेऊन विजयी होईल. महाराष्ट्र आणि विदर्भात काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, अशी सध्या काँग्रेसची स्थिती असल्याचे देखील बावनकुळे म्हणाले. 

 महाराष्ट्रात अशा घटना होणे अपेक्षित नाही

एखाद्या घटनेमुळे महायुतीमध्ये काही फरक पडत नाही. अनावधानाने काही घटना घडतात. काही घटनांना कारण असतात. त्याची सखोल चौकशी गृहखात करत आहे. शेवटी आमची महायुती भक्कम आहे. अशा घटना यापूर्वी देखील महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्याचे उदाहरण देऊन झालेली घटना झाकता येणार नाही. हे महाराष्ट्राचे संस्कार नाही. ज्याप्रमाणे या घटना घडत आहे, ही गोष्ट आम्हाला मान्य नाही आहे.

अशी घटना या महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व नेत्यांनी स्वताला सांभाळलं पाहिजे. महाराष्ट्र साधुसंतांचा आणि वैचारिक प्रगल्भ असलेले राष्ट्र आहे. महाराष्ट्रात अशा घटना होणे अपेक्षित नाही आहे. या घटनेतून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. शेवटी गृहखात सखोल चौकशी केल्यानंतर जो काही रिपोर्ट देईल त्यावर कारवाई केल्या जाईल. असे देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोळीबार प्रकरणावर भाष्य करत आपले मत स्पष्ट केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; चालकासह सहा जनावरांचा मृत्यू

अवैध जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; चालकासह सहा जनावरांचा मृत्यू


Amravati News : दर्यापूर ते अकोला (Akola) मार्गावरील गोळेगाव फाट्याजवळ अवैध जनावरे (Cow Smuggling)  घेऊन जाताना वाहन उलटून अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात वाहन चालकासह वाहनातील सहा जनावरांचाही मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने वाहन असल्याने टायर फुटल्याने ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून वाहनाला जेसीबीच्या माध्यमातून रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आलं. घटनेचे माहिती मिळताच दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि  या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू केली आहे.

वाहन चालकासह 6 जनावरांचा मृत्यू

या दुर्दैवी घटनेनंतर दर्यापूर ते अकोला मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अवैध जनावरांच्या वाहुतुकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.  अशातच दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान, जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरु आहेत. मात्र या घटनेत वाहन चालकासह निष्पाप 6 जनावरांचा मृत्यू झाला असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  

समृद्धी महामार्गावर गायींची तस्करी

काही दिवसांपूर्वीच  समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गो तस्करीचं प्रकरण समोर आलं होत. वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर 50 पेक्षा जास्त गाई आढळल्या. या घटनेनंतर महाराष्ट्राची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का? असा प्रश्न  उपस्थित होत आहे.समृद्धी महामार्गाच्या वर्धा जिल्ह्यातून जाणाऱ्या भागात एक ट्रक 29 जानेवारीच्या दुपारी साडे बाराच्या सुमारास संशयास्पदरीत्या प्रवास करताना दिसून आला. त्यामुळे वर्धा पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरू करताच तो ट्रक आणखी जास्त वेगानेने पळू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला. 

पोलिसांनी अतिरिक्त कुमक बोलावून ट्रकला थांबवण्याचे प्रयत्न केले. तीन ठिकाणी असलेली नाकाबंदी तोडून तो ट्रक नागपूरच्या दिशेने पळाला. त्याच वेळेस अकोल्यावरून नागपूरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या शिवसेनेच्या अकोला जिल्ह्यातील युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना तो ट्रक दिसला. त्यांनीही त्याचा पाठलाग सुरू केला. अनेक वाहन पाठलाग करत असताना  त्या ट्रकने नागपुर जिल्ह्यात प्रवेश करत समृद्धी महामार्ग सोडले. हिंगणा तालुक्यात एका निर्जन ठिकाणी ट्रक सोडून ट्रकमधील तिन्ही लोक पडून गेले. जेव्हा पोलिसांनी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या ट्रकला उघडले तेव्हा त्यामध्ये 50 पेक्षा जास्त गाई अत्यंत दाटी-वाटीने कोंबून बांधण्यात आल्याचे दिसून आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

गँगस्टर बिश्नोईच्या संपर्कातील टोळी जेरबंद; अवैध शस्त्रसाठ्यासह तिघांना केली अटक

गँगस्टर बिश्नोईच्या संपर्कातील टोळी जेरबंद; अवैध शस्त्रसाठ्यासह तिघांना केली अटक


Akola Crime News अकोला: गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला (Akola Crime) पोलिसांनी अटक केली आहे. 25 वर्षीय शुभम लोणकर असे या अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव असून त्यासोबत इतर दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन पिस्टलसह 9 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत.

अकोला जिल्ह्यातील (Akola Crime ) अकोट शहर पोलीसांनी 16 जानेवारीला देशी पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं होत. 27 वर्षीय अजय तुकाराम देठे आणि 25 वर्षीय प्रफुल्ल विनायक चव्हाण या दोघांवर राहत्या घरून अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, या अवैध शस्त्रसाठ्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय टोळीशी जुळले असल्याचा संशय बळावला होता. अशातच आता पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.  

पार्सलमुळे सत्य आले समोर

अजय आणि प्रफुल्ल हे शुभम लोणकरच्या संपर्कात होते. काही दिवसांपूर्वी शुभमने या दोघांना एका अज्ञात व्यक्तीकडून पार्सल घ्यायला सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या व्यक्तिकडून पार्सल घेतलं. हे पार्सल होत देशी पिस्टलचं. दोघांनाही याबाबात काहीही कल्पना नव्हती, मात्र घरी नेल्यानंतर त्यांनी पार्सल ओपन केलं अन् थेट त्यामध्ये दोन पिस्टल दिसल्या.  पिस्टल बघतांच दोघांना जबर धक्का बसला आणि ते दोघेही घाबरले. त्यानंतर त्यांनी याबाबत शुभमला फोन करून याबाबत विचारणा केली. मात्र त्याने फार प्रतिसाद दिला नाही.

त्यानंतर देखील त्यांनी शुभमला वेळोवेळी फोन करून ते पार्सल नेण्यासाठी सांगितले. मात्र तो तेव्हाही आला नाही. अखेर या बाबत पोलिसांना गुप्त महितीद्वारे ही बाब कळली पोलिसांनी अजय आणि प्रफुल्ल या दोघांना त्याच्या राहत्या घरून अटकेची कारवाई केली. तपासात मात्र याबाबत सत्यता बाहेर आली आणि पिस्टल बोलवणाऱ्या शुभम लोणकरचा देखील शोध पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत शुभमला पुण्यातील वार्जे शहरातून अटक केली. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून तो पुण्यातील वार्जे शहरात वास्तव्यास होता. 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई अनेक व्हिडीओ कॉल

पोलिसांनी शुभम लोणकरची कसून चौकशी केली असता पोलिसांपुढे धक्कादायक माहिती समोर आली. शुभम हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात होता. शुभम आणि त्या दोघांच्या संपर्काचे अनेक व्हिडिओ कॉल, फोन रेकॉर्ड आणि इतर माहीत पोलिसांच्या हाती लागली. ज्यामध्ये दुबईसह अनेक इंटरनॅशनल गुन्हेगारासोबत शुभमचा कॉन्टेक्ट होता. तसे फोन कॉल आणि इतर माहिती पोलिसांना तपासात मिळाली असल्याची माहिती अकोल्याच्या पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. विशेष म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तुरुंगात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

काँग्रेस नेत्यांवर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले….

काँग्रेस नेत्यांवर टीका करताना भाजप खासदार अनिल बोंडे यांची जीभ पुन्हा घसरली; म्हणाले….


Amravati News अमरावती : भारतीय जनता पार्टीचे (BJP) राज्यसभेचे खासदार  डॉ. अनिल बोंडे (MP Dr. Anil Bonde) यांनी काँग्रेस नेत्यांवर (Congress) टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता बळावली आहे. तिवसा मतदारसंघ काँग्रेसच्या जंगली प्राण्याने उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये हे काँग्रेसचे डुक्कर घुसतात त्यांना झटका लावलाच पाहिजे, अशा शब्दात बोंडे यांनी काँग्रेसवर (Congress) प्रखर टीका केली आहे. अमरावतीच्या (Amravati News) तिवसा शहरात कबड्डी सामन्याच्या उद्घाटन सोहळ्यात बोंडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. 

…त्यांना झटका लावलाच पाहिजे

सध्या राज्यात आणि देशात निवडणुकांचे वारे वाहत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी जवळजवळ सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली असून जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक तर कुठे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचे चित्र आहे. अशातच भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे हे पुन्हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. अमरावतीच्या तिवसा शहरात कबड्डी सामन्याच्या उदघाटन सोहळ्यात बोंडे यांनी काँग्रेसवर टिका करताना बोंडे यांची जीभ घसरली आहे.

यावेळी अनिल बोंडे म्हणाले, ‘आज सोलर झटका मशीन, डास झटका मशीन उपलब्ध आहेत. या मशीनचा वापर जंगली डुक्कर, जंगली प्राणी शेतात, रानावनात आले तर त्यांना झटका देण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे तुमचा तिवसा मतदार संघ पूर्णपणे काँग्रेसच्या जंगली प्राण्यांनी उद्ध्वस्त केला आहे. ज्याप्रमाणे डास सोलर झटका मशीन आहे, डास झटका मशीन आहे, त्याचप्रमाणे आता या तिवसा मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये हे काँग्रेसचे जे डुक्कर घुसतात ना त्यांना झटका लावलाच पाहिजे. तेव्हा कुठे संपूर्ण महाराष्ट्राची प्रगती आहे. तेव्हाच पूर्ण देशाची प्रगती आहे. अशा शब्दात खासदार डॉ. अनिल बोंडे यानी काँग्रेसवर प्रखर टीका केली आहे. त्यांच्या या वक्तव्यांनंतर पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता बळावली आहे. 

डॉ अनिल बोंडे यांच्या डोक्यात फरक पडला आहे – यशोमती ठाकूर

अनिल बोंडे कायम वाद-विवाद करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. याआधी त्यांनी मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं, आता त्यांनी काँग्रेसवाल्यांना डुक्कर म्हटलं, त्यामुळे त्यांची संस्कृती आणि वागणं यातून दिसत आहे. डॉक्टर बोंडे हे सुशिक्षित आहे, शिकलेले आहे की नाही कळायला मार्ग नाही. पदोपदी तुम्ही महिलांचा अपमान करता तुमचा पक्ष तुम्हाला हेच शिकवतं का, असा प्रश्न आमदार यशोमती ठाकूर यांनी विचारत खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर टीका केली आहे.

याआधी आमच्या युवक काँग्रेसने त्यांची मेंटल हॉस्पिटलमध्ये नोंद केली होती. आता अनिल बोंडे ते सिद्ध करत आहे. खरच त्यांच्या डोक्यात फरक पडला आहे. एका साध्या शेतकऱ्यांच्या पोरांना त्यांना पाडले आहे, त्यांना जे आज खासदारकीचे  गिफ्ट मिळाल आहे ते कॉन्ट्रोव्हर्सी करून मिळाला आहे. दंगली करवत, स्वतःसाठी बक्षीस मिळवतात. त्यामुळे असे वाद-विवाद करून चर्चेत राहण्याचा ते प्रयत्न करत असल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

सर्वेक्षणाच्या नावाखाली तहसीलदारांच्या घरी दरोडा; पोलिसांनी अवघ्या 60 तासांत लावला छडा

सर्वेक्षणाच्या नावाखाली तहसीलदारांच्या घरी दरोडा; पोलिसांनी अवघ्या 60 तासांत लावला छडा


Amravati Crime Newsसर्वेक्षणाच्या नावाखाली काही अज्ञातांनी अमरावतीच्या  (Amravati News) नायब तहसीलदारांच्या घरात शिरत चाकूचा धाक दाखवून लूट केल्याची खळबळजनक घटना घडली होती. 30 जानेवारीच्या भरदिवसा घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू केले असता अवघ्या 60 तासांत पोलिसांनी 5 संशयित आरोपींना अटक केली आहे. या संशयित आरोपींकडून देशी कट्टा, चाकू आणि चोरीला गेलेला एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सर्वेक्षणाच्या नावाखाली भरदिवसा दरोडा 

अमरावती शहरातील राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या. दरम्यान काही अज्ञातांनी सर्वेक्षणाच्या नावाखाली घरात शिरून विचारपूस सुरू केली. त्यानंतर त्यांनी महिलेकडे पिण्यास पाणी मागितले आणि अचानक त्यांनी चाकू आणि देशी कट्याचा धाक दाखवत महिलेच्या अंगावरील दाग दागिन्यांसह घरातील रक्कम असा एकूण 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

महिलेने प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला. आवाज ऐकून शेजारचे धावत आले असता, त्या महिलेने सर्व प्रकारची माहिती दिली. त्यानंतर जमलेल्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. भरदिवसा एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरात अशी घटना घडणे ही पोलीस आणि प्रशासनासाठी गंभीर बाब असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी कारवाईचे वेग वाढवत सखोल तपास सुरू केला. 

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून संशयितांचा छडा 

अमरावती पोलिसांनी आठ पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात सुरुवात केली असता या परिसरात लागलेले जवळजवळ शंभर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही संशयित व्यक्ती आढळून आल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे डीबी पथक आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने या प्रकरणातील एका संशयित व्यक्तीला शहरातील रद्दीपुरा परिसरातून अटक केली.

या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने ही चोरी केल्याचे कबूल केले असून इतर चार संशयितांना देखील पकडण्यात आले आहे. यातील एक जण नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरात ड्रायव्हर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने अनेक वर्ष अडसुळे यांच्या घरात काम केल्याने त्याला घरातील बऱ्यापैकी माहिती असल्याचे तपासातून समोर आले आहे.  

दिपक रमेश इंगोले (40, रा. रद्दीपुरा), उमेश उत्तमराव गवई (35, रा. मोजखेडा पो. स्टे. चांदुर बाजार जि. अमरावती),  विनोद छोटेलाल सोनेकर (37, रा. बडचितोलो तहीसील पांढरणा जि. छिंदवाडा) , महेंद्र विठोबा निरवाडे (40, रा. करजगांव ता. वरूड जि. अमरावती), पंकज रामप्रसाद यादव (34, रा. भानखेडा जि. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp