शिवसैनिकाला चॅलेंज करू नका; भुजबळांना शिवीगाळ प्रकरणानंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया; म्हणाले…. 

शिवसैनिकाला चॅलेंज करू नका; भुजबळांना शिवीगाळ प्रकरणानंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया; म्हणाले…. 


Akola News अकोलाशिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal)  शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या कथित शिवीगाळ ऑडिओ क्लिपनंतर मंत्री छगन भुजबळांनी गायकवाड यांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र डागले होते. आता त्यांच्या या टीकेला संजय गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.

भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या एकाच तालमीतले आहोत. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. आम्ही काही भुजबळांचा वैयक्तिक द्वेष करत नाही. तुम्ही राज्यातील 57 लाख लोकांना ओबीसीच आरक्षण  (Maratha Reservation) मिळताना तुम्ही त्याला विरोध करत असाल, तर आमचा देखील त्याला विरोध कायम असेल असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले. 

मराठ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये

शेवटी आम्ही कोण आहोत, आम्ही सुद्धा विदर्भात मराठा असून देखील ओबीसीमध्ये मोडतो. त्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करत आहात. आमचे म्हणणे आहे की, ज्या गोरगरीब मराठ्यांना गेल्या 70 वर्षात न्याय मिळाला नाही, जर आता तो न्याय मिळत असेल तर, त्यांच्या तोंडचा घास कोणीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये. आमचा व्यक्तिगत कुणालाही विरोध नाही. मात्र मराठा आरक्षणाला कुणाचा विरोध असल्याचे कारण नाही. आज राज्यात  57 लाख लोकांना ओबीसीच आरक्षण मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग या लढ्यातून मोकळा झाला आहे. छगन भुजबळांनी जर या आरक्षणाला विरोध केला तर आम्ही देखील तशीच भूमिका घेऊ, असे देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

संजय गायकवाड यांच्यावर छगन भुजबळ म्हणाले की, जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही. मी पण ते ऐकले आणि वाचले. ठीक आहे थोड वाईट वाटलं.  माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे. त्यामुळे तो आमदारांनादेखील आहे. याबाबत माझ काहीही म्हणणे नाही. ते आताही शिवसेनेचे आहे, म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, असा टोला छगन भुजबळांना संजय गायकवाड यांना लगावला. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

छगन भुजबळांना अश्लील शिवीगाळ; संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल

छगन भुजबळांना अश्लील शिवीगाळ; संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल


Akola News: अकोलाछगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या (Maratha Reservation) विरोधात जर भूमिका घेत असतील तर, त्यांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केले आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशातच आता आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. 

कथित ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळांनी आपला विरोध दर्शविला आहे. त्यांच्या या भूमिकेला विरोध दर्शवत सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य करत भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा,असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ताधाऱ्यांमधील वाद परत एकदा चव्हाट्यावर आला असून आणखी वाद पेटण्याचे चिन्ह आहे. या वादग्रस्त वक्तव्यानंतर कल्याण चे दुर्गेश बागुल यांनी आमदार गायकवाड यांना फोन करून याबत जाब विचारलं असता गायकवाड यांनी दुर्गेश बागुल यांच्यासह मंत्री छगन भुजबळांना अश्लील भाषते शिवीगाळ केल्याची कथित ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली आहे. मात्र अद्याप या क्लिप मागील सत्यता समोर आली नसली तरी या संभाषणामुळे नवा वादंग उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि दुर्गेश बागुल यांचे संभाषण  

दुर्गेश बागुल –  हॅलो 

आमदार संजय गायकवाड – हॅलो..

दुर्गेश बागुल – आमदार संजय गायकवाड यांचा नंबर आहे ना हा ..

आमदार गायकवाड – कोण बोलते ..

दुर्गेश बागुल – दुर्गेश बागुल बोलतो ..

आमदार गायकवाड – कुठून … 

दुर्गेश बागुल – कल्याण ..

आमदार गायकवाड – हा बोला ..

दुर्गेश बागुल – साहेबांनी आता काय स्टेटमेंट दिले ते ..

आमदार गायकवाड – दिलं ना** त्या भुजबळच्या .. माज आला त्याला … त्याचं *****… काय म्हणणे आहे तुह्यावाले…

दुर्गेश बागुल – साहेब हे तुम्ही चुकीचे बोलता …

आमदार गायकवाड – **** खानदान ही खतम करतो **** मी ..

दुर्गेश बागुल – साहेब ऐका हो ऐका …. .आम्ही सुद्धा शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ..

काय म्हणाले संजय गायकवाड?

महाराष्ट्रात बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला सापडलेल्या नोंदीनुसार आणि सगेसोयऱ्यांसह प्रमाणपत्र देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. पण मराठा आरक्षण विषयाच्या आमच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्कारची विषारी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळणार नाही अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहे. आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या. जवळ जवळ 39 लाख लोकांना सर्टिफिकेट देण्यात आले. परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याकरता छगन भुजबळांनी समाजामध्ये आवाहन केले आहे.

जेणेकरून मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला नको. परंतु भुजबळांना मला सांगायचं आहे की, ज्या 57 लाख नोंदी ओबीसींच्या सापडलेल्या आहेत, त्यांना कुणाचा बाप देखील आरक्षणापासून रोखू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ हे सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजावर विषयी विरोधी भूमिका घेत असतील तर माझे मुख्यमंत्र्यांकडे आवाहन असेल की,  भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय. 

अधिक पाहा..



Source link

union budget 2024 congress mla Yashomati Thakur Criticism on finance mnister nirmala sitharaman budget modi government maharashtra marathi news

union budget 2024 congress mla Yashomati Thakur Criticism on finance mnister nirmala sitharaman budget modi government maharashtra marathi news


अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या अतिशय पावरफुल्ल आहे, असे मला वाटलं होतं. आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना त्या छान घोषणा त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा मला होती. मात्र आता या अर्थसंकल्पानंतर असे वाटायला लागले आहे की, त्यांच्याही हातात काहीही राहिलेले नाही. त्यांच्यासमोर जो कागद येतो तो त्या वाचतात. त्याच्या पलीकडे त्यांनाही डोकं वापरण्याची मुभा नाही, अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur ) यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण याच्यावर टीका करत आजच्या अंतरिम अर्थसंकल्पावर भाष्य केले.

अतिशय फेलिअर असं बजेट

आजचा अर्थसंकल्प मोघम स्वरूपाचा झालेला आहे. इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून पाहिजे त्या घोषणा करत आहे. मात्र यात प्रत्यक्षात काहीच नाही. केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या अर्थसंकल्पात केले आहे. शेतकऱ्यांना निव्वळ चुना यात लावलेले आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी कुठेलेही नियोजन यात झालेले नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेले नाहीये. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव आहे तेवढेच आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कपाशीचे भाव आज एवढे खाली पडलेली आहे, एवढा कमी भाव याच्या आधी कधीच नव्हता. 2009 मध्ये 10 ते 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र आता अवघा चार हजारच्या खाली भावा देत आहे. हे बजेट अतिशय फेलिअर असं बजेट आहे. भविष्यासाठी इथं कुठलेही नियोजन झालेले नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी बोलताना दिली आहे. 

एकीकडे प्रत्येकाला म्हणत आहेत की, तुम्ही अयोध्येला जा. दर्शन करून घ्या. मात्र आज इथे बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताई साठी या बजेटमध्ये काही नाही, विदर्भासाठी तर काहीच नाही. आज राज्यात आशाताई,आंगणवाडी सेविकांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्यासाठी देखील फार काही या बजेट मध्ये नाही. एकंदरीत सर्वसामन्यांच्या, शेतकऱ्यांच्या दृष्टीने या बजेटमध्ये कुठलीही समाधानकारक बाब नसल्याचे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.

निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

– चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा
 
– डीबीटी (DBT) च्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला. 

– स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण

– पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी कर्ज दिले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले

– तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. 3 हजार नवीन आयआयटी उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

– आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे. 

– तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.

– शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.

– 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

– ग्रामीण भागातील 70 टक्के घरे महिलांना देण्यात आली. PM AWAS अंतर्गत 70 टक्के घरे महिलांना दिली.

– सर्व प्रकारचे पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत. येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील. 

– येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील, ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 कोटी घरे बांधली जातील, मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे.

– रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज

– अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार, ‘आशा’ कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ.

– गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढवले ​​जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.

– शेतीसाठी आधुनिक साठवण, पुरवठा साखळीवर भर, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देईल, मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाईल, सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे, सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य


Akola News: अकोला : मनोज जरांगे  (Manoj Jarange) यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकराने अध्यादेश काढत मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावला असल्याचे बोलले जात आहे. तर, आरक्षणासंदर्भात अधिसूचनेनंतर राज्यभरात जल्लोष साजरा केला जात असतानाच दुसरीकडे ओबीसी (OBC ) नेत्यांनी देखील आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विरोधात ओबीसी नेते एकवटले असून त्यांनी आव्हान देण्याची तयारी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळांना टीकेची झोड देखील सहन करावी लागत आहे. अशातच आता सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे आमदार  संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हे छगन भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेले आहे. 

कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा

एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही, असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. छगन भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही, असं आव्हान देखील गायकवाड यांनी भुजबळांना दिलंय.

काय म्हणाले संजय गायकवाड?

महाराष्ट्रात बहुसंख्या असलेल्या मराठा समाजाला सापडलेल्या नोंदीनुसार आणि सगेसोयऱ्यांसह प्रमाणपत्र देण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. पण मराठा आरक्षण विषयाच्या आमच्या मागणीपासूनच छगन भुजबळ यांनी तिरस्कारची विषारी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळेला मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र कसे मिळणार नाही अशाच प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले आहे. आज राज्यामध्ये 54 लाख नोंदी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे मिळाल्या. जवळ जवळ 39 लाख लोकांना सर्टिफिकेट देण्यात आले. परंतु त्यांना प्रमाणपत्र देऊ नये याकरता छगन भुजबळांनी समाजामध्ये आवाहन केले आहे.

जेणेकरून मराठा समाजाला हे आरक्षण मिळायला नको. परंतु भुजबळांना मला सांगायचं आहे की, ज्या 57 लाख नोंदी ओबीसींच्या सापडलेल्या आहेत, त्यांना कुणाचा बाप देखील आरक्षणापासून रोखू शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे. गेल्या 70 वर्षापासून ते या विषयाकरता वंचित राहिले आणि म्हणून भुजबळ हे सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजावर विषयी विरोधी भूमिका घेत असतील तर माझे मुख्यमंत्र्यांकडे आवाहन असेल की, त्यांना ताबडतोब घरचा रस्ता दाखवा, असं देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

माणुसकीला काळीमा! 23 वर्षीय तरुणीवर 5 नराधमांकडून सामूहिक अत्याचार; अपहरण करुन घरात कोंडलं मग शेतान नेऊन…

माणुसकीला काळीमा! 23 वर्षीय तरुणीवर 5 नराधमांकडून सामूहिक अत्याचार; अपहरण करुन घरात कोंडलं मग शेतान नेऊन…


Amravati Crime News : महाप्रसादाला नेतो असं सांगत तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार (Gang Rape) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील (Amravati News) हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावती (Amravati Gang Rape News) जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील मालखेडमधील (Malkhed) ही घटना आहे. तरुणीला महाप्रसादासाठी नेतो, असं तिच्या आईला सांगत आरोपीने तरुणीला दुचाकीवर बसवून नेलं आणि घरी कोंडून ठेवलं. त्यानंतर तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं बाईकवर बसवून शेतात नेलं आणि तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पाच जणांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मन सुन्न करणारी आहे.

23 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

महाप्रसादाच्या निमित्ताने 23 वर्षीय तरुणीला अमरावतीतील मालखेड येथे आणले आणि त्यानंतर परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे सर्व राहणार मालखेड अशी आरोपींची नावे आहेत. 

नेमकं प्रकरण काय?

आरोपी महेश वाघमारे हा पीडितेला लाहीकरिता म्हणजे महाप्रसादासाठी मालखेड (Malkhed) येथे घेऊन जातो, असे तिच्या आईला सांगून तरुणीला घेऊन गेला. आरोपीने पीडितेला रात्रभर त्याच्या घरी कोंडून ठेवलं. 28 जानेवारी रोजी तरुणीला तिच्या गावी सोडण्यासाठी आरोपी महेशने तिला दुचाकीवर बसवलं. मात्र, त्यानंतर आरोपीनं तरुणीला गावी न नेता दुसऱ्या आरोपीसोबत शेतात नेलं. आरोपी महेशने पिंटू हरले याला सोबतीला घेतलं आणि दुचाकीवर दोघे जण पीडितेला मालखेड शिवारातील शेतात घेऊन गेले. यानंतर दोघांनी शिवारात तिच्यावर अतिप्रसंग केला. यादरम्यान तिथे आणखी तीन आरोपी आले आणि त्यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याला पीडितने विरोध केला असता, आरोपींनी तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकंच नाही तर या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवे मारू अशी धमकीही आरोपींनी तरुणीला दिली होती. याप्रकरणी पीडितेने शेंदुरजनाघाट पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी वेळीच सूत्रे हलवत पाचही आरोपींना अटक केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..



Source link

Akola : अकोल्यामध्ये अफझलखानाचा वध दाखवल्यानं मागायला लागली माफी, होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रकार

Akola : अकोल्यामध्ये अफझलखानाचा वध दाखवल्यानं मागायला लागली माफी, होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रकार


Akola : अकोल्यामध्ये अफझलखानाचा वध दाखवल्यानं मागायला लागली माफी, होमिओपॅथी महाविद्यालयातील प्रकार
अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यात अफझलखानाच्या वधाचं दृष्य साकारणार्या विद्यार्थ्यांना माफी मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अकोल्यातील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात हा प्रकार घडलाय. अफझलखानाच्या वधाचं दृष्य दाखवल्यानं आपल्या भावना दुखानल्याचा आरोप एका विशिष्ट धर्मीय विद्यार्थ्यांनी केला होताय. त्यानंतर नाट्य सादर करणार्या विद्यार्थ्यांना माफी मागण्यास भाग पाडण्यात आलंय. दरम्यान, अकोल्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी आक्रमक होत दोषींवर कारवाईची मागणी केलीये. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp